loader

Nagpur News

नागपूर: हिवाळ्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आलीच तर वैद्यकीय यंत्रणेने सज्ज राहावे असे नमूद करत नागपूर जिल्ह्यामध्ये २० ऑक्टोबरपासून आरोग्य उपकेंद्र, तालुका आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड होऊन गेलेल्यांची तपासणी (पोस्ट कोविड ओपीडी) सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करताना पोस्ट कोविड रुग्णांसाठी १२ ते १ या कालावधीमध्ये विशेष ओपीडी सुरू करण्याच्या सूचना त्यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागपूर शहरात आज अवघ्या ३५ वर्षीय पोलिसाला करोनामुळे प्राण गमवावे लागले. ( Coronavirus In Nagpur Latest News Updates )

जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तथापि, आरोग्य सूत्रांच्या सूचनेनुसार दुसऱ्या करोना लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे. यासाठी जिल्हाभरातील आरोग्य, महसूल व अनुषंगिक यंत्रणेशी जिल्हाधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' हे अभियान तसेच 'माझे क्षेत्र, माझा पुढाकार' या योजनांमध्ये सर्व यंत्रणेने झोकून देऊन काम करावे, असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.

नागपूर: लकडगंज पोलिस स्टेशनसमोर जप्त ट्रक घेऊन चोरटा पसार झाला. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच ट्रक चोरी प्रकरणात चोरट्याला अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटताच त्याने पुन्हा हाच ट्रक चोरी केला. पोलिस स्टेशनसमोर उभा असलेला जप्त ट्रक चोरी जाण्याची शहर पोलिस दलाच्या इतिहासीतील ही पहिलीच घटना होय. संजय गोविंदराव ढोणे (वय ५२, रा.झिंगाबाई टाकळी),असे चोरट्याचे नाव आहे.
स्माल फॅक्टरी भागातील पुष्कर समाज भवनसमोर २० टन सळाखी असलेला सीजी-०४-जे-५०३७ या क्रमांकाचा ट्रक उभा होता. १० ऑक्टोबरला सळाखीसह ट्रक घेऊन ढोणे पसार झाला. संतोष पांडे (३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्हेशाखेच्या युनिट तीनने मोर्शी भागात ढोणे याला पकडले. ट्रक व ढोणे याला लकडगंज पोलिसांच्या स्वाधीन केले. लकडगंज पोलिसांनी ढोणे याची १५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली. त्यानंतर ढोणे याची जामिनावर सुटका झाली. ट्रक पोलिस स्टेशनसमोरच उभा होता. मालकाने तेथे चौकीदार तैनात केला. जामिनावर सुटका झाल्यानंतर ढोणे याने ट्रक चोरीचा कट आखला. सोमवारी सकाळी ६ वाजता तो लकडगंज पोलिस स्टेशनसमोर आला.

चौकीदाराला धमकी देत ट्रक घेऊन पसार झाला. चौकीदार धावत पोलिस स्टेशनमध्ये गेला. ढोणे हा ट्रक घेऊन पसार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच ढोणे याचा शोध सुरू केला. वृत्त लिहिपर्यंत ढोणे व ट्रक पोलिसांना आढळला नाही.पोलिसांची चार पथके ढोणे व ट्रकचा शोध घेत आहेत.

नागपूर: महिला निराधार असल्याचा गैरफायदा घेऊन तिची दिशाभूल करत बाळाला परस्पर विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वर्धा येथील चाइल्ड लाइनकडे तक्रार आली होती. अधिकाऱ्यांनी महिलेची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली. महिलेचे हैदराबाद येथे नरेश चिकटे यांच्याशी लग्न झाले. तिथे मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन झाल्यामुळे तिच्या पतीने तिला तुरकमारी बुट्टीबोरी येथे त्यांच्या घरी घेऊन आला. तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. तो रोज दारू पिऊन महिलेला मारहाण करत असे. या त्रासाला कंटाळून महिलेने बुट्टीबोरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार केली होती. तिच्या पतीने तिला घराबाहेर काढले. ती त्यावेळी ६ महिन्यांची गर्भवती होती. अशा परिस्थितीत बुट्टीबोरी येथील एका महिलेने तिला तिच्या भोजनालयात आश्रय दिला. तिची प्रसूती होईपर्यंत काळजी घेतली. प्रसूती झाल्यावर तिचा परिचय प्रयाग डोंगरे नामक व्यक्तीशी झाला. त्याचे आश्रम असल्याचे तो सांगू लागला. त्यावरून ती त्याच्यासोबत गेली आणि पुनर्जन्म आश्रमात राहू लागली. दोन महिन्यांनी महिलेला तिचे आधार कार्ड काढायच्या बहाण्याने नागपूर येथे घेऊन गेला आणि एका दापत्याला तिचे बाळ दत्तक देण्यासाठी बेकायदा दत्तक पत्र तयार करून घेतले. महिलेकडून तिच्या बाळाला हिरावून घेतले व परस्पर बाळाला दत्तक दिले, अशी माहिती मिळाली. त्यावरून चाइल्ड लाइन वर्धा यांनी वर्धा येथील बालकल्याण समितीसमोर महिलेला हजर करण्यात आले. समितीसमोर आपबीती सांगितल्यानंतर, समितीने तातडीने बैठक घेऊन नागपूर येथील बालकल्याण समिती यांना पत्र दिले. चाइल्ड लाइनला संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.

नागपूर: राज्यात मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांच्या पत्रावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा हिंदुत्वाचा नवा वाद रंगला असला तरी, हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेकडेही सरकारने लक्ष दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय निवास व्यवस्था समिती स्थापन केली आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात नियोजित आहे. करोनाच्या संकटामुळे अधिवेशन व्हावे आणि होऊ नये, अशा बाजूने काही नेते, पक्ष व संघटना आहेत. असे असले तरी, दोन आठवड्याचा कार्यक्रम निश्चित केल्यानंतर आता सरकारने यापूर्वीच्या समितीत थोडे फेरबदल केले. अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आणि सोयी-सुविधांची देखरेख समितीच्या माध्यमातून होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विधानमंडळाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश आहे. विभागीय आयुक्त सदस्य सचिव आहेत.
या समितीच्या माध्यमातून अधिवेशनाची तयारी करण्यात येईल. वाहने अधिग्रहित करणे, भाड्याने घेणे, मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या कार्यालयास लागणारे साहित्य, विमान, रेल्वे आरक्षण, दूरध्वनी व्यवस्था, टपाल ने-आण, संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती, निवास व्यवस्थेचा आराखडा तयार करणे, निवास व्यवस्थेत बदल वा अतिरिक्त मागणी आदी अनेक मुद्यांवर समिती निर्णय घेईल. अधिवेशनाच्या एक महिना आधी म्हणजे दिवाळीपूर्वी समितीची बैठक अपेक्षित आहे. त्यात चर्चा करून व्यवस्थेच्या नियोजनावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

नागपूर: सेवाकाळात मृत कर्मचाऱ्यांच्या जागेवर अनुकंपा यादीत दिलेले नाव बदलवून दुसऱ्या वारसाचे नाव दाखल करून घेण्याची तरतूद नसल्याच्या कारणावरुन यादीतून काढून टाकलेल्या ९ उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला. त्या उमेदवारांची नावे पुन्हा यादीत घेण्याचे आदेश दिलेत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेमधील सेवेत असताना मृत पावलेल्या कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नी किंवा पतीने अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून अर्ज सादर केले होते. त्यानुसार त्यांची नावे अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी तयार केलेल्या प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात आला होता. दरम्यान अनेक वर्ष नियुक्ती न मिळाल्याने विधवा पत्नी या वयोमर्यादा उलटल्याने अपात्र झाल्याने किंवा मुले १८ वर्ष पूर्ण झाल्याने आधीच्या नावांच्याऐवजी त्यांच्या मुलांची नावे यादीत दाखल करण्यात आली. परंतु दिनांक २० मे २०१५च्या शासन निर्णयानुसार अशाप्रकारे नाव बदलता येत नसल्याचे कारण देत मुलांची नावे काढून यादीत विधवा पत्नीची नावे पुन्हा नोंदविण्यात आली. नंतर वयोमर्यदा झाल्याचे कारण देऊन त्यांची नावे अपात्र करण्यात आली होती. सदर निर्णयाला सुमित कांबळे आणि शुभम राऊत या उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. अनुकंपा यादीतील नावांचा बदल हा शासन निर्णय लागू होण्यापूर्वी झालेला आहे. त्यामुळे पूर्वलक्षीप्रभावाने त्या निर्णयाची अंमलबजावणी करता येणार नाही, असे नमूद करीत प्रतीक्षा यादी पूर्ववत करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. याचिकाकर्त्याच्यावतीने अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली.

नागपूरः शहर आणि जिल्ह्याभोवती करोना विषाणू संक्रमणाच्या साखळीचा विळखा सलग आठव्या महिन्यातही कायम आहे. सुदैवाने आठवडा सुरू झाल्यापासून विषाणू बाधितांची शृंखला सैल होत आहे. तर दुसऱ्या बाजुला समाधानाची बाब म्हणजे विषाणू लागण झाल्यानंतर उपचाराने बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८९८ नव्या बाधितांची भर पडली तर १४२५ जण लक्षणातून बाहेर पडल्याने सुखरूप घरी परतले. या घडामोडीत आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या २३ जणांच्या मृत्यूची नोंद जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. आज आजाराची बाधा होऊन दगावलेल्यांमध्ये १५ जण शहराच्या, ३ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर ५ जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते.

करोनाची बाधा झाल्याच्या संशयातून आज संपूर्ण जिल्ह्यात ७७८५ संभाव्य रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. यातील ४५५६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली. तपासलेल्या एकूण संशयितांपैकी ६८८७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना करोनाची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाले. तर ८९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. शहरातील विविध निदान केंद्रांमध्ये नव्याने करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झालेल्यांपैकी खासगी लॅबमधून ३९५, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ३४२, मेयोतून ६७, एम्समधून ३९, निरीतून ३५, माफ्सूतून १९ तर मेडिकलमधून केवळ एकाच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोनाचा अंश सापडला. त्यामुळे आतापर्यंत विषाणू बाधित झालेल्यांची संख्या आता ८३,१०५ पर्यंत पुढे सरकली आहे.

नागपूर: खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार देता येतील काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे. त्यावर मंगळवारी सरकार उत्तर सादर करणार आहे.उपराजधानी नागपुरातील वाढत्या करोना मृत्युदराची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या करोनाबाधितांवर मोफत उपचार व्हायला हवेत, अशी अपेक्षा न्या. रवी देशपांडे यांनी व्यक्त केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी उत्तर सादर केले. त्यात राज्य सरकारच्या योजनेनुसार ३१ खासगी आणि नऊ शासकीय रुग्णालयांत करोनाबाधितांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत, असे नमूद केले होते. तसेच खासगी रुग्णालयांत करोना उपचारासाठी येणारा खर्चही सरकारकडून देण्यात येतो. ही योजना शहरातील इतरही खासगी रूग्णालयांनी स्वीकारल्यास त्यांनाही योजनेंतर्गत करोनाबाधितांवर मोफत उपचार करता येतील, असे नमूद करण्यात आले. तेव्हा हायकोर्टाने इतर खासगी रुग्णालये व राज्य सरकार यांना सदर योजना अमलात आणता येईल काय, अशी विचारणा केली आहे. तसेच यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चाधिकार समितीनेही विचार करावा, खासगी रुग्णालयात करोनाबाधितांना मोफत उपचार मिळतील, त्यासाठी प्रयत्न करावे व चर्चा करावी, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

नागपूर: उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील घटनेनंतर विविध पातळीवरून तीव्र निषेध सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुली व महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला. उपराजधानीतील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी देऊन 'हाथरस' कधी थांबणार, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुतणे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. आयुश्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला.राज्यातील स्थितीही चिंताजनक असल्याने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर दिशा कायदा करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावून अंमलबजावणी करावी, अशी मागणी देशमुख दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात केली. त्यांनी सरकारला परत घरचा अहेर दिल्याने नवीन कायद्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बलात्कार आणि क्रुरतेने वागणुकीच्या व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सर्वत्र घडत आहेत. नागपुरमधील आकडेवारीवरून राज्यात दिशा कायद्याची गरज अधोरेखित होते. वाढते अत्याचार थांबवण्यासाठी नवीन कायदा हाच एकमेव उपाय असल्याचे आयुश्री व आशिष देशमुख यांनी म्हटले आहे

गेल्या ३ वर्षात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार वाढ झाली. २०१८ सालच्या तुलनेत २०१९ साली २१ टक्के गुन्हे वाढले. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन्स फ्रॉम सेक्सुअल ऑफन्सेस (पोक्सा) अंतर्गत गुन्ह्यांमध्ये नागपूर दहाव्या क्रमांकावर असणे ही चिंतेची बाब आहे. गेल्यावर्षी पोक्सांतर्गत २३१ गुन्हे दाखल झाले. अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या १११ घटना तर, ११७ मुलींवर तसे प्रयत्न झाल्याचे गुन्हे नोंदवले. २०१८ साली १९५ गुन्हे नोंदवले, त्यात ९१ अत्याचाराच्या घटना होत्या. महिलांवरील गुन्ह्यात नागपूर बाराव्या क्रमांकावर आहे. पोक्सोमध्ये व अल्पवयीन मुलींवर अत्याचारात दहावा, अत्याचाराचा प्रयत्न सहावा आणि अपहरणार सातवा क्रमांक गंभीर स्थिती दर्शवते. नागपुरात २०१८ साली १८ वर्षावरील ६९ तर, गेल्यावर्षी ७३ महिलांवर अत्याचार करण्यात आले. ३ वर्षात अशा घटनांमध्येही वाढ झाली आहे. २०१९ साली ११४४ प्रकरणे दाखल करण्यात आली. ११५५ महिलांना विविध प्रकारच्या अन्यायाला सामोरे जावे लागले. २२२ अत्याचार, ४०५ अपहरणाचे गुन्हे आणि सासरच्या मंडळींकडून त्रासदायक वागणुकीच्या १३६ गुन्ह्यांचा समावेश आहे. महिलांवरील अत्याचार संपणार केव्हा, असाही प्रश्न निवेदनात करण्यात आला.

नागपूरः उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नेपाळच्या तरुणीवर अत्याचार करुन तिला ब्लॅकमेल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जीवाच्या भीतीने तरुणी नागपुरात आल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला. पीडित २२ वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी युवक व त्याच्या मानलेल्या बहिणीविरुद्ध अत्याचार, विश्वासघातसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण जयपाल यादव (वय २५, रा. लखनौ) व सुफी विश्वकर्मा मूळ रा. नेपाळ, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये २२ वर्षीय तरुणी कामाच्या शोधात नेपाळहून दिल्लीला आली. तेथून ती नोएडाला गेली. येथे एका इव्हेंट कंपनीत कामाला लागली. याचदरम्यान तिची अन्य एका नेपाळी तरुणीसोबत मैत्री झाली. २०१९ मध्ये पीडित तरुणी मैत्रिणीसह सूरत येथे गेली. येथे पीडित तरुणी एका हॉटेलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करु लागली. दरम्यान तिची सुफीसोबत ओळख झाली.

सुफीही मूळ नेपाळची असल्याने दोघींची मैत्री झाली. माझा मानलेला भाऊ प्रवीण हा दुबईत सॉफ्टवेअर इंजीनिअर असल्याचे तिने सांगितले. पीडित तरुणीसोबत त्याचे व्हीडिओ कॉलद्वारे बोलणेही करुन दिले. प्रवीण याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. दरम्यान जानेवारी २०२० मध्ये सुफी ही पीडित तरुणीला घेऊन लखनौ येथे आली. तरुणीने विश्वासाने सुफीकडे दीड लाख रुपये व दोन मोबाइल दिले. लखनौमध्ये आल्यानंतर दोन महिन्यांनी लॉकडाउन सुरू झाले. तरुणीला पैशाची गरज भासू लागली. तरुणीने सुफीला पैसे परत मागितले. सुफीने पैसे देण्यास नकार दिला. पीडित तरुणीचा छळ सुरू केला. पीडित तरुणीने कशीबशी ही माहिती प्रवीण याच्यापर्यंत पोहोचविली. प्रवीण याने तिला लखनौमधील एका हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. तरुणी हॉटेलमध्ये गेली. तेथे राहायला लागली.

नागपूर: ऑगस्टच्या अखेर आलेल्या पुरामुळे नागपूर जिल्ह्यासह विभागातील इतर जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांवर बेघर होण्याची वेळ आली, तर शेतजमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानभरपाई म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात नागपूर जिल्ह्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७९ हजार रुपयांचा निधी मिळाला आला.नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये ३०-३१ ऑगस्ट तसेच १ सप्टेंबर रोजी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दराने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी सांगितले. राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व नागपूर येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली होती.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी मदत करण्यात येईल. मृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत करणे, पडलेल्या घरांची निर्मिती, शेतकऱ्यांना मदत, मोफत केरोसीनचे वाटप आदी कामे या निधीतून करण्यात येणार आहेत.

...असा मिळाला निधी
जिल्हा : निधी
नागपूर : ४५ कोटी १७ लाख ७९ हजार
वर्धा : ६९ लाख
भंडारा : ४२ कोटी ४३ लाख ५३ हजार
गोंदिया : १२ कोटी ३२ लाख ४० हजार
चंद्रपूर : ३८ कोटी
गडचिरोली : २४ कोटी ३७ लाख २९ हजार

नागपूर: हाथरस परिसरातील घटनांचे पडसाद गुरुवारी उपराजधानीत उमटले. काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.'राहुल गांधी के सन्मानमे काँग्रेस मैदान मे', 'योगी सरकार मुर्दाबाद' अशा घोषणा देत ठाकरे समर्थक गटाने देवडिया भवनसमोर तर, युवक काँग्रेसच्या एका गटाने गणेशपेठेतील भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. मुलीवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न उत्तरप्रदेश सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.

सरचिटणीस गजराज हटेवार व अॅड. अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक किशोर गजभिये, इरशाद अली, प्रा. दिनेश बानाबाकोडे, महेश श्रीवास, मोतीराम मोहाडीकर, राजेश पौनिकर, अॅड. अभय रणदिवे, श्रीकांत ढोलके, राज खत्री, अनमोल लोणारे उपस्थित होते.गणेशपेठेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसिफ खान यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून पुतळ्याचे दहन करण्यात आले. आंदोलनात वसीम शेख, सागर चव्हाम, इरफान काजी, स्वप्निल ढोके, अक्षय घाटोळे, ग्रामीणचे अध्यक्ष राहुल सिरीया, आकाश गुजर, हेमंत कातुरे सहभागी झाले होते.

नागपूर: अश्लील छायाचित्र व चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रियकराने हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्यानंतर भावाच्या मदतीने तिला ब्लॅकमेल करून साडे सात लाख रुपयेही उकळले. ही खळबळजनक घटना अजनी येथे उघडकीस आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी दोन भावांविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मोहित दिनकर येरपुडे (वय २४) आणि प्रणय दिनकर येरपुडे (वय२१, दोन्ही रा. महाल), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ( Nagpur Crime Latest Updates ) पीडित तरुणीच्या आईचा व्यवसाय आहे. मोहित हा तरुणीचा वर्गमित्र आहे. मोहितने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याचे छायाचित्र व चित्रफित त्याने तयार केली. ती व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला ब्लॅकमेल करायला लागला. सराफाचे दुकान सुरू करण्यासाठी मोहित व त्याच्या भावाने तरुणीच्या आईकडून साडेसात लाख रुपये घेतले. काही दिवसांपूर्वी मोहित याने लग्नास नकार दिला. पैसेही परत केले नाहीत. त्यानंतर तरुणीने अजनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नागपूर, पत्नीच्या विरहात पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना वाठोड्यातील पवनशक्तीनगर येथे घडली. चंद्रशेखर पुरी (वय ३५),असे मृतकाचे नाव आहे. ते खासगी काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी चंद्रशेखर यांचे लग्न झाले. दोन आठवड्यापूर्वी करोनामुळे त्यांच्या पत्नीने निधन झाले. तेव्हापासून ते तणावात होते. बुधवारी रात्री चंद्रशेखर यांनी विष प्राशन केले. नातेवाइकांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नागपूर: करोना विषाणूचा विळखा जिल्ह्याभोवती अंशत: का होईना शिथील होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून जीव टांगणीला लागलेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात ४,१६१ संशयितांच्या घशातील स्राव नमुना तपासला गेला. त्यापैकी ८६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सरासरीच्या तुलनेत ही टक्केवारी आता २० टक्क्यांवर कमी झाली आहे. या घडामोडीत सोमवारी दिवसभरात करोनाची लागण झालेल्या, पण उपचाराने लक्षणे कमी झालेल्या १,४३१ जणांनी आजारातून मुक्ती मिळविली. त्यामुळे आजवर आजारमुक्त झालेल्यांची संख्याही रविवारच्या तुलनेत दीड टक्क्याने वाढून ८९ टक्क्यांवर म्हणजे ६० हजारांच्या उंबरठ्यावर ५९,६९७पर्यंत गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५,६८३ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ८९ टक्के रुग्ण विषाणूमुक्त झाले आहेत. समाधानाची दुसरी बाब म्हणजे, सोमवारी दिवसभरात उपचार घेत असलेल्या ३० जणांनी अखेरचा श्वास घेतला. त्यातील १७ जण हे महापालिका, नऊजण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर चारजण जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात १३ हजार ५७३ सक्रिय करोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातील ९,९९२ जण शहराच्या हद्दीतील तर ३,५८१ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. सोमवारी आजारमुक्त झालेल्यांमध्येही २८१ रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान करण्यात आलेल्यांमध्ये २५५ खासगी प्रयोगशाळेतून पॉझिटिव्ह आले. त्याखालोखाल अँटिजन चाचणी केलेल्या १,५६१ जणांपैकी १९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेयोतून १८०, मेडिकलमधून ११०, नीरीतून ६७, एम्समधून ५३ जणांच्या घशातील स्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळल्याचे निदान करण्यात आले.
 

नागपूर: लग्नाची संपूर्ण तयारी झाली. वधू-वर पक्षाकडील पाहुणेही सभागृहात येऊन बसले. सजून धजून वर-वधूही लग्नमंडपी पोहोचले. थोड्याच वेळात लग्न लागेल, अशी घोषणाही माइकवरून करण्यात आली. तोच पोलिस आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाची चमू लग्नस्थळी पोहोचली. मुलगी अल्पवयीन असल्याची घोषणा करीत लग्न थांबविण्यात आले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

जुनी कामठी परिसरातील इमलीबाग येथील सभागृहात सोमवारी ही घटना घडली. सकाळी ११ वाजता लग्न होणार होते. जिल्हा बालसंरक्षण कक्षाला ही माहिती मिळाली. कामठी पोलिसांना याची कल्पना देण्यात आली. लग्न लागणार, तेवढ्यात पोलिसांसह जिल्हा बालसंरक्षण कक्षाची चमू लग्नस्थळी पोहोचली. अचानक पोलिस आल्याने वधू-वरांकडील मंडळींनी काहीसा गोंधळ घातला. मुलीच्या जन्माचा दाखला सादर करण्यासोबतच विरोध करण्यात आला. मुलीकडच्यांनी रडायलाही सुरुवात केली. प्रशासनाने वधू आणि वर पक्षाकडील मंडळींची समजूत काढली. मुलगी १७ वर्षांचीच असल्याने तिचे लग्न करता येणार नाही, याची माहिती देण्यात आली. लग्न थांबविले नाही तरबालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. अखेर लग्न थांबविण्यात आले. मुलगी आपल्या पालकांसह घरी गेली. नवरदेवासह वरातीतील मंडळी आल्यापावली परतली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या चमूने ही कारवाई केली. संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा सोनटक्के, पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे, अंगणवाडी सेविका शारदा नगराळे आदींचा या कारवाईत समावेश होता. वर-वधूकडील मंडळींची समजूत काढण्यासाठी स्वत: तहसीलदार अरविंद हिंगे उपस्थित होते.

नागपूर: लता मंगेशकरांची गाणी म्हणजे अवीट गोडवा, भावपूर्णता आणि सुरांची श्रीमंती यांचा दैवी संगम. भारतीय मनावर वर्षानुवर्षे गारुड घातलेल्या या गानकोकिळेच्या सुरांच्या ऑनलाइन मैफलीचा पुरेपूर आनंद गानरसिकांनी शनिवारी घेतला. श्री सिद्धीविनायक पब्लिसिटी आणि मटा कल्चर क्लब यांच्या वतीने शनिवारी रात्री 'डायमंडस फॉरएव्हर : लता मंगेशकर-दर्जेदार मराठी गाण्यांची अविस्मरणीय मैफल' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लतादीदींच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त ही मैफल घेण्यात आली होती.

'गणराज रंगी नाचतो' या राधा ठेंगडी गायलेल्या प्रसिद्ध गणेशगीताने मैफलीला प्रारंभ झाला. त्यापाठोपाठ त्यांनी लतादीदींनी अजरामर केलेले 'मोगरा फुलला', तर आकांक्षा नगरकर यांनी 'सख्या रे घायाळ मी हरिणी' आणि 'श्रावणात घननिळा' ही गाणी सादर केली. 'चिंब पावसात रान', 'मी डोलकर', 'संधीकाली या अशा' ही सारंग जोशी यांच्यासह गायलेल्या युगल गाण्यांनीही या मैफलीत रंग भरला. या शिवाय, 'वादळ वारं सुटलं गं', 'वारा गाई गाणे', 'असा हा बेभान वारा',"सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'घन ओथंबून येती', 'ऐरणीच्या देवा',"मालवून टाक दीप', 'मेंदीच्या पानावर' ही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी गाणीदेखील राधा ठेंगडी आणि आकांक्षा नगरकर यांनी गायिली.

वृषाली देशपांडे यांनी आपल्या संदर्भसंपन्न निवेदनादरम्यान लतादीदींची गाणी आणि त्यांच्याशी जुळलेल्या घटना व किस्से यांनी मैफल फुलविली. की-बोर्डवर परिमल जोशी, व्हायोलिनवर अमर शेंडे, ऑक्टोपॅडवर नंदू गोहणे, तबल्यावर प्रशांत नागमोते आणि तालवाद्यांवर विक्रम जोशी यांनी साथसंगत केली.

नागपूर: एकीकडे आधीच वीजदरांमध्ये वाढ झाल्याने भरमसाठ वीजबिलांनी हैराण असलेल्या वीजग्राहकांना आता सततचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. आठवड्यातील कोणत्याही दिवशी आणि अगदी कोणत्याही वेळी वीज जात असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. विशेष दर्जेदार व अखंडित वीजपुरवठ्याचा दावा करणाऱ्या महावितरणला एकूणच परिस्थिती हाताळण्यात अपयश येत आहे. ऊर्जामंत्र्यांच्याच शहरात सतत हा त्रास होत असल्याने याबद्दल वीजग्राहकांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपासून अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांनी नागपूकरांना चांगलेच हैराण करून सोडले आहे. अगदी दहा मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने वीजग्राहकांची चांगलीच पंचाईत होत आहे. विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या एखाद्या विशिष्ट भागापुरती नसून शहरातील सर्वच भागांमध्ये हे होत असल्याने नागरिक सध्या हैराण आहेत. लॉकडाउननंतर सध्या परिस्थितीत सर्वत्र साधारण झाली असली तरी अजूनही घरून काम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, अचानक कुठलीही सूचना न देता वीजपुरवठा खंडित होत असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दिवसा वीजपुरवठा खंडित होण्याबरोबर रात्री व मध्यरात्री वीजपुरवठा खंडित होत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण आहे. शहरात थोडाही पाऊस किंवा वारा सुटला तरी अचानक वीजपुरवठा बंद होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर तक्रार केली तरी तो नेमका कधी सुरळीत होईल, हे नीट सांगण्यात येत नाही. रात्री-अपरात्री कधीही वीजपुरवठा खंडित होतो, अनेक तास सुरळीत होत नाही, याबद्दल वीजग्राहक आशीष काळे यांनी नाराजी व्यक्त केली.

नागपूर: शहर आणि जिल्ह्यात वेगाने वाढत असलेला करोनाचा विळखा दोन महिन्यांनंतर प्रथमच सैल होताना दिसत आहे. समाधानाची बाब म्हणजे, रविवारी दिवसभरात ५९० जणांना या आजाराने वेढा घातला. त्या तुलनेत अडीचपटींहून अधिक १,६५० करोनाबाधित आजारमुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आजवर करोनामुक्त झालेल्यांची संख्या आता ६० हजारांपासून अवघ्या दोन हजारांपासून दूर ५८,२६६वर स्थिरावली आहे. करोनामुक्तीचा हा सरासरी दर ७८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातून ५,३३७ संशयितांच्या घशातील स्राव नमुना तपासला गेला. त्यापैकी ४,७४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर ५९० जण पॉझिटिव्ह आले. नव्याने करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये सर्वाधिक १४५ नमुने एम्समधून, ११० नमुने मेयोतून, खासगीतून ९८, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ९०, मेडिकमधून ५५, नीरीतून ५४ तर माफसूतून ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
जिल्ह्यात सद्यस्थितीत १४,१७२ सक्रिय करोनाबाधित उपचार घेत आहेत. त्यातील १९,५४८ महापालिका हद्दीतील तर ३,६२४ जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. रविवारी आजारमुक्त झालेल्यांमध्ये ३३० ग्रामीणमधील तर १,३२० महापालिका हद्दीतील रहिवासी आहेत.

नागपूर:करोना आजारामुळे त्रस्त असणाऱ्या नागरिकांना अव्वाच्यासव्वा बिल आकारणी करणे, शासकीय निर्देशानुसार तपासणीचे पैसे न घेता अतिरिक्त शुल्क आकारणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. यासाठी प्रसंगी 'स्टिंग ऑपरेशन' सारखी आकस्मिक भेटीची गुप्त मोहीम राबवून खासगी हॉस्पिटल, खासगी करोना तपासणी लॅब तसेच खासगी प्लाझ्मा लॅबवर करडी नजर ठेवली जाईल. सामान्य नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. ( Anil Deshmukh Warns Covid Hospitals Over High Bills )

नागपूरमध्ये करोना मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' ही मोहीम घेऊन महाराष्ट्र करोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत अनेक खासगी रूग्णालये शासकीय नियमानुसार रुग्णसेवा करत आहेत, पण काही खासगी हॉस्पिटल, खासगी तपासणी प्रयोगशाळा, प्लाझ्मा प्रयोगशाळा याठिकाणी रुग्णांची लूट होत असल्याचे पुढे आले आहे. लोकप्रतिनिधी तसेच पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा वेळी शासकीय नियमाची पायमल्ली करून अतिरिक्ति पैशांची मागणी करणाऱ्या वैद्यकीय आस्थापनांना मोकळीक दिली जाणार नाही, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले

शहर जिस तरह कोरोना पाँजिटीव की संख्या बढ रही है इसी तरह अपराध भी बढते जा रहे है चोरी लुटमार हत्या जैसे मामले आए दीन सामने आ रहे है मगर शनिवार को जो शहर मे हुआ जिसे ये लग रहा है.की अब.अपराधियो मे पुलिस खौफ नही रहा शनिवार की दोपहर को शहर के भोले पेट्रोल पर चौक पर कुछ आरोपीयो ने एक व्यक्ती को मौत के घाट उतार दीया प्राप्त जानकारी नुसार मृतक व्यक्ति का नाम बाल्या उफ के किशोर बिनेकर बताया जा रहा है किशोर का शांती नगर मे सावजी भोजनालय है  शनिवार को वो अपने कार से सिताबडी थाना क्षेत्र के भोले पेट्रोल पंप रास्ते जा रहा था चौक के सिग्नल पर जब किशोर की गाडी रुकी तो पिछे से आए चार से पाच आरोपीयो शस्त्रो के साथ उस पर हमला बोल दीया ये पुरा मामला सी सी टीव्ही कँमेरा मे कैद हुआ है जो अब अपकी स्कीन पर चल रहा है दुश्य मे आप देख सकते हो की कीस तरह भरे चौराहे और भिड भाड वाले परिसर मे बेखौफ ये आरोपी किशोर पर हमला कर रहे है सभी ने अपने चेहरे नकाब के पिछे छुपा रखे है मगर जिस तरह इस वारदात को अजाम दीया गया जिस ये अनुमान लगाया जा सकता है की अब अपराधियो मे पुलिस का कोई खौफ नहीं रहा वारदात होते ही पुलिस अधिकारीयो का मेहखामा घटना स्थल पोहच गई पुलिस आरोपीयो की तलाश कर रही है.

 

नागपूर: ऑगस्टच्या अखेरच्या आठवड्यात आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागपूर विभागातील जिल्ह्यांसाठी आणखी १७० कोटी रुपयांची गरज असल्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.

३०, ३१ आणि १ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कन्हान, पेंच, बावनथडी, वैनगंगा व इतर उपनद्यांना पूर आल्याने पूर्व विदर्भात पुराचे संकट निर्माण झाले. यात शेतीचे नुकसान झाले असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. कुणाची घरे पडली, तर गुर ढोर वाहून गेली. हे नुकसान भरून काढण्यासाठी प्रशासनाकडूनही पंचनामे करण्यात आले. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत जाहीर करण्यात आली. पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्यांना सानुग्रह मदत, निराधार झालेल्या कुटुंबांना मोफत अन्न धान्य वितरित करणे, घर पडझडीच्या नुकसानीसाठी मदत यासह शेतपिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून मदत जाहीर करण्यात आली. सुमारे ७१ कोटींची ही मदत अपुरी असून आता पुन्हा १७० कोटी मिळावे यासाठीची प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नागपूरः कडकनाथ कोंबड्याचे पालन केल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल ११० शेतकऱ्यांची १६ लाख ४९ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी सांगलीतील मेसर्स महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संस्थापक व संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुधीर शंकर मोहिते व संदीप सुभाष मोहिते (दोन्ही रा. सांगली) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेतकरी विकास बलवंतराव मेश्राम (रा. गुमथळा, ता. कळमेश्वर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सुधीर व संदीप या दोघांनी शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्याचे पालन करण्यास सांगून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. दोघांनी शेतकऱ्यांसोबत करारही केला. ११० शेतकऱ्यांकडून १६ लाख ४९ हजार रुपये जमा केले. मात्र, शेतकऱ्यांना नफा दिला नाही व मूळ रक्कमही परत केली नाही. फसवणूक झाल्याने शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. या दोघांनी आणखीही काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती आहे. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी सिव्हिल लाइन्समधील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोलिस निरीक्षक मीना जगताप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नागपूर: 'उपराजधानीतील करोना मृत्युदर कमी करण्याच्या व्यापक जनहितासाठीच आपल्या कार्यकक्षेत राहून न्यायालयीन अधिकारांचा वापर करीत यंत्रणांना आदेश देण्यात येत आहे. ऑक्सिजन, जीवनरक्षक औषधी अथवा आरोग्य सेवा अपुरी पडल्याने जर कोणत्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर त्यासाठी संपूर्ण यंत्रणेला आम्ही जबाबदार धरू', अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने प्रशासकीय अधिकाऱ्यांना इशारा दिला.

शहरातील करोना मृत्युदर कमी करण्यासाठी हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यापूर्वी न्यायालयाने विविध आदेश दिले आहेत. तर त्या आदेशांच्या पूर्ततेची अपेक्षा न्यायालयाने प्रशासकीय यंत्रणेकडून व्यक्त केली.

न्यायालय म्हणाले, 'करोना मृत्युदर कमी करण्यात येणाऱ्या सगळ्या समस्यांवर विविध प्रशासकीय यंत्रणांनी सहमतीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्याचवेळी आम्ही सगळया यंत्रणांच्या निदर्शनास आणून देत आहोत की आम्ही जनहितसाठी बसलो आहोत, आणि न्यायालयाचे अधिकार त्यासाठी वापरत आहोत. लोकांचे प्राण वाचविण्यासाठी न्यायिक अधिकारांचा वापर करीत आहोत. जर प्रशासकीय यंत्रणा सहमतीने काम करणार नसतील तर सगळ्या समस्यांवर कायद्यानुसार तोडगा काढता येतो', असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

नागपूर: बुधवारी नागपुरात १,२९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली. एकूण बाधितांचा आतापर्यंतचा आकडा आता ६७ हजार ६७१ झाला आहे. उपराजधानीत मृत्यूचे सत्र थांबत नसून बुधवारीही ५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या २ हजार २०५ झाली आहे.

बुधवारी ४ हजार ७७६ तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाला. १,२९१ जण करोनाबाधित असल्याचे आढळले. यात शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४५ असून ग्रामीणमधील ३३८ रुग्ण आहेत. ८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ६७ हजार ६७१ करोनाबाधितांमध्ये शहरातील ५३ हजार ५६८ आणि ग्रामीणमधील १३ हजार ७१६ रुग्ण आहेत.

७६.७१ टक्के रुग्ण बरे
एकूण बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत ५१ हजार ९१२ रुग्ण बरे झाले आहेत. यातील ३२ हजार २९२ रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे झालेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७६.७१ टक्के झाली आहे.

माफसू पुन्हा सुरू
गेल्या काही दिवसांपासून माफसू येथील तपासण्या बंद होत्या. मनुष्यबळाच्या कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे तपासण्या बंद ठेवण्यात आले असल्याचे माफसू येथील सूत्रांकडून सांगण्यात येत होते. आता पुन्हा सुरू झाल्या असून बुधवारी माफसूत ८४ तपासण्या करण्यात आल्या.

नागपूर: बारमध्ये तोडफोड करुन रोख लुटणाऱ्या लुटारुंना जरीपटका पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करुन त्यांची अर्धनग्न अवस्थेत धिंड काढली. यावेळी महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणा नागरिकांनी दिल्या. या धिंडची चित्रफित बुधवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. आशिष प्रेम मसिहा (वय २१, रा. खापरखेडा), असे अटकेतील लुटारुचे नाव आहे. त्याचे पाच साथीदार अल्पवयीन आहे.

जुना जरीपटका बसस्थानक परिसरात श्रेयस संजय पाटील (वय २४ रा. ज्ञानेश्वर सोसायटी, मानकापूर) यांच्या मालकीचे रॉयल बार अॅण्ड रेस्टॉरेंट आहे. मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास श्रेयस पाटील यांचे वडील संजय पाटील, कर्मचारी गजानन मलिक रा. लुंबिनीनगर, किशोर उपाध्याय रा. राणी दुर्गावती चौक व गिरीश उपाध्याय रा. राणी दुर्गावती चौक हे बारमध्ये होते. याचवेळी सहा जण हातात तलवार व शस्त्र घेऊन बारमध्ये घुसले. पाटील व कर्मचाऱ्यांना तलवारीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. बारमधील साहित्याची तोडफोड करून काऊंटरमधील सात हजार रुपये लुटले व पसार झाले. या संपूर्ण घटनेची चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक खुशाल तिजारे यांच्यासह पोलिसांचा ताफा बारमध्ये पोहोचला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एक आठवड्यापूर्वी लुटारु हे बारमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी बारमध्ये बसून दारु प्यायला लागले. मालकाने नकार दिला. लुटारुंनी त्यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर बारमालकाला अद्दल घडविण्यासाठी लुटपाट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अटक व ताब्यात घेण्यात आलेले सर्व गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध खापरखेडा व यशोधरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

नागपूर: सध्या जिल्ह्यात ३५६ व्हेंटिलेटरची उपलब्धता आहे. भविष्यातील करोनावाढीचा वेग लक्षात घेता शासकीय व खासगी रुग्णालयातील ही सुविधा वाढविण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरची संख्या वाढवून समन्वय समिती स्थापन करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

डॉ. राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी सोमवारी मुंबई येथून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील स्थितीचा आढावा बैठक घेतली. या बैठकीला नागपूर येथून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्यासह महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके आदी उपस्थित होते. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलिस प्रशासन व जिल्हा परिषद यांमध्ये यापुढेही उत्तम समन्वय ठेऊन करोना नियंत्रित ठेवण्याचे निर्देश राऊत यांनी दिले.

नागपूर: गत सात महिन्यांपासून पोलीस करोना विरुद्ध लढा देत आहेत. पोलीस थकले असले तरी हरलेले नाहीत. या संकटाचा त्याच जोशाने पोलीस सामना करण्यासाठी सक्षम असल्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात पोलिसांसाठी १६ खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय निर्माण करण्यात आले. गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याहस्ते या स्वतंत्र रुग्णालयाचे सोमवारी ‘ऑनलाइन’ लोकार्पण झाले. यावेळी देशमुख बोलत होते. करोना बाधित असताना नितीन राऊत यांनी रुग्णालयातून या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन केले.

राज्य पोलीस दलातील २० हजार पोलीस अधिकारी कर्मचारी करोना बाधित झाले. २१७ अधिकारी कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारलं गेल्याने हा स्तुत्य उपक्रम ठरला आहे. याबाबतची मागणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केली होती. पालकमंत्री नितीन राऊत यांनी तात्काळ यासाठी निधी दिला आणि आठ दिवसांत अमितेशकुमार, प्रभारी पोलीस सहआयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, पोलीस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी १६ खाटांचे स्वतंत्र कोविड रुग्णालय निर्माण केले. नागपूरप्रमाणेच संपूर्ण जिल्ह्यातील मुख्यालयात पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची निर्मिती करण्याच्या सूचनाही देशमुख यांनी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांना यावेळी केली.
 

नागपूर: सोमवारी २ हजार ६७२ तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील १, ३५० नमुने पॉझिटिव्ह आढळले. यामुळे करोनाबाधितांचा आकडा आता ६५ हजार १०७ वर गेला. नागपुरात मृत्यूचे सत्र सुरूच असून, सोमवारी ४८ जणांचा करोनाने मृत्यू झाला.
सोमवारी बाधित झालेल्या १३५० जणांपैकी शहरातील १ हजार २३ आणि ग्रामीणमधील ३२२ नमुने पॉझिटिव्ह आले. बाधित आलेल्यांपैकी पाच नमुने जिल्ह्याबाहेरील आहेत. सोमवारी शहरात ३५ जणांना आणि ग्रामीणमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याबाहेरील पाच जणांचा नागपुरात मृत्यू झाला. सद्यस्थितीत ९ हजार ४६३ जणांवर उपचार सुरू असून, यात शहरातील ५ हजार ७६५ आणि ग्रामीणमधील ३ हजार ६९८ रुग्ण आहेत. ४ हजार २७९ जण घरीच उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील स्थिती
सोमवारचे पॉझिटिव्ह : १,३५०
एकूण पॉझिटिव्ह : ६५,१०७
सोमवारचे मृत्यू : ४८
आतापर्यंतचे मृत्यू : २,०९४
एकूण तपासण्या : ४,०१,७५९
८२ टक्के रुग्ण झालेत बरे

नागपूर: पीपीई किट न घालताच एका पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती करणाऱ्या सुजाता मून यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्या पुन्हा आता कामावर रुजू झाल्या आहेत. पाच दिवस क्वारन्टाइन राहिलेल्या सुजाता यांनी पुन्हा रुग्णसेवेला सुरुवात केली असून योग्य काळजी घेतली तर करोना होत नाही, असा संदेश देत नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

नंदनवन येथील निर्मलनगर येथे राहणाऱ्या सुजाता गेल्या सहा वर्षांपासून मेडिकलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. ११ सप्टेंबर रोजी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना त्यांचा नियमित राउंड सुरू होता. अचानक त्यांना लिफ्टजवळ महिलेचा ओरडतानाचा आवाज आला… त्या लगेच धावून गेल्या. प्रसूतीची वेळ आली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या गर्भवती महिलेला पहिल्या मजल्यावर लिफ्टने घेऊन जाण्याचाही वेळ नव्हता. गर्भवती महिला पॉझिटिव्ह होती, अशावेळी त्या महिलेजवळ कसे जायचे, हा विचार सुजाता यांनी न करता आईचा आणि बाळाचा जीव वाचविणे हेच आपले प्रथम कर्तव्य समजले आणि लिफ्टसमोरच प्रसूती केली. सुजाता यांच्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक झाले.

-तर करोना होत नाही!
करोना आता झपाट्याने पसरत आहे. या आजारातून अनेकजण बरे होत असले तरी आपल्यापर्यंत करोनाचे संकट येऊच नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. नियमित मास्क वापरा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवायला हवेत. शक्यतो बाहेर पडू नका, सुरक्षित अंतर ठेवा असा, सल्ला सुजाता यांनी दिला.

नागपूर: नागपुरात करोनामुळे रविवारी ५४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपुरात करोनामुळे झालेला मृत्यूंचा आकडा आता २ हजार ४४ झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ताण वाढत असल्याने मृत्युसंख्याही वाढत आहे. रविवारी १,२२६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ६३ हजार ७५७ झाली. यातील १२ हजार ७१६ रुग्ण ग्रामीणमधील आहेत.

रविवारी ५ हजार ७३२ तपासण्यांचा अहवाल प्राप्त झाला. यापैकी शहरात ९९३ आणि ग्रामीणमध्ये २२८ करोनाबाधित आढळले. यात ५ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९९ हजार ८७ तपासण्या झाल्या. रविवारी झालेल्या ५४ मृत्यूंपैकी ४० शहरातील असून, ९ ग्रामीणमधील आहेत. एकूण मृत्यूंपैकी शहरात १,५२३ आणि ग्रामीणमध्ये ३३७ मृत्यू झालेत. जिल्ह्याबाहेरील मृत्यूंची संख्या १८४ आहे.

जिल्ह्यातील स्थिती
रविवारचे पॉझिटिव्ह : १,२२६
एकूण पॉझिटिव्ह : ६३,७५७

रविवारचे मृत्यू : ५४

एकूण मृत्यू : २०४४
दैनिक तपासण्या : ५७३२
एकूण तपासण्या : ३,९९,०८७
बरे झालेले ८० टक्क्यांच्यावर

करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात प्रशासनाला यश येत नसले तरी करोनातून बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याने दिलासा देणारे आहे. रविवारी १,६१० रुग्ण करोनातून बरे झाले असून, आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ५१ हजार ५५६ आहे. यातील २९ हजार २५७ रुग्ण घरीच बरे झालेत. करोनातून बरे झालेल्यांची टक्केवारी आता ८०.८६ टक्के झाली आहे. सध्या अॅक्टिव्ह करोना रुग्ण १० हजार १५७ आहेत. शहरात ५ हजार ५७० आणि ग्रामीणमध्ये ४ हजार ५८७ रुग्ण सध्या अॅक्टिव्ह आहेत.

नागपूर: कोव्हिड काळात नागपुरात अधिवेशन घ्यावे की नाही, असा वाद रंगू लागला आहे. 'अधिवेशनावर होणारा कोट्यवधीचा खर्च टाळा, त्या निधीतून विदर्भात आरोग्यसोयी उभारा', अशी मागणी काही जणांनी केली आहे. 'आरोग्यसुविधेसाठी निधी तर द्याच, पण अधिवेशनदेखील घ्या. त्यानिमित्ताने विदर्भातील प्रश्न सरकारला कळतील, इकडील आरोग्यव्यवस्था दिसेल. त्यावर चर्चा होईल', असा सूर काही मंडळींनी लावला आहे. पूर्वी अधिवेशनात वाद गाजत. यावेळी अधिवेशनापूर्वीच वादाचे पडघम वाजू लागले आहेत.

नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन नेहमीच वादळी ठरते. काहींसाठी तो उत्सव असतो. त्यांची अनेक कामे मार्गी लागतात. काहींना मात्र अधिवेशन म्हणजे उधळपट्टी वाटते. नुसता खर्च होतो, निर्णय काहीच होत नाही, ही त्यांची तक्रार असते. अधिवेशनाच्या निमित्ताने नियमित कामांवर दरवर्षी किमान ७५ कोटी रुपये खर्च होतो, असा अंदाज आहे. विधानभवन, राजभवन, रामगिरी, देवगिरी, रविभवन, नागभवन आणि इतर कार्यालये व निवासव्यवस्था सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येते. डागडुजी, रंगरंगोटीवर १५ ते १८ कोटी रुपये खर्च केला जातो. तब्बल पाच दशकांनंतर २०१८ साली जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन झाले. अचानक आलेल्या विक्रमी पावसामुळे नव्याने तयारी करावी लागली. त्यामुळे कमी कालावधी असला तरी गेल्यावर्षी ७५ कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. मागील सहा वर्षांचा अढावा घेतला तर दरवर्षी सरासरी ११५ कोटी रुपये खर्च झाले असावेत, असा अंदाज अधिवेशनाशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केला.

नागपूर: नाटक हे येथील झाटीपट्टीतील दहा हजारांहून अधिक कलावंतांच्या आणि अन्य संबंधितांच्या जगण्याचे प्रमुख स्रोत आहे. झाडीपट्टीने कलावंतांना आईप्रमाणे आश्रय दिला. आपल्या कुशीत घेतले. पोटापाण्याची व्यवस्था केली. आज ती आईच रुसली, तर मुले जगतील कशी याचे उत्तर सरकारने द्यावे. या रंगभूमीला व्यवसायाची परवानगी द्यावी, अशी मागणी झाडीपट्टीतील प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक सदानंद बोरकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात खुले पत्र लिहिले आहे.या पत्रानुसार, पूर्व विदर्भात झाडीपट्टी रंगभूमीला दीडशे वर्षाचा समृद्ध इतिहास आहे. महाराष्ट्राच्या रंगभूमीचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम या रंगभूमीने केले आहे. दरवर्षी लाखो लोकांचे मनोरंजन आणि त्या माध्यमातून सामाजिक आणि बौद्धिक प्रबोधन करण्याचे पुण्यकाम येथील कलावंतांनी केले आहे. ऑक्टोबर ते मार्च या काळात गावोगावी सणासारखी नाटके सादर होतात. यामुळे इथल्या सांस्कृतिक परंपरेचे जतन तर होतेच, हजारो परिवारांचे जगणेही सुकर होते. कोट्यवधींची उलाढाल होते.

झाडीपट्टी रंगभूमीने अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातीलच नव्हे तर मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर येथीलही कलावंतांना आश्रय दिला आहे. जगण्याचे बळ दिले आहे. आजपर्यंत कुठल्याच सरकारने या रंगभूमीसाठी कवडीची मदत केली नाही. तरी कुणाकडे हात न पसरता ही रंगभूमी एखाद्या श्रीमंत इंडस्ट्रीप्रमाणे स्वाभिमानाने उभी राहिली. पण करोनाची नजर लागली. तोंडाला रंग फासले तरच पोट भरते. दुसरे कुठलेच मार्ग नाहीत. झाडीपट्टीच्या चार जिल्ह्यांत सुमारे शंभर नाट्यसंस्था कार्यरत आहेत. नट, नटी, पडद्यामागचे कलावंत, संगीतकार, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार, लेखक, रंगभूषाकार, गायक, वादक, नृत्यांगना आणि पेंडॉलचा व्यवसाय करणारे अशा साऱ्यांची अवस्था चिंताजनक आहे. करोनामुळे नाटकाचे सादरीकरणच होणार नसेल, तर हे सारे भिकेला लागतील.

नागपूर: 'ओबीसींना अद्याप आरक्षण मिळाले नसल्याने मराठा समाजाचा या प्रवर्गात समावेश करू नये,' अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करण्यासाठी नेत्यांचे प्रयत्न चालले आहेत. राज्याच्या अनेक जिल्ह्यात ओबीसींना १९ टक्के आरक्षण मिळालेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यात ११ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १४ टक्के, धुळे, नंदुरबार, नाशिक, रायगड, पालघर आदी जिल्ह्यात ९ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ६ टक्के अशी विसंगती दिसून येते. समाजावर होणार हा अन्याय तत्काळ दूर करावा. मराठा समाजाच्या आरक्षणाला महासंघाचा कुठलाही विरोध नाही. मात्र, मराठा समाजाला ओबीसीत सहभागी करू नये. यामुळे दोन्ही समाजावर अन्याय होईल, असेही डॉ. तायवाडे यांनी म्हटले आहे.

केंद्र व राज्य सरकारने जातनिहाय गणना करावी आणि नच्चीपन आयोगाच्या शिफारशी पूर्णत: लागू कराव्या, अशी मागणीही महासंघाचे कार्याध्यक्ष खुशाल बोपचे, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सरचिटणीस सचिन राजूरकर, शेषराव येलेकर, सुधाकर जाधवर, प्रा. शरद वानखेडे, खेमेंद्र कटरे, अॅड. रेखा बाराहाते, कल्पना मानकर, शकिल पटेल, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, गुणेश्वर आरेकर, श्याम लेडे, रोशन कुंभलकर, नीलेश खोडे आदींनी केली आहे.

नागपूर: करोनाचे वाढते संक्रमण पाहता पुकारण्यात आलेल्या दोनदिवसीय जनता कर्फ्यूला राजकीय स्वरूप मिळाले. त्याचा परिणाम शनिवारी सर्वत्र दिसून आला. दुकाने, व्यवहार बंद ठेवावेत की नको, या संभ्रमात नागपूरकरांनी पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद दिला. मुख्य बाजारपेठांतील बहुतांश दुकाने बंद होती. नागरिकांनी संयमाचे दर्शन घडवित दुपारी घरात राहणे पसंत केले. मात्र, सायंकाळी काही मुख्य चौकांमध्ये युवकांचे घोळके मोठ्या प्रमाणात दिसून आले.

महापौर संदीप जोशी यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. त्यावर लगेच मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ट्वीट करून, 'हा बंद केवळ महापौरांचे आवाहन आहे. त्यासाठी महापालिकेने कुठलीही अधिसूचना काढलेली नाही', असे स्पष्ट केले. दरम्यान, भाजप आणि राज्यात असलेल्या महाविकास आघाडीमधील राजकीय पक्षांच्या जनता कर्फ्यूवरून परस्परविरोधी संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या. परिणामत: शनिवारी काहीशा अस्पष्ट वातावरणातच कर्फ्यूचा पहिला दिवस उजाडला. सकाळचे काही तास भाजीपाला, दूध, अंडी, ब्रेड, बिस्किटे आदी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले. दुपारच्या वेळी रस्त्यावर बऱ्यापैकी शांतता जाणवली. मात्र, सायंकाळ होताच पुन्हा एकदा उत्सवी वातावरण दिसून आले. बँक, पोस्ट ऑफिससह विविध सरकारी कार्यालये शनिवारी सुरू होती. येथील गर्दी नेहमीच्या तुलनेत रोडावल्याचे जाणवले.

नागपूर: चाकूने गळा कापून २२ वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना मांजरी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुबोध ऊर्फ बापू विशाल मेश्राम (वय २२, रा. पाटील लेआउट, मांजरी) असे मृताचे नाव आहे. दारूच्या पैशांच्या वादातून सुबोधची हत्या करण्यात आली. यशोधरानगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तीन मारेकऱ्यांना अटक केली आहे. प्रणय ऊर्फ गोलू राऊत (वय २२), सागर परिमल (वय २०) आणि अभिषेक चौधरी (सर्व रा. मांजरी) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत.

लॉकडाउनमुळे प्रणयचा कॅटरिंगचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे तो अवैध दारूविक्री करायला लागला. सुबोध त्याच्याकडून उधार दारू घ्यायचा. त्याने प्रणयला दारूचे पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद व्हायला लागले. शुक्रवारीही सुबोध व प्रणयचा वाद झाला. प्रणयने साथीदारांच्या मदतीने सुबोधचा काटा काढण्याचा कट आखला. शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास प्रणय व त्याच्या साथीदारांनी सुबोधला गाठले. चाकूने त्याच्या गळ्यावर सपासप वार केले. सुबोधचा मृत्यू झाला. प्रणय व त्याचे साथीदार पसार झाले. घटनेची माहिती मिळताच यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमाकांत दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना केला. खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.

नागपूर: 'कौन बनेगा करोडपती'मधून मिळणाऱ्या कथित पैशांची वाटणी करण्यास नकार दिल्याने साथीदारांनी युवकाची चाकूने वार करून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. वाठोड्यातील सेनापतीनगर येथील हत्याकांडाचा अवघ्या दोन तासांत पर्दाफाश करून गुन्हेशाखेच्या युनिट चारने दोन मारेकऱ्यांना अटक केली. हे तिघेही मित्र होते.

इम्तियाज अली मुख्तार अली (वय २१, रा. ठाकूर प्लॉट, मोठा ताजबाग) व शेख कासीम ऊर्फ गोलू शेख राशीद (वय २४, रा. गौसिया कॉलनी, बेसा पॉवर हाउसजवळ) अशी अटकेतील मारेकऱ्यांची तर यश मधुकर ठाकरे (रा. संजय गांधीनगर झोपडपट्टी) असे मृतकाचे नाव आहे. तिघांविरुद्ध दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. इम्तियाज, कासीमसह यशलाही गांजाचे व्यसन होते.

गेल्या काही दिवसांपासून यशच्या मोबाइलवर 'कौन बनेगा करोडपती'च्या नावाने फोन यायचे. त्याला करोडो रुपयांची रक्कम बक्षिसात मिळणार असल्याचे आमिष दाखविण्यात येत होते. ही बाब त्याने इम्तियाज व कासीम या दोघांना सांगितली. 'आपण सोबत दरोडे टाकतो. मिळालेल्या रकमेची तिघांमध्ये सारखी वाटणी करतो. करोडपतीतून मिळणाऱ्या रकमेचीही सारखी वाटणी करू', असे दोघे यशला म्हणायचे. यश त्यांना नकार द्यायचा. दोन दिवसांपूर्वीही याच कारणावरून यशने कासीमला शिवीगाळ केली. त्यामुळे कासीम संतापला. पैशांची वाटणी करीत नाही व शिवीगाळही करतो, असे म्हणत कासीमने इम्तियाजच्या मदतीने यशचा काटा काढण्याची योजना आखली. दोघे मोटरसायकलने यशला घेऊन सेनापतीनगरमधील मोकळ्या मैदानात गेले. तेथे गांजा प्यायला. त्यानंतर दोघांनी यशच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. यशचा मृत्यू झाला. दोघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ताकसांडे, गुन्हेशाखेच्या युनिट चारचे निरीक्षक अशोक मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक उपनिरीक्षक बट्टुलाल पांडे, हेडकॉन्स्टेबल देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, कृपाशंकर शुक्ला, शिपाई आशिष क्षीरसागर, शिपाई सचिन तुमसरे, दीपक झाडे व श्रीकांत मारोडे घटनास्थळी पोहोचले. गुन्हेशाखेचे निरीक्षक अशोक मेश्राम यांनी मृतक यशबाबत माहिती काढली. यश व त्याच्या साथीदारांविरुद्ध हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले.

नागपूर: मानकापूरच्या क्रीडा संकुलातील प्रस्तावित १ हजार खाटांच्या जम्बो कोव्हिड हॉस्पिटलला राज्यसरकारने अखेर मंजुरी दिली. या रुग्णालयाला आठ दिवसांत मंजुरीचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. न्यायालयाच्या दणक्यानंतर ऑगस्टपासून प्रलंबित असणारे रुग्णालय मंजूर झाले आहे.

करोना मृत्युदराची अत्यंत गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयमित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत क्रीडा संकुलातील प्रलंबित जम्बो कोव्हिड रुग्णालयाच्या प्रस्तावाकडे लक्ष वेधले. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ऑगस्टमध्ये प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर त्या योजनेवर काहीही झाले नाही. शहरात आज करोनाबाधित वाढत असताना तसेच रुग्णालये व सुविधा कमी पडत असताना अशा योजनांची नितांत आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, विभागीय आयुक्तांच्या शपथपत्रातदेखील क्रीडा संकुलातील जम्बो हॉस्पिटलबाबत सरकारकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे नमूद केले. या माहितीची अत्यंत गंभीर दखल घेत हायकोर्टाने आठ दिवसांत जम्बो कोव्हिड हॉस्पिटल मंजूर करण्याचा आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिला. हा प्रस्ताव निर्धारित मुदतीत मंजूर न झाल्यास सचिवांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर रहावे लागेल, असा इशाराही देण्यात आला होता.

नागपूर: नागपूर शहरातील करोना मृत्युदर कमी करण्यासाठी आणि खासगी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापौर संदीप जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हायकोर्टाने समन्वय समिती स्थापन केली आहे. त्यात विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त अथवा त्यांचे प्रतिनिधी, आएमएचे अध्यक्ष डॉ. अनुप मरार आणि खासगी रुग्णालयांचे प्रतिनिधी डॉ. अनिल लद्दड यांचा समावेश आहे.

शहरातील वाढत्या करोना मृत्युदराची दखल घेत हायकोर्टाने दाखल करून घेतलेल्या जनहित याचिकेवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा खासगी रुग्णालयांच्या सेवा प्राप्त करून देण्यासाठी हायकोर्टानेच एक समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी यांनी केली. तेव्हा हायकोर्टाने महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. तसेच समितीला तातडीने बैठक घेऊन खासगी रुग्णालयांसोबत समन्वय साधण्याचा आदेश दिला. त्यानुसार, समितीची पहिली बैठक शुक्रवारी महापौरांच्या कक्षात सकाळी ११ वाजता घेण्यात आली.समितीने खासगी रुग्णालयांतील डॉक्टर्स आणी पॅरामेडिकल स्टाफच्या सेवा कशा उपलब्ध होतील, त्यावर काम करावे, असे न्यायालयाने सूचित केले आहे.

दरम्यान, शहरातील करोनाबाधितांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी कंट्रोल रूम स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हायकोर्टाला दिली. यावेळी कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा कमी पडणार नाही, याची खातरजमा करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

याशिवाय, आएमएचे १०० डॉक्टर करोनाबाधितांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी तयार आहेत, अशी माहिती कोर्टात देण्यात आली. तर आयुष पदवीप्राप्त ५० डॉक्टर आणि १७ एमबीबीएस डॉक्टरदेखील उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली आहे.

नागपूर: करोनाबाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या पाहता, महापौर संदीप जोशी आणि शहरातील आमदारांनी शुक्रवारी रात्रीपासून ते रविवारपर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली. काँग्रेस व राष्ट्रवादीने मात्र सरकारने कुठलाच कर्फ्यू लागू केला नसल्याचे म्हटले आहे. तर, महापालिका आयुक्तांनी ट्वीट करून जनता कर्फ्यू पाळणे बंधनकारक नसल्याचे म्हटले आहे. या सगळ्या प्रकारामुळे जनता मात्र गोंधळात सापडली आहे.

नागपूर करोनाबाधितांचीदेखील विदर्भ राजधानी बनली आहे. बाधितांनी साठ हजारांचा आकडा पार केला असून लाखाकडे वाटचाल सुरू आहे. दररोजचे मृत्यूचे आकडे प्रशासनाची अस्वस्थता वाढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापौरांनी लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन दोन दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्याला वेगवेगळे वळण मिळत आहे. जनता कर्फ्यूला शुक्रवारी रात्री ९.३० वाजेपासून सुरुवात झाली असून सोमवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत तो राहील. उपराजधानीत झपाट्याने वाढणारी करोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे करोनाची साखळी मोडून काढण्यासाठी विविध वर्गांतून पुन्हा एकदा लॉकडाउनची मागणीही जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी आमदार व महापालिका पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा आग्रह लोकप्रतिनिधींनी धरला. मात्र, आता जनता कर्फ्यूच्या मुद्द्यावरून शहरातील राजकारण पुन्हा तापू लागले आहे. जनता कर्फ्यूसंदर्भात झालेल्या बैठकीला केवळ भाजपचे आमदार उपस्थित होते. त्यामुळे या निर्णयानंतर काँग्रेसकडून सरकारतर्फे अशाप्रकारचा कुठलाही कर्फ्यू किवा बंदचे आवाहन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यादरम्यान कोणीही बळजबरीने दुकाने किवा आस्थापना बंद करण्यास आल्यास त्यांचे फोटो किवा व्हिडीओ काढून पोलिसांकडे तक्रार करण्याचे आ‌वाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने पाळण्यात येणारा हा जनता कर्फ्यू नागपूरकर पाळून करोनाची साखळी मोडण्यास हातभार लावतात का, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

नागपूर: राज्य विधिमंडळाचे येत्या ७ डिसेंबरपासून होणारे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत घेण्याऐवजी यावर खर्च होणारा निधी नागपूर-विदर्भात कोव्हिड उपचारासाठी, आरोग्ययंत्रणा बळकट करण्यासाठी द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या प्रदीर्घ पत्रात ‌विकास ठाकरे यांनी करोनामुळे झालेली विदारक स्थिती आणि तोकड्या आरोग्य यंत्रणेचे दाहक वास्तव मांडले आहे. गेल्यावर्षी ६ दिवसांच्या अधिवेशनावर ७५ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा अंदाज आहे. रोज १३ कोटी म्हणजे दर तासाला १ कोटी ६२ लाख आणि मिनिटाला २ लाख ७० हजार रुपये खर्च झाला. करोनामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडली आहे. रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा अभाव आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले. या स्थितीवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शहरात रोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. ६० हजारांहून अधिक रुग्ण असून सुमारे १ हजार ८१५ नागरिकांचे मृत्यू झाले. महापालिकेतील ३८५ कर्मचारी करोनाबाधित आहेत. १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. महापालिका आयुक्तांनी कोव्हिडबाबत घेतलेल्या निर्णयास खासगी रुग्णालयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. रुग्णालयाचे शुल्क निर्धारित करण्याचा सरकारला अधिकार नसल्याचा दावा केला आहे. मेयो व मेडिकलमधील दीडशे डॉक्टर बाधित आहेत. महापालिकेकडे नोंद असलेल्या ६३७ खासगी रुग्णालयांपैकी ३३ मध्ये ४०७ आयसीयू व १२२ व्हेंटिलेटर आहेत. शहरात ही स्थिती असताना कोव्हिड सेंटर असलेले आमदार निवास व दीडशे कर्मचारी राहात असलेले १६० गाळे रिकामे करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले आहे. दीडशे कर्मचाऱ्यांना अशा स्थितीत भाड्याने कुठे घर मिळणार, असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

 

नागपूर: शहरातील करोनाबाधितांची आकडेवारी ५० हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रणात येण्याची चिन्हे नाहीत. या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यातील या आणि पुढच्या शनिवार-रविवारी जनता कर्फ्यू राहणार आहे. शहरातील आमदार, महापालिकेचे पदाधिकारी व आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर महापौरांनी हा निर्णय जाहीर केला.

उपराजधानीत झपाट्याने वाढणारी करोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरत असताना विविध वर्गातून पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात यावे अशी मागणीही जोर धरू लागली होती. ऑक्टोबर महिन्यात नेमके काय करायचे, याबाबत निर्णय पुन्हा एकदा सर्व जनप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी स्पष्ट केले. बैठकीला आमदार नागो गाणार, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चिलकर आदी उपस्थित होते.

शुक्रवारी रात्रीपासून ते सोमवारी सकाळपर्यंत
शुक्रवारी १८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू राहणार आहे. याच धर्तीवर २५पासून ते २८पर्यंत जनता कर्फ्यू राहणार आहे. या काळात औषधी दुकानांव्यतिरिक्त कोणतीही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. शहरातील व्यापारी वर्गानेही स्वयंस्फूर्तीने दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेऊन या मोहिमेस सहकार्य कारावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

नागपूर: जिल्ह्यात बुधवारी २,०५२ नव्या करोनाबाधितांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ५७ हजार ४८२वर जाऊन पोहोचला. वाढत्या बाधितांवर उपचार करणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने मृत्यूचा आकडाही वाढत आहे. बुधवारी एकाच दिवशी ६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

बुधवारी ८ हजार २१६ तपासण्यांचे अहवाल आले. यापैकी ३ हजार ४०५ आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या असून रॅपिड अँटिजन तपासण्यांची संख्या ४ हजार ८११ आहे. या तपासण्यांपैकी २ हजार ५२ जणांना करोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले. बुधवारी ६० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून यात शहरातील ३७ आणि ग्रामीणमधील १४ जणांचा समावेश आहे. ९ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ हजार ५४६ रुग्ण ग्रामीणमधील आहेत.

७६.४२ टक्के रुग्ण बरे
वाढत्या रुग्णांबरोबर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असून ७६.४२ टक्के रुग्ण आतापर्यंत बरे झाले. बुधवारी १५९४ जणांना बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली असून आतापर्यंत ४३ हजार ९२७ जण करोनातून मुक्त झाले आहेत. यात घरीच बरे होणाऱ्यांचे प्रमाण २४ हजार ८९७ आहे.

लॉकडाऊन काळात सर्वांनाच आर्थिक फटका बसला. अनेकांना रोजगारास मुकावे लागले. त्यामुळे आर्थिक घडीच विस्कटून गेली. अशाचप्रकारे लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तीन युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नागपुरात उघड झाले असून हळहळ व्यक्त होत आहे. या तीन वेगवेगळ्या घटना असल्या तरी बेरोजगारी हे यामागील एकच कारण असल्याने चिंता व्यक्त होत आहे. ( Maharashtra Lockdown Crisis Latest News ) पहिली घटना नागपूर शहरातील कपिलनगर म्हाडा क्वार्टर येथे आज सकाळी उघडकीस आली. योगेश नरेंद्र मोहोड (वय ३०) हा ऑटोरिक्षा चालवायचा. योगेश हा आई सहजा यांच्यासोबत राहायचा. लॉकडाऊनमुळे ऑटोरिक्षाचा व्यवसाय बंद झाला. त्यामुळे तो बेरोजगार झाला होता. नैराश्येतून त्याला दारुचे व्यसन जडले आणि त्यातच मंगळवारी रात्री योगेश याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. आज सकाळी सहजा यांना योगेश हा गळफास लावलेला दिसला. त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी जमले. माहिती मिळताच कपिलनगर पोलिस तेथे पोहोचले. पंचनामा करून मृतदेह हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी योगेश याच्या भावाची हत्या करण्यात आली होती.

दुसरी घटना नंदनवनमधील मिरे ले-आऊट येथे आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश धनराज लताड (वय २८) हा इलेक्ट्रिशियनच्या हाताखाली काम करायचा. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. तो बेरोजगार झाला. बेरोजगारीला कंटाळून बुधवारी सकाळी त्याने दुपट्ट्याने गळफास घेतला व जीवन संपवले.

तिसरी घटना हुडकेश्वरमधील गजानननगर परिसरात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास समोर आली. सूरज रमेश आसोले (वय ३०) यानेही पंख्याला दुपट्टा बांधून गळफास घेतला. बेरोजगारीला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

रेती चोरी प्रकरणात भावाला अटक केल्याने संतप्त झालेल्या गुन्हेगाराने चाकूने सपासप वार करून पोलीस हेडकॉन्स्टेबलला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुधवारी रात्री कन्हान येथे घडली. जखमी हेडकॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक असून, त्याला नागपुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ( Nagpur Crime Latest News )रवींद्र चौधरी (वय ४०), असे जखमी हेडकॉन्स्टेबलचे तर कमलेश मेश्राम (वय ३५) असे हल्लेखोराचे नाव आहे. कमलेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. तीन दिवसांपूर्वी रेती चोरी प्रकरणात चौधरी यांनी कमलेश याच्या भावाला अटक केली. त्यामुळे कमलेश हा संतापला होता. बुधवारी रात्री कन्हानमधील एका चौकात कमलेश याने रवींद्र यांना गाठले. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले व पसार झाला. याबाबत माहिती मिळताच कन्हान पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला.

पोलिसांनी जखमी रवींद्र यांना जवळील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लगेचच नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला कन्हानमधील डॉक्टरांनी दिली. त्यानंतर जखमी रवींद्र यांना शंकरनगर चौकातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. कन्हान पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून कमलेश याचा शोध सुरू केला आहे.

नागपूर: पेंच व बोर व्याघ्रप्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून पर्यटनाला प्रारंभ होत आहे. जंगलातील रस्त्यांची योग्य स्थिती असलेल्या भागातच ही सफारी सुरू केली जाईल. केवळ ऑफलाइन पद्धतीने सफारीचे बुकिंग करता येणार आहे. सोमवारी ताडोबा प्रकल्प व्यवस्थापनानेही कोअरमधील पर्यटनाची दारे उघडली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.

ऑफलाइन पद्धतीने १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान प्रकल्पांच्या प्रवेशद्वारांवर सफारीचे बुकिंग करता येईल. १६ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पर्यटकांना ऑनलाइन पद्धतीने ५० टक्के सफारी वाहनांचे बुकिंग करता येईल. १ नोव्हेंबर, २०२० ते ३० जून २०२१ या कालावधीत नियमित ऑनलाइन बुकिंग सेवा उपलब्ध राहील. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकूण क्षमतेपैकी फक्त ५० टक्के पर्यटकांना प्रवेश देण्यात येईल. एका खुल्या जिप्सीत १ वाहनचालक, एक गाइड आणि चार पर्यटक राहतील. खासगी गाड्यांच्या बाबतीत ५० टक्के पर्यटक संख्या ही गाडीनुसार निश्चित करण्यात येईल. सफारी दरम्यान सुरक्षित अंतराचे नियम पाळणे बंधनकारक राहणार आहे.

सिलारीत निवासाला परवानगी
पेंच व्याघ्रप्रकल्पातील सिलारी येथील पर्यटन संकुलात एकूण क्षमतेच्या ३० टक्क्यांपर्यंत निवासास परवानगी देण्यात येईल. सुरेवानी आणि कोलितमारा येथील पर्यटन संकुलात सध्या उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. सुरेवानी आणि पवनी येथे खासगी वाहनांपैकी केवळ जीप आणि एसयुव्ही वाहनांना परवानगी देण्यात येईल. बोर धरण आणि कऱ्हांडला प्रवेशद्वारांवर जिप्सी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अतिपावसामुळे आडेगाव प्रवेशद्वार बंद राहणार आहे. प्रवेश व इतर शुल्क हे मागील पर्यटन हंगामानुसार राहणार आहे. ऑनलाइन सफारी आरक्षण आणि निवास आरक्षणासाठी www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील.

ऑक्सिजन पातळी खालावलेल्या करोनाबाधितांना तातडीने न मिळणारे बेड, 'गोल्डन अवर'मध्ये न मिळणारा उपचार यामुळे करोनाग्रस्तांच्या मृत्यूंचा आकडा वाढत चालला आहे. उपराजधानीत परिस्थिती बिकट आहे. विदर्भातील अन्य काही जिल्ह्यांची स्थिती दिलासादायक नाही. आरोग्य यंत्रणेचा श्वासच कोंडला जात आहे.

विदर्भात करोनाच्या मृत्यूने तांडव घातले आहे. हे आकडे का फुगत आहेत, याची माहिती घेण्याचा प्रयत्न 'मटा'ने केला असता, अनेक बाबी समोर आल्या. प्रमुख बाब म्हणजे, बाधितांची संख्या आणि रुग्णालयातील बेड यांचे प्रमाण कमालीचे व्यस्त आहे. नागपुरात ५५,४३० एकूण पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील ४२,३३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १३,०९७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयातील एकूण बेडची संख्या साडेसहा हजाराच्या घरात आहे. अपुरी आहे.लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार घेण्यासाठी सांगितले जात आहे. त्यातील एखाद्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली की त्याला तातडीने रुग्णालय गाठणे गरजेचे ठरते. अशावेळी कधी रुग्णवाहिका मिळत नाही तर, कधी बेड मिळत नाही. नातेवाईक बाधिताला घेऊन तासन्‌ तास फिरत आहेत. यातच बाधिताची प्राणज्योत मालवल्याच्या दुर्दैवी घटना घडत आहेत.

करोनाचा सामना पुरेशा सुसज्जतेने करण्यासाठी प्रशासनाला तयारी करता यावी यासाठी लॉकडाउन लावल्याचे सांगितले जाते. मग लॉकडाउनच्या काळात केले काय, हा संतप्त सवाल नागपूरकर करीत आहेत. याच मुद्द्यावरून मंगळवारी नागपूर खंडपीठानेही प्रशासन आणि सरकारवर ताशेरे ओढले.

नागपूर: स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम चोरट्यांच्या रडारवर असून, गेल्या ४८ तासांत चोरट्यांनी शहरातील विविध ठिकाणच्या बँकेच्या चार एटीएममधून लाखो रुपयांची रोख लंपास केली. या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एटीएममधील सुरक्षा व्यवस्थेचीही पोलखोल झाली आहे. चारही एटीएममध्ये चौकीदार नव्हता.

आशीर्वादनगरमधील द्वारका कॉम्प्लेक्समधील पहिल्या माळ्यावर एसबीआयचे एटीएम आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास एक युवक एटीएममध्ये घुसला. त्याने मशीनमध्ये एटीएम कार्ड टाकले. पीन कोड टाकला. मशिनमधून पैसे बाहेर येताच युवकाने मशिनमध्ये पेचकस टाकला. मशिनमधून एक लाख ६६ हजार रुपये बाहेर निघाले. त्यानंतर मशिन बंद पडली. अलार्म वाजला. या मशीनची देखरेख करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी तेथे पोहोचले. तोपर्यंत चोरटा पसार झाला. आशीर्वादनगर प्रमाणेच चोरट्यांनी याच पद्धतीने हिंगणा टी-पॉइंट, कळमना व म्हाळगीनगरमधील चार एटीएममधून लाखो रुपयांची रोकड चोरी केली. निळ्या रंगाचा टी-शर्ट व तोंडाला मास्क लावलेल्या युवकाने ही रक्कम काढल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. आशीर्वादनगर वगळता अन्य तीन प्रकरणांत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

नागपूर: सोमवारी नव्याने १,००२ बाधित तर ४४ मृतांची भर पडली. दुसऱ्या बाजूला, दिवसभरात जिल्ह्यातून १,५१८ करोनाबाधित उपचाराने बरे होऊन घरी परतले.

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या शहरी व ग्रामीण भागातील सर्वच प्रकारच्या करोना चाचणींची संख्य दैनिक नऊ हजारापर्यंत नेली आहे. त्यातच आता रोज जिल्ह्यात दीड ते दोन हजारावर बाधितांची भर पडत असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. सोमवारी जिल्ह्यात ४ हजार ६३३ चाचण्या नोंदवल्या गेल्या. त्यात शहरातील २ हजार ३९७ आरटी पीसीआर, ३ हजार ८९७ रॅपीड अँटिजन चाचण्यांचा समावेश आहे. तर ग्रामीणला ८२ आरटीपीसीआर, ७३७ रॅपिड अँटिजन चाचणी झाली. एकूण चाचण्यांमध्ये १ हजार २ जणांना करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यात शहरातील ६७०, ग्रामीणच्या ३२९, जिल्हाबाहेरील ३ जणांचा समावेश होता. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या शहरात ४२ हजार २५७, ग्रामीणला १० हजार ८८३, जिल्ह्याबाहेरील ३३३ वर अशी एकूण ५३ हजार ४७३वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत शहरात ३०, ग्रामीणला ११ तर जिल्हाबाहेरील ३ अशा एकूण ४४ रुग्णांचा शहरातील विविध रुग्णालयांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या शहरात १ हजार २९२, ग्रामीणला २५९, जिल्हाबाहेरील १५१ अशी एकूण १ हजार ७०२वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात रोज बाधितांची संख्या वाढत असतानाच करोनामुक्तांचीही संख्या वाढत आहे. दिवसभरात शहरात १ हजार २७२ तर ग्रामीणला २४६ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ४० हजार ६६७ वर गेली. त्यात शहरातील ३२ हजार ९९६, ग्रामीणच्या ७ हजार ६७१ जणांचा समावेश आहे.

आजवर गल्लीबोळात हातपाय पसरणाऱ्या करोनाने आता महत्त्वाची ठाणी काबीज करण्याचा सपाटा लावला आहे. उपराजधानीतील जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाणारे विभाग त्याने घुसखोरी करून बाधित केले आहेत. जनतेचे रक्षण करणारा पोलिस विभाग असो, करोनाचा लढा लढणारी महापालिका असो, ग्रामीण भागाशी संबंधित जिल्हा परिषद असो की हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे विद्यापीठ असो... करोना सगळ्यांनाच करोनाचा डंख बसला आहे. बाधितांवर उपचार करून त्यांना ठणठणीत करणाऱ्या आरोग्य विभागालाही करोनाचा संसर्ग चुकला नाही. शेकडो डॉक्टर्स आणि नर्स त्याच्या चपाट्यात आले आहेत. हे तर केवळ महत्त्वाचे सरकारी विभाग झालेत. खासगी कार्यालये, बँकांमध्येही या विषाणूने शिरकाव केला असल्याने भीती अधिकच गडद झाली आहे.

(मेडिकल-मेयो): १३० बाधित; ४ मृत्यू
फ्रंटवर आरोग्यसेवा देणाऱ्या डॉक्टरांपासून ते परिचारिकांनाही करोनाने कवेत घेतले आहे. मेडिकल-मेयोत सेवा देणारे आतापर्यंत दोन प्रमुख प्रतिथयश डॉक्टर आणि दोन परिचारिका दगावल्या आहेत. ही बाधित साखळी इतक्यावरच थांबलेली नाही. तर या विषाणूने शहरातील २०० डॉक्टरांना संक्रमित केले आहे. त्यातील शंभरावर डॉक्टर हे एकट्या मेडिकल मेयोत सेवा देणारे आहेत. मेडिकलमध्ये आतापर्यंत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांसह ७० निवासी डॉक्टर करोनाबाधित झाले आहेत. तर मेयोत ४० निवासी डॉक्टर आणि १५ वरिष्ठ प्राध्यापक, पाच सहयोगी प्राध्यापकांनीही करोनाचे संक्रमण झाले आहे.

नागपूर: अज्ञात व्यक्तीने एका मादी श्वानावर हल्ला करून तिचे दोन्ही डोळे फोडल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेमुळे पशुप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, सीताबर्डी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

८ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास अमरावती मार्गावर बोले पेट्रोल पंपाजवळ एक मादी श्वान रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे लोकांना दिसले. याबाबत कळताच पशुप्रेमी अभिषेक तुरक, समीर उके, प्रतीक अरोरा, साहील हे घटनास्थळी पोहचले. या श्वानाच्या दोन्ही डोळ्यांतून रक्त वाहात होते. हे पशुप्रेमी श्वानाला घेऊन डॉ. गौरी कानटे यांच्या पशू दवाखान्यात गेले. तेथे शस्त्रक्रिया करून श्वानाचे दोन्ही डोळे काढावे लागले. त्यामुळे अंध झालेल्या या श्वानाची जबाबदारी आता राइस टू टेल्स य संस्थेने घेतली आहे. ही संस्था या श्वानाची देखभाल करणार आहे. या घटनेनंतर पशुकल्याण अधिकारी अंजली वैद्यार, ईश्वर पोतदार, निकिता बोबडे, प्रतीक अरोरा, कल्याणी व अन्य पशुप्रेमी सीताबर्डी पोलिस स्टेशनला गेले. पोलिसांनी भादंविनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

नागपूर: विदर्भातील सात जिल्हे हे हवामान बदलाच्या दृष्टीकोनातून हॉटस्पॉट म्हणून तयार होत असल्याचे दोन वर्षांपूर्वी जागतिक बँकेच्या एका अहवालात नमूद करण्यात आले होते. गेल्या काही वर्षातील मान्सून काळातील पर्जन्यमानाची आकडेवारी लक्षात घेतल्यास यवतमाळ, वाशीम आणि भंडारा या जिल्ह्यांची वाटचाल खरोखरीच हॉटस्पॉटच्या दिशेने होत असल्याचे दिसून येते.

यवतमाळचा विचार केल्यास शेतकरी आत्महत्यांचे सर्वाधिक प्रमाण याच जिल्ह्यात आहे. गेल्या काही वर्षांपासून या जिल्ह्याने सातत्याने दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना केला आहे. येथे २०१४मध्ये २१ टक्क्यांची, २०१५मध्ये २२ टक्क्यांची, २०१७मध्ये ३४ टक्क्यांची, २०१९मध्ये ३० टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. या वर्षीचा मान्सून अद्याप संपलेला नसला तरीसुद्धा निम्मा सप्टेंबर उलटल्यानंतर २८ टक्क्यांची तूट भरून निघण्याची फारशी आशा नाही. यंदा वाशीम जिल्ह्यात ७ टक्के अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली. मात्र २०१४मध्ये ३२ टक्क्यांची, २०१५मध्ये २१ टक्क्यांची, २०१७मध्ये २८ टक्क्यांची, २०१९ मध्ये २० टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. यंदा नुकतीच सरासरी गाठलेल्या भंडाऱ्यात २०१४मध्ये २० टक्क्यांची, २०१६मध्ये २२ टक्क्यांची तर २०१७मध्ये २७ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली. याबाबत हवामानशास्त्राचे अभ्यासक तसेच भूशास्त्रज्ञ सुरेश चोपणे म्हणाले, 'गेल्या २० वर्षांपासून हा बदल होत असल्याचे दिसून येते. अनेकदा एखाद्या जिल्ह्याने सरासरी गाठल्याचे दिसून येते. मात्र पावसाचे दिवस कमी झालेत आणि अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्वाभाविकच शेतीचे गणित बिघडते. यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांबाबत हे प्रकर्षाने जाणवून येते. ही हॉटस्पॉटचीच लक्षणे आहेत.'

नागपूर: अवघ्या बारा दिवसांची ती चिमुकली जिवाच्या आकांताने रडत होती. मेडिकलच्या आकस्मिक विभागातील परिचारिका बुचकळ्यात पडल्या. त्यांनी चिमुकली असलेल्या खाटेकडे धाव घेतली. ते निरागस बाळ मातेच्या ऊबचा अंदाज घेत टाहो फोडत होते. पण, जवळ तिची आई नव्हती. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या पोटच्या गोळ्याला तिथे सोडून माय-बाप पसार झाल्याचे कळल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेने सारेच सुन्न झाले.

दरम्यान, अजनी पोलिसांनी त्या माता-पित्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला. मंदा संतोष कासरकर (वय २५) व संतोष कुमार कासरकर (वय ३०) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंदा व संतोष हे दोघेही श्रमिक आहेत. १२ दिवसांपूर्वी मंदाने यवतमाळमधील जी. एम. हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. याचदरम्यान मंदा व मुलीची प्रकृती खालावली. जी. एम. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दोघींना नागपुरात मेडिकलमध्ये दाखल करण्यास सांगितले. संतोष दोघींना घेऊन शुक्रवारी रात्री नागपुरात आला. दोघींना आकस्मिक विभागात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मंदा यांची प्रकृती स्थिर झाली. शनिवारी सकाळी चिमुकलीला हॉस्पिटलमध्ये सोडून मंदा व संतोष पसार झाले. मुलगी रडत असल्याने तेथे कार्यरत परिचारिकांनी मंदा यांचा शोध घेतला. मंदा व संतोष दोघेही आढळून आले नाहीत. परिचारिकांनी मेडिकलमधील पोलिस बूथमधील कर्मचाऱ्यांना माहिती दिली. कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्हीची पाहणी केली. दोघेही मेडिकलमधून बाहेर जाताना दिसले. त्यानंतर दोघांविरुद्ध अजनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक संकेत नानोटी या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

नागपूर: लॉकडाउनच्या काळात म्हणजे २३ मार्च ते ३ सप्टेंबर २०२०पर्यंत १६५ दिवसात मध्य रेल्वेने २२.२८६ दशलक्ष टन मालवाहतूक यशस्वीरीत्या केली आहे. मध्य रेल्वेने १६५ दिवसांत कोळसा, अन्नधान्य, साखर, पेट्रोलियम पदार्थ, खते, कंटेनर, लोखंड व स्टील, सिमेंट, कांदे आणि इतर संकीर्ण वस्तूंची ८,८९९ मालगाड्यांच्या माध्यमातून ४,२४,९३१ वॅगन्सची मालवाहतूक केली. या कालावधीत दररोज सरासरी २,५७५ वॅगन्सची मालवाहतूक भारीत (लोडींग) केली गेली.

अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी विविध वीज प्रकल्पांना उपरोक्त कालावधीत १,६०,००२ वॅगन कोळसा लोड केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी २,६३४ अन्नधान्य वॅगन्स, २,२१३ साखरेच्या वॅगन्स, १९,९२१ खतांच्या वॅगन्स, ६,१९२ कांद्यांच्या वॅगन्स, पेट्रोलियम पदार्थांच्या ४२,०२९ वॅगन्स; लोह आणि स्टीलच्या ११,२९७ वॅगन्स; सिमेंटच्या २७,३०१ वॅगन्स, कंटेनरच्या १,३२,१०५ वॅगन्स आणि डी-ऑइल केक आणि इतर वस्तूंच्या सुमारे २१,२३७ वॅगन्सदेखील लोड करण्यात आल्या.

मालवाहतुकीच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी रेल्वे कर्मचारी २४ तास विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांत काम करत आहेत. लोको पायलट, गार्ड कुशलतेने गाड्या चालवत आहेत. ट्रॅक, सिग्नलिंग, ओव्हरहेड उपकरणे, लोकोमोटिव्ह्ज, डब्बे आणि वॅगन्सचे मुख्य देखभाल करणारे कर्मचारी गाड्यांची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या स्थितीत राखत असल्याचे मध्य रेल्वेने कळविले आहे.

नागपूर: व्हाइटनर खरेदीसाठी १०० रुपये न दिल्याने १५ वर्षीय बाल गुन्हेगाराने कैचीने गळा कापून सोहनकुमार ऊर्फ टायगर विनय प्रसाद (वय २५, रा. अमरनगर) याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. या बाल गुन्हेगाराविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. टायगर हा हॉटेलमध्ये काम करायचा.

या बाल गुन्हेगाराला व्हाइटनरचे व्यसन आहे. हे व्यसन भागविण्यासाठी तो चोऱ्या करायचा. शनिवारी त्याला व्हाइटनर हवे होते. मात्र ते खरेदीसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. रात्री टायगर दारू पिऊन पायी घरी जात होता. प्रियदर्शनी अभियांत्रिकी कॉलेजजवळ बाल गुन्हेगाराने त्याला अडविले. बाल गुन्हेगाराने टायगरला १०० रुपये मागितले. टायगरने पैसे देण्यास नकार देत त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने कैचीने टायगरचा गळा कापून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून टायगरचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी रात्रीच बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

नागपूर: 'सरकारने रेडीरेकनरच्या दरांमध्ये ०.१ टक्क्यांनी केलेली वाढ कुणाच्याच हिताची नाही. ही दरवाढ अत्यंत कमी आहे. मात्र, याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे महसूलवाढ होण्याची शक्यता नाही. सरकारने केवळ त्यांच्या मनात आले म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे दिसून येत आहे', अशी भूमिका शहरातील विकासकांनी व्यक्त केली.

रेडीरेकनर हे स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदीसाठी वापरातात. मूल्यदर तक्त्यामध्ये बांधकाम वर्गीकरणासाठी जिल्हा, तालुका, गाव, प्रभाव क्षेत्र, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद यानुसार स्वतंत्र दर निश्चित करण्यात येतात. नोंदणी महानिरीक्षक किंवा मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेनंतर रेडीरेकनरचे दर ठरतात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच सप्टेंबरमध्ये रेडीरेकनरचे दर जाहीर करण्यात आले. याबाबत अधिक सांगताना क्रेडाई मेट्रो नागपूरचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे म्हणाले, 'गेल्या काही वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात सुरू असलेली मंदी लॉकडाउनमुळे अधिक गडद झाली आहे. एकीकडे सरकारने मुद्रांक शुल्क कमी केलेले असताना रेडीरेकनरचे दर वाढविणे काही संयुक्तिक नाही. वास्तविक पाहता, क्रेडाईसह राज्यातील सर्व विकासकांनी रेडीरेकनरचे दर कमी करण्याची मागणी केली होती. परंतु, त्याउलट सरकारने निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात रेडीरेकनरचे दर वाढविण्यासारखी स्थिती नाही. रेडीरेकनरहून कमी दरात विकासक विकायला तयार आहेत. पण, आयकर कायद्यातील तरतुदींमुळे तसे करता येत नाही. परिणामत: विकासक तोट्यात आहेत आणि गरज असूनही अनेक ग्राहक स्वत:चे घर घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे.'

भाजपच्या बळावर दुसऱ्यांदा राज्यसभेत पोहोचून केंद्रीय मंत्रिपद अबाधित ठेवणारे रामदास आठवले यांच्या भूमिकेवरून विदर्भातील पक्षाचे कार्यकर्ते भडकले आहेत. संविधानाला विरोध करणारी प्रवृत्ती व मोदीधार्जिणी भूमिका वारंवार मांडण्याबद्दलचा हा संताप आहे. प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामापत्र पाठविण्यास सुरुवात झाली असून, येत्या काही दिवसांत विदर्भातील पक्षाचे जुने कार्यकर्ते पक्षाला राम राम ठोकणार आहेत.

आठवले भाजपसोबत गेल्यापासून पक्षाचे कार्यकर्ते तसेही नाराज होते. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या नाराजीत भरच पडली. त्यांच्यासोबत पँथरपासून असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना वेळोवेळी 'समाजाच्या कणखरपणाची भूमिका वागण्यातून येऊ द्या', अशी विनंती केली. परंतु, आठवले कुणाचेही ऐकायला तयार नाहीत. अभिनेत्री कंगना रनोटच्या घरी आठवलेंची भेट व तिला मुंबईत सुरक्षेचे आश्वासन यावरून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. कंगना ही संविधानविरोधी आहे. असे असताना आठवले तिला पाठिंबा देत आहेत. घरी जाऊन भेटत आहेत. देशातील कुठल्याही नेत्यांनी कंगनाच्या घरी भेट दिलेली नाही. आठवलेंना हे साधून काय मिळाले? असा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. अमरावतीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रदीप दंदे यांनी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांना पाठविलेल्या पत्रातून याबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. संविधानविरोधकांशी हातमिळवणी करून वारंवार मोदीधार्जिणी भूमिका पक्षाला हानिकारक आहे. आठवलेंची संघर्षशील नेता म्हणून प्रतिमा डागाळली. आता पक्षात राहणे योग्य नाही, असे राजीनामापत्रात म्हटले आहे. भंडाराचे जिल्हाध्यक्ष असित बागडे हेदेखील संपूर्ण कार्यकारिणीसह पक्ष सोडणार आहेत. गोंदियाचे जिल्हाध्यक्ष राजेश गजभिये यांनीही मानसिक तयारी केली आहे. आठवलेंना थेट भेटून त्यांच्या वागण्याबाबत अनेकदा विनंती करूनही त्यांच्या स्वभावात फरक पडत नाही. अशा पक्षात कशाला आलो? असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे बागडे यांचे मत झाले आहे. जे काम स्वत:ला करता येत नाही, ते कार्यकर्त्यांना सांगायचे व मागे फरफटत फिरवायचे, असा आठवलेंचा प्रकार असल्याकडेही बागडे यांनी लक्ष वेधले.

नागपूर: मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांना निरोप देतेवेळी घोषणाबाजी, रस्ता अडविल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मुंढे समर्थक व नगरसेवक कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यासह तब्बल १२५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

मुंढे यांची बदली झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ते नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी आर्य, चौधरी यांच्यासह शेकडो समर्थक सिव्हिल लाइन्समधील मुंढे यांच्या तपस्या निवासस्थानासमोर जमले. यावेळी समर्थकांनी हातात फलक झळकावून घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यावेळी सुरक्षित वावरचे भानही समर्थकांनी ठेवले नाही. काही समर्थकांनी पोलिसांशी वादही घातला.या समर्थकांविरुद्ध पोलिसांची परवानगी न घेता जमाव जमविणे, घोषणा देणे, रस्ता अडविणे, नियमांचा भंग करणे, पोलिसांशी वाद घालण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तपास सुरू आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.

नागपूर: भाजीसाठी ४२ वर्षीय इसमाने चाकूने वार करुन दाम्पत्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना गुरुदेवनगर येथे शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. हुडकेश्वर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक केली आहे. मनीष सुरेश काळे (वय ४२,रा. गुरुदेवनगर) हे अटकेतील हल्लेखोराचे तर संतोषकुमार भीमराव नागवंशी (वय ४६) व त्यांच्या पत्नी रुपवंती (दोन्ही रा. श्रीरामनगर) ही जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीष याचा संजयगांधीनगर येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. नागवंशी दाम्पत्य श्रमिक आहेत. मनीष व संतोषकुमार हे मित्र आहेत. शुक्रवारी रात्री मनीष याने मद्यप्राशन केले. तो संतोषकुमार यांच्या घरी गेला. रुपवंती यांना भाजी (मटण) करण्यास सांगितले. रुपवंती यांनी नकार दिला. मनीष याने त्यांना शिवीगाळ केली व घरी परतला. काही वेळाने संतोषकुमार आले. रुपवंती यांनी संतोषकुमार यांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर संतोषकुमार व रुपवंती दोघेही मनीष याच्या घरी गेले. संतोषकुमार यांनी मनीष याला जाब विचारला. मनीष संतापला. त्याने चाकूने रुपवंती यांच्यावर चाकूने वार करायला सुरुवात केली. संतोषकुमार यांनी रुपवंती यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मनीष याने संतोषकुमार यांच्यावरही चाकूने हल्ला केला. नागवंशी दाम्पत्य जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक पंकज लहाने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. जखमींना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करून मनीषला अटक केली.

नागपूर: वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्या उरात धडकी भरविणारी आहे. त्यातच दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, सुरक्षित वावरचा उडालेला फज्जा, नियमांचे सर्रास उल्लंघन अशी चिंताजनक दृश्ये रस्त्यांवर दिसू लागली आहेत. ही संसर्ग कमी होण्याची नव्हे, तर लॉकडाउनची लक्षणे असल्याचे मत व्यक्त होत आहे. एरवी लॉकडाउनला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता 'लॉकडाउन हवेच', असा आग्रह धरल्याने गांभीर्य अधिकच गडद झाले आहे.

दरम्यान, लॉकडाउन झालेच तर ते दोन आठवड्यांचे असावे, असे नागरिकांना वाटते. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सम-विषमचा नियम रद्द करण्याच्या मागणीसह चाचणीलाही विरोध करणारे व्यापारी आता लॉकडाउनच्या मागणीसाठी सरसावले आहेत. यासंदर्भात अजून खुलेपणाने कोणत्याही व्यापारी संघटनेने बाजू मांडली नसली तरी याला जवळपास सर्वच संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले.

अनलॉक-४मध्ये अनेक निर्बंध अधिक शिथिल झाल्याने सर्वत्रच गर्दी वाढली आहे. त्यातच महापालिकेने आता दुकानांसाठी असलेला सम-विषम तारखांचा नियमही रद्द केल्याने सर्वच प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने नियमित सुरू झाली आहेत. दरम्यान, सम-विषमच्या नियमांना विरोध करणारे व्यापारी व त्यांच्याकडील कर्मचारीच आता करोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे व्यापारी अधिक जोखीम उचलण्यास तयार नसल्याची माहिती एका व्यापाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

करोना पॉझिटिव्ह महिलेला मेडिकलमधील दुसऱ्या मजल्यावरील लिफ्टसमोरच प्रसूतिकळा सुरू झाल्या. वेदना तीव्र होत्या…ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याचा वेळही हाती नव्हता.…या अडचणीच्या प्रसंगी रुग्णालयातील एक नर्स धावून आली…. 'आई आणि बाळाचे जीव वाचविणे माझे पहिले कर्तव्य आहे', याच विचाराने या नर्सने पीपीई किट न घालताच त्या महिलेची प्रसूती केली. त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला असून आता आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. नर्सच्या या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सुजाता मून असे या नर्सचे नाव.… नंदनवन येथील निर्मलनगरात राहणाऱ्या सुजाता गेल्या सहा वर्षांपासून मेडिकलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असताना त्यांचा नियमित राउंड सुरू होता. शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक त्यांना लिफ्टजवळ महिलेचा ओरडतानाचा आवाज आला…. त्या लगेच धावून गेल्या. प्रसूतीची वेळ आली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्या गर्भवतीला पहिल्या मजल्यावर लिफ्टने घेऊन जाण्याचाही वेळ नव्हता. गर्भवती महिला पॉझिटिव्ह होती…. अशावेळी त्या महिलेजवळ कसे जायचे, हा विचार सुजाता यांनी न करता आईचा आणि बाळाचा जीव वाचविणे हेच आपले प्रथम कर्तव्य समजले आणि लिफ्टसमोरच प्रसूती केली. परिचारिका अधीक्षिका वैशाली तायडे यांनीही सुजाता यांच्यावर कौतुकाची थाप दिली.

नागपूर: ऑगस्टच्या अखेरीस आलेल्या पुरामुळे नागपूर जिल्ह्यासह विभागातील जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले. सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.हे नुकसान भरून काढण्यासाठी ४५६ कोटी रुपयांची गरज असल्याची माहिती केंद्रीय समितीपुढे प्रशासनाकडून देण्यात आली.

गेल्या महिन्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने शुक्रवारी केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले. विभागीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांकडून झालेल्या पुराच्या आकडेवारी संदर्भातील माहिती घेतल्यानंतर केंद्रीय पथकाने प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्याला प्रथम भेट दिली.

पुराच्या तडाख्याने शेतकरी व गावकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची व्याप्ती आणि तीव्रता त्यांच्या लक्षात आली. कामठी तालुक्यात सोनेगाव येथे त्यांनी भेट दिली. या पथकामध्ये केंद्रीय पथकातील महेंद्र सहारे, एस. एस. मोदी आणि आर. पी. सिंग यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे आदी उपस्थित होते.

घरांडी पडझड
कन्हान नदीला अचानक आलेल्या पुरामुळे मौजे सोनेगाव राजा येथील १५५ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून, ३५४ घरांपैकी तब्बल ११४ घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व पायाभूत सुविधायुक्त ठिकाणी सोनेगावचे पुनर्वसन करण्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली आहे. इतर अनेक गावांतही असेच नुकसान झाले. कुणाचे घर वाहून गेले, दुभती जनावरे वाहून गेली तर शेतीचेही मोठे नुकसान झाले. भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी पथकापुढे आपल्या व्यथा मांडल्या.

नागपूर: करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात चांगलाच वाढत आहे. गेल्या आठ दिवसांपासून जवळजवळ २ हजार नव्या बाधितांची शृंखला शुक्रवारीही कायम राहिली. तर मृत्यूचा आकडाही अर्धशतकाचा दैनिक पल्ला ओलांडून पुढे सरकला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता ५० हजारांच्या जवळजवळ म्हणजेच ४८ हजार ५५०पर्यंत जाऊन पोहोचली आहे. शुक्रवारी दिवसभरात २,०६० बाधित आढळले तर ५३ मृत्यू झाले.

खाटांची संख्या अपुरी पडत असताना दिवसभरात शुक्रवारी जिल्ह्यात करोनाची बाधा झालेली असली तरी लक्षणे नसल्याने २,६५९ जणांना रुग्णालयातून सुटी देऊन घरातच विलगीकरणासाठी रवाना करण्यात आले. त्यामुळे कागदोपत्री करोनामुक्त झालेल्यांची संख्या ३५,७३८ इतकी दिसत असली तरी यातील निम्मे रुग्ण करोनाची बाधा झालेले सक्रिय रुग्ण आहेत.

सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ११,२४३ सक्रिय बाधित रुग्ण आहेत. त्यातील ५,८६९ जणांना लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवले गेले आहे. यात ६,९४७ रुग्ण हे मनपाच्या हद्दीतील आहेत. तर ४,२९६ बाधित जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत.

नागपूर: एकीकडे निधी अभावी महापालिकेची शहरातील विकासकामे रखडली असताना आता महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांची कोट्यवधींची थकीत असलेली देणी अदा करण्यासाठी महापालिकेकडे तगादा लावला आहे. अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेली बिल अदा न झाल्यास सध्या सुरू असलेली कामे पुढे सुरू ठेवण्यास असमर्थतता दर्शवली आहे. महापालिकेने तब्बल ४०० कोटींची देणी अजूनही न दिल्याने कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणी चांगल्या वाढल्या आहेत. त्यामुळे आता कंत्राटदारांनी महापालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कंत्राटदारांच्या संघटनेने थकीत बिल अदा करण्यासंदर्भात स्थायी समिती सभापती विजय झलके यांना निवेदन दिले आहे. निधीअभावी अनेक समस्या भेडसावत असल्याचेही स्पष्ट केले आहे. थकित बिलांची रक्कम अदा करण्याची मागणी महापालिकेच्या कंत्राटदारांकडून अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष विजय नायडू यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले. एकीकडे कंत्राटदारांची कोट्यवधींची बिले थकीत आहे. दुसरीकडे मात्र महापालिकेचे अभियंता व पदाधिकारी शहरातील अर्धवट असलेली कामे पूर्ण करावी यासाठी कंत्राटदारांकडे पाठपुरावा करीत आहेत.

नागपूर:उपराजधानीतील करोना मृत्युदर कमी करण्यासाठी तातडीने बारा डॉक्टरांची चमू असणारा टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

शहरातील वाढत्या मृत्युदराची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर गुरुवारी न्या. रवी देशपांडे व न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सने झालेल्या सुनावणीत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यासह मेडिकल व मेयोचे डीन उपस्थित झाले होते. शहरातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांची कमतरता असल्याचे कारण सांगण्यात आले. या माहितीची अत्यंत गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले. डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आणि व्हेंटिलेटरसारख्या सुविधा कमी आहेत म्हणून मृत्युदर वाढत असल्याचे समर्थन करता येणार नाही. करोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असणारी साधने उपलब्ध करून देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, याची जाणीव हायकोर्टाने करून दिली.

हायकोर्टातील न्यायाधीश आणि वकील २४ तासही काम करण्याबाबतच्या मुद्द्यांवर गंभीरपणे विचार करतात तर डॉक्टर आणि पॅरामेडिकल यांनी करोनाबाधितांना उपचार देण्यासाठी पुढे का येऊ नये असा सवाल करीत, त्यांनी आपले कर्तव्य समजून करोनाबाधितांची सेवा करावी, असे हायकोर्टाने नमूद केले. न्यायालय मित्र म्हणून अॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली. उपचाराची द्यावी मुभा!शहरातील करोनाबाधितांना त्यांच्या पसंतीच्या डॉक्टर व रुग्णालयात उपचार घेण्याची मुभा देण्यात यावी, त्यांना अमुकच रूग्णालयात जाण्याची सक्ती करू नये, असे हायकोर्टाने स्पष्ट केले. याशिवाय, मेडिकल व मेयोच्या डीनला १२ डॉक्टरांची नावे जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्याचा आदेश दिला. त्या डॉक्टरांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल.

नागपूर: लक्षणे नसलेल्या कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांना घरात व्यवस्था असेल तर गृहविलगीकरणाचा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.

महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून बुधवारपासून नागपूर महापालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएनशच्या संयुक्त विद्यमाने गृहविलगीकरणात असलेल्या कोव्हिड रुग्णांसाठी 'कोव्हिड संवाद' या शीर्षकांतर्गत 'फेसबुक लाइव्ह'च्या माध्यमातून संवाद कार्यक्रम आयोजिण्यात आला. बुधवारी आयोजित कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमेय हॉस्पिटलचे डॉ. आनंद काटे आणि कोठारी हॉस्पिटलच्या डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होत्या. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'कोव्हिड संवाद'मागील संकल्पना विषद केली. डॉ. अर्चना कोठारी यांनी गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना नेहमीच पडत असलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांना डॉ. आनंद काटे यांनी समर्पक उत्तरे दिलीत. घरात स्वतंत्र खोली असेल, बाथरूम, शौचालय स्वतंत्र असेल अशा व्यक्तींनीच गृहविलगीकरणाचा पर्याय निवडावा. अशांनी शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, नियमित मास्क घालावा, कुटुंबातील लोकांना दूर ठेवावे, डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे न चुकता सेवन करावे, अशी उपयुक्त माहिती दिली.

पावसाच्या हजेरीने नागपूर जिल्ह्यातील करोना संकटाचे मळभ गुरुवारी आणखी गहिरे केले. यात दिवसभरात करोनाची लागण झालेल्या आणखी १९३४ जणांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतचा बाधितांचा आकडा ४७ हजाराच्या उंबरठ्यावर ४६,४९० पर्यंत धडकला आहे. करोनाची लागण झाल्याने विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या ५८ जणांनी गुरुवारी दिवसभरात अखेरचा श्वास घेतला. या घडामोडीत १५१३ बाधित आजारमुक्त होऊन घरी परतले. ( Coronavirus In Nagpur Latest Updates )

करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयावरून गुरुवारी दिवसभरात जिल्ह्यामध्ये ७०२६ जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यातील ५०९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. नव्याने करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये ४७८ जण हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. तर मृतांमध्येही ९ जणांचा समावेश आहे. त्यामुळे करोनाचा विषाणू ग्रामीण भागातही धुमाकूळ घालत असल्याने चिंतेचे मळभ दिवसागणिक गहिरे होत आहे.

आज करोनाची लागण झाल्याचे निदान झालेल्यांपैकी खासगी लॅबमधून सर्वाधिक ६९६ आणि अँटिजेन रॅपिड टेस्ट मधूनही ६७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याच दरम्यान २०१ नमुने मेयोतून, १९७ नमुने मेडिकलमधून, निरीतून९६, माफ्सूतून ५७ तर एम्समधून१७ जणांना करोनाची लागण झाल्याचे निदान करण्यात आले.
सध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ११८९५ सक्रिय करोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील ६७२८ जणांना विषाणू बाधा झालेली असली तरी कोणतिही लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवले गेले आहे. तर सौम्य, मध्यम आणि तिवृ स्वरुपाची लक्षणे असलेल्या ५१६७ जणांवर कोव्हिड केअर सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत.

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झालेले कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज नागपूरकरांचा निरोप घेतला. 'काही गोष्टी करता आल्या. काही करायच्या होत्या. पण त्यातच बदली झाली. आता नियमानुसार माझ्या मार्गानं निघालो आहे. आपल्यातील ऋणानुबंध असेच कायम ठेवा,' अशी अपेक्षा त्यांनी नागपूरकरांकडून व्यक्त केली आहे.

मागील सात महिने तुकाराम मुंढे हे नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. या काळात त्यांच्या अनेक निर्णयांना राजकीय पक्षांचा विरोध झाला. मात्र, नागरिक त्यांच्या बाजूने उभे राहिले. कोविड काळात सतत फिल्डवर असलेल्या मुंढेंना काही दिवसांपूर्वी करोनाने गाठले होते. ते होम क्वारंटाइन असतानाच त्यांची बदली झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काल ती बदलीही रद्द झाली आहे. मात्र, करोनामुक्त झालेल्या मुंढेंनी नागपूरकरांना अलविदा केले आहे. फेसबुकवर व्हिडिओ टाकून सहकार्याबद्दल नागपूरकरांचे आभार मानले आहेत.

'नागपुरात सात महिने राहिल्यानंतर मी आपला निरोप घेत आहे. या सात महिन्यात या शहराला उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. या काळात काही प्रकल्प पूर्ण झाले. काही सुरू आहेत. काही अजून सुरू झालेले नाहीत. हे सगळं होत असतानाच माझी बदली झाली. आता, 'मै चल पडा मेरे राह की ओर…. या नियमानुसार पुढील कामकाजासाठी आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

 

महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले धडाकेबाज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे आज नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी नागपूरमधील चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती. यावेळी मुंढे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. 'वुई वॉण्ट मुंढे साहेब... आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे... वंदे मातरम्...' अशा घोषणा लोक देत होते.

नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं नागपूरकरांची मने जिंकली होती. अलीकडेच त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर नियुक्ती झाली होती. अवघ्या १५ दिवसांत ती बदलीही रद्द झाली आहे. त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, नागपूरमधून त्यांनी आपला मुक्काम हलवला आहे. करोनाची लागण झालेल्या मुंढे हे नुकतेच या आजारातून बरे झाले आहेत. आज ते मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी, फेसबुक पोस्ट शेअर करून त्यांनी नागपूरकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले. नागपूरकरांनी शासन, प्रशासनाला यापुढंही सहकार्य करावं. नागपूरकरांशी असलेले ऋणानुबंध कायम राहतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसंच, नागपुरातून निघण्यापूर्वी मुंढे यांनी काही नागरिकांच्या भेटीही घेतल्या.

मुंढे यांना निरोप देण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्या घरासमोर गर्दी केली होती. तुकाराम मुंढे यांना पाठिंबा देणारे पोस्टर त्यांच्या हातात होते. 'वुई वॉण्ट मुंढे साहेब, आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे, वंदे मातरम्, मी सुद्धा तुकाराम' असं लोक म्हणत होते. तसंच, मुंढे यांच्या बदलीसाठी आग्रही असलेल्या राजकारण्यांनाही लोकांनी लक्ष्य केले. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या विरोधात 'मुर्दाबाद, मुर्दाबाद' अशा घोषणाही लोकांनी दिल्या.

नागपूर: नागपुरात करोनामुळे होणारे मृत्यू कसे रोखायचे यावर तज्ज्ञांची समिती येऊन गेली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमागून बैठका होत आहेत. असे असतानाही दिवसागणिक मृत्यूचा आकडा वाढतच आहे. बुधवारी एकाच दिवशी ५९ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. गेल्या ८ दिवसांत करोनामुळे नागपुरात झालेल्या मृत्यूंची संख्या ३६७ झाली आहे.

बुधवारी नागपुरात १,३१९ नवे करोनाबाधित आढळले. यात शहरातील ८६४ आणि ग्रामीणमधील ४५० जण असून पाच जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण बाधितांचा आकडा ४४ हजार ५५६ झाला आहे. यात शहरातील ३५ हजार २१६ आणि ग्रामीणमधील ९,०२७ रग्णांचा समावेश आहे. बुधवारी वाढलेली मृत्यूची संख्या चिंता वाढविणारी आहे. ५९पैकी ४३ मृत्यू शहरातील, ११ ग्रामीणमधील आणि पाच जिल्ह्याबाहेरील आहेत.

बुधवारी १,१०५ करोनाबाधित बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३१ हजार ५६६ असून, ही टक्केवारी ७०.८४ झाली आहे. १७ हजार ४०५ जण रुग्णालयात न जाताच बरे झालेत.

करोनाकाळात फ्रंटवर सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चारशेपैकी तब्बल ७० निवासी डॉक्टरांना करोनाची बाधा झाल्याने चिंता गहिरी झाली आहे.

एकट्या मेडिकलमधील मनुष्यबळाचा विचार केला तर सध्याच्या स्थितीत वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे ४०० विद्यार्थी सेवेत आहेत. त्यातील ७० टक्के निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कोव्हिड केअर सेंटरशी संलग्न वॉर्डांमध्ये नियुक्ती करण्यात आली. यात मेडिसिनपासून ते गायनिक, सर्जरी, रेडिऑलॉजी, ऑर्थो, ईएनटी अशा सर्वच विभागांतील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. त्यापैकी सर्वांत धोक्याच्या वळणावरील मेडिसिन युनिटमधील १५, स्त्रीरोग प्रसूतिशास्त्र विभागातील १३, रेडिऑलॉजी विभागातील सहा, ऊररोग विभागातील १०, सर्जरी विभागीत सात अशा मिळून जवळजवळ ७० निवासी डॉक्टरांना आतापर्यंत करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी जवळजवळ ७ टक्के करोनाबाधित डॉक्टरांच्या फुफ्फुसांना मध्यम, तीव्र, गंभीर स्वरूपाचा संसर्ग झाला आहे. याखेरीज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रुग्णसेवेशी निगडीत नसलेल्या सत्तरहून अधिक मेडिकल कर्मचाऱ्यांनाही करोनाची बाधा झाली आहे. करोनाची लागण झालेल्यांमध्ये एक तरुण निवासी डॉक्टर सध्या फुप्फुस संसर्गाने कोमात असल्याने निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये रोष आहे.

नागपूर: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील सिव्हिल लाइन्समधील बंगल्यावर बुधवारी पुन्हा धमकीचे दोन फोन आले. गेल्या तीन दिवसांपासून गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी सतत धमकीचे फोन येत आहेत. मात्र, अद्यापही हायटेक पोलिसांना याबाबतचा ठोस सुगावा लागलेला नाही. धमकी देणाऱ्याने दिल्ली, हिमाचल प्रदेशसह विविध ठिकाणांहून, विविध क्रमांकावरून फोन केले आहेत.

गृहमंत्र्यांना पहिला फोन रविवारी आला. 'कंगना रनौट के प्रकरण मे मत पडो, नही तो उडा देंगे', अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. याचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविण्यात आला. त्यानंतर सोमवारी, मंगळवारी व बुधवारीही गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी धमकीचे फोन आले. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास धमकीचा फोन आला.'मृत्युंजय गर्ग बोलत असून, अभिनेत्री कंगना रनौटच्या प्रकरणात पडू नका', अशी धमकी फोन करणाऱ्याने दिली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पुन्हा धमकीचा फोन आला. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी येत असलेल्या धमकीच्या फोनबाबत पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास गुन्हेशाखा पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे.

धमकी देणाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकही स्थापन करण्यात आले. गृहमंत्र्यांच्या निवासस्थानावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून येथे दिवस व रात्रपाळीला सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

नागपूर: करोनातून मुक्त झालेले माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी त्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या 'तपस्या' येथे नागरिकांची भेट घेतली. बदली झाल्यानंतरही नागपूरकरांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, पुढील कार्यकाळासाठीही शुभेच्छा दिल्या. आज, गुरुवारीही मुंढे नागरिकांशी भेटून संवाद साधणार आहेत.

करोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मुंढे यांच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या. १४ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर मुंढे यांनी संवादासाठी उपलब्ध असल्याचे एका संदेशाद्वारे कळविले होते. त्यानुसार बुधवारी काही नागरिक आयुक्तांचे शासकीय निवासस्थान असलेल्या जवाहर विद्यार्थीगृहाच्या शेजारील 'तपस्या' या निवासस्थानी त्यांना भेटले. मुंढे यांच्या कार्यकाळाचे कौतुक केले. त्यांनी करोना काळात केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच मनपात लावलेली शिस्त, घेतलेले कठोर निर्णय यांबद्दलही त्यांचे अभिनंदन करण्यात आले. एक प्रामाणिक, कर्तव्यकठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मुंढे यांची नागपूरकरांना नेहमीच आठवण राहील, असेही संवादात नागपूरकरांनी नमूद केले. एका महिलेने मुंढे यांच्या हाताला धागाही बांधला. एका लहान मुलीनेही 'मुंढे यांच्या कार्याची प्रेरणा आम्हाला मिळाली', असे सांगितले. मुंढे यांच्या नव्या कर्तव्यठिकाणाबद्दलही नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

महापालिकेतील पाच रुग्णालये जुनीच असून तिथे आस्थापना यादीनुसार तज्ज्ञापासून ते स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंतची पदे मंजूर आहेत. या पदांवर आधीच वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती आहे. अशात सध्या कार्यरत असलेल्यांमधूनच या रुग्णालयात नियुक्ती देण्यात यावी. कोव्हिड रुग्णालय अशी कुठलीही संकल्पना नाही. शिवाय, त्यावर विशेष असा उपचार व औषधेही नाहीत. तेव्हा मनपाच्या तिजोरीतील लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा मनपात कार्यरत असलेल्यांचे समायोजन करा, अशी मागणी नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एम्प्लॉइज यूनियन आणि नागपूर महानगर पालिका अस्थाई आरोग्य कामगार संघटनेतर्फे जम्मु आनंद यांनी केली आहे.

मनपा प्रशासनाने तज्ज्ञ डॉक्टरांसह विविध पदांच्या २१८ कंत्राटी जागांची जाहिरात काढली. त्यावर मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांसाठी ९६ लाख रुपये वेतनावर खर्च होणार आहे. एवढा खर्च करण्यापेक्षा मनपातच कार्यरत असलेल्यांना या रुग्णालयातील रिक्त पदांवर सामावून काम करता येणे शक्य आहे. अनेक मंजूर पदे आजही रिक्त आहेत. परंतु, या पदांवरही तातडीने नियुक्ती केली जावी. आज करोनाचा सरळ उपचार आहे. वेगळी औषधेही नाहीत. त्यामुळे मनपातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन काम करता येणे शक्य असल्याकडे आनंद यांनी लक्ष वेधले. मनपात कार्यरत डॉक्टर करोनाबाधितांवर उपचार करीत नाहीत. तरीही, अत्यंत गरज असेल तरच तज्ज्ञांची नियुक्ती केली जाण्याचे त्यांनी मात्र समर्थन केले.

गेल्या २० वर्षांपासून मनपात अस्थायी स्वरूपात मोठ्या संख्येत कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना स्थायी करून त्यांच्या माध्यमातून करोनाकाळात काम करता येऊ शकते, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने सुमारे ६७ खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. परंतु, तिथे आधीच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना इतरत्र स्थानांतरित करण्याचा आदेशही दिला. मात्र, अशा रुग्णांना स्थानांतरित न करण्याचा आदेश हायकोर्टाने मनपाला दिला.

विवेका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने महापालिकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल केली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यानुसार, महापालिकेने शहरातील सुमारे १८हून अधिक खासगी रुग्णालयांना करोनाबाधितांवर उपचार करण्याचे, तेथील सुमारे ८० टक्के खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिलेत. करोनाबाधितांवर उपचारास खासगी रुग्णालये तयार आहेत. परंतु, महापालिकेने खासगी रुग्णालयांत आधीच दाखल इतर रुग्णांना इतरत्र स्थानांतरित आणि नवीन रुग्ण दाखल करून घेण्यास मनाई केली आहे. या आदेशाला आव्हान देण्यात आले आहे.

अनेक खासगी रुग्णालयांत आधीच दाखल झालेल्या काही रुग्णांवर हृदय, मेंदू, अथवा इतर अवयवांवरील शल्यक्रिया करण्यात आलेल्या आहेत, तर काहींवर शल्यक्रिया होणार आहेत. त्यास्थितीत अशा रुग्णांना इतर स्थानांतरित करणे अयोग्य ठरेल, असे याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अॅड. कार्तिक शुकूल यांनी नमूद केले. तेव्हा याचिकेवर हायकोर्टाने महापालिका व राज्य सरकारला नोटीस बजावत १० सप्टेंबरला उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. त्यासोबतच खासगी रुग्णालयांतील इतर रुग्णांना स्थानांतरित करण्यास मनाई केली. इतर रुग्णांना उपचार व शल्यक्रियेसाठी दाखल करून घेण्याची परवानगी या रुग्णालयांना दिली.

समूह संसर्गाच्या शिखरावर जाऊन बसण्याच्या वेगाने वाढत असलेल्या करोना विषाणूने आज दिवसभरात २२०५ नव्या रुग्णांची विक्रमी साखळी जोडली. रोज नव नव्या उच्चांकाने वाढत असलेल्या या प्रादुर्भावाने आता खाटाच उपलब्ध नसल्याने उपचार करणार कोठे आणि इतके मनुष्यबळ आणणार कुठून अशी विचित्र कोंडी वैद्यकीय यंत्रणेपुढे निर्माण केली आहे. ( Coronavirus In Nagpur latest updates )

करोना विषाणू ज्या वेगाने पसरत आहे, ते पाहता शहरातील सर्व सरकारी, खासगी रुग्णालये ताब्यात घेतली तरी खाटा पुरतील, की नाही अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना विषाणूने शिरकाव केल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात ४३ हजार २३७ जणांना विळखा घातला आहे. त्यापैकी आज करोनामुक्त झालेल्या १८०३ रुग्णांसह ७० टक्के म्हणजे ३० हजार ४६१ जण आजारमुक्त झाले आहेत. करोनाच्या या घडामोडीत जीवाला आणखी घोर लावणारी बाब म्हणजे आज दिवसभरात ३४ करोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ४ जणांसह मनपा हद्दीतील २८ तर जिल्ह्याबाहेरील २ जणांचा समावेश आहे.

नागपूर :करोनामुळे मृत्यू होण्याची दहशत आणि नातेवाइकांची तडफड कायम आहे. रुग्णाजवळ जाणेदेखील कठीण आहे. असे असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्काराचा मोठा प्रश्न मध्यंतरी उद्भवला होता. आजही स्थिती फारशी बदललेली नाही. अशा कठीण काळात आरोग्यदूत वा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिवाची पर्वा न करता अंत्यसंस्कार करीत समाजासमोर आदर्श घालून दिला.

देशात करोनाचे संकट ओढवल्यानंतर अनेक ठिकाणी आप्तेष्ट दूर जात असल्याचे चित्र दिसले. असे असताना वेगवेगळ्या संस्था आणि हजारो हात देवदूत म्हणून मदतीसाठी सरसावले. अगदी सुरुवातीपासून कुणी धान्याच्या किट, कुणी सॅनिटायजर, मास्कचे वाटप केले. श्रमिकांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांद्वारे मदत करण्यात आली. सर्वात कठीण काळ म्हणजे करोनामुळे होणारे मृत्यू आणि अंत्यसंस्कारांचे आव्हान. हृदय हेलवणाऱ्या समयी नागपुरात जमियत उलमा ही संघटना मदतीसाठी पुढे आली. उलमाचेही दोन गट असून अरशद मदनी गटाने आतापर्यंत १३२ पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जमियत उलमाचे अध्यक्ष हाफिस मसूद अहमद हुस्सामी, माजी नगरसेवक सिराज अहमद, जावेद अख्तर यांच्या देखरेखीखाली जमातची १२-१३ सदस्यांची टीम गेल्या चार महिन्यांपासून जातपात धर्म बाजूला सारून काम करत आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा त्यांच्या धर्मानुसार अंत्यविधी करण्यात येतो, असे अतिक कुरेशी यांनी सांगितले.

नागपूर : करोनामुळे होणारे मृत्यू कसे रोखता येईल, याची चाचपणी करण्यासाठी मुंबईची चमू अलीकडेच नागपुरात येऊन गेली. उच्च न्यायालयानेही याबाबत सरकारला जाब विचारला. असे असताना नागपूरने मृत्युदरात पुण्यालाही मागे टाकले असल्याची चिंताजनक आकडेवारी पुढे आली आहे. पुण्यात करोनामुळे होणारा मृत्युदर २.३७ असताना नागपुरात तो ३.३३ असा आहे.

नागपुरात दिवसाला दीड हजारापेक्षाही अधिक करोनाबाधितांची भर पडत आहे. मृतांचा आकडा कमी करण्यातही प्रशासनाला यश येत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात करोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या कशी रोखता येईल, यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पुढाकाराने तज्ज्ञ डॉक्टरांची चमू अलीकडेच येऊन गेली. तपासण्या वाढवा, आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम करा असे एकाहून एक निर्देश उच्चस्तरीय बैठकांमधून निघत असताना त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण होत चालले आहे. नागपूरच्या तुलनेत पुण्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी तिथे मृत्युदर नागपूरपेक्षा कमी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही नागपुरात पुण्यापेक्षा कमी आहे. पुण्यात एकूण बाधितांपैकी ८२ टक्के रुग्ण करोनातून मुक्त झाले. नागपुरात मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९ टक्के आहे. पुण्यातील लोकसंख्या आज अंदाजे १ कोटी १६ लाखांच्या घरात आहे. नागपुरातील लोकसंख्या ५२ लाख ३८ हजारांच्या घरात आहे. लोकसंख्येनुसार टक्केवारी बघितली तर पुण्यात ०.९१ टक्के लोकांना करोनाची बाधा झाली असून नागपुरात ही टक्केवारी ०.७५ आहे. तपासण्यांनुसार टक्केवारी बघितली तर पुण्यात २१.४४ टक्के लोकांना करोनाची बाधा झाली असून नागपुरात हीच टक्केवारी १३.२१ आहे.

नागपूर: करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर व कर्मचारी नसल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात (मेयो) सुमारे तीनशेहून अधिक खाटा रिक्त ठेवाव्या लागल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती नागपूर महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सोमवारी सादर केली.

करोनाबाधितांना रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत म्हणून उपचार नाकारण्यात येत असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रकाशित झाले होते. त्या वृत्ताची दखल घेत हायकोर्टाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यासंदर्भात याचिका दाखल करण्यासाठी अॅड. श्रीरंग भांडारकर यांची न्यायालयमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली.

दरम्यान, करोनाबाधितांच्या उपचारासाठी शहरातील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालयांतील एकूण उपलब्ध खाटा व रिक्त खाटा यांची माहिती सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता. त्यानुसार महापालिकेने शपथपत्र दाखल केले. त्यात शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय, मेयो, एम्स या तीन शासकीय रुग्णालयांसोबतच सुमारे ६७ खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालयात परिवर्तीत करण्यात आले आहे. शहरात एकूण ३,१५० खाटा उपलब्ध आहेत. परंतु, सुमारे तीनशेहून अधिक खाटा विविध कारणांमध्ये रिक्त ठेवाव्या लागल्या आहेत. त्यात मेयोत गेल्या आठवड्यात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे ९० खाटा रिक्त ठेवाव्या लागल्या होत्या. तर मेडिकलमध्ये डॉक्टर, परिचारिका व इतर सहायक कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे २०० खाटा वापरता आलेल्या नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे.

नागपूर: पन्नास वर्षांवरील सरकारी कर्माचाऱ्याला कामावर बोलाविण्यात येऊ नये वा त्यांना आवश्यक असेल तेव्हा रजा घेऊ देण्यात यावी, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणाची पन्नासी गाठलेल्या कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सरकारी विभागातील कर्मचारी आता विश्रांतीसाठी इच्छुक दिसून येत आहेत.

टपाल विभाग, राष्ट्रीयीकृत बँक यांसह विविध शासकीय विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. सर्व कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, पन्नास वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांनाही यातून वगळण्यात आलेले नाही. वास्तविक पाहता करोना संक्रमणाची भीती ज्येष्ठांमध्ये अधिक आहे. तेव्हा पन्नास वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविण्यात येऊ नये. तसेच दररोज पन्नास टक्के कर्मचारी कामावर असावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरातील काही टपाल विभागात कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यानंतरही वेगवेगळ्या भागातील टपाल कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात येत आहे. टपाल कर्मचाऱ्यांचा कार्यालयात येणाऱ्या नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याने त्यांना संक्रमणाची भीती अधिक आहे. हाच प्रकार बँक कर्मचाऱ्यांसोबत घडत आहे. शहरातील राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांमध्ये मोठ्या संख्येने कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर पन्नास वर्षांवरील कर्मचाऱ्यांना कामावर न बोलाविण्यासाठी आता कर्मचारी संघटना सरसावल्या आहेत.

सेवानिवृत्तीकडे झुकलेल्यांवर भर
बँक, विमा विभागासह विविध कार्यालयातील कर्मचारी भरती रखडली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकाधिक कामाचा ताण वाढत आहे. विशेषत: सेवानिवृत्तीकडे झुकत असलेल्या कर्मचाऱ्यांवर याचा अधिक परिणाम होत आहे. करोनाकाळात होत असलेला हा मानसिक त्रास दूर होण्याची अपेक्षा कर्मचारी व्यक्त करत आहेत.

नागपूर: करोनाच्या संकटात फ्रंटवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांना अधिक मोबदला दिला जात आहे. इतकेच नाही तर कमी जोखीम असलेल्या केंद्रीय रुग्णालयात परिचारिकांना जोखीम पाहता मोबदला वाढविण्यात आला आहे. पण, राज्यात अशी कोणतीही सोय नाही. विषाणूच्या या उद्रेकात रुग्णालयांमध्ये वॉर्डात सर्वाधिक जोखमीची सेवा आम्हीच देतो, तरीही जर असा दुजाभाव होत आहे. आम्हाला जीव नाही का, असा व्यवस्थेला सवाल करीत परिचारिकांनी काळ्याफिती लावून रुग्ण सेवा सुरू ठेवली आहे.

राज्यभरात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या पुढाकारातून १ सप्टेंबरपासून विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये काळ्या फिती लावून रुग्ण सेवा दिली जात आहे. हे प्रतिकात्मक आंदोलन आहे. ८ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढे बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मेडिकल परिसरात झालेल्या द्वारसभेत देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे सचिव शहजाद बाबा खान करीत आहेत. १ ते ८ सप्टेंबर या प्रतिकात्मक आंदोलन काळात रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही, याची खबरदारी घेत परिचारिका काळी फित लावून सहभागी होत आहे. सकाळी निदर्शने करण्यात येतात. यानंतर मात्र ८ सप्टेंबर रोजी एक दिवस कामबंद आंदोलन होईल. त्यानंतरही मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

नागपूर: सुप्रीम कोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून कोणतेही संरक्षण न मिळाल्याने महापालिकेने शुक्रवारी वर्धा मार्गावरील साई मंदिर परिसरातील अनधिकृत दुकाने पाडली. यावेळी कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून पोलिसांना तैनात करण्यात आले होते.

साई मंदिर परिसरातील अवैध दुकाने पाडण्यात यावी, अशी याचिका साई मंदिर व्यवस्थापनाने हायकोर्टात दाखल केली होती. यापूर्वीच न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महापालिकेकडून कारवाई झाली नाही. तेव्हा हायकोर्टाने महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुकाने पाडण्याची हमी मनपाने दिली. त्यानुसार दुकानदारांना पुन्हा नोटीस देण्यात आली. पण दुकानदारांनी शुक्रवारी हायकोर्टात पुन्हा धाव घेतली. तसेच कारवाईवर स्थगिती मागितली. त्यासोबतच हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले.

दरम्यान, सुप्रीम कोर्ट व नागपूर खंडपीठात दोन्ही याचिका शुक्रवारीच सुनावणीला दाखल झाल्या. तेव्हा नागपूर खंडपीठाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची दुपारी अडीच वाजतापर्यंत प्रतिक्षा करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, सुप्रीम कोर्टाने आठ सप्टेंबरला सुनावणी निश्चित केली. तेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने त्यावर लगेच आदेश देता येणार नाही, असे स्पष्ट करीत हायकोर्टाने ९ तारखेला सुनावणी निश्चित केली. दोन्ही न्यायालयाकडून अंतरिम आदेश न मिळाल्याने मनपाने कारवाई करीत दुकाने पाडली. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. तुषार मंडलेकर यांनी, तर मनपातर्फे अॅड. जे. बी. कासट यांनी बाजू मांडली.

नागपूर: करोनावर मात करण्यासाठी चाचण्या वाढविणे, विलगीकरण आणि वैद्यकीय यंत्रणा बळकट करणे या त्रिसूत्रीवर झोननिहाय 'वॉर रुम' तयार करावी. सोबतच 'एकछत्री समन्वय' साधून युद्धपातळीवर प्रयत्न करावे, अशा सूचना मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी केल्या.

मुंबईच्या धर्तीवर उपाययोजना करण्यासाठी चहल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या एका समितीने शुक्रवारी नागपुरात चर्चा केली. गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. गृहमंत्र्यांच्या पुढाकाराने आलेल्या चमूत डॉ. हेमंत शहा, डॉ. राहुल पंडित, डॉ. मुफज्जल लकडावाला, डॉ. गौरव चतुर्वेदी यांचा समावेश होता. बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेशकुमार, मावळते पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यात करोनाबाधितांची वाढणारी संख्या आणि मृत्युदरावर उभय मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.

इंदिरा गांधी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, वैद्यकीय उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर यांनी चाचण्या व उपाययोजनांचा आढावा सादर केला. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व यंत्रणेसोबतदेखील त्यांनी सविस्तर चर्चा केली. झोननिहाय नियुक्त केलेले सनदी अधिकारी माधवी खोडे, राममूर्ती, मनीषा खत्री यांनी गेल्या काही दिवसांतील निरीक्षणे सादर करून सूचना केल्या.

नागपूर: पूर्व विदर्भात पुरामुळे प्रकोप ओढवल्यानंतरही सरकारने विदर्भाला वाऱ्यावर सोडले असल्याची तोफ डागून माजी आमदार आशिष देशमुख यांनी सरकारला घरचा अहेर दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीकास्त्र सोडले.

पूर्व विदर्भात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमुळे एका रात्री होत्याचे नव्हते झाले. राज्याच्या प्रमुखांनी तातडीने लक्ष देणे आवश्यक होते पण, अद्याप आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. पुरामुळे हजारो कुटुंबांचे संसार उद्‌ध्वस्त झाले. घरातील साहित्य व घरे वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक देशोधडीला लागले. एक लाख हेक्टरहून अधिक पीक पाण्याखाली आले. अशा भीषण संकटसमयी मुख्यमंत्र्यांनी किमान हवाई पाहणी करून नागरिकांना दिलासा देणे आवश्यक होते. अद्याप ते विदर्भाकडे फिरकलेले नाही. महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पूरग्रस्त भागाचा दौरा केलेला नाही. यावरून राज्यकर्त्यांना विदर्भाची चिंता नाही, असेच दिसून येत असल्याची टीका देशमुख यांनी केली.

टोपे गेले कुणीकडे ?
अन्य शहरांप्रमाणेच नागपुरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. चाचण्यांची कमतरता आहे. रुग्ण वाढल्याने आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे. अशा संकटात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एकवेळाही नागपूर-विदर्भाचा दौरा केलेला नाही. आरोग्य मंत्री नेमके गेले कुणीकडे, असा सवालही आशिष देशमुख यांनी केला.

नागपूर: करोना विषाणू प्रादुर्भाव साखळीचा विळखा दिवसेंदिवस उपराजधानी भोवती करकचून आवळला जात आहे. गुरुवारी १,७२७ या आणखी एका उच्चांकी संख्येने भर घातल्याने रुग्णसंख्या ३४ हजार ४३४वर पोहचली. आतापर्यंतचा हा एका दिवसातील उच्चांकी आकडा ठरला आहे. चिंतेची बाब म्हणजे जिल्ह्यात तब्बल ४५ जण उपचारादरम्यान दगावले. त्यामुळे आजवर करोनाने दगावणाऱ्यांची संख्याही आता वाढून १,१७७पर्यंत पोहचली आहे.

या घडामोडीत आज जिल्ह्यात १२२६ जणांनी करोनातून मुक्ती मिळविल्याने त्यांना रुग्णालयातू सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. करोना आजारमुक्तीचा हा दर एकूण बाधितांच्या तुलनेत आता ६६ टक्क्यांवर पोहचला आहे. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात करोनाची लागण झालेले १०, ३७३ सक्रिय बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील ६१३३ जणांना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला असला तरी लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर लक्षणे असलेल्या ४२४० बाधितांवर विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६,८४० संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यातील ५,११३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला.

नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांपैकी ९१४ नमुने हे अँटिजेन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आले. त्या खालोखाल खासगी प्रयोगशाळेतून २९२, मेयो १५३, नीरी ११८, मेडिकल १११, एम्स ७३ तर माफसूमधून ६६ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळला. दिवसभरात जिल्ह्यातून करोनाची बाधा झालेल्यांपैकी १,४०९ नागरिक हे शहर परिसरातील तर ३१५ हे जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमधील रहिवासी आहेत. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या एकूण जवळजवळ ३५ हजार करोनाबाधितांपैकी ७,२२८ बाधित हे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. यापैकी ५,२१२ जणांनी आजारातून मुक्ती मिळविली आहे.

नागपूर: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती क्षीण पडत जाते, असे म्हटले जाते. त्यामुळेच करोनासारख्या विषाणूच्या विळख्यात ज्येष्ठ व्यक्ती तरुणांच्या तुलनेत अधिक जोखमीवर असतात, असे आढळून आले आहे. मात्र याही स्थितीत एखादा इच्छाशक्तीच्या बळावर करोनासारख्या विषाणूला परतावून लावू शकतो, हे उपराजधानीतील ९५ वर्षीय ज्येष्ठाने सिद्ध करून दाखविले आहे.

तब्बल दहा दिवस करोनाशी झुंज देत हे ज्येष्ठ नागरिक आजारमुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. उपराजधानीत करोनाचा विळखा वाढत असताना ते आता शहरातील सर्वांधिक वयाचे करोनामुक्त ज्येष्ठ नागरिक ठरले आहेत. यापूर्वी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ९६ आणि ९४ वर्षीय अशा दोन ज्येष्ठांनी विदर्भातील सर्वांत अधिक वयाचे करोनामुक्त रुग्ण म्हणून आपली नोंद केली होती. आता उपराजधानीतीलही या ९५ वर्षीय ज्येष्ठाने करोनावर विजय मिळविला आहे. करोनासदृश आजाराची लक्षणे आढळल्याने नातेवाइकांनी त्यांना तातडीने २० ऑगस्ट रोजी सेव्हन स्टार या खासगी कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती केले. त्याच दिवशी त्यांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सलग दहा दिवस त्यांच्या प्रकृतीवर नाजूक लक्ष ठेवण्यात आले. रुग्णाने उपचाराला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने करोनावर मात करणे शक्य झाले आहे.

याला दुजोरा देताना रुग्णालयाचे संचालक डॉ. सदाशिव भोळे म्हणाले, करोनाचे वेळीच निदान झाल्याने उपचाराची दिशा ठरविता आली. रुग्णालयातील परिचारिकांनीदेखील त्यांचे वय पाहता रुग्णावर अधिक काळजीपूर्वक उपचार केले. करोनासारख्या संकट काळात अतिदक्षता विभागातील टीमची तत्परता आणि परिचारिकांची सुश्रुषा पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नागपूर: शहरात करोना रुग्णांना बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. वेळेत उपचार मिळत नसल्याने मृत्युचा आकडाही वाढत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनी तत्काळ बेड्सची संख्या वाढवावी. त्यातच आयसीयूमधील बेड्सची संख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी शहरातील डॉक्टरांना दिले.

शहरात करोना संसर्गाची भविष्यात उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता काही उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. शासकीय रुग्णालयांवर पडणारा ताणही वाढला आहे. काही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता भविष्यात जे रुग्णालय कोव्हिड रुग्णालय करण्यासाठी पुढे येईल त्यांनाच परवानगी देण्यात येईल, असेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौरांची शहरातील डॉक्टरांसह गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय झलके, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, संजय निपाने यांची उपस्थिती होती.

आयएमएने डॉक्टरांची यादी द्यावी
आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी, कोव्हिडच्या दृष्टिकोनातून नागपूर महापालिकेतर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागपूर महापालिकेकडे व्यवस्था उपलब्ध आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. रुग्णालये तयार आहेत, परंतु तेथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे. यासाठी जाहिरात काढली असून खासगी डॉक्टरांनी यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. आयएमएने यासाठी पुढाकार घेऊन सेवा देऊ इच्छिणाऱ्या डॉक्टरांची यादी पाठविल्यास २४ तासांत कार्यादेश काढू, असेही ते म्हणाले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, आयएमए व खासगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.

नागपूर: उपचारास विलंब होत असल्याचा आरोप करीत करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांनी कोराडी मार्गावरील कुणाल हॉस्पिटलच्या डॉक्टरवर हल्ला करुन तोडफोड केली. ही घटना ३१ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. रवी श्याम सुर्यवंशी (वय ३६, रा. वंजारीनगर, अजनी), असे डॉक्टरचे नाव आहे.

डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी करोनाबाधित रुग्णाच्या दोन नातेवाइकांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ व तोडफोड केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित रुग्ण गंजीपेठ येथील रहिवासी आहे. ३१ ऑगस्टला त्याला करोनाचा असल्याचे निदान झाले. नातेवाइकांनी त्याला कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारासाठी दोन लाख रुपयेही जमा केला.

हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर रुग्णावर उपचारास विलंब होत असल्याने नातेवाइकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. डॉ. रवी हे नातेवाइकांची समजूत काढत असताना, दोन नातेवाइकांनी त्यांना शिवीगाळ केली. एका नातेवाइकाने हातातील काचेची बाटली फोडून रवी यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर पैसे परत घेतले. रुग्णाला घेऊन नातेवाइक कारने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. डॉ. रवी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
 

नागपूर: करोनामुळे उपराजधानीतील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या घाटांवरील चित्रही अधिक भयावह होत आहे. अंत्यसंस्कार करताना सुरक्षिततेसाठी वापरलेले पीपीई किट, मास्क, हातमोजे यांची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज आहे. मात्र गांधीबाग झोनअंतर्गत गंगाबाई घाट परिसरात करोनाबाधितांवरील अंत्यसंस्कारानंतर मृतदेह उचलाना वापरलेले पीपीई किट, हातमोज व इतर साहित्य उघड्यावर फेकण्यात येत आहे. यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भिती पसरली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

गंगाबाई घाट परिसरात तसेच घाटावर अंत्यसंस्कारासाठी दर दिवसाला नागरिक येतात. या परिसरात करोना जैव घनकचरा अशाप्रकारे फेकलेला आढळल्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यासंदर्भात माजी नगरसेवक तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पूर्व नागपूरचे अध्यक्ष नाना झोडे यांनी महापालिका गांधीबाग झोन आरोग्य विभागाला सूचना दिली आहे. मात्र या तक्रारीची दखलच घेण्यात येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मृतदेह आणणारे कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांच्या संपर्कात येतात. याशिवाय येथे वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसरात करोनाचे विषाणू पसरण्याची भिती आहे. कर्मचारीच स्वतः काळजी घेत नसल्याने करोनाबाधितांच्या नातलगासह इतरही अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गंगाबाई घाट परिसरात ठिकठिकाणी करोनाचा जैविक कचरा अस्ताव्यस्त पसरला आहे. करोनामुळे एकीकडे सुरक्षितता व आवश्यक उपाययोजनेसाठी धडपड सुरू असताना, अशाप्रकारचा बेजबाबदारपणा उपराजधानीसाठी अत्यंत घातक व धोक्याची घंटा मानली जात आहे. यासाठी जबाबबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी झोडे यांनी केली.

जुगार व ऑनलाइन लॉटरीची उधारी चुकविण्यासह मैत्रिणींवर पैसे खर्च करण्यासाठी ‘हात की सफाई’ करून एटीएमची अदलाबदली करणाऱ्या कुख्यात चोरट्याला स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली. मयूर अनिल कायरकर (वय २९, रा. विश्वकर्मानगर, अजनी), असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. तो दहावी अनुत्तीर्ण असून, त्याचे वडील महावितरणचे निवृत्त अभियंते आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर याला जुगार व ऑनलाइन लॉटरीचे व्यसन असून त्याच्यावर कर्ज झाले. याशिवाय मैत्रिणींवर पैसे खर्च करण्यासाठीही त्याला पैशाची गरज होती. त्यामुळे त्याने एटीएममध्ये वृद्ध नागरिकांकडील एटीएम कार्डची अदलाबदील करायला सुरुवात केली. चोरीच्या एटीएम कार्डद्वारे पैसे काढून तो उधारी फेडायला लागला. नागपूर ग्रामीणमध्ये अशाप्रकारच्या घटना वाढल्याने चोरट्याला जेरबंद करण्याचे निर्देश नागपूर ग्रामीणचे अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांना दिले.

स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, जावेद शेख, सचिन मत्ते, सायबर सेलचे सतीश राठोड, स्नेहलता ढवळे यांनी चोरट्याचा शोध सुरू केला. सापळा रचून मयूर याला अटक केली. त्याच्याकडून उमरेड व कन्हानमधील प्रत्येकी पाच, सावनेरमधील दोन तर पारशिवनी, कुही, खापरखेडा व कळमेश्वरमधील प्रत्येकी एक असे एकूण १६ गुन्हे उघडकीस आणले.

नागपुर के लोगों ने नागपुर महानगर पालिका द्वारा बार-बार की गई कॉल का जवाब दिया।  महापौर संदीप जोशी ने इस साल सार्वजनिक रूप से गणेशोत्सव न मनाने, चार फीट से ऊंची मूर्तियों को न रखने और घर में गणेश की मूर्तियों को विसर्जित करने की अपील की थी।  नागपुर महानगरपालिका द्वारा की गई इस अपील का नागपुरवासियों ने सहजता से जवाब दिया।  अनंत चतुर्दशी पर, कई नागपुरवासियों ने घर पर विघ्नहर्ता गणराया की मूर्ति को विसर्जित करके अपनी जिम्मेदारी का परिचय दिया।  इस संकट में नागपुर के लोगों द्वारा दिखाई गई सामंजस्य की भूमिका सराहनीय है और शहर के प्रथम नागरिक के रूप में, मैं नागपुर के सभी लोगों को धन्यवाद देना चाहूंगा, महापौर  संदीप जोशी ने कहा।

मंगलवार को महापौर संदीप जोशी ने शहर में विसर्जन स्थल का दौरा किया और स्थिति का जायजा लिया।  शहर के फुटाला, गांधीसागर और सकरदा झील क्षेत्रों में कृत्रिम टैंकों के विसर्जन स्थलों का निरीक्षण किया।  स्थायी समिति के अध्यक्ष विजय (पिंटू) झलके, खेल समिति के अध्यक्ष प्रमोद चिखले, पुलिस उपायुक्त विनीता शाहू, उपायुक्त सॉलिड वेस्ट मैनेजमेंट डॉ।  प्रदीप दशरवार, पुलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर आदि उपस्थित थे।

तीन से चार दीन पहीले विदर्भ भारी वर्षा हुई इस बारीश से पूर्व मे काफी नुकसान हुआ है खेती से घर तक सब तबाह हो गया है महाराष्ट्र सरकार ने बाढग्रस्तो को मदत की धोषणा कि है बुधवार को विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस ने बाढग्रस्त गावो का दौरा किया फडणवीस कहा की भारी वर्षा से घरो का ओर खेती बडी संख्या मे नुकसान हुआ है सुविधा हो ने के बावजुद 36 घटे के बाद भी लोगो तक इसकी जानकारी नही मिली अब इसकी समीक्षा कि जाएगी इसके बात बाढग्रस्तो को जल्द से जल्द से मदत करणे कि मांग रहेगी इस दौरे मे पूर्व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले विधायक परिणय फुके ओर जिला ग्रामिण अध्यक्ष उपस्थित थे

मंगलवार को गणेश विसर्जन होने के कारण पुरे शहर मे पुलिस का तगडा बंदोबस्त रखा गया था जहा एक ओर लोग गणेश विसर्जन मे दंग थे वही दुसरी ओर गिट्टीखदान थाना क्षेत्र मे हत्या का मामला सामने आया है इस मामले मे एक ओर हैरान करणे वाली बात ये है की जिसकी मौत हुई वो ओर जिसने की दोनो भी नाबालीक है जानकारी नुसार फिर्यादी रफिक खान दिलावर खान साई नगर बडी मस्जिद निवासी इनके बेटे आफताब खान इसकी हत्या कर दी आफताब ओर आरोपी के बिच झगडा हुआ झगडे कि  बात मन मे रखकर उसने आफताब को एक खेत मे ले जाकर धारदार हतीयार से वार कर उसे मौत के घाट उतार दिया पुलिस ने फिर्यादी के शिकायत पर नाबालिक बच्चे 302 का मामला दज कर उसे हिरासत मे लिया है 

नागपूर: राज्यातील खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपचारांचे दर निश्चित करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे काय, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केली आहे.

विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनने महापालिकेची कारवाई अवैध असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्यावर न्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा हायकोर्टाने राज्य सरकार आणि महापालिका आयुक्तांना उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

शहरात करोनाबाधित वाढल्याने काही खासगी रुग्णालयांतदेखील त्या रुग्णांवर उपचार करण्याची सोय करण्यात आली. परंतु, करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांनी आकारलेल्या शुल्कावर मनपाने बंधने घातली आहेत. एखाद्या व्यवसायाप्रमाणे खासगी रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आलेल्या देयकांची तपासणी आणि ऑडिट केले जात आहे. तसेच वास्तविक माहिती जाणून न घेताच रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. अशाप्रकारे रुग्णालयांना बदनाम करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. खासगी रुग्णालयांतील डॉक्टरदेखील करोनायोद्धा आहेत. मात्र, त्यांचा अशाप्रकारे अपमान करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. केवळ करोनाच नाही तर अन्य आजाराच्या रुग्णांवरील उपचारांचे दर लादण्यात येत असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

नागपूर: कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी गरज पडल्यास मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने ६० कोच तयार केले असून राज्य सरकारकडून मागणी झाल्यास हे कोच त्यांच्या ताब्यात देण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे व्यवस्थापक सोमेशकुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.

शहरात वाढत्या करोना रुग्णांसाठी हॉस्पिटल्समध्ये जागा नसल्याने अनेकांवर घरीच उपचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने तयार केलेल्या कोचेसबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ६० कोचेसचे रूपांतर हॉस्पिटलमधील वॉर्डात करण्यात आले आहे. या कोचेसचा उपयोग कोव्हिड रुग्णांसाठी करता येऊ शकतो. मात्र त्यात गंभीर रुग्णांवर उपचाराची सोय नाही. कारण तेथे ऑक्सिजन सिलेंडर किंवा अन्य साधने नाहीत मात्र विलगीकरण किंवा तत्सम कामांसाठी या कोचेसचा उपयोग केला जाऊ शकतो व राज्य प्रशासनाकडून आम्हाला मागणी झाल्यास हे कोच पुरविण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नागपूर: पूर्व विदर्भातील पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य सुरू आहे. तातडीने उपाययोजना करण्यात येत असून नुकसानाबाबत सर्वेक्षणाचे आदेश दिले असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिंदे यांनी सोमवारी गडचिरोलीच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. अतिवृष्टीमुळे अनेक गावांशी संपर्क तुटला, काही लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. उपाययोजना करण्याच्या सूचना आधीच दिल्यानुसार प्रशासन काम करत आहे. तातडीने पंचनामे करण्यात येत आहेत. सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आठवभरात मदत करण्याच्या विरोधी पक्षाच्या मागणीकडे लक्ष वेधले असता, 'गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आदी पूरग्रस्त भागात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. सरकारने तातडीने मदत पोहोचवण्यात येत आहे. रस्ते, पुलांचा आढावा घेऊन नुकसान झालेल्या ठिकाणी नव्याने कामे करण्यात येतील', असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील लोकल, धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत विचारले असता, कोव्हिडचे संकट अद्याप संपुष्टात आलेले नाही. विविध क्षेत्र टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहेत. संसर्ग कमी होत असला तरी, वाढता कामा नये, याची काळजी घेतली जात आहे. केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नागरिकांना दिलासा देण्यात येत आहे. गर्दी होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. सर्व स्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेतले जातील, असेही शिंदे यांनी सांगितले.

नागपूरः अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शासनाकडून १० हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी हे आदेश दिले आहेत.

गेल्या १०० वर्षात पूर्व विदर्भात प्रथमच पूरपरिस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चंद्रपूर जिल्ह्यालाही पुराचा तडाखा बसला आहे. चंद्रपुर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना दहा हजारांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तर, येत्या एक-दोन दिवसांत खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती, विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्हयात पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे, अशा स्वरुपाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं युद्धपातळीवर पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. तसंच, पूरग्रस्त् भागात सध्याच्या काळात महामारी पसरणार नाही यासाठी पिण्याचे शुध्द पाणी, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, पशुधनाच्या चाऱ्याची व्यवस्था, नियमित वीज पुरवठा, रोहीत्रे व रस्ते दुरूस्ती याकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले होते.

 

नागपूर: इंदोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचा 'मेक ओव्हर' होण्याचे संकेत आहेत. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने या केंद्राचे रूपांतर अतिविशेषोपचार रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) होणार आहे. येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमही उपलब्ध होणार आहे. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंढे यांच्यासोबत उद्या, बुधवारी मुंबईतील मंत्रालयात बैठक होत आहे.

केंद्रात ५६८ खाटांचे हॉस्पिटल तर पदव्युत्तर व सुपर स्पेशालिटीसाठी महाविद्यालय असेल. साडे सात एकर विस्तीर्ण परिसरातील ही संस्था उभारण्यात येणार आहे. साडे आठ एकरमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था, उद्यान, क्रीडांगण, सभागृह असेल. सुमारे ९१७ कोटी रुपयांचा प्रकल्प असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.

विदर्भ व मध्य भारतात पदव्युत्तर अभ्यासक्रम संस्थांची कमतरता या संस्थेमुळे भरून निघेल. अतिविशेषोपचाराची सुविधा उपलब्ध होईल. कार्डियोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोसर्जरी, न्युरोसर्जरी, हृदयरोग शल्यचिकित्साशास्त्र, हिमटोलॉजी हे सहा अतिविशेषोपचार अभ्यासक्रम येथे प्रस्तावित करण्यात आले आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध वैद्यकशास्त्र, बालरोग चिकित्साशास्त्र, त्वचा व गुप्तरोग, मनोविकृतीशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, रक्तपेढी, जीव रसायनशास्त्र, विकृतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, बधिरीकरणशास्त्र, शल्य चिकित्साशास्त्र, अस्थि व्यंगपोचारशास्त्र, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, नाक-कान-घसाशास्त्र, नेत्रशल्य चिकित्साशास्त्र, रुग्णालयीन प्रशासन, इमरजन्सी मेडीसिन इत्यादी १७ अभ्यासक्रम येथे प्रस्तावित करण्यात आले आहेत.

नागपूर :करोना आणि त्यामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगांवर संकट आहे. लॉकडाउनच्या नकारात्मक परिणामांची यादी मोठी असली तरी त्याचे काही सकारात्मक परिणामही झाले आहेत. यात प्रामुख्याने प्रदूषणाचा स्तर खालावला आहे. हवा आणि पाण्याची गुणवत्ता सुधारली आहे. या काळात गंगेच्या पाण्याचीही गुणवत्ता बरीच सुधारल्याची वस्तुस्थिती नीरीच्या एका अभ्यासातून समोर आली आहे.

गंगा नदीच्या पाण्याची ढासळणारी गुणवत्ता हा केंद्र आणि अनेक राज्यांसाठी चिंतेचा विषय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गंगेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र त्यात म्हणावे तसे यश अद्याप प्राप्त झाले नव्हते. परंतु लॉकडाउनच्या काळात गंगेच्या पाण्याची गुणवत्ता अचानक सुधारली आहे. देशभरातील सगळेच उद्योग लॉकडाउनमुळे बंद होते. त्यामुळे कारखान्यांमधुन गंगेत सोडले जाणारे प्रदूषित पाण्याचे प्रमाण कमी झाले. या काळात पर्यटकांची संख्याही रोडावली. त्यामुळे गंगेच्या पाण्यातील मानवी हस्तक्षेप कमी झाला. त्यामुळे प्रदूषणाची पातळी खालावली.

'नमामी गंगे' अभियानाअंतर्गत गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेचे शास्त्रीय मोजमाप करण्याची जबाबदारी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेकडे (नीरी) आहे. या संस्थेच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अत्या कपले यांनी गंगेच्या पाण्याची गुणवत्ता वाढल्याची माहिती एका ट्विटद्वारे दिली आहे. अलीकडेच मे महिन्यात गंगेच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. ऋषीकेश, हरिद्वार, कानपूर, प्रयागराज, वाराणसी, पटना, भागलपूर, फराक्का आणि कोलकाता जवळील डायमंड हार्बर येथील गंगेच्या पाण्याचे नमुने संकलित करून त्याची तपासणी करण्यात आली. यात मे २०१६ आणि मे २०१८च्या तुलनेत मे २०२०मधील पाण्याची गुणवत्ता चांगली असल्याचे आढळून आले आहे. वरील ठिकाणांपैकी कानपूर, डायमंड हार्बर आणि प्रयागराज येथील पाण्याची गुणवत्ता २०१६ आणि २०१८मध्ये तुलनेने अधिक ढासळली होती, असे लक्षात आले. मात्र २०२०मध्ये इतर ठिकाणांसहित या तीनही ठिकाणांवरील गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेतही सुधार झाल्याचे आढळले.

अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. बचाव पथकांचे कार्य वेगाने सुरु असून नागरिकांचे जीव वाचविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. बचावकार्यासाठी सैन्यदलाची मदत घेतली आहे. प्राथमिक अंदाजानुसार विभागातील १४ तालुक्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला असून ९० हजार ८५८ नागरिक पूर बाधित आहेत. त्यापैकी ४७ हजार ९७१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यंत्रणेला यश आले आहे. विभागात एकूण १३८ पुनर्वसन केंद्रात ९ हजार ९८२ पूर बाधितांना तात्पुरत्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे. ( Heavy rain flood situation in Vidarbha )

विभागीय नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार सोमवारी तीन वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी, कुही येथे सैन्यदलाच्या मदतीने मदत कार्य करण्यात आले. नागपूर जिल्हयातील ५ तालुक्यांमध्ये ६१ गावे बाधित झाली आहेत. ४९११ कुटुंबांतील २८ हजार १०४ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्हयातील मौदा, कामठी, पारशिवणी, कुही, सावनेर या तालुक्यांना फटका बसला आहे. तर भंडारा जिल्ह्यात पवनी, लाखांदूर, भंडारा येथे एनडीआरएफ च्या दोन व भंडारा, मोहाडी, तुमसर येथे एसडीआरएफच्या दोन चमूंनी बचतकार्य केले. चंद्रपूर जिल्ह्यातील लाडज येथे दोन एनडीआरएफ चमू व लाडज व बेलगाव येथे दोन एसडीआरएफच्या चमूंनी मदत कार्य केले.

उपराजधानी भोवती कोविड विषाणूचा विळखा आता नव्या वेगाने वाढत चालला आहे. जून पर्यंत दशकाने वाढत असलेला प्रादुर्भाव आता दररोज हजारोंच्या घरात गेला आहे. ही प्रादुर्भाव साखळी इथवरच थांबलेली नसून मृत्यूनेही आपला तीन दशकांचा वेग कायम ठेवला आहे. यात नव्या १२२७ बाधितांची तर पुन्हा ३४ जणांच्या मृत्यूची नोंद सोमवारी घेण्यात आली. त्यामुळे आजवर विषाणूने गाठलेल्यांचा आकडा आता ३० हजाराच्या जवळ जाऊन पोचला आहे. तर या विषाणूला आतापर्यंत १ हजार ४५ जण बळी पडल्याची दखलही आरोग्य विभागाने घेतली आहे. ( Coronavirus In Nagpur )

शहर आणि ग्रामीण भागात करोनाचे मृत्यूसत्र थांबलेले नाही. या मृत्यूंवर नियंत्रण मिळवण्यात सरकारी आणि खासगी यंत्रणा सपशेल अपयशी ठरत आहे. २४ तासांत मेडिकलमध्ये २६ मृत्यूंची नोंद घेतली गेली. तर मेयो आणि खासगीत प्रत्येकी ७ असे १४ जणांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मृत्यू संख्या १०४५ झाली आहे. दर दिवसाला बाधितांचा आकडा भयावह स्थितीत वाढत आहे. सोमवारी दिवसभरात जिल्ह्यात नव्या १,२२७ करोनाग्रस्तांची भर पडल्याने बाधितांची संख्या २९ हजार ५५५ झाली आहे. यातील सर्वाधिक ७७ टक्के रुग्ण शहरातील आहेत. तर ६ हजार ४१७ रुग्ण जिल्ह्याच्या १३ तालुक्यांमधील रहिवासी आहेत. याखेरीज विदर्भातील अनेक भागांमधून उपचाराला आलेल्या २८० रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये रेफर करण्यात आले होते.

 

उपराजधानीत मनपाच्या उपद्रव शोध पथकाची (एनडीएस) आदरयुक्त भीती आहे. शिस्त लावण्यासाठी झटणाऱ्या या पथकात सेवानिवृत्त लष्करी जवान असून, नियमांवर बोट ठेवून ते काम करतात. लॉकडाउनपूर्वी व नंतर यातील अनेकांना काही चांगली संधी मिळाली. त्यामुळे रस्त्यांवर उतरून नागरिकांशी भांडण करण्यापेक्षा सरकारी नोकरीला त्यांनी जवळ केले. अशा एकूण २१ जणांनी एनडीएसला 'बाय बाय' केले आहे.

तर, लॉकडाउन काळात दुसऱ्या शहरात फसलेल्या ३० जणांना कर्तव्यावर हजर राहता न आल्याने नोकरीवर पाणी सोडावे लागले. या पथकातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकूण ७९ जणांचे अकरा महिन्याचे कंत्राट संपल्याने त्यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव येत्या मंगळवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

सध्या एनडीएसच्या पथकात १८० जण कार्यरत आहेत. प्रारंभी ही संख्या २०१ होती. पहिल्या टप्प्यातील ३८ तसेच दुसऱ्या टप्प्यातील ४१ जणांना आता मुदतवाढीची प्रतीक्षा आहे. पथकातील २१ जणांना आतापर्यंत विविध ठिकाणी नोकऱ्या लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पथक सोडून सरकारी नोकरी पत्करली आहे. यात पोलिस विभागात सहा, वनविभागात दोन, आयुध निर्माणीत दोन, गोवा येथील हातमाग महामंडळात दोन यांचा समावेश आहे. उर्वरितांना इतर ठिकाणी निमसरकारी नोकरी मिळाली आहे. त्यामुळे या रिक्त ठिकाणी नवे जवान भरती करण्याचे निर्देश महापौरांनी आधीच दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे, रस्त्यांवर थुंकणे यांसारख्या आरोग्यास हानिकारक, बेशिस्त ठरणाऱ्या उपद्रवांवर कारवाईचे अधिकार या पथकाला आहेत. त्यांची उपस्थितीच अनेकांना घाम फोडणारी असते. त्यामुळे अशा पथकामुळे शहराच्या शिस्तीत भरच पडली आहे. टी. चंद्रशेखर मनपाचे आयुक्त असताना त्यांनी सर्वप्रथम हा प्रयोग शहरात राबविला होता. त्यानंतर दीड तपानंतर एनडीएस पथकाला पुन्हा मनपात पाचारण करण्यात आले आहे.

नागपूर: नागपुरात करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता, तज्ज्ञ डॉक्टरांची गरज तातडीने निर्माण झाली आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्स अपुरे पडत असल्याने इतर जिल्ह्यांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी शासकीय सेवेत रुजू व्हावे, महिन्याला दोन लाख रुपये वेतन दिले जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

नागपुरातील करोनाबाधितांचा आकडा आता २७ हजारांच्या पार गेल्याने रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. खासगी रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याचे कारण देत भरती करून घेण्यास नकार देत असल्याने या रुग्णांचा कल मेयो, मेडिकलकडे वाढला आहे. मात्र, अपुऱ्या डॉक्टरांच्या संख्येमुळे उपचारांत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यातील डॉक्टरांनी पुढे येऊन नागपुरात रुजू व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यात नागपूरच्या तुलनेत कमी रुग्ण आहे, त्यामुळे अशा डॉक्टरांनी नागपूरला मेडिकल आणि मेयो येथे रुजू व्हावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले आहे.

या तज्ज्ञांची आहे गरज
एमडी मेडिसीन, एमडी अॅनेस्थेशिया, छाती व क्षयरोगतज्ज्ञ अशा तज्ज्ञ डॉक्टरांना महिन्याला २ लाख रुपये वेतन दिले जाणार आहे. एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये महिना देण्यात येणार आहे. लॅब टेक्निशियन आणि इतर टेक्निशियनला १७ हजार रुपये महिना देण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. मेयोला ६० डॉक्टरांची गरज आहे.

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या करोनाबाधितांच्या सहस्त्रकाचा जोर रविवारीही कायम होता. यात आणखी धक्का देणारी बाब म्हणजे, आतापर्यंत करोनाने दगावणाऱ्यांची संख्याही आता हजाराचा पल्ला ओलांडून पुढे सरकली आहे. रविवारी २४ तासांत ३२ मृत्यूची नोंद घेण्यात आली. चिंतेची बाब म्हणजे यातील ७६५ मृत्यू संत्रानगरीतील आहेत. ग्रामीण भागातील १४९ तर ९७ जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते. याखेरीज रविवारी जिल्ह्यात १,३१३ नव्या बाधितांची भर पडली. त्यामुळे आजपर्यंतच्या बाधितांची संख्या २८ हजारांपुढे सरकली आहे.

रविवारी उपचारादम्यान दगावलेल्या ३२ जणांमध्ये शहरातील २३, ग्रामीण भागातील सात आणि जिल्ह्याबाहेरील दोनजणांचा समावेश आहे. त्यामुळे येथील आजपर्यंत दगावलेल्या बाधितांची संख्या १,०११ झाली. या घडामोडीत रविवारी जिल्ह्यात नवीन १ हजार ३१३ जणांची वाढ झाली. त्यात शहरी भागातील १ हजार १५६, ग्रामीणचे १५५ तर जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत येथील बाधितांची एकूण संख्या तब्बल २८ हजार ३२८वर पोहोचली आहे. त्यातील सर्वाधिक २१ हजार ८४३ बाधित शहरी भागातील, ६ हजार २०६ रुग्ण ग्रामीण भागातील, २७९ रुग्ण जिल्ह्याबाहेरील असले तरी नागपुरात उपचाराला आले आहेत.

नागपूर: विदर्भाच्या आंदोलनाला बळ मिळावे यासाठी 'विदर्भवादी चाय' ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या दुकानाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युवकांना रोजगार मिळावा आणि आंदोलनाची धार अधिक तीव्र करावी, हा यामागचा उद्देश असल्याचे विदर्भवादी चायच्या आउटलेटचे उद्घाटन करताना विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले.

पहिल्या दुकानाचे उद्घाटन नंदनवन येथील श्रीकृष्ण नगर चौक येथे करण्यात आले. प्रत्येक चहाच्या विक्रीतून प्राप्त होणारा एक रुपया विदर्भ राज्य आंदोलन समितीला देण्यात येणार आहे. त्यातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी लढा तीव्र करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विदर्भातील युवकांना रोजगारही प्राप्त होईल, असा विश्वास यावेळी नेवले यांनी व्यक्त केला. ही संकल्पना मांडणारे सुयोग निलदावार, जिल्हा अध्यक्ष अरुण केदार, मुकेश मासूरकर, सुनील वडस्कर, रेखा निमजे, गुलाबराव धांडे, सुनीता येरणे, प्रीती दीडमुठे, ऋषभ वानखेडे , प्रशांत मुळे, ज्योती खांडेकर, अमित घरलुटे, दीपक सप्रा, शशी गुप्ता आदी उपस्थित होते.

२०२३चे लक्ष्य: चहा सारखे आता विदर्भाचे आंदोलनही गरम होत आहे. संपूर्ण विदर्भात विदर्भवादी चाय सुरू करण्यात येणार आहे. २०२३च्या पूर्वी विदर्भ राज्य बनलेच पाहिजे हे लक्ष्य ठेऊन आता वाटचाल सुरू आहे. घराघरात विदर्भाचा संदेश पोहचविण्यासाठी रणनीती आखण्यात आली असल्याचे नेवले यांनी सांगितले. वेगळा विदर्भ राज्य झालेच पाहिजे, असे ते म्हणाले.

मध्यवर्ती कारागृहात झडती सुरू असताना संधी साधून न्यायालयीन कैदी पसार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. कैदी पसार झाल्याने कारागृह प्रशासन आणि पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकेबंदी केली असून फरार कैद्याचा शोध सुरू केला आहे. सायमन अॅन्थोनी फ्रान्सीस (वय १८ रा. ८५ प्लॉट एरिया, दुर्गा माता मंदिराजवळ, अजनी), असे पसार झालेल्या कैद्याचे नाव आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

सायमन हा कुख्यात वाहनचोर आहे. त्याच्याविरुद्ध वाहनचोरीचे पाच पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. तीन दिवसांपूर्वी अजनी पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात सायमन याला अटक केली. त्याची पोलिस कोठडी घेतली. पोलिस कोठडी संपल्यानंतर अजनी पोलिसांनी त्याला पुन्हा अन्य एका चोरीच्या प्रकरणात अटक करून पोलिस कोठडी घेतली. रविवारी पोलिस कोठडी संपल्याने अजनी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. पोलिस त्याला घेऊन कारागृहात आले. प्रक्रिया पूर्ण करून सायमन याला कारागृहातील अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले. कारागृह परिसरातील मंगलमूर्ती लॉनमधील सभागृहात कारागृहाचे जवान त्याची झडती घेत होते. याच दरम्यान संधी साधून सायमन पसार झाला. जवानांनी त्याचा पाठलाग केला. मात्र अजनी चौकातून तो बेपत्ता झाला. या घटनेने कारागृह प्रशासन व पोलिसांमध्ये खळबळ उडाली. शहरात नाकेबंदी करण्यात आली. पोलिस त्याचा शोध घेत आहे. याबाबत धंतोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर: लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने अभियंत्यासह तिघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पहिली घटना कळमन्यातील जुना पारडी नाका परिसरातील सुरेंद्र अपार्टमेंट येथे गुरुवारी दुपारी उघडकीस आली. निखिल महेश अग्रवाल (वय २८) हा पुण्यातील एका कंपनीत अभियंता होता. करोनामुळे मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले. निखिल याला नोकरी गमवावी लागली. तो नागपुरात परतला. नोकरी गेल्याने निखिल हा तणावात होता. गुरुवारी दुपारी निखिल याने साडीने गळफास घेतला. नातेवाइकांना तो गळफास लावलेला दिसला. नातेवाइकांनी फास काढून निखिल याला आधी खासगी रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांनी त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. नातेवाइकांनी निखिल याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

दुसरी घटना सीताबर्डीतील मरियमनगर येथे गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संजय गणेश आठवले (वय ४८) हे पानठेला चालवायचे. लॉकडाऊनमुळे पानठेला बंद झाला. त्यांना आर्थिक चणचण निर्माण झाली. त्यामुळे ते तणावात असायचे. गुरुवारी आठवले यांच्या नातेवाइकांकडे कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी ते पत्नी व मुलाला घेऊन नातेवाइकाकडे गेले. तेथून एकटेच घरी परतले. लाकडी बल्लीला चादर बांधून गळफास घेतला. त्यांच्या पत्नी घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. तिसरी घटना बेल्यातील सालईराणी येथे घडली. लॉकडाउनमुळे योगेश प्रकाश मात्रे वय २५ हा बेरोजगार झाला. बेरोजगारीला कंटाळून त्याने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला.योगेश हा खासगी काम करायचा. तिन्ही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नागपूर: उपराजधानीत करोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी सध्या परमोच्च बिंदूवर पोहोचली आहे. त्यामुळे दगावणाऱ्यांची संख्याही भयावह स्थितीत वाढली आहे. या विषाणूची लागण होऊन आतापर्यंत जिल्ह्यात ९४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ७० ते ८० टक्के मृत्यू हे अवघ्या दिड महिन्यांमधील आहेत. त्यामुळे या मृत्यूमागचे नेमके कारण काय, हे तपासण्यासाठी पुण्यातील दोन सदस्यांची चमू शुक्रवारी उपराजधानीत दाखल झाली.

करोना मृत्युच्या वाढत्या आलेखासंदर्भात सर्वांत चिंतेत टाकणारी बाब म्हणजे गेल्या दिड महिन्यांमध्ये नोंदविल्या गेलेल्या एकूण करोना बाधितांच्या मृत्यूंपैकी ८० टक्के बाधित हे सरकारी कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. त्यामुळे करोनाची बाधा झाल्यानंतर भारतीय वैद्यकीय चिकित्सा परिषदेने ठरवून दिलेल्या 'गाइड लाइन'नुसार त्यांच्यावर उपचार झाले का, की या मृत्यूंमागे आणखी काही कारणे दडली आहेत, याची मिमांसा करण्यासाठी ही चमू नागपुरात दाखल झाली आहे. यामध्ये डॉ. सांगोळे आणि डॉ. नाईक यांचा समावेश आहे. या दोघापैकी डॉ. सांगोळे हे कोणालीही पूर्वसूचना न देता तडकाफडकी मेडिकलमध्ये तर डॉ. नाईक मेयोत दाखल झाले. या दोघांनीही गेल्या दिड महिन्यांत करोनाची बाधा होऊन उपचारादरम्यान दगावलेल्यांच्या उपचारासंबंधी कागदपत्रे तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागपूर: करोना विषाणूबाधितांच्या हजाराच्या साखळीचा विळखा शुक्रवारी सलग आठव्या दिवशीही कायम राहिला. या विषाणूने आज दिवसभरात १,३२९ रुग्णांच्या नव्या उच्चांकाची नोंद घेतली. शुक्रवारी दिवसभरात उपचार घेत असलेल्या ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या २६ हजार ९४, तर मृतांची संख्या हजाराच्या उंबरठ्यावर म्हणजे ९४६ पर्यंत धडकली आहे.

करोनाची बाधा होऊन शुक्रवारी उपचारांदरम्यान मरण पावलेल्यांमध्ये सर्वाधिक ३४ जण हे संत्रानगरीतील, तर पाच ग्रामीण भागातील आणि तीन जिल्ह्याबाहेरील रहिवासी होते. संपूर्ण जिल्ह्यांत आज ७ हजार ६०३ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १ हजार ३२९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित ६ हजार २७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. करोनाची नव्याने लागण झाल्याचे निदान झालेल्यांपैकी १ हजार ७६ जण एकट्या नागपूर शहरातील, तर २५० जण ग्रामीण भागातील रहिवासी आहेत. आजच्या घडीला जिल्ह्यात ९ हजार २९३ सक्रिय करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यातील ५ हजार ७६३ जणांना विषाणू लागण झाली असली तरी लक्षणे नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

नव्याने करोनाबाधा झालेल्यामध्ये सर्वाधिक ६३२ नमुने अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आलेत. खासगी प्रयोगशाळांमधून ४३६, मेडिकलमधून ११२, माफ्सूतून ७६, मेयोतून ३३, एम्समधून २२, तर नीरीतून १८ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोना विषाणूचा अंश आढळला.k

नागपूर: करोनाचे वाढते संकट आणि हाताबाहेर जाणाऱ्या स्थितीत शहराचे प्रमुख महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली कशी, कुणी व का केली, या प्रश्नांचा भडीमार सोशल मीडियावरील सर्वसामान्यांच्या चर्चेत सुरू झाला आहे.

बुधवारी सायंकाळपासून राज्यभरात मुंढे यांच्या बदलीचीच चर्चा रंगली आहे. एखाद्या अधिकाऱ्याच्या बदलीची राज्यभरात अशी चर्चा अलीकडच्या काळात पहिल्यांदाच घडली असावी. यापूर्वी शहराचा चेहरामोहरा बदलवणारे टी. चंद्रशेखर यांच्या बदलीसाठी सत्तारुढ काँग्रेसने आंदोलन केले होते, तेव्हाही सर्वसामान्य चंद्रशेखर यांच्या बाजूने उभे राहिले.

महापालिका बरखास्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांना नागपुरात पाठवले, अशी सुरुवातीला चर्चा होती. त्याच मुंढे यांना करोनाची बाधा झाल्यानंतरही तडकाफडकी बदली केल्याबद्दल कोण वरचढ ठरले, कोणता राजकीय समझोता झाला, यातून कुणाला लाभ होईल, असे प्रश्नही उपस्थित झाले आहेत. शिवसेना आणि भाजप हे सध्याचे नवे राजकीय शत्रू आहेत. भाजपला सातत्याने अडचणीत आणणाऱ्या अधिकाऱ्याची बदली मुख्यमंत्र्यांनी का, कशी केली, असा चर्चेचा सूर आहे.

नागपुरात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, तसेच, पालकमंत्री नितीन राऊत, गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रातील वजनदार मंत्री नितीन गडकरी थेट जुळलेले आहेत. रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमानेही नागपुरातच राहतात. हेविवेट नेत्यांच्या शहरात मुंढेच 'छाये हुए थे' अशी स्थिती होती. ऐन लढाईत मुंढेंची हिट विकेट घेऊन शिवसेनेने काय मिळवले, हा राजकीय जगताचा खरा प्रश्न आहे.

नागपूर: लॉकडाउनच्या काळात उन्हाळ्यात आलेल्या भरमसाठ वीज बिलानंतर राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीजग्राहकांना येणाऱ्या काळातील बिलात मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असे जाहीर केले होते. यासाठी ऊर्जामंत्र्यांनी अनुदानाची मागणी करणारा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे सादर केला होता. सुमारे एक हजार कोटींच्या अनुदानाची मागणी करणारा हा प्रस्ताव अर्थमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावला आहे.

यासंदर्भात राऊत यांनी 'मटा'शी बोलताना अर्थमंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याचे सांगितले. त्यामुळे वीज वितरण कंपन्या ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी स्वता:च्या खात्यातून अनुदान देऊ शकत नाही. वितरण कंपनीलाही पारेषण व निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना शुल्क अदा करावे लागते, अशी हतबलता ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. काही दिवसांपूर्वी राऊत यांनी यासंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी पवार यांनी अनुदानासाठी आवश्यक रक्कम देण्याबाबत सहमती दर्शवली होती. त्यानंतर डॉ. राऊत यांनी ऊर्जा खात्याचे सचिव असीम गुप्ता यांना ग्राहकांना कशाप्रकारे स्वस्त वीज उपलब्ध करून देता येईल याचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. यात ज्या ग्राहकांना उन्हाळ्यात भरमसाठ वीजबिल आले ते कसे कमी करता येईल यासाठी किती अनुदान लागेल या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. त्यामुळे महावितरण, बेस्ट, अदानी पॉवर आणि टाटा पॉवर या चार वितरण कंपन्यांना दिलासा मिळणार होता. मात्र, यासाठी सरकारच्या तिजोरीवर एक हजार कोटींचा बोजा पडणार होता. त्यामुळे बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत अर्थमंत्री पवार यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.

करोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला व २१ मार्चपासून एसटीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. नेहमी गजबज राहणाऱ्या एसटी बस स्थानकावर शुकशुकाट दिसू लागला. मधल्या काळात फक्त श्रमिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटीची व्यवस्था करण्यात अली होती.

नियमित प्रवाशांसाठी सेवा नव्हती. दरम्यानच्या काळात राज्य सरकारने जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एसटी वाहतुकीला परवानगी दिली. मात्र नागपूर करोनाच्या रेड झोनमध्ये असल्याने नागपुरातून गाडी बाहेर जाण्यास व नागपुरात येण्यास बंदी होती. बाकी नागपूर जिल्ह्यात गाड्या सुरू होत्या. आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र यात लांब पल्ल्याच्या गाड्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जी गावे २०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत तेथे गाड्या जाणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे नागपूरच्या गणेशपेठ आगारातून पुण्यासाठी एसटी सुरू करण्यात आली आहे. ही गाडी स्लिपर कोच नसून आसनी (सीटर) आहे. दररोज सायंकाळी ५ वाजता ही गाडी नागपूरवरून सुटते व पुणे येथे सकाळी ९ च्या सुमारास पोहते. त्याचप्रमाणे पुणे येथून सायंकाळी ५ ला निघून सकाळी ९ वाजता नागपूरला परत येते.

नागपूरः जुलै महिन्यापर्यंत आटोक्यात असलेल्या करोना विषाणू प्रादुर्भाव साखळीने आता शहरापाठोपाठ जिल्ह्यातही विस्फोट सदृष्य परिस्थिती निर्माण केली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचे प्रमाण एकीकडे वाढत असले तरी प्रादुर्भावाची साखळी त्यापेक्षा अधिक वेगाने विस्तारली जात आहे. यात जिल्ह्यात गुरुवारी १२७० इतक्या पुन्हा विक्रमी संख्येची नोंद घेण्यात आली. तर आज जिल्ह्यातून १०५४ जण विषाणूच्या मिठीतून बाहेर पडल्यानंतर घरी परतले. या सगळ्या घटनाक्रमात आज दिवसभरात जिल्ह्यात ४५ करोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू नोंदविला गेला.

करोना विषाणू प्रादुर्भाव झाल्यानंतर दगावलेल्यांपैकी ३३ एकट्या शहरातील असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १० आणि जिल्ह्याबाहेरील दोघांचा समावेश आहे. करोनाच्या चाचणीत अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २६४ जण ग्रामीण भागातील तर १०५४ जण हे नागपूर शहरातील आहेत. सायंकाळी पाच पर्यंत प्राप्त अहवालानुसार आज ४२०२ संशयितांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. त्यातील १२७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह तर २९३२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. सर्वाधिक ५३७ नमुन्यांचा अहवाल अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आला. तर ३३३ नमुने खासगीतून, १३३ नमुने मेयोतून, ११८ नमुने मेडिकलमधून, निरीतून ९४ तर एम्समधून ५५ नमुन्यांत करोनाचा अंश सापडला.

सध्याच्या स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ९०९८ सक्रिय करोना बाधित नागरिक आहेत. त्यापैकी ७०३६ एकट्या शहरातील तर २०६२ ग्रामीण भागातील आहेत. तर उर्वरित ५६६८ जणांना करोनाची लागण झालेली असली तरी सौम्य लक्षणेही नसल्याने घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

नागपूर: नागपूर महापालिका भाजपसाठी जीव की प्राण आहे. असे असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सत्तापक्षाला चांगलेच जेरीस आणले होते. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या पाठीशी असताना भाजपचे नेते त्यांना अप्रत्यक्षपणे सुनावत होते. तरीही, मुंढे कुणाला बधले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी सर्वस्तरातून प्रयत्न होत होते. मात्र, त्यांनी उपराजधानीतील राजकीय पक्षांची चांगलीच कोंडी केली.

करोनाकाळात मुंढेंनी केलेल्या कार्याबद्दल नागपूरकर त्यांच्या पाठीशी भक्कमपणे होते. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरून आंदोलनेही करण्यात आली. मुंढेंची ही आतापर्यंतची पंधरावी बदली आहे. यापूर्वीही ते कार्यरत असलेल्या ठिकाणी वाद ओढवून बदलून गेले आहेत. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख आहे.

सात महिन्यांपूर्वी, २८ जानेवारीला मुंढे नागपुरात रुजू झाले होते. मनपातील सत्तापक्ष असलेल्या भाजपची कोंडी करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने त्यांना पाठविल्याची त्यावेळी जोरदार चर्चा होती. काही दिवसांतच नागपूरकरांना त्याचा प्रत्यय आला. मनपातील सत्तापक्ष भाजपसोबत त्यांचे पटले नाही. करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच त्यांनी मनपाच्या आर्थिक परिस्थितीकडे बोट दाखवत अनेक विकासकामे निधीअभावी रोखून धरली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना जाण्याचे टाळले. त्यामुळे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज होते. एखाद्या आयुक्तांविरुद्ध महापौरांकडून पोलिसांत तक्रार व न्यायालयात याचिका दाखल झालेले ते पहिलेच अधिकारी आहेत. नागपुरात वाद वाढत असताना मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या पाठीशी ठामपणे राहिले. त्यामुळेच मुंढे यांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे काम सुरू ठेवले. तेच सत्तापक्षासह काँग्रेसच्याही काही नेत्यांना खटकले. प्रशासकीय पातळीवरही उपराजधानीत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसोबत त्यांचे पटले नसल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळेच अत्यंत कमी कालावधीत परत त्यांना बदलीला सामोरे जावे लागले. बदली होण्याची कुणकूण लागली असावी म्हणूनच त्यांनी करोना पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले, अशीही चर्चा मनपात सुरू झाली आहे.

नागपूर:मुलीला मोबाइलवर मॅसेज पाठविल्याने संतप्त झालेल्या वलनी ग्रामपंचायतीच्या सरपंचाने नातेवाईक व साथीदारांच्या मदतीने युवकाची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना खापरखेड्यातील चनकापूर येथे मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मोहीब लतिफ खान (वय २२, रा. खापरखेडा) असे मृतकाचे नाव आहे. सोहेल अतिक अन्सारी (वय १९, रा. खापरखेडा), हनीफ ऊर्फ इल्लू अन्सारी (वय २४, रा. खापरखेडा), असीफ ऊर्फ राजाबाबू हनीफ अन्सारी, रोशनकुमार ऊर्फ बाला रामबिहारी साहनी (वय २०, रा. वलनी कॉलनी, खापरखेडा),अशी अटकेतील मारेकऱ्यांची, तर सरपंच लईक अन्सारी व त्याचे अन्य साथीदार अशी फरार मारेकऱ्यांची नावे आहेत. लईक अन्सारी हा कुख्यात लतिफ अन्सारी याचा भाऊ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतिफ अन्सारी याच्या मुलीला मोहीबने मोबाइलवर मॅसेज पाठविला. हा मॅसेज लतिफने बघितला. तो संतापला. त्याने मॅसेजबाबत भाऊ लईकला सांगितले. लईकने नातेवाइक व साथीदारांच्या मदतीने मोहीबच्या हत्येचा कट आखला. मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास मोहीब व त्याचा मित्र आसिफ अशफाक हुसेन (वय १८, रा. वलनी) हे दोघे मोटरसायकलने खापरखेडाकडे जात होते. चनकापूर भागात लईक व त्याच्या साथीदारांनी मोहीबला अडविले. त्याच्यावर काठी व बेसबॉल बॅटने हल्ला केला. आसिफलाही मारहाण केली. दोघांना गंभीर जखमी करून लईक व त्याचे साथीदार पसार झालेत. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मोहीब व आसिफला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री मोहीबचा मृत्यू झाला. खापरखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली.

नागपूर: लॉकडाउनच्या काळात एसटी वाहतूक पूर्ण बंद असल्याने काही कर्मचाऱ्यांच्या सेवांना स्थगिती देण्यात आली होती. आता एसटीची वाहतूक सुरू झाल्यानंतरही त्यांच्या सेवा पूर्ववत करण्यात आलेल्या नाहीत. १३०० कर्मचाऱ्यांचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

एसटीने घेतलेल्या परीक्षेत पास झालेल्या सुमारे ४,५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यांना चालक तथा वाहक पदावर रोजंदार गट क्र. १ मध्ये नियुक्त्या दिलेल्या आहेत. तसेच सुमारे ३२०० चालक तथा वाहक पदाकरिता प्रशिक्षण सुरू आहे. परंतु लॉकडाउनच्या काळात रा. प. महामंडळाने चालक तथा वाहक पदामध्ये रोजंदार गट क्र. १मध्ये नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता महाराष्ट्र शासनाने एसटीची आंतरजिल्हा वाहतूक सुरू करण्याची परवानगी दिल्याने मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे ही स्थगिती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थगिती मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी म्हटले आहे.
 

नागपूरः प्रभारी पोलिस सहआयुक्त व गुन्हेशाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांना करोनाची लागण झाली असताना बुधवारी सहाय्यक पोलिस आयुक्तांसह ४० पोलिस अधिकारी कर्मचारीही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पोलिस विभागात करोनाचा झपाट्याने संसर्ग होत असल्याने कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात सहाय्यक पोलिस आयुक्तांसह सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. आतापर्यंत ५०५ पेक्षा पोलिस अधिकारी ,कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली झाली आहे. पोलिस आयुक्तालयातील बिगुल वादकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.तसेच पोलिसाच्या एका नातेवाइकाचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पोलिस दलात करोनाबाधित कर्मचाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिस आयुक्तालय व पोलिस अधीक्षक कार्यालय नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. भरणे हे पॉझिटिव्ह आल्यानंतर छावणीतील पोलिस आयुक्त कार्यालयाचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी हे कार्यालय बंद असणार आहे. अत्यावश्यक असल्यास नागरिकांनी पोलिस नियंत्रण कक्षातील ०७१२-२५६१२२२, २५६११०३ किंवा पोलिस आयुक्तालयातील २५९०६०१ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले आहे. पोलिस आयुक्तालयाप्रमाणाचे सिव्हिल लाइन्समधील नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक कार्यालयही नागरिकांसाठी २ सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आले आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती अधीक्षक राकेश ओला यांनी दिली. पोलिसांनी घाबरुन न जाता हिमतीने करोनाचा सामना करावा. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली करोनाबाधित पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे पोलिस रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप शिंदे यांनी सांगितले.

उपचाराच्या बहाण्याने बोलावून मारहाण केल्यानंतर डॉक्टरला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. फैजान अली गफ्फार अली (वय २५), अहमद ऊर्फ गोलू रजा खान (वय २२) व अब्दुल खान (वय २४,सर्व रा. हसनबाग),अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तिघांची एक दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली. डॉ. अमोल विजय रुडे (वय ४३ रा. व्यंकटेशनगर) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

अमोल हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. अमोल हे हसनबागमधील जावेद याच्या पानठेल्यावर नियमितपणे जाताता. दहा महिन्यांपूर्वी त्यांना अहमद भेटला. मला यकृतचा त्रास आहे. औषधोपचार केले. मात्र त्रास कमी झाला नाही, असे त्याने अमोल यांना सांगितले. आयुर्वेदिक उपचार करा, असे तो अमोल यांना म्हणाला. अमोल यांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याला पथ्यही पाळायला सांगितले. मात्र त्याने पथ्य पाळले नाही. २३ ऑगस्टला रात्री ८ वाजताच्या सुमारास मोहीज नावाचा युवक त्यांच्या घरी आला. अहमद यांची प्रकृती खालावली आहे. तुम्ही त्याला बघायला माझ्यासोबत चला, असे तो अमोल यांना म्हणाला. बळजबरीने त्याने अमोल यांना अहमद याच्या हसनबाग येथील घरी नेले. अहमद याला ऑक्सिजन लावल्याचे अमोल यांना दिसले. अमोल यांनी अहमद याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले.

नागपूरःमुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी कोणत्याही नियमांची पूर्तता न करता उठसूट जनहित याचिका दाखल करणाऱ्या संघटनांना कडक संदेश दिला आहे. यापुढे नियमांची पूर्तता केल्याशिवाय जनहित याचिकांवर सुनावणी होणार नाही, अशा शब्दात मुख्य न्यायमूर्तींनी जनहित याचिकांवर चाप आणावा, असा आदेशच दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच न्या. दीपांकर दत्ता नागपूर खंडपीठात आले. त्यांनी आज येथील वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्यासोबत याचिकांवर सुनावणी केली. तेव्हा मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांच्या समक्ष काही जनहित याचिका देखील सुनावणीसाठी सादर करण्यात आल्यात.

लॉकडाउनच्या काळात ऑटोचालकांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत करावी, अशी विनंती करणारी शहरातील एका संघटनेने दाखल केलेली याचिका सुनावणीस सादर झाली. तेव्हा सदर संघटना ही नोंदणीकृत आहे काय, अशी विचारणा संबंधीत वकिलांना मुख्य न्यायमूर्ती दत्ता यांनी केली. तसेच त्या वकिलांना संघटनेचे नोंदणी प्रमाणपत्र पुढील सुनावणीला सादर करण्याचा आदेश दिला. यावेळी खंडपीठासमोर सादर झालेल्या जनहित याचिकांमध्ये याचिकाकर्त्यांचा " लोकस " काय आहे, अशी थेट विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी केली.

उच्च न्यायालयाने जनहित याचिकांबाबत केलेल्या नियमांमध्ये नोंदणीकृत नसलेल्या संघटनांना अथवा संस्थांना जनहित याचिका दाखल करता येत नाहीत, याची आठवण मुख्य न्यायमूर्तींनी एका जनहित याचिकेच्या सुनावणीला करून दिली. अनेकदा केवळ वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेत काही संघटना थेट हायकोर्टात जनहित याचिका दाखल करतात. बहुतांश याचिका या केवळ प्रसिद्धीसाठी असतात, त्यात जनहित नगण्य असते, त्यामुळेच मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिलेल्या कडक संदेशामुळे भविष्यात केवळ जनतेच्या मुलभूत प्रश्नांनाच घेऊन याचिका दाखल होतील, अशी अपेक्षा वरिष्ठ वकिलांनी व्यक्त केली.

नागपूर: एकाच दिवशी झालेले उच्चांकी मृत्यू आणि नव्या बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतर आता करोनामुक्त होणाऱ्यांनीही सोमवारी नव्या उच्चांकाची नोंद केली. दिवसभरात शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या सक्रिय ९७९ रुग्णांना कुठलीही लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे विषाणू लागण झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही १२,०३२ वर गेली आहे. या घडामोडीत आज दिवसभरात ३० करोनाबाधितांचा मृत्यू, तर नव्या ७१५ बाधितांची नोंद घेण्यात आली.

नव्याने करोनाची बाधा झालेल्या ७१५ जणांपैकी ५८५ हे शहरातील, तर १२७ जण ग्रामीण भागातील आहेत. आज दिवसभरात दगावलेल्या ३० जणांपैकी २१ शहरातील, ३ जिल्ह्याबाहेरचे, तर ६ जण ग्रामीण भागातील रहिवासी होते. त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातून करोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही १११ पर्यंत गेल्याने विषाणू प्रादुर्भावाची समूह साखळी आता ग्रामीणमध्येही पोहोचल्याचे सिद्ध होत आहे. करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन चाचणीत ३६३, खासगीतून १३४, मेयोतून ९४, मेडिकलमधून ९३ आणि नीरीतून ३१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

करोनाची लागण झाल्यानंतर उपचारांदरम्यान दगावलेल्यांमध्ये सदर परिसरातल्या छावणी येथील ५०, जयभीम चौक हिवरी नगर येथील ६६, जुनी मंगळवारीतील ६४, कामठीतील ५५, महाकालीनगर मानेवाडातील ६८ वर्षीय पुरुष आणि यासिन प्लॉट मोठा ताजबाग येथील ५५, खरबीतील ५३, मौदा येथील ५४ वर्षीय महिलांचा समावेश आहे.

नागपूरः एकाच दिवशी झालेले विक्रमी मृत्यू आणि नव्या बाधितांच्या उच्चांकी संख्येनंतर आता करोना मुक्त होणाऱ्यांनीही सोमवारी विक्रमाची नोंद केली. दिवसभरात शहरातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या सक्रिय ९७९ रुग्णांना कुठलीही लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात आले. त्यामुळे विषाणू लागण झाल्याने आतापर्यंत करोना मुक्त होणाऱ्यांची संख्याही १२०३२ वर गेली आहे. या घडामोडीत आज दिवसभरात ३० करोना बाधितांचा मृत्यू तर नव्या ७१५ बाधितांची नोंद घेण्यात आली.

नव्याने करोनाची बाधा झालेल्या ७१५ जणांपैकी ५८५ हे शहरातील तर १२७ जण ग्रामीण भागातील आहेत. आज दिवसभरात दगावलेल्या ३० जणांपैकी २१ शहरातील ३ जिल्ह्याबाहेर तर ६ जण ग्रामीण भागातील रहिवासी होते. त्यामुळे आतापर्यंत ग्रामीण भागातून करोनामुळे मृत झालेल्यांची संख्याही १११ पर्यंग गेल्याने विषाणू प्रादुर्भावाची समुह साखळी आता ग्रामीणमध्येही पोचल्याचे सिद्ध होत आहे.

करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांपैकी अँटिजन चाचणीत ३६३, खासगीतून १३४, मेयोतून ९४, मेडिकलमधून ९३ आणि निरीतून ३१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोनाची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये सदरपरिसरातल्या छावणी येथील ५०, जयभीम चौक हिवरी नगर येथील ६६, जुनी मंगळवारीतील ६४, कामठीतील ५५, महाकाली नगर मानेवाडातील ६८ वर्षीय पुरुष आणि यासिन प्लॉट मोठा ताजबाग येथील ५५, खरबीतील ५३, मौदा येथील ५४ वर्षीय महिलांचा समावेश आहे.

 

 

नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना करोनाची लागण झाली आहे. मुंढे यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. करोनाची कुठलीही लक्षणं दिसत नसली तरी नियमानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. (Nagpur Civic Chief Tukaram Mundhe tests coronavirus positive)

मुंढे यांनी स्वत: ट्वीट करून काही वेळापूर्वीच ही माहिती दिली. 'माझा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोणतीही लक्षणे नसली तरी नियमानुसार मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. मागील १४ दिवसांत जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:ची तपासणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी,' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 'घरी असलो तरी मी काम करत राहणार असून नागपूरमधील करोना साथीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपण नक्कीच विजयी होऊ,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंढे यांच्याकडे काम करणारा एका अटेंडन्टची करोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळं संपूर्ण स्टाफची तपासणी करण्यात आली. त्यात मुंढे यांच्या ताफ्यातील एक पोलीस आणि स्वत: मुंढे यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

तुकाराम मुंढे गेल्या पाच महिन्यांपासून नागपूरमध्ये करोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सातत्यानं अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठका घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून ते स्वत: रस्त्यावरही उतरलेले दिसले होते. लॉकडाऊनच्या कठोर निर्णयांवरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी त्यांचे अनेकदा खटकेही उडाले. मात्र, मुंढे यांनी कठोर निर्णयाचा धडाका सुरूच ठेवला होता. नागपूरच्या जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळाला होता.
 

करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तब्बल ५४१ कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या ३ तारखेपर्यंत त्यातील केवळ १३२ कोटी रुपये खर्च झाले आहेत,' अशी माहिती समोर आली आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी या संदर्भात अर्ज करून माहिती मागवली होती. कोलारकर यांनी प्रामुख्यानं नागपूर जिल्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले होते. मुख्यमंत्री कार्यालतील जनसंपर्क अधिकारी मिलिंद कापडी यांनी त्या अर्जाला प्रतिसाद देताना मुख्यमंत्री निधीला मिळालेल्या निधीचा सविस्तर तपशील दिला आहे. त्यानुसार, सुमारे ५४१ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यातील १३२.३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोविडशी संबंधित उपाययोजनांसाठी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला १.२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलला २० कोटी रुपये, रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालय व जालना जिल्हा रुग्णालयाला प्रत्येकी १.०७ कोटी रुपये देण्यात आले आहेत. जालना येथे रेल्वेखाली चिरडून मृत्यू पावलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना ८ कोटींची मदत देण्यात आल्याचंही सरकारच्या उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. नागपूरमधील एखाद्या रुग्णालयास कोविडविरोधी लढ्यासाठी काही मदत देण्यात आली आहे का, असाही प्रश्न माहिती अर्जातून विचारण्याला आला होता. मात्र, तशी कोणतीही मदत देण्यात आली नसल्याचं उत्तरात नमूद करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्री साहाय्यात निधीला मदत देणाऱ्यांची नावे द्यावीत, अशी मागणीही कोलारकर यांनी केली होती. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचं कारण देत देणगीदारांची नावे देण्यास नकार देण्यात आला आहे. शिवाय, सरकारकडून मिळालेल्या माहितीमध्ये देणगीदारांची नावे नाहीत. केवळ धनादेशाचे क्रमांक आहेत. त्यावरून नावे शोधून काढणे खूपच जिकिरीचे काम आहे,' असं मिलिंद कापडी यांनी स्पष्ट केलं आहे.

नागपूर: प्रेमप्रकरणातून युवकाला मारहाण करून त्याचे नग्न चित्रीकरण करीत त्याच्याकडील रोख हिसकावली. मोबाइलद्वारे केलेले चित्रीकरण व्हॉट्सअॅपसह अन्य सोशल मीडियावर व्हायरल करून युवकाची बदनामी केली. ही खळबळजनक घटना सदर भागात उघडकीस आली. याप्रकरणी सदर पोलिसांनी जबरी चोरीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून सूत्रधारासह चौघांना अटक केली आहे.

शारीक खान, मुश्रीफ, इम्रान व नकीब, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. रोशन महेशकुमार नानवाणी (२९, रा. खामला) याच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी ही कारवाई केली. रोशनचा खासगी व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारीक खानचे आदिती नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. कालांतराने ते संपुष्टात आले. त्यानंतर आदितीची रोशनसोबत ओळख झाली. दोघेही खास मित्र झाले. आदितीच्या बहिणीचे सदरमधील सिव्हिल लाइन्स भागात कार्यालय आहे. रोशन नेहमी आदितीला बहिणीच्या कार्यालयात सोडायचा.

दरम्यान, रोशन हा आदितीचा खास मित्र असून, तो नेहमी तिला सोडायला येतो, अशी माहिती शारीकला मिळाली. १७ ऑगस्टला दुपारी ३ वाजताच्या सुमारास रोशन कारने सिव्हिल लाइन्समधील विज्ञान भवनजवळ आला. याचदरम्यान शारीक व त्याचे साथीदार रोशनजवळ आले. 'आदितीला भेटणे बंद कर', असे म्हणून रोशनला मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील पाच हजारांची रोख काढली. त्यानंतर त्याला कपडे काढायला लावले. तो नग्न असल्याचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केले. हे चित्रीकरण व्हायरल केले. रोशनने सदर पोलिसांत तक्रार दिली. चौघांची दोन दिवस पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
 

नागपूर: मुलाचे, मुलीचे लग्न झाले. की घरात कधी एकदा नवीन पाहुणा येतो याची वडीलधाऱ्यांना प्रतीक्षा असते. आई होणे हे जगाच्या पाठीवरील कुठल्याही स्त्री साठी सर्वांत आनंददायी बाब असते. मात्र काही जण करिअरच्या, स्थिरस्थावर होण्याच्या ओढीने नियोजित बाळंतपणे पुढे ढकलतात. स्थीर स्थावर झाल्यानंतर ही जबाबदारी उचलू असेही काही जणांना वाटते. मात्र सध्याच्या करोनाच्या काळात पाळणा हलण्याचा कालावधीदेखील आता आणखी लांबत असल्याचे जाणवत आहे. वंध्यत्वामुळे उपचार घेत असलेली जोडपीदेखील आता नियोजित शहरातील काही स्त्रीरोग प्रसुती तज्ज्ञ आणि कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञांशी साधलेल्या संवादातूनही ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे. आश्चर्यात टाकणारी बाब म्हणजे हा सगळा घटनाक्रम एकीकडे सुरू असताना लॉकडाउनच्या काळात घरून सुरू असलेल्या ऑफिसमुळे विवाहीत जोडप्यांना परस्परांसोबत वेळ घालविण्यास बराच कालावधी मिळाल्याने अनपेक्षित बाळंतपणाची संख्याही तितक्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येत्या नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीत शहरात बाळंतपणाची संख्याही वाढेल, अशी शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

यासंदर्भात स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र संघटनेच्या अध्यक्षा डॉ. वैदेही मराठे म्हणाल्या, सध्या सर्वत्र कोव्हिडची दहशत आहे. त्यामुळे जोडप्यांमध्येही या विषाणू प्रादुर्भावाच्या साखळीने गोंधळ वाढला आहे. ठरल्याप्रमाणे नियोजित बाळंतपण केले तर या काळात विषाणू प्रादुर्भाव होईल, उपचार मिळतील का, बाळ सुरक्षित राहिल का याचाही धास्ती जोडप्यांमध्ये आहे. त्यामुळे आम्हीदेखील नियोजित बाळंतपणाची जोखीम शक्य असेल तर पुढे ढकला असा सल्ला देत आहोत. याशिवाय करोनाच्या काळात बाळंतपणादरम्यान जोखीम टाळण्यासाठी कोव्हिड चाचणीपासून ते बाळंतपण करताना आणि दवाखान्यातील मुक्काम काळात पीपीई किटचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे या काळात बाळंतपणावरचा खर्चही किंचित वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.

वंध्यत्वाशी झुंजणाऱ्या जोडप्यांच्या बाजूने प्रकाश टाकताना कृत्रिम गर्भधारणा तज्ज्ञ डॉ. नटचंद्र चिमोटे म्हणाले, मधल्या काळात लॉकडाउनमुळे वंध्यत्त्वाचे उपचार करणारे केंद्र बंद होते. ते आता टप्प्याटप्याने सुरू होत आहेत. त्यामुळे आम्हीदेखील मोजक्याच जोडप्यांवर उपचार करीत आहोत. पहिल्यासारखी परिस्थिती निश्चितच राहिलेली नाही. कृत्रिम गर्भधारणेतून पाळणा हलवू इच्छिणारे १० टक्के जोडपी आम्ही सहा महिन्यानंतर वर्षभरानंतर उपचार घेऊन बाळंतपणाचा विचार करू, असे स्पष्ट सांगत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

नागपूर: करोना प्रादुर्भावाची साखळी वेगाने वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत ४६ बधितांचा मृत्यू झाला तर नव्याने ८२४ जणांना या विषाणूने गाठले. त्यामुळे आजपर्यंत दगावलेल्या बधितांची संख्या सातशेपार गेली आहे. त्यातले ५४४ मृत्यू हे एकट्या संत्रानगरीतील आहेत.

मेयोत २४ तासांत रविवारी १५ बाधितांचे मृत्यू नोंदवण्यात आले. सर्वाधिक मृत्यू शहर हद्दीतील आहेत. तर ग्रामीण आणि जिल्ह्याबाहेरीलही काही मृत्यू नोंदवण्यात आले. मेडिकलमध्येही हीच स्थिती आहे. तर खासगी रुग्णालयातही मृत्युसंख्या वाढत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या अहवालानुसार २४ तासांत करोनाचे ४६ मृत्यू नोंदवण्यात आले.

दगावलेल्यांत शहरातील ४२, नागपूर ग्रामीणचे दोन आणि जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील रुग्णालयात आजपर्यंत दगावलेल्यांची संख्या थेट ७३०वर पोहोचली आहे. त्यात नागपूर शहरातील ५४४, ग्रामीणचे १०५ तर जिल्ह्याबाहेरच्या ८१ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, शहरात दिवसभरात ८२४ नवीन बाधितांची भर पडली. त्यात शहरातील ७१४, ग्रामीणच्या १०८ आणि जिल्ह्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या थेट २०,४३९ वर पोहोचली आहे. त्यात शहरातील १५,४०६ रुग्ण तर ग्रामीणच्या ४,७७० रुग्णांचा समावेश आहे. शहरातील एकूण रुग्णांत जिल्ह्याबाहेरील २६३ रुग्णांचा समावेश आहे. शहरी आणि ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत तब्बल ८१४ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यात शहरातील ५५६ तर ग्रामीण भागातील २५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ७,३४०वर पोहोचली. तर ग्रामीण भागातीलही ३,७१३ जण करोनामुक्त झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ११,०५३ वर गेली आहे. करोनामुक्तीचा हा सरासरी दर आज ५४ टक्क्यांवर कायम होता.

नागपूर: बायोडिझेलच्या नावाखाली भेसळयुक्त इंधनाची विक्री सुरू आहे. त्यामुळे वाहनांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. या प्रकारच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन आणि विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सोमवारी केली.

केंद्र सरकारने ३० एप्रिल २०१९ रोजी एका अधिसूचनेप्रमाणे हायस्पीड डिझेलमध्ये बायो डिझेल वीस टक्क्यांपर्यंत मिसळून विक्री करण्याची परवानगी दिली. मात्र, त्याचा गैरफायदा घेत बायो डिझेल आणि फ्युएल ऑइल अशा नवीन मिश्रणाची संपूर्ण राज्यामध्ये सर्रास विक्री सुरू आहे. त्यामुळे राज्य शासनाचा सहा ते सात हजार कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. भेसळयुक्त इंधनाचा पुरवठा मुख्यत्वे गुजरात येथून होतो. स्वस्त दरात इंधन मिळत असल्याने वाहनचालक खरेदी करतात. त्याचा फटका केंद्र आणि राज्य सरकार, वाहनचालकांना बसत असल्याचा दावा विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी केला आहे. याप्रसंगी प्रणय पराते, हरविंदर भाटीय आदी उपस्थित होते.

नागपूर: करोनापासून बचावासाठी आता सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य झाले आहे. मात्र, त्याचा नको तिथे वापर धोकादायक ठरू शकतो. लाडक्या बाप्पांची आरती करताना सॅनिटायजरचा वापर करू नका, आरती घेताना ते पेट घेऊ शकते, अशा इशारा महापालिकेचे प्रभारी मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिला.

गणेशोत्सवात गणरायाची आराधना करताना दिवा लावला जातो. अगरबत्ती, धूप आदींचा वापर होतो. कापूर पेटविला जातो. आरती घेताना हात पेटत्या कापराजवळ नेले जातात, त्यामुळे अशा स्थितीत हाताला सॅनिटायझर असेल तर हात पेटण्याचा धोका आहे. सॅनिटायजर लावून आगीजवळ जाऊ नका. घरातील दिवा लावणे, किचनमध्ये गॅस पेटविणे, सिगरेट ओढणे, लायटरचा वापर करणे टाळायला हवे. सॅनिटायजरची ज्वाळा ही रंगीत नसल्याने लगेच ती लक्षात येत नाही, अशा स्थितीत अधिक नुकसान होण्याचा धोका असतो. लहान मुलांना सॅनिटायजरसोबत खेळू देऊ नका, असा सल्ला उचके यांनी दिला.

मंडळांनो, खबरदारी घ्या!
उत्सव काळात आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारीच्या योग्य त्या सूचना अग्निशमन विभागाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. गणेश मंडळांनी पेंडॉलवर फायर रेझिस्टंट स्प्रे (अग्निरोधक द्रव्य) मारणे गरजेचे आहे. ही काळजी घेतली तर आगीच्या घटना घडणार नाहीत. विद्युत रोशणाई बसविताना प्रमाणित इलेक्ट्रिशियनकडूनच बसविण्यात यावे. विद्युत उपकरणे चांगल्या दर्जाची असावीत. मंडप बंदिस्त नसावेत, ते उभारताना मोकळी जागा असेल अशीच व्यवस्था करावी. दुर्घटना घडली तर बाहेर पडणे सोयीचे जावे, ही काळजीही मंडळांनी घ्यावी, अशी सूचना अग्निशमन विभागाने केली.

हे लक्षात ठेवा...
मनपाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशांचे काटेकोर पालन व्हावे. गणेश मंडपात एकावेळी चार ते पाच व्यक्तीच असाव्यात, मंडप १० बाय १०चा असावा. करोनाविषयी जनजागृती करणारे फलक लावावे, ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करावी, सार्वजनिक रस्ते, खेळांचे मैदान अशा ठिकाणी गणेशाची स्थापना करू नये, अशा सूचना मनपाकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.

साबणानेच धुवा हात...
करोनाबाधित वाढत आहेत. त्यामुळे बचावासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सॅनिटायजर त्यातीलच एक. मात्र, त्याचा अतिरेक होताना दिसतो. जेव्हा आपण घरात आहोत, तेव्हा सॅनिटायजर न वापरता केवळ साबणाने हात धुवावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

 वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी भारतात आला. आधीच करोना आणि विलगीकरणाचे संकट, त्यात त्याचे पैसे आणि सामान चोरीला गेले. कुणीच त्याची मदत करेना. अखेर दुतावास गाठण्यासाठी तो पायीच दिल्लीला निघाला. फिरत फिरत नागपुरात आला. नशिबाने या ब्रिटीश नागरिकाची गाठ नागपूर पोलिसांशी पडली आणि त्याच्या पायपीटीला व दैन्यावस्थेला विराम मिळाला.

ऑस्टीन व्यंकटेश नागा परमाबटुरी ऊर्फ व्हॅप नागा (वय ३७, रा. अ‍ॅम्बा हाऊस, लंडन) असे या ब्रिटीश नागरिकाचे नाव आहे. त्याच्या भारतीय वंशाच्या वडिलांचे १२ जून २०१९ निधन झाले. त्यांच्या अस्थी विसर्जनासाठी तो १९ मार्च रोजी ब्रिटनहून आंधप्रदेशातील गुडूर येथे दाखल झाला. याच काळात करोनामुळे देशव्यापी लॉकडाउनची घोषणा झाली. तेव्हापासून त्याच्या पायाला चाकं लागली. तो वाराणसी, अमृतसर, कटरा, वैष्णोदेवी, गोवा, मंगलोर, मदुराई अशा ठिकाणी फिरला. प्रत्येक ठिकाणी त्याला विलगीकरणाला तोंड द्यावे लागले. या काळात त्याची कागदपत्रांची आणि पैशांची बॅग चोरीला गेली आणि त्याची दैनावस्था सुरू झाली. इंग्रजी भाषिक असल्याने त्याला स्थानिकांशी संवाद साधता येत नव्हता. परिणामत: त्याला मदतही मिळत नव्हती. इतर राज्यातील पोलिसही त्याचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. घरी परतण्यासाठी ब्रिटीश दुतावासाला संपर्क साधणे आणि त्यासाठी दिल्लीत पोहोचणे गरजचे होते. अखेर त्याने पायदळच दिल्लीच्या गाठळण्याचे ठरविले.

नागपूर" करोनामुळे रस्त्यावरील सार्वजनिक उत्साहाला आता नियमांचा अटकाव आहे. मात्र, हा उत्साह मनामनात ओसंडून वाहतो आहे. गणरायाचे आगमनही याच करोनाच्या सावटात होत आहे. 'गणरायाने करोनाचे हे विघ्न दूर करावे', अशी आस ठेवूनच भाविक या विघ्नहर्त्याचे स्वागत करणार आहेत. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी अर्थात आज, शनिवारी बाप्पा आपले वाहन मूषकासह घरोघरी येणार आहेत.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या महिनाभर आधीच सार्वजनिक मंडळांची तयारी सुरू होते. मूर्तीची नोंदणी, गणपतीसाठी मंडप, वर्गणी, देखावा अशा साऱ्या बाबींची तयारी कितीतरी दिवस आधीच सुरू होते. कार्यकर्त्यांमध्ये कामे वाटून दिली जातात. एकाच परिसरात राहणारे पण एकमेकांना नियमित न भेटणारे या गणेशोत्सवाच्या काळातील आरतीला हमखास भेटत असतात. गणपतीचे दहा दिवस वेगवेगळे कार्यक्रम, उत्साह आणि आनंदात जातात. मात्र, यंदा करोनामुळे मार्चनंतरचे बहुतांश सण उपचार म्हणूनच साजरे होत आहेत. यंदा गणेश मंडळांवर अनेक निर्बंध आले आहेत. मात्र, घरगुती गणपती बसिवणाऱ्यांची लगबग सुरू आहे. यावेळी बाजारपेठा नेहमीसारख्या गजबजलेल्या नसल्या तरी फुले, प्रसाद, फळे यांची दुकाने लागली आहेत. गणेशमूर्तींच्या दुकानांवरही यंदा निर्बंध आहेत. रस्त्याच्या कडेला दुकान लावल्यास महापालिका दंड करीत आहे. दंड भरण्याची तयारी ठेवूनच या विक्रेत्यांनी दुकाने लावली आहेत. काहीजण ऑनलाइन विक्री करीत आहेत.

गणपतीबाप्पांना प्रिय असलेल्या मोदकांचा नैवेद्य घरोघरी तयार झाला आहे. लाडू, पेढे प्रसादाचे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानांमध्येही चांगलीच गर्दी आहे. मखरात गणरायांना आसनस्थ केले जाणार असल्यामुळे देखणे मखर, विजेच्या माळा, फुलांच्या माळा, आंब्याची पाने, दुर्वा, कमळ फुले, आघाडा, केना, केळी, सेप, नारळ हे पूजेचे साहित्य खरेदीसाठी पूर्वसंध्येला चांगलीच लगबग सुरू होती. त्यामुळे मुख्य बाजारपेठा गर्दीने भरगच्च दिसत होत्या.

करोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी आता विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत पोचली आहे. शुक्रवारी विभागीय आयुक्तांचा चालक आणि सुरक्षा रक्षकही करोनाच्या विळख्यात अडकल्याने आता डॉ. संजीव कुमार यांच्यावरच विलगीकरणात राहण्याची वेळ ओढवली आहे. या दोघांनाही तुर्तास सौम्य लक्षणे असली तरी आयुक्तांनी तातडीने आपली करोना चाचणी करून घेतली. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. या घडामोडीत जिल्ह्यात आज दिवसभरात १०२४ जणांना करोना विषाणूने गाठले. त्यामुळे बाधितांच्या साखळीने आज चौथ्या दिवशीही हजाराचा आकडा कायम ठेवला. तर दुसरीकडे जिल्ह्यात करोनाची लागण झाल्यानंतर उपचार घेत असलेले २८ जण दगावले.

करोनाची बाधा होऊन उपचारादरम्या विविध रुग्णालयांमध्ये दगावलेल्यांपैकी २४ जण हे एकट्या शहरातील आहेत. तर २ जण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तर २ जण परजिल्ह्यातील रहिवासी आहेत. या घटनाक्रमात आज करोना मुक्त होणाऱ्यांच्या संख्येनेही विक्रमी बाजी मारली. आज दिवसभरात जिल्ह्यात ७०० जण सौम्य लक्षणे असल्याने आजार मुक्त झाल्याचे सांगून घरात विलगीकरणात पाठविण्यात आले. नव्याने करोनाच्या विळख्यात अडकलेल्यांपैकी सर्वाधिक ६०४ नमुन्यांचा अहवाल अँटिजन रॅपिड टेस्टमधून पॉझिटिव्ह आला. त्या खालोखाल खासगी प्रयोगशाळांमधून १७७, एम्समधून १०५, मेयोतून ८९, माफ्सूतून २६ आणि मेडिकलमधून २३ जणांच्या घशातील स्राव नमुन्यात करोनाचा अंश आढळला. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात ८७२७ सक्रिय करोना बाधित विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. त्यातील ५७३४ करोनाबाधित एकट्या शहरातील असून उर्वरित २९९५ हे ग्रामीण भागातील सक्रिय रुग्ण आहेत.
 

नागपूर: करोना कालावधीत राज्यातील रेशन दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांची ओळख पटविण्यासाठी बायोमेट्रिक मशिनचा वापर करण्यास घातलेली बंदी पुढील कालावधीपर्यंत कायम ठेवण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.

रेशन दुकानदार संघ नागपूर यांनी बायोमेट्रिक मशिनचा वापर करोना संपेपर्यंत स्थगित करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. सदर याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली.

याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना अॅड. फिरदोस मिर्झा म्हणाले, १७ मार्च २०२०च्या परिपत्रकानुसार करोनाचा प्रसार रोखण्यासाठी रेशनदुकानदारांना बायोमेट्रिक मशिनचा वापर बंद करण्याचा आदेश देण्यात आला होता. परंतु, त्या कालावधीत रेशन दुकाने सुरू होती. अनेकांना धान्यपुरवठा करण्यात आला. त्यात काही दुकानदारांना करोनाची लागण झाली व मृत्यूही झाला आहे. तरीही राज्यातील कोणतेही रेशन दुकान बंद करण्यात आलेले नाही. दरम्यान, केंद्र सरकारने करोनासंदर्भात १३ जुलै रोजी नवीन आदेश काढलेत. त्यात आदेशांना नागपूर महापालिकेनेदेखील अमलात आणले.

केंद्राच्या निर्देशानुसार दुकानात सुरक्षित वावर, सॅनिटायजर व इतर साधने उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे रेशन दुकानदारांना बायोमेट्रिकचाही वापर करण्याबाबत सांगण्यात आले आहे. परंतु, करोनाचा प्रसार रोखण्यासाठी या मशिनचा वापर बंद ठेवणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने सदर बाब मान्य करीत बायोमेट्रिक मशिनचा वापर करण्यास घातलेल्या बंदीला मुदतवाढ दिली.
 

नागपूर: स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूरने देशातील 'टॉप ट्वेंटी' शहरांमध्ये स्थान पटकावले आहे. या यादीत नागपूर १८व्या क्रमांकाचे स्वच्छ शहर ठरले. तर राज्यात पाचव्या स्थानी आहे. केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत देशभरातील स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली. या सर्वेक्षणाच्या निकालात विविध विभागांमध्ये नागपूरने एकूण सहा हजारांपैकी ४,२८३.२६ गुण पटकावले. गेल्या वर्षी नागपूरचा क्रमांक ५८वा होता.

स्वच्छ भारत सर्वेक्षणात गुण देताना विविध निकषांची पाहणी करण्यात येते. नागपूरने निरीक्षण या प्रकारात सर्वाधिक १५००पैकी १,३५४ गुण मिळविले आहेत. नागरिकांचा प्रतिसादमध्ये १२८३.११ इतके गुण मिळवण्यात यशस्वी ठरले. मात्र, कचरामु्क्त शहर (गारबेज फ्री सिटी) या विभागात नागपूर महानगरपालिका पुन्हा एकदा अपयशी ठरली आहे. विशेष म्हणजे या विभागाचे निकाल एप्रिल महिन्यातच जाहीर करण्यात आले होते. याअंतर्गत शहरात सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या चमूला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आढळून आले. यात सुधारणा करता आली असती तर नागपूरचा क्रमांक अधिक वरचा राहिला असता असे मत घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. कचरामुक्त शहर विभागात नागपूरला शहराला शून्य गुण मिळाले आहे. त्यामुळे 'सर्टिफिकेशन' या प्रकारात शहराला १५००पैकी केवळ ५०० गुणांवरच समाधान मानावे लागले. हे ५०० गुणही हागणदारीमुक्त शहरासाठी मिळाले आहेत. या गटात नागपूरला ओडीएफ ++ मानांकन मिळाल्याने थोडेफार गुण मिळविता आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नागपूर: करोनामुळे आलेल्या मर्यादांसह यंदाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. यंदा निर्बंध असले तरी उत्साह जुनाच आहे. छोट्या स्वरुपात साधेपणाने उत्सव साजरा करण्याच्या तयारीला मंडळे लागली आहेत.

शहरातील मोठ्या मंडळांची तयारी दोन महिन्यांपूर्वीपासून सुरू होती. आयोजक-प्रायोजक जुळविणे, पाहुण्यांची यादी, दररोजच्या आरतीला उपस्थित राहणारे मान्यवर, देखाव्याची तयारी, महाप्रसाद, निमंत्रण पत्रिका आदी कार्यांमध्ये कार्यकर्ते गुंतून जातात. गणपती आगमनाच्या मिरवणुकीपासून अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन यात्रेपर्यंत दहा-बारा दिवस बाप्पाचे हे तरुण हात वेगळ्याच विश्वात असतात. चोवीस तास मंडळाचाच विचार डोक्यात ठेवून संपूर्ण उत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. यावर्षी या सर्व बाबींचे स्वरूप काहीसे बदलले आहे. याबाबत सांगताना संती गणेशोत्सव मंडळाचे संयोजक संजय चिंचोळे म्हणाले,'उत्सवादरम्यानचे सर्व दिवस एक प्रकारची धुंद असते. यंदा ती स्थिती नाही. कार्यकर्त्यांना काय काम सांगावे, हा प्रश्न आहे. परंपरा खंडित होऊ नये म्हणून औपचारिकता सुरू आहे. दरवर्षीचा माहौल पूर्णत: हरविला आहे.' मूर्तीची कमी झालेली उंची, देखाव्यांवर आलेले बंधन यामुळे एकमेकांसोबत असलेली मंडळांमधील स्पर्धासुद्धा दिसणार नसल्याचे चित्र आहे.

नागपूर: संपूर्ण महिनाभर श्रावणामुळे मांसाहार करू न शकलेल्या नागपूरकरांनी पाडव्याला तब्बल दोन कोटी रुपयांचे मटण फस्त केले. कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून या एका दिवशी अकरा हजार बोकडांची विक्री झाली. त्यामुळे यंदाचा पाडवा विक्रेत्यांसाठी आनंदाचा राहिला.

गेल्या काही महिन्यांपासून करोनामुळे सर्वत्र चिंतायुक्त दहशतीचे वातावरण आहे. त्यातल्या काहींनी अंडी खाल्ल्याने, मांसाहार केल्याने करोनाची लागण होत असल्याचा गैरसमज पसरविला. त्यानंतर मांसाहाराने करोनाचे संक्रमण होत नसल्याची जनजागृती सरकारलाच करावी लागली. अनेक सेलिब्रिटीनींही त्यात उडी घेतली. अशा वातावरणात सुरू असलेल्या मांसविक्रीने पोळ्याच्या पाडव्याचा मुहूर्त साधत विक्रमी आकडा गाठला. श्रावणामुळे अनेकांनी मांसाहार महिनाभर बाद केला होता. पोळ्यानंतर येणारा गणेशोत्सव, हाडपक, अधिक मास अशी सणांची लांबच लांब यादी पाहता अनेकांनी पाडवा हातचा जाऊ दिला नाही. सुसाट सुटत मटणावर ताव मारला. गेल्या काही वर्षांमध्ये मटणाला पसंती वाढली आहे. चिकनच्या तुलनेने मटण खाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याची प्रचीती खऱ्या अर्थाने पाडव्याला आली.

एपीएमसीला फळला बुधवार
पाडव्याला नेमका बुधवार आल्याने बोकडांची विक्री वाढल्याचे दिसून आले. संपूर्ण दिवसभरात मार्केटयार्डमधून २ कोटी ७० लाख रुपयांचे बोकड विकल्या गेले. एपीएमसीला प्रत्येक व्यवहारातील शंभर रुपयामागे एक रुपया मिळतो. त्यानुसार २ लाख सत्तर हजार रुपये एपीएमसीला मिळालेले आहेत. गेल्या काही वर्षांचा विचार करता इतक्या मोठ्या प्रमाणात बोकडांची विक्री होण्याच्या काही ठराविक प्रसंगांमध्ये यावर्षीच्या पाडव्याची नोंद करण्यात आली आहे.

नागपूर: शहरातील करोना विषाणूचा विळखा दिवसागणिक अधिक करकचून आवळला जात आहे. या विषाणूची बाधा होऊन उपचार घेत असलेल्या ४६ जणांचा गुरुवारी मृत्यू ओढवला. यामुळे आता मृत्युसंख्या ६२५ वर झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊन एकाच दिवशी नोंदविला गेलेला हा उच्चांकी आकडा आहे. सलग तिसऱ्या दिवशी हजाराच्या संख्येत रुग्ण आढळले आहेत.

पुन्हा ९८९ जणांना करोनाची लागण झाल्याचेही गुरुवारी निदान झाले. त्यामुळे आतापर्यंत करोनाच्या विळख्यात अडकलेल्यांची संख्या वाढून १७ हजार ७२२ पर्यंत पोहोचली आहे. शहरात यापूर्वी याच ऑगस्ट महिन्यात एकाच दिवशी ४० मृत्यू झाल्याचा उच्चांक होता. याशिवाय दोन वेळा ३९ जण दगावले होते. १२ ऑगस्ट रोजी ३८ जण एकाच दिवशी दगावल्याची नोंद घेण्यात आली होती.

उपचारादरम्यान गुरुवारी दगावलेल्यांमध्ये ३८ जण हे एकट्या शहरातील आहेत. ग्रामीण भागातील चार आणि नागपूरबाहेरच्या चौघांचा मृत्यू या विषाणूने झाला. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात करोनाची दहशत आणखी गहिरी झाली आहे. यापैकी मेडिकलमध्ये २०, तर मेयोत २१ जणांच्या मृत्यूची नोंद घेतली गेली. खासगी रुग्णालयात तीन जण दगावले. खासगी रुग्णालयात दगावलेल्यांचा टक्का हळूहळू वाढत आहे. १ ऑगस्ट रोजी खासगी रुग्णालयात केवळ चार रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद होती. मात्र, अवघ्या २० दिवसांत नागपुरात खासगी रुग्णालयात ४२ जण दगावले आहेत. मेडिकलमध्ये १ ऑगस्टपर्यंत ६३, तर मेयोत ७० मृत्यूंची नोंद झाली होती. त्यानंतरच्या २० दिवसांत मेडिकलमध्ये २९९, तर मेयोत २८२ मृत्यूची नोंद झाल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

 

इसलिए गणपति उत्सव की पृष्ठभूमि पर, राज्य के लाखों यात्रियों को राहत मिलेगी।  यह जानकारी परिवहन मंत्री और एसटी निगम के अध्यक्ष एडवोकेट अनिल परब ने एक संवाददाता सम्मेलन में दी।

श्री। परब ने कहा कि कल से, एसटी की सरल, निमाराम, शिवशाही, शिवनेरी और सभी प्रकार की बस सेवाएं (मूल टिकट की कीमत पर) चरणों में शुरू की जाएंगी, जिनमें से लंबी और मध्यम दौड़ की बसें अग्रिम आरक्षण के लिए उपलब्ध कराई गई हैं।  एसटी यात्रा के लिए ई-पास की आवश्यकता नहीं है।

यात्रा के दौरान, यात्रियों को कोविद -19 के सभी नियमों का सख्ती से पालन करना चाहिए।

मुंबई में आवश्यक सेवाओं को छोड़कर, कोविद -19 की पृष्ठभूमि पर 23 मार्च से पूरे राज्य में एसटी सेवाएं बंद कर दी गईं।  इस बीच, राज्य सरकार द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार, एसटी ने विदेशी मजदूरों को परिवहन करके, समाज के सभी वर्गों को सुरक्षित परिवहन सेवाएं प्रदान की हैं, जो महाराष्ट्रीयन छात्रों को कोटा से उनके घरों तक पहुँचाते हैं, और कोल्हापुर-सांगली के गन्ना श्रमिकों को उनके गृहनगर में स्थानांतरित करते हैं।

सरकार द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार बस सेवा 22 मई से शुरू कर दी गई है।  इसके माध्यम से, एसटी ने प्रतिदिन लगभग 1300 बसों से 7287 राउंड यात्राओं में लगभग डेढ़ लाख यात्रियों को सुरक्षित यात्री सेवा प्रदान की है। श्री परब ने यात्रियों से अपील की कि वे कोविद -19 के दौरान सरकार द्वारा निर्धारित नियमों का पालन करते हुए कल से शुरू होने वाली अंतर जिला बस सेवा का लाभ उठाएं।

इसलिए गणपति उत्सव की पृष्ठभूमि पर, राज्य के लाखों यात्रियों को राहत मिलेगी।  यह जानकारी परिवहन मंत्री और एसटी निगम के अध्यक्ष एडवोकेट अनिल परब ने एक संवाददाता सम्मेलन में दी।

 श्री।  परब ने कहा कि कल से, एसटी की सरल, निमाराम, शिवशाही, शिवनेरी और सभी प्रकार की बस सेवाएं (मूल टिकट की कीमत पर) चरणों में शुरू की जाएंगी, जिनमें से लंबी और मध्यम दौड़ की बसें अग्रिम आरक्षण के लिए उपलब्ध कराई गई हैं।  एसटी यात्रा के लिए ई-पास की आवश्यकता नहीं है।

 यात्रा के दौरान, यात्रियों को कोविद -19 के सभी नियमों का सख्ती से पालन करना चाहिए।

 मुंबई में आवश्यक सेवाओं को छोड़कर, कोविद -19 की पृष्ठभूमि पर 23 मार्च से पूरे राज्य में एसटी सेवाएं बंद कर दी गईं।  इस बीच, राज्य सरकार द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार, एसटी ने विदेशी मजदूरों को परिवहन करके, समाज के सभी वर्गों को सुरक्षित परिवहन सेवाएं प्रदान की हैं, जो महाराष्ट्रीयन छात्रों को कोटा से उनके घरों तक पहुँचाते हैं, और कोल्हापुर-सांगली के गन्ना श्रमिकों को उनके गृहनगर में स्थानांतरित करते हैं।

 सरकार द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार बस सेवा 22 मई से शुरू कर दी गई है।  इसके माध्यम से, एसटी ने प्रतिदिन लगभग 1300 बसों से 7287 राउंड यात्राओं में लगभग डेढ़ लाख यात्रियों को सुरक्षित यात्री सेवा प्रदान की है।

 श्री परब ने यात्रियों से अपील की कि वे कोविद -19 के दौरान सरकार द्वारा निर्धारित नियमों का पालन करते हुए कल से शुरू होने वाली अंतर जिला बस सेवा का लाभ उठाएं।

मिली जानकारीनुसार रोशन मुलचंद माटे-२६ ,मु वार्ड नं १, चिचोली (खापरखेड़ा) त सावनेर निवासी मृतक का नाम बताया जा रहा है। मृतक युवक अविवाहित था। बताया जा रहा है की युवक अपने पिता के साथ चार साल से रह रहे  थे। लेकिन उसकी मां और बड़ा भाई जबलपुर रहते हैं। पिता रेलवे विभाग से सेवानिवृत्त हुये और पेंशन के भरोसे पर गुजारा कर रहे थे।मृतक और पिता दोनो शराब के आदि थे।घटना के दिन दोनों ने शराब पी रखी थी। इसी बीच मृतक को पिता ने खाना खाने को कहा।मृतक कमरे में जा कर अंदर से दरवाजा लगाकर सीलिंग फैन के बाजू लोहे के पाइप में दुपट्टा बांधकर फंदा लगा के आत्महत्या कर ली। कुछ देर बाद पिता द्वारा आवाज लगाने पर अंदर से आवाज नही आने पर पिता ने खिड़की से झांकने पर मृतक फंदे से झूलता नजर आया। घटना की जानकारी खापरखेड़ा पुलिस को दी गई। शव का पंचनामा कर पोस्टमार्टम के लिए नागपुर मेयो अस्पताल भेजा गया। आत्महत्या का कारण फ़िलहाल पता नही चल पाया। खापरखेड़ा पुलिस मामले की जांच कर रही

वाड़ी, दवलामेटी,नवनीत नगर परिसर में  कई वर्षों से छोटे बच्चों के लिए पोला त्योहार मनाया जाता था, लेकिन इस बार प्रशासकीय आदेश से सार्वजनिक रूप से त्योहार नहीं मनाने के आदेश जारी किया गया. कोरोना ने छोटे बच्चों की खुशियां भी छीन ली. इस संबंध में छोटे-छोटे बच्चे आस-पास के ही घरों में लकड़ी के बैल ले जाकर पोले की गिफ्ट त्योहार का आनंद लेते दिखाई दिए.वाड़ी शहर  युवा सेना प्रमुख सचिन बोमले हर साल तन्हा पोला प्रतियोगिता का आयोजन करते थे इस साल कोरोना  के संक्रमण के वजहसे प्रतियोगिता को रद्द करके छोटा सा कार्यक्रम किया गया,ऐसे ही दवलामेटी, हेटी, हिलटॉप कॉलोनी,वसंतविहार,में भी सार्वजनिक तन्हा पोला का बड़ा आयोजन किया जाता था इन सभी जगहों पर पोला का आयोजन नही होने पर बच्चो में मायूसी नज़र आरहे थे,लव्हा गांव में भी माजी उपसभापति सुजीत नितनवरे के नेतृत्व में छोटा  तन्हा पोला का आयोजन किया गया था

नागपूर: जीम सुरू न करण्याच्या निर्णयाविरुद्ध बुधवारी संविधान चौकात जीमचालकांनी व्यायाम करीत राज्य सरकारचे लक्ष वेधले. महापौर संदीप जोशी यांनीही यात सहभागी होत कसरती केल्या. 'करोनाविरुद्ध लढ्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवा, असे सरकार सांगते. बाजार सुरू झाले. दारूचे दुकानही सुरू आहेत. मग, शरीर बळकट ठेवण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जीम का सुरू नाहीत,' असा सवाल महापौरांनी केला.

नागपूर डिस्ट्रिक्ट हेल्थ क्लब असोसिएशन आणि विदर्भ बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. महापौर म्हणाले, साथरोग कायद्याच्या नावाखाली गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील दोनशेवर जीम बंद आहे. त्यामुळे जीमचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जीम का सुरू नाहीत, याचे कुठलेही शास्त्रीय कारण राज्य सरकारने दिले नाही. जागतिक आरोग्य संघटनेने जीममध्ये व बाहेरही व्यायाम केल्यास करोनासारख्या आजारावर मात करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने अनलॉक-३ मध्ये जीम व योग संस्थांना ५ ऑगस्टपासून अटी व शर्तीच्या आधारावर परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' अंतर्गत जीम व योग क्लबला का वगळते, याबद्दल महापौरांनी आश्चर्य व्यक्त करीत येत्या आठवडाभरात जीम सुरू करण्यास परवानगी न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. एकाचवेळी शहरातील २२२ जीमच्या बाहेर जीमचालक व कर्मचारी सरकारविरोधात आंदोलन करीत असल्याचेही सांगितले
 

शिक्षकांच्या विचारांतील सकारात्मकता, आशावाद मुलांना जगण्याचे बळ देतो. भविष्यात येणाऱ्या संकटावर मात करायची असेल तर शिक्षकांना मुळात स्वतःला घडविण्याचा, जीवनाकडे बघण्याचा दुर्दम्य आशावाद हवा. कठोर वास्तवाला सामोरे जाण्याची जिद्द हवी. शिक्षकांसाठी रोजचा दिवस हा शिक्षक दिन असला पाहिजे, तरच चांगले विद्यार्थी घडवले जाऊ शकतात.

विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर संस्कार, नीतिमूल्ये, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र बुद्धी आणि स्मृती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजून घेतला पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रकट अवगुण आणि सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा असतो.

विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मुले कच्ची आहेत, ती अस्वच्छ राहतात, गैरहजर राहतात, गृहपाठ करीत नाहीत, दंगा करतात, अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात वगैरे वगैरे. विद्यार्थ्यांबाबतचा हा नकारात्मक दृष्टिकोन कमी करण्यासाठी शिक्षकांनी आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे. समस्या असणारच! मात्र कौशल्य आणि त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थ्यांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.

शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. माहितीच्या विस्फोटाच्या या युगात शिक्षकांवरील जबाबदाऱ्या फार मोठ्या आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्र येऊन विचार करण्याची ही वेळ आहे. उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यतत्परता खूप महत्त्वाची आहे. छोट्या-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञानसमृद्ध असेल तेवढे विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनकार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो.

जो खूप जाणतो तो विद्वान असे म्हणतात. शिक्षक इतर बाबतीत विद्वान असो वा नसो, जे शिकवायचे आहे त्याबाबत तो विद्वान असलाच पाहिजे. आपल्या विषयाच्या अनुषंगाने नवनवीन ज्ञान मिळवून, विविध शैक्षणिक साहित्याचा अवलंब करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणाऱ्या आणि आपली तासिका प्रसन्नचित्ताने शिकण्यासाठी सर्वोच्च प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांचे विद्यार्थी नक्कीच ऐकतात. उमलत्या कळ्यांमधील आंतरिक शक्तींचा तेजोवलय शिक्षकांनी साकारला पाहिजे. शिक्षकांनी वाचनप्रिय असले पाहिजे. त्यांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह असावा.

नागपूर: विहिरीत बुडून तीन शेतमजुरांचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना अरोलीतील सिरसोली येथे बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. आकाश पंचबुधे वय २७, विनोद बर्वे वय ३७ आणि गणेश काळबांडे वय २८ सर्व रा. वाकेश्वर, अशी मृतकांची नावे आहेत. ( Three Farm Laborers Drown )

तिघेही शेतमजूर शेतात काम करायला गेले होते. दुपारी तिघांनी सोबत जेवण घेतले. जेवणानंतर तिघे हात धुवायला विहिरीजवळ गेले. याचदरम्यान एक जण विहिरीत पडला. त्याला विचाविण्यासाठी एकामागून एक दोघे विहिरीत उतरले आणि पोहता येत नसल्याने तिघांचाही विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, तिघेही अचानक बेपत्ता झाल्याने शेतमालकाने शोध घेतला असता तिघांचे मृतदेह विहिरीत आढळले.

घटनेची माहिती अरोली पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच अरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार विवेक सोनवणे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. सोनवणे यांनी विहिरीत उतरुन तिघांचे मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आले आहेत. याप्रकरणी अरोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकाच गावातील तिघांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

नागपूर: माजी नगरसेवक देवा उसरे यांच्या हत्येची चित्रफीत मंगळवारी उपराजधानीत व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ही चित्रफीत कुणी व कशासाठी व्हायरल केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, अटकेतील मारेकऱ्यांनी उसरे यांची हत्या केल्यानंतर कुऱ्हाड व कुकरी हे रामदासपेठेतील नाल्यात फेकल्याचे समोर आले. मंगळवारी पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली. जेरॉन ऊर्फ बंटी जॉर्ज निकोलस आणि जतीन ऊर्फ जय योगेश जंगम ,अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे असून, दोघेही २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

दोघांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर कुऱ्हाड व कुकरीने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात उसरे कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झालेत. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बंटी व जय या दोघांना अटक केली. घराच्या वादातून हत्या केल्याचे दोघे पोलिसांना सांगत आहेत. पोलिसांचा मात्र यावर विश्वास नाही. गत दीड महिन्यांपासून दोघे उसरे यांच्या मागावर होते. कोणत्या वेळी ते कोठे जातात, याची संपूर्ण माहिती मारेकऱ्यांना होती. ते संधीच्या शोधात होते. रविवारी संधी मिळताच दोघांनी उसरे यांची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात अन्य आरोपींची नावे माहिती करून घेण्यासाठी सदर पोलिस अटकेतील मारेकऱ्यांची कसून चौकशी करीत आहेत.

लाच मागणारा पोलिस निलंबित
बजाजनगर पोलिस स्टेशनमधील लाच मागणारा पोलिस शिपाई प्रफुल्ल पवार याला निलंबित करण्यात आले आहे. वाहनचोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराला ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांनी ही कारवाई केली. लाच मागितल्याप्रकरणी गत बुधवारी पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला.

दरम्यान, त्याने २० ऑगस्टपर्यंत तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे त्याला अटक होऊ शकली नाही. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पवार याला निलंबित करण्याचे निर्देश दिले. याप्रकरणात एका अधिकाऱ्याचीही गोपनीय चौकशी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
 

नागपूर: कोणीतरी प्राध्यापक धीरज राणे यांना ब्लॅकमेल करीत होते. याबाबत धीरज यांनी पत्नी डॉ. सुषमा यांना सांगितले. या कारणावरून दोघेही गत एक महिन्यापासून तणावात होते. यातूनच सुषमा यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज यांना कोणीतरी ब्लॅकमेल करीत होते. याबाबत धीरज यांनी पत्नीला सांगितले. दोघांनी या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र मार्ग निघाला नाही. त्यामुळे दोघे तणावात राहायला लागले. बदनामीच्या भीतीने राणे दाम्पत्याने ही बाब कोणालाही सांगितली नाही. राणे दाम्पत्याच्या स्वभावातही बदल झाला. अखेर डॉ. सुषमा यांनी टोकाचा निर्णय घेतला. सोमवारी रात्री पती धीरज, मुलगा ध्रुव व मुलगी वण्या यांना जेवणातून गुंगीचे औषध दिले. तिघेही बेशुद्ध झाले. त्यानंतर इंजेक्शन देऊन तिघांना ठार मारले. रात्रभर सुषमा या तिघांच्या मृतदेहाजवळ बसून होत्या. मंगळवारी सकाळी त्या बाहेर गेल्या. त्यांनी फुले आणली. फुले तिघांच्या मृतदेहांवर वाहिले. त्यानंतर पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. वृत्त लिहिपर्यंत चौघांचा प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आला नव्हता. तूर्त कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सकाळी ११नंतर घेतला गळफास
डॉ. सुषमा या सकाळी ११ वाजता धीरज यांच्या आत्या प्रमिला यांच्यासोबत बोलल्या. प्रकृती बरी नाही. झोपायचे आहे, असे सांगून त्या खोलीत गेल्या. त्यानंतर डॉ. सुषमा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली आहे. सुषमा, धीरज व मुले झोपले असतील त्यामुळे प्रमिला यांनी त्यांना जागविले नाही. दुपारी २ वाजल्यानंतरही ते न उठल्याने प्रमिला यांनी धीरज व सुषमा यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडल्यानंतर चौघांचे मृतदेह आढळले.

हर साल धूम धाम से मनाने वाला पोला इस वर्ष कोरोना संक्रमण के चलते किसानों ने अपने घर पर ही बलिराजा की पूजा कर उत्सव मनाया।इस वर्ष बळीराजा को तोरण में खड़े नही रखा गया।वाड़ी में सामाजिक कार्यकर्ता अखिल पोहनकर ने अपने घर पर आए बैल जोड़ी की पूजा कर कोरोना जल्द खत्म होने की दवाएं मांगी।वाड़ी क्षेत्र में लावा ,खड़गाव में हर साल बड़ी धूमधाम से मनाया जाता है लेकिन इस वर्ष नही मनाया गया।खड़गाव में तीन पोले का आयोजन होता है।इस वर्ष पोले का आयोजन नही हुआ।बैलजोड़ी को सजाकर मंदिर में पूजापाठ के लिए ले गए।व पोला घर मे मनाने की जानकारी पोला आयोजक भीमराव कडू ने दी।कोरोना को देखते सभी किसानों ने बैल जोड़ी की पूजा कर कोरोना जल्द खत्म करने की प्रार्थना की गई.

लक्ष्मीप्रसाद दुबे को पोलीस महासंचालक पदक से सन्मानित किया गया . नागपुर ग्रामीण स्थानिक अपराध शाखा में कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीप्रसाद दुबे इन्हें 15 अगस्त को पोलीस महासंचालक पदक से सन्मानित किया गया. यह पदक इन्हें राकेश ओला पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण इनके हस्ते दिया गया. दुबे ने अभी तक 34 साल नागपुर ग्रामीण में सेवा दी है और सेवा निवृत्ति के लिए उन्हें 3 वर्ष रह गए है. स्थानिक अपराध शाखा के अलावा , खापरखेड़ा , कलमेश्वर , हिंगना , कामठी में सेवा दी है. 200 से अधिक पोलिस रिवार्ड भी इन्होंने हासिल किए है. खापरखेड़ा पोलीस स्टेशन और स्थानिक अपराध शाखा में कार्य करते दौरान उन्होंने 17 माउजर भी पकड़े यह भी एक ग्रामीण पुलिस में रिकॉर्ड उनके नाम है. पोलीस महासंचालक पदक  उन्हें 1 मई को ही घोषित कर उन्हें पदक दिया जाने वाला था पर लॉकडाउन रहने से इस पदक से उन्हें 15 अगस्त को सन्मानित किया गया.

नागपूर: माजी नगरसेवक देवा उसरे यांच्या हत्येची चित्रफीत मंगळवारी उपराजधानीत व्हायरल झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. ही चित्रफीत कुणी व कशासाठी व्हायरल केली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दरम्यान, अटकेतील मारेकऱ्यांनी उसरे यांची हत्या केल्यानंतर कुऱ्हाड व कुकरी हे रामदासपेठेतील नाल्यात फेकल्याचे समोर आले. मंगळवारी पोलिसांनी ही शस्त्रे जप्त केली. जेरॉन ऊर्फ बंटी जॉर्ज निकोलस आणि जतीन ऊर्फ जय योगेश जंगम ,अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे असून, दोघेही २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.

रविवारी सकाळी देवा उसरे हे नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी भारत टॉकीज चौकात आले. यावेळी दोघांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर कुऱ्हाड व कुकरीने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात उसरे कोसळले. त्यांचा मृत्यू झाला. मारेकरी पसार झालेत. सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून बंटी व जय या दोघांना अटक केली. घराच्या वादातून हत्या केल्याचे दोघे पोलिसांना सांगत आहेत. पोलिसांचा मात्र यावर विश्वास नाही. गत दीड महिन्यांपासून दोघे उसरे यांच्या मागावर होते. कोणत्या वेळी ते कोठे जातात, याची संपूर्ण माहिती मारेकऱ्यांना होती. ते संधीच्या शोधात होते. रविवारी संधी मिळताच दोघांनी उसरे यांची हत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात अन्य आरोपींची नावे माहिती करून घेण्यासाठी सदर पोलिस अटकेतील मारेकऱ्यांची कसून चौकशी करीत आहेत.
 

नागपूर: मेडिकलमध्ये चांगली वागणूक मिळत नाही. औषधी मिळत नाही. घरातील कुणाशीही संवाद नाही. यामुळे घाबरलेल्या एका करोना पॉझिटिव्ह रुग्णाने आंघोळीचे निमित्त साधून थेट मेडिकलमधून बोंब ठोकली. घर गाठले. मात्र, कुणीच दिसून न आल्याने घरासमोरच रडत बसला. ही माहिती मिळताच मेडिकल व पोलिसांची तारांबळ उडाली. पथकाने घरासमोर रडत बसलेल्या रुग्णाला समजावून परत मेडिकलमध्ये आणले.

रमेश(नाव बदलले) हा रुग्ण धन्वंतरीनगर येथे भाड्याने राहतो. आठवडाभरापूर्वी तो पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला मनपाचे पथक मेडिकलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या घरातील इतर सदस्यांचीही करोना चाचणी करण्यात आली. तेदेखील पॉझिटिव्ह आले. दुसऱ्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. त्यामुळे रमेशचा घरच्यांशी संवादच तुटला. इतरांकडे बघत तो घाबरला. दोन दिवसांपूर्वी त्याला वॉर्डातील कर्मचाऱ्याने आंघोळीला जाण्यास सांगितले. हीच संधी साधत त्याने थेट घर गाठले. घराचा परिसर चारही बाजूने सील असल्याने उडी घेत घरी गेला. पण, घराला कुलूप होते. नंतर तो घरासमोरच रडत बसला. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी गर्दी केली. नागरिकांनी त्याला परत जाण्यास सांगितले. काही नागरिक तर त्याला रागावू लागले. काही वेळातच रुग्णाच्या पाठोपाठ आरोग्य पथक व पोलिस आले. त्यांनी त्याला समजावत परत रुग्णालयात घेऊन गेले.

नागपूर: प्राध्यापक पती, मुलगा व मुलीला इंजेक्शन देऊन ठार मारल्यानंतर डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना कोराडीतील ओमनगर येथील जगनाडे ले-आऊट येथे मंगळवारी दुपारी उघडकीस आली. ऐन पोळ्याच्या दिवशी एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने उपराजधानीत खळबळ उडाली आहे.

धीरज डिंगाबर राणे (वय ४२), त्यांच्या पत्नी डॉ. सुषमा धीरज राणे (वय ३९), मुलगा ध्रुव धीरज राणे (वय ११), मुलगी लावण्या ऊर्फ वण्या धीरज राणे (वय ५), अशी मृतकांची नावे आहेत. धीरज राणे हे वानाडोंगरीतील रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक विभागाचे विभागप्रमुख, तर डॉ. सुषमा या धंतोलीतील अवंती हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या.

राणे दाम्पत्याकडे धीरज यांच्या आत्या प्रमिला (वय ६५) या राहतात. दुपार झाल्यानंतरही चौघे खोलीतून बाहेर न आल्याने प्रमिला यांनी धीरज यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळाला नाही. प्रमिला यांनी आरडा-ओरड केली. शेजारी जमले. एका शेजाऱ्याने सुषमा यांचे भाऊ रितेश सिंग यांना माहिती दिली. माहिती मिळताच ते ओमनगर येथे आले.

दरम्यान, एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला कळविले. पोलिस नियंत्रण कक्षाने कोराडी पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नीलोत्पल, कोराडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. धीरज, ध्रुव व वण्या या तिघांचे मृतदेह पलंगावर पडलेले आढळले. तर बाजूलाच पंख्याला डॉ. सुषमा या गळफास लावलेल्या पोलिसांना दिसल्या. पोलिसांनी पंचनामा करून चौघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केले. तूर्त कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. राणे कुटुंबातील चौघांच्या मृत्यूचे वृत्त कळताच नातेवाइकांनी ओमनगर येथे धाव घेतली. सुखी कुटुंबातील चौघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
 

नागपूर: ऐतिहासिक परंपरेसह सामाजिक प्रश्नांवर प्रहार करणाऱ्या मारबत उत्सवाविना यंदाच पोळा नागपूरकर अनुभवणार आहे. शेकडो वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा ही मिरवणूक रद्द करण्यात झाली आहे. त्यामुळे 'घेऊन जा गे मारबत'च्या आरोळ्या, डीजे-संदलच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुकीसोबत फिरणे आणि एकमेकांची टर उडविणे, राजकारणी-पाकिस्तानच्या नावाने शिव्याची लाखोळी वाहणे आदी गोष्टींना नागपूरकर मुकणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'स्वच्छता अभियाना'ला सुरूवात केली. मात्र गेली कित्येक वर्षी नागपुरात अशी स्वच्छता अभियानाची एक अनोखी परंपरा आहे. 'मारबत व बडग्या' हा जगातला एकमेव असा मिरवणुक प्रकार फक्त नागपूरातच आहे. या काळात रोगराई वाढते. त्यामुळे साधारणत: दरवर्षीच 'ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत' अशी घोषणा देत या उत्सवाला प्रारंभ करण्यात येतो. मारबत आणि बडग्या हे वाईट शक्तींचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे या वाईट शक्तींची धिंड काढून त्यांना शहराबाहेर दहन करण्याची आणि शहर स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि समस्याविरहित ठेवण्याचा उद्देश या उत्सवामागे आहे. यात काळी आणि पिवळी मारबत महत्त्वाची मानली जाते. तान्हा पोळ्याच्या दिवशी मारबत काढण्याची परंपरा १४० वर्षांपासून आजतागायत सुरू आहे. समाजातील अनिष्ट रुढी, रोगराई दूर करण्याचे साकडे घालत 'ईडा पिडा घेऊन जाऽऽ गे मारबत' असे म्हणत मारबतीची मिरवणूक काढण्यात येते. त्याचबरोबर राजकारणी, भ्रष्टाचार, दहशतवाद आदी मुद्यांवर बडगे उभारण्यात येतात. वर्षभर चर्चेत राहणाऱ्या समस्या, प्रश्नांना या माध्यमातून वाचा फोडण्यात येते. यावर्षी मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मारबत मिरवणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा पोळा मारबतीविना सुनासुना वाटत असला तरी प्रादुर्भावाचा विचार करता घेण्यात आलेला निर्णय योग्य असल्याची भावना आहे.

नागपूर: 'करोनाचा संसर्ग लक्षात घेता आगामी महिना नागपूरसाठी 'क्रिटिकल' आहे. ही स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासोबतच जम्बो कोव्हिड केअर सेंटर न उभारता विविध भागांत लहान-लहान केंद्र स्थापन करावेत, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

फडणवीस यांनी सोमवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व महापालिकेत महापौर संदीप जोशी,आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बैठका घेऊन करोनाबाबत उपाययोजना, स्थितीचा आढावा घेतला. महिनाभराचा काळ नागपूरसाठी जोखमीचा असल्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या महिन्यात अत्युच्च मृत्युदर धोक्याची घंटा आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढवले की मृत्युदर कमी होईल. योग्य प्रकारची चाचणी केल्यास २०-२५ दिवसांत परिस्थिती आटोक्यात आलेली दिसेल. गृहविलगीकरणात समुपदेशन करावे लागेल. खासगी संस्था व डॉक्टरांचे सहकार्य घेतल्यास हे शक्य होईल, असे फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या महिन्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. संसर्गाचा वेग वाढल्याने चाचणीची संख्या ३ हजारांहून ५ हजारांच्यावर कशी नेता येईल, याची व्यवस्था करावी. पुढच्या २०-२५ दिवसांत रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. त्यानुसार हॉस्पिटल्स, ऑक्सिजनेटेड बेड्सची व्यवस्था वाढवणे गरजेचे आहे. खासगी हॉस्पिटल्सच्या सहकार्याने कोव्हिड सेंटरची व्यवस्था करता येईल. मनुष्यबळाची समस्या दूर करता येईल, आदी सूचना केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईच्या तुलनेत नागपूरची लोकसंख्या फारच कमी आहे. मुंबईत २ कोटी लोकसंख्या असताना तिथे रोज सरासरी साडेपाच ते सहा हजार जणांची चाचणी होते. पुण्यात ७ हजार आणि आपल्याकडे ३ हजार चाचण्या होतात. दिल्लीत ५ हजारांहून २८ हजार चाचण्या केल्याने २४ टक्के संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांपर्यंत आले व मृत्यूदरही घटला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

नागपूर: करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता जिल्हा परिषदेत अभ्यागतांवर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. आवक-जावक अर्थात डाकसाठीही आता जिल्हा परिषदेत प्रवेश मिळणार नाही. जिल्हा परिषदेतील सगळ्याच विभागांची आवक-जावक व्यवस्था मुख्य प्रवेशद्वाराजवळच करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेतील करोनाग्रस्तांची संख्या आता वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी सामान्य प्रशासन विभागातील एकाला करोनाची बाधा झाली. यानंतर त्याच विभागातील अन्य दोघांनाही करोनाची लागण झाल्याचे शनिवारी समोर आले. यातील एका कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील सगळ्याच सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागात बाधितांची साखळी तयार होण्याची भीती आहे. जिल्हा परिषदेतील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता आठवर गेली आहे.

प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अध्यक्ष रश्मी बर्बे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी रविवारी चर्चा केली. या चर्चेनुसार आता सोमवारपासून जिल्हा परिषदेत अभ्यागतांवर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. केवळ पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच आता जिल्हा परिषदेत प्रवेश दिला जाईल. कर्मचाऱ्यांना ओळखपत्राखेरीज प्रवेश दिला जाणार नाही.

एकत्र भोजनास मनाई

कर्मचाऱ्यांनी दुपारी भोजनास एकत्र बसू नये, आपल्या जागेवर बसूनच जेवण करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. कर्मचाऱ्यांनी सुरक्षित वावराच्या सगळ्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

कर्मचारी सामूहिक रजेवर
सामान्य प्रशासन विभागातील तीन कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे या विभागातील काही कर्मचारी सामूहिक दीर्घ रजेवर गेले आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे कार्यालय किमान ४८ तासासाठी बंद ठेऊन निर्जंतुकीकरण करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

उपस्थितीत कपात करा
सध्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपस्थिती १५ टक्क्यांपर्यंत आणण्याची मुभा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कपात करून त्यांना आळीपाळीने कामावर बोलविण्यात यावे, अशीही मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

 

नागपूर: सिलबंद दारूच्या बाटतीतून दारू काढून त्यात पाणी मिसळून विकणाऱ्या टोळीला नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी सांगितले.

उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चौघांना याप्रकरणी अटक केली. त्यांच्याकडून २ लाख ८३ हजार ६३० रुपयांचा विदेशी दारूचा साठा आणि टाटा एस वाहन असा एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ठोक विक्रेत्यांकडून वाहतूक परवाना आणि मद्य घेऊन वितरणासाठी जाताना वाटेत विदेशी दारूचे टोकन काढून त्यात पाणी मिसळत होते. त्यानंतर कुणाच्या लक्षातही येणार नाही असे ते टोकन पुन्हा लावण्यात येत होते.

बनावट दारू बनविणाऱ्या आकाश मेश्राम, सिद्धू साहू आणि भूषण लोणारकर, विकी इरणकर यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार कारवाई करण्यात आली. अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शना त निरीक्षक रावसाहेब कोरे यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक प्रशांत युरपुडे, सोनाली खांडेकर यांनी ही कारवाई केली.

जप्त केलेला साठा
विदेशी दारू : १८० मिलिलिटरच्या १४४० बाटल्या

विदेशी दारू : ७५० मिलिलिटरच्या ६० बाटल्या

विदेशी दारू : ०१ लिटरच्या १२ बाटल्या

नागपूर : काय थाट होता त्यांचा एकेकाळी. छुन्नुक छुन्नुक आवाज आला की पूर्ण वस्तीला कळायचे, सायकलरिक्षा आली. त्यात कधी कुणी आपली व्यक्ती असायची, कधी शाळेतली मुले. त्या रिक्षावाल्यालाही भारी मान होता. भाड्यापेक्षा दोन पैसे जास्तच पडायचे त्याच्या हातात. मात्र, आज परिस्थिती बदलली. करोनाचे संकट अन् इतर पर्यायी साधने, यामुळे बरेचसे सायकलरिक्षा थांबले. जे आहेत, ते फक्त मालवाहू बनले.

एकेकाळी नागरिकांसाठी दळण-वळणासाठी किफायतशीर साधन असलेली सायकलरिक्षा आज अस्तित्वासाठी लढत आहे. आता ई-रिक्षा आलेत. कुणीही साहजिक त्यालाच प्राधान्य देतो. त्यामुळेही सायकलरिक्षाचे चाक काहीसे रुतून बसल्याचे वास्तव आहे.

दोन दशकांपासून रेल्वेस्थानकाच्या संत्रा मार्केट परिसरात सायकलरिक्षा चालविणारा जमिल सांगतो, 'पूर्वी नागपूरला नोकरीसाठी, व्यवसायासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून सायकलरिक्षालाच पसंती दिली जात होती. मात्र, जेव्हापासून ई-रिक्षा आले तेव्हापासून फक्त दारोदारी जाऊन वस्तू विकणारे किंवा जास्त सामान असलेल्या फेरीवाल्यांपलीकडे सामान्य नागरिक प्रवास करत नाहीत.'

महाल परिसरात राहणारे सुबोध म्हणतात, 'लहानपणी शाळेत जाण्यासाठी वडिलांनी सायकलरिक्षा लावून दिली होती. दररोज ते रिक्षावाले काका शाळेत घेऊन जायचे आणि परत घरी सोडूनही द्यायचे. मुलांनी भरगच्च भरलेल्या रिक्षाचा तो प्रवास लहानपणी गंमत वाटायचा. रिक्षावाल्या काकांना आम्ही खूप त्रास द्यायचो. कधी रिक्षामधून उडी मारणे तर कधी मागे बसल्या बसल्या सहकाऱ्यांचे दप्तर फेकणे हे रोजचेच होते. मात्र, आज जेव्हा रस्त्याने क्वचितच दिसणाऱ्या सायकलरिक्षाचालकाला बघितले की, मन खूप हळवे होते. पायडल मारताना त्या रिक्षाचालकाचा संघर्ष बघून तर त्याला पैसे देऊन पायी घरी जावे अशी इच्छा होते. आज तर त्यांच्या व्यवसायावरच जणू गदा आली आहे.'

नागपूर: करोना विषाणूचा हैदोस नागपुरात सुरू झाला आहे. समुदाय प्रादुर्भाव झाला असल्यानेच दर दिवशी बाधितांचा संख्या वाढत आहे. १५ आणि १६ ऑगस्ट रोजी नागपुरात १ हजार २४५ करोनाबाधितांची नोंद झाली. मेयो-मेडिकलसह खासगी रुग्णालयांत सुमारे ३९ जणांचा बळी करोनाने घेतल्याने या विषाणूमुळे दगावलेल्यांची संख्या आता ४८८ झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील मृत्यू पाचशेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. तर बाधितांची संख्या १३ हजार ९९०वर पोहोचली आहे. ही जिल्हाधिकारी कार्यालयाची रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी आहे.

नागपूर जिल्ह्यात करोनाच्या विषाणूचा निर्दयी खेळाने मेयो रुग्णालयात दोन दिवंसात मेडिकल-मेडिकलमध्ये ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले आहे. ऑगस्ट महिन्यात १६ दिवसांत ३३९ मृत्यूंची नोंद झाली.

नागपुरात ३० जूनपर्यंत करोना नियंत्रणात होता. अवघे १,५०३ बाधित होते. मात्र पुढील पंचेचाळीस दिवसांमध्ये नागूपर करोनाचे हॉस्टस्पॉट बनले असून, १४ हजारांपर्यंत करोनाचा आकडा फुगला आहे. १५ ऑगस्ट रोजी नागपुरात ७३३, तर १६ ऑगस्ट रोजी ५१२ बाधितांची भर पडली. करोनाबाधेने दगावलेल्या रुग्णांना प्रामुख्याने फुप्फुसांत संसर्ग झाल्याने श्वसनाचा त्रास झाला. याशिवाय विविध व्याधी असल्याने अनेक अवयव निकामी होत गेल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. मेयोतील मृतकांमध्ये महेंद्रनगर येथील ३० वर्षीय महिला, लकडगंज येथील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. नारा रोड येथील १०० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू करोनाच्या बाधेने झाला. नाईक तलाव बांगलादेश येथील ८० वर्षीय वृद्ध देखील करोनामुळे दगावला. मेडिकलमध्ये जरीपटका येथील ५१ वर्षीय महिलेसह २० जणांचा मृत्यू झाला. यात आयुध निर्माणी, अंबाझरी येथील ५७ वर्षीय व्यक्ती, चंद्रपूर(मारगाव) येथील ५२वर्षीय , तर नागपूरच्या एकता कॉलनीतील ७५ वर्षीय व्यक्ती दगावली. याशिवाय अमरावती येथील मिरर स्ट्रीट येथील ६१ वर्षीय व्यक्ती, भंडारा रोड येथील २१ वर्षीय युवक, शिवाजीनगर येथील ७९ वर्षीय व्यक्ती दगावला. गोधनी येथील ४२ वर्षीय, क्वेट्टा कॉलनी येथील ४७ वर्षीय, तर रामेश्वरीतील ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.
 

नागपूर: कोव्हिड पॉझिटिव्हच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी सरकारी कोव्हिड सेंटरमधीलखाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. मनपाने शहरात सात 'कोव्हिड केअर सेंटर' सुरू करूनही तेही अपुरे आहे. दुसरीकडे जे करोनाबाधित रुग्ण पैसा देऊन उपचार घ्यायला तयार आहेत त्यांच्यासाठी सहा खासगी कोव्हिड सेंटरला मान्यता देण्यात आली. मात्र सध्या या सगळ्या रुग्णालयात रुग्णांना लुबाडण्याचा प्रकार सुरू असल्याची ओरड वाढली आहे.

ही रुग्णालये ठरलेल्या दरपत्रकानुसार शुल्क आकारत नाही, जेवणासाठीही पैसे घेतले जातात, आहाराची गुणवत्ताही नाही. जे आरोग्य विमाधारक आहेत अशांनाही सेवा दिली जात नसल्याचाही तक्रार समोर येत आहेत. करोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी आल्यास त्यांना भरती करून घेण्यास टाळले जात आहे. रुग्णाने रुग्णालय सांगेल तेवढी फी भरावी व उपचार घ्यावेत यासाठी काही ठिकाणी रुग्णांना दिवसभर बसवून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे करोना रुग्णांची चांगलीच अडचण होत आहे.

मनमानी फी वसूल करणे व नियमांचे पालन न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनातर्फे वोक्हार्ट रुग्णालय व सेव्हन स्टार रुग्णालयावर आधीच कारवाई केली आहे. तरी खासगी रुग्णालयांनी धडा घेतलेला नाही. नियमानुसार जेवढ्या खाटा करोना रुग्णांच्या उपचारासाठी आरक्षित केल्या आहेत त्यातील ८० टक्के रुग्णांकडून सरकारने ठरविलेल्या दरानुसार फी वसुली करायची आहे. उर्वरित २० टक्के खाटांवर रुग्णालय आपल्यास्तरावर शुल्क वसुली करू शकते. परंतु रुग्णालयात रुग्ण पोहचल्यानंतर बेड रिकामे नसल्याचे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात उत्तम सुविधा मिळेल याच हेतूने रुग्ण जात आहेत. परंतु रुग्णालयांचा व्यवहार या आपत्तीच्या प्रसंगात रुग्णांसाठी वेदनादायी ठरत आहे. बहुतांश रुग्णालयात नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचेही कळले आहे.

नागपूर: 'शहरातील व्यापाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्टपूर्वी करोनाची चाचणी न केल्यास दुकाने बंद करू,' या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशाला सत्ताधारी भाजपने विरोध केला आहे. आयुक्तांचा हा निर्णय तुघलकी असून, याविरुद्ध रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला आहे. असे असले तरी आयुक्तांनी काढलेल्या या आदेशाला शहरातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना 'नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स'ने मात्र पाठिंबा दिला आहे.

यासंदर्भात गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलताना महापौर जोशी म्हणाले, 'शहरातील व्यापाऱ्यांची व त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची संख्या ५ लाखांपर्यंत आहे. आता सहा दिवसांत ५० लाख चाचण्या कशा करणार? आयुक्तांनी शहरातील वातावरण खराब करू नये.'

शहरात ५० हजार व्यापारी असून, प्रत्येकाकडे सरासरी १० कर्मचारी आहेत. अर्थात १८ ऑगस्टपर्यंत ५ लाख चाचण्या कराव्या लागतील, हे शक्य आहे का? आयुक्तांचा निर्णय अव्यावहारिक नव्हे तर व्यापाऱ्यांसोबतच तुटपुंज्या पगारात घर चालविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही वेठीस धरणारा आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यांची चाचणी दुकानदाराने करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले. लॉकडाउननंतर दुकानदारांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. ते एवढे पैसे कुठून आणतील? ५ लाख चाचण्या करण्यासाठी १,९०० रुपये प्रती चाचणीप्रमाणे ९५ कोटींचा व्यवसाय होईल. आयुक्तांनी शहरात भीतीचे वातावरण निर्माण करू नये. आयुक्तांचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. व्यापाऱ्यांशी उत्तम संवादातूनही मार्ग निघू शकतो. व्यापाऱ्यांकडील एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास संपर्कातील इतरांचीही चाचणी, हे योग्य आहे. मात्र, सरसकट सर्व व्यापाऱ्यांना धमकी देण्याचा निर्णय योग्य नाही. यात कुठललेही राजकारण न करता जनतेसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा महापौरांनी दिला आहे.

नागपूर: 'गेल्या चार महिन्यांपासून करोनाने देशात थैमान घातले आहे. नागरिकांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासाळते आहे. अशा स्थितीत सरकारने नागरिकांना आर्थिक दिलासा देणे अपेक्षित असताना सगळ्याच सुविधांचे दर वाढविले जात आहेत. सरकारची धोरणे उलट्या दिशेने जात आहेत', असाल्याचा आरोप करीत नागपूर शहर सुधार समितीतर्फे (केंद्रीय ग्रामसभा) गुरुवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.

समितीच्यावतीने ई-रिक्षा रिव्हर्स गीअरमध्ये चालवून सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आला. समितीतर्फे मानेवाडा चौक ते तुकडोजी पुतळा चौक या मार्गावर योग्य दिशेने (राइट साइड) ई-रिक्षा रिव्हर्स गेअरमध्ये अर्थात उलट्या चालविण्यात आल्या. याद्वारे समितीतर्फे सरकारी धोरणांचा निषेध करण्यात आला. देशाच्या संविधानानुसार अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, पाणी व वीजपुरवठा हे मुलभूत अधिकार आहेत. त्यांची पूर्तता करणे हे स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार व केंद्र सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, सरकारतर्फे गेल्या काही काळात वीज व पाण्याचे दर वाढविण्याचे निर्णय घेण्यात आले. गेल्या चार महिन्यांपासून सर्वसाधारण व्यक्ती करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाने त्रस्त आहे. या काळात शेतकऱ्यांच्या तसेच बेरोजगारांच्या आत्महत्या वाढत आहेत. अशा काळात सरकारने दरवाढीचे धोरण अवलंबिणे चुकीचे आहे. या उलट्या धोरणाचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येत असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले

सोमाजी शंभरकर, साईराम महाराज, बाळू मांडवकर, शिवा तायवाडे, नीलेश राऊत यांच्यासह अनेकांचा या आंदोलनात सहभाग होता.

असहकार पुकारा!
वीज, पाणी बिल, कर, शिक्षणशुल्क इत्यादी सरकारी शुल्क न भरता असहकार करण्याची घोषणा यावेळी आंदोलनातून करण्यात आली. या सगळ्या सुविधा सरकारने नि:शुल्क पुरवाव्यात अशी मागणी यावेळी समितीचे अध्यक्ष प्रवीण राऊत यांनी केली.

 

नागपूर: गेल्या काही दिवसांत शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातही अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाशिवाय कुणीही मुख्यालय किंवा झोन कार्यालयात येऊ नये, असे आवाहन नागरिकांना केले आहे.

महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालय व झोनमध्ये दररोज विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. मुख्यालय व झोनमध्ये अधिकारी व कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. विविध भागांतील नागरिकांच्या येण्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेचा स्वच्छता विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन आदी विभागांद्वारा नागरिकांना अत्यावश्यक सेवा दिल्या जातात. मुख्यालयात किंवा झोन कार्यालयात जर संसर्ग वाढला तर या सेवा प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे होऊ नये, यासाठी सर्व संबंधित अधिकारी किवा कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती लक्षात घेता, मुंढे यांनी महानगरपालिकेच्या मुख्यालय तसेच झोन कार्यालयांमध्ये नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय येण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांना मनपाच्या कोणत्याही अत्यावश्यक कामाविषयी तक्रार असल्यास ते मनपाच्या 'नागपूर लाइव्ह सिटी' मोबाइल ॲपवर तक्रार नोंदवू शकतात. या ॲपद्वारे नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याबाबत मनपा प्रयत्नशील असून, त्यासाठी नागरिकांना मनपामध्ये येण्याची कोणतीही आवश्यकता राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोव्हिड-१९ संबंधी तक्रार असल्यास महापालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२१, २५५१८६६ तसेच पाणीपुरवठा व चोकेजसंबंधी तक्रारी असल्यास ०७१२-२५६५५०९ वर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात येत आहे.

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर आकारणीसंदर्भातील पद्धतीमध्ये केलेल्या बदलांचे करदाते, व्यापारी संघटना, चार्टर्ड अकाउंटंट यांनी स्वागत केले आहे. प्रामाणिक करदात्यांसाठी कर जमा करण्याची पद्धत अधिक सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने झालेली पारदर्शी करआकारणी क्रांतिकारी पाऊल आहे. आता याचप्रमाणे कर लोकपाल आणण्यात यावा, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

नवीन करप्रणाली ही फेसलेस असणार आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने देशातील कोणत्याही शहरातील कोणतेही काम कुठल्याही फेसलेस टीमला देण्यात येणार आहे. याबाबत सांगताना करदात्यांची संघटना असलेल्या विदर्भ टॅक्सपेअर्स असोसिएशनचे (व्हीटीए) अध्यक्ष श्रवणकुमार मालू म्हणाले,'मोदी सरकारने पारदर्शी कराधान-इमानदारका सम्मान' ही घोषणा केली आहे. त्यामुळे करव्यवस्थेत मोठे बदल अपेक्षित आहेत. व्हीटीएने सिटीझन चार्टरसाठी लढा दिला आहे. फेसलस यंत्रणेमुळे टॅक्स रिफंड लवकर मिळणार आहे.'

नागपूर रेसिडेन्शिअल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले,'प्रामाणिक करदात्यांच्या हिताचा हा निर्णय आहे. टॅक्सपेअर चार्टरमुळे अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.'

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव रामअवतार तोतला म्हणाले,'करदात्यांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सरकारने योजना तयार करण्याची गरज आहे. घोषणा केलेल्या बाबींच्या अंमलबजावणीची समीक्षा करणारी यंत्रणा असायला हवी.' सीए जुल्फेश शहा यांनी फेसलेस अॅसेसमेंट हा साहसी निर्णय असल्याचे सांगत करव्यवस्था पारदर्शक होणार असल्याचे नमूद केले. सीए अभिजित केळकर यांनी प्रामाणिक करदात्यांना सरकारने भेट दिल्याची भावना व्यक्त केली.

 

नागपूर: संपूर्ण राज्यभरात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. सर्वत्र रेमडिविसीरसह अन्य करोनामारक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर औषधांचा तुटवडा का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केंद्र आणि राज्य सरकारला केला आहे. याबाबत आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश देण्यात आला.

जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. रवी देशपांडे आणि न्या. नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान औषधांच्या तुटवड्याचा मुद्दा मांडण्यात आला. वेळेवर करोनामारक औषधे न मिळाल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील सुनील मिश्रा तसेच हायकोर्टात वकिली करणारे अ‍ॅड. शशिकांत बोरकर यांचा मृत्यू झाला. सरकारी रुग्णालयांमध्ये गुणवत्ताहीन उपचार सुरू आहेत. करोना रुग्णांकरिता दर्जेदार सुविधायुक्त वॉर्ड नाहीत. दुर्बल घटकातील रुग्णांना मिळेल तसे उपचार घ्यावे लागत आहेत. ते खासगी रुग्णालयात जाऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे सरकारनेच गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हा उपचारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी तसेच, करोना रुग्णांवर भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर केलेल्या कारवाईचा अहवाल आणि विदर्भात उपलब्ध असलेल्या करोनामारक औषधांच्या साठ्याची माहिती न्यायालयात सादर करण्यात यावी, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन, महानगरपालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च, मेडिकलचे अधिष्ठाता, मेयोचे अधिष्ठाता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

नागपूर:लॉकडाउनमुळे नागरिकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या स्थितीत आयुक्तांनी पाणी दरवाढीला मान्यता देणे चुकीचे आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत नागपूर महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपने गुरुवारी आंदोलन केले. आयुक्तांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन करण्याची ही पहिलीच घटना असल्याची चर्चा महापालिकेत होती.

पाणी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने परतावून लावल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी, 'नियमानुसारच ही दरवाढ असून स्थायी समितीला परतावून लावण्याचे अधिकार नाही,'असे स्पष्ट केले होते, तर महापौर संदीप जोशी यांनीही 'ही दरवाढ मागे घेण्यासाठी राज्य सरकारला विनंती करावी,' असे पत्र आयुक्तांना पाठवले होते. शहरातील नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे दरवर्षी करण्यात येणारी पाणी करवाढ यंदा करू नये, या मागणीसाठी आता आयुक्तांविरोधात सत्ताधाऱ्यांनी संघर्षाची भूमिका घेतली. महापालिकेच्या २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभागृहात याबाबत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना महापौर संदीप जोशी यांनी काल, बुधवारी प्रशासनाला केल्या. मात्र, आयुक्तांच्या कक्षापुढे आंदोलन केल्यानंतर आता येणाऱ्या दिवसांत आयुक्त व सत्ताधारी यांच्यातील वाद आता पाण्यावरून पेटण्याचे संकेत मिळाले आहेत. करोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीत आहेत, त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. वीज कंपनीने तिपटीने वाढवून बिल पाठविले. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कंबरडे मोडले आहे. दरवर्षी ५ टक्के दरवाढीचा निर्णय झाला असला तरी या काळात ती करू नये, या मागणीसाठी महापालिकेच्या सिव्हिल लाइन्स येथील आयुक्तांच्या कक्षापुढे जवळपास ७० नगरसेवकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे फलक झळकावत काहींनी घोषणाबाजीही केली. आंदोलनात परिवहन समिती सभापती बाल्या बोरकर, विधी सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक डॉ. छोटू भोयर, सभापती अभय गोटेकर, नगरसेविका वर्षा ठाकरे, प्रगती पाटील, दिव्या धुरडे आदी उपस्थित होते.

नागपूर : नागपुरात दुकानदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे (Corona test Compulsory for Shop owner in Nagpur). दुकानातील कर्मचाऱ्यांनाही कोरोना चाचणी करावी लागणार आहे, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. 18 ऑगस्टपर्यंत कोरोना चाचणी करण्याची मुदत देण्यात आली आहे (Corona test Compulsory for Shop owner in Nagpur).

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णांचा आकडा 11 हजारच्या उंबरठ्यावर आहे. तर कोरोना बळींची संख्या 400 पार गेल्यानं सर्वांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी शहरातील सर्व दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. 

येत्या 18 ऑगस्टपर्यंत दुकानदारांनी आपली कोरोना चाचणी करुन चाचणीचं प्रमाणपत्र दुकानात ठेवायचं आहे. ज्या दुकानादराकडे कोरोना चाचणीचं प्रमाणपत्र दिसलं नाही, त्यांच्यावर नागपूर महानगरपालिका कारवाई करणार आहे.

नागपूर शहरात साधारण 30 हजार दुकानं आहेत. 70 ते 80 हजार दुकानदार आणि कर्मचाऱ्यांची संख्या आहे. या सर्वांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सनेही दुकानदारांना कोरोना चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

नागपूरः राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरु झाल्याच पाहिजे या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण राज्यात डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. प्रकाश आंबेडकर यांनी नागपुर येथे स्वतः डफली वाजवत आंदोलनाचे नेतृत्व केलं.

'महाराष्ट्र राज्य हे एकेकाळी देशाला दिशा दाखवणारे राज्य होते पण आता हे दुसऱ्यांचेआदेश पाळणारे राज्य बनले आहे, सरकार खासगी वाहतूकीला परवानगी देतेय, तेव्हा खासगी वाहतूकीतील कर्मचाऱ्यांना करोना होत नाही. मग सरकारी वाहतूक सेवेतील लोकांनाच करोना कसा होणार? हे शासनानं सांगावं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच, आजचं आंदोलन हे फक्त इशारा देण्यासाठी आहे, जनजीवन सुरळीत केलं नाही तर १५ ऑगस्टनंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन करू,' असा इशारा सुध्दा यावेळी त्यांनी दिला आहे. '६००-७०० भाडे असावे तेथे खासगी ट्रॅव्हल्स चार ते पाच हजार रुपये आकारतात. ही लुट सरकार करवित आहे. सार्वजनिक वाहतुकीमुळे प्रवाशांची लुट होण्याऐवजी सोय झाली असती.' असंही ते म्हणाले.

'लॉकडाउनला चार महिने झाले. प्रत्येक वेळी स्थिती सामान्य करण्याचे आश्वासन केंद्र व राज्य सरकार देत आहे. राज्यकर्त्यांच्या घोषणांमुळे नव्याने सुरुवात करण्याच्या आशेत वंचित समूह आहे. मात्र त्या दिशेने कुठलेही ठोस पावले उचलली नाही. दुकानांवरील बंदी उठवावी, जनजीवन सुरळीत करावे. सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकारने नियम तयार करावे, जनतेला ते मान्य राहतील,' असंही ते म्हणाले

नागपूर: कारवाई न करण्यासाठी नागपूर येथील बजाजनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस शिपाई प्रफुल्ल पवार याच्याविरुद्ध लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे बजाजनगर पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणात लाचखोरांची संख्या वाढण्याची शक्यता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वर्तविली आहे.

तक्रारदार याने बजाजनगरमधील एका अवैध सावकाराकडे १२ हजार रुपयांमध्ये मोटरसायकल गहाण ठेवली होती. तक्रारदाराने सावकाराला व्याजासह पूर्ण रक्कम परत केली. मात्र सावकार त्याला मोटरसायकल परत करीत नव्हता. त्यामुळे तक्रारदाराने सावकाराकडे ठेवलेली स्वत:ची मोटरसायकल घरी आणली. त्यानंतर सावकाराने बजाजनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संर्पक साधला आणि तक्रारदाराविरुद्धच तक्रार दिली. पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकाऱ्याचा विश्वासू असलेल्या प्रफुल्ल याने तक्रारदाराला पोलीस स्टेशनमध्ये बोलाविले. ‘तुझी चोरांची टोळी आहे. तू मोटरसायकल चोरी करतो, तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करेन’,अशी धमकी तक्रारदाराल देण्यात आली. त्याचवेळी गुन्हा दाखल न करण्यासाठी प्रफुल्ल याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने पडताळणी सुरू केली. त्यातून प्रफुल्ल याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

एसीबीच्या पथकाने प्रफुल्ल याला रंगेहात अटक करण्यासाठी बुधवारी सापळा रचला. तक्रारदार पोलीस स्टेशनमध्ये गेला. चार तास तो पोलीस स्टेशनमध्ये होता. मात्र एसीबीने सापळा रचल्याची कुणकूण लागल्याने प्रफुल्ल पोलीस स्टेशनमध्ये आला नाही. त्यामुळे त्याला रंगेहात पकडता आले नाही. याप्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आहे. त्याच्या सांगण्यावरूनच प्रफुल्ल याने ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई होण्याचे संकेत मिळाले आहेत. रात्री उशिरापर्यंत प्रफुल्ल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नागपूरः रूग्णांकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम लाटणाऱ्या जगनाडे चौकातील सेव्हन स्टार रूग्णालयास मनपाने दणका दिला आहे. या रूग्णालयातील तब्बल ६८७ नॉन कोव्हीड रूग्णांकडूनही अधिकचा शुल्क आकारल्याचे उघडकीस आले आहे. शिवाय, पाच करोनामुक्त झालेल्या रूग्णांकडूनही अधिकची रक्कम वसूल केल्याचे आढळले आहे. दोन दिवसात या रूग्णांकडून आकारलेले अतिरीक्त् शुल्क परत करून, स्पष्टीकरण द्यावे अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने करोना काळात खासगी रूग्णालयात कोव्हीड व्यतिरीक्त इतरही रूग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे दरपत्रक ठरविले आहे. करोनाबाधीत रूग्णांकडूनही आकारले जाणारे शुल्क निर्धारीत केले आहे. मनपाने खासगी रूग्णालयावर कारवाईसाठी नेमलेल्या विशेष पथकाने आकस्मिक पाहणी केली असता मोठा घोळ आढळला. रूग्णालयात उपचारार्थ असलेल्या ९९१ रूग्णांपैकी ३०४ रूग्णांची माहितीच दिली नाही. शिवाय, ६८७ रूग्णांना दिलेले बील समितीला उपलब्ध करून दिले नाही. २१ जुलै रोजी शासनाने यासंदर्भात काढलेल्या परिपत्रकाचे हे सरळसरळ उल्लंघन आहे. समितीच्या तपासणीत पाच करोनाबाधीत रूग्णांकडूनही काही शुल्क अतिरीक्त आकारण्यात आल्याचे समितीला आढळले. सेव्हन स्टार रूग्णालय व्यवस्थापनाने रूग्णांवर उपचार व त्यांच्याकडून आकारल्या गेलेल्या शुल्काची माहितीही दडवून ठेवली. त्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा,२०११,मुंबई नर्सीग होम कायदा, २००६ आणि द बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा,१९५० या कायद्याचे उल्लंघन असल्याने आपणाविरूध्द कारवाई का करू नये, अशी नोटीस आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजावली. दोन दिवसात तपासणी पथकाने दिलेल्या १७ मुद्यांवर आधारीत सुस्पष्ट स्पष्टीकरणासह रूग्णांकडून अतिरीक्त आकारण्यात आलेले शुल्क परत केल्याचे देयक व अहवाल सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

नागपूर: प्रांरभी केवळ शहरी भागापुरताच मर्यादित असलेल्या करोना संसर्गाने आता ग्रामीण भागातही थैमान घालणे सुरू केले आहे. कामठी तालुक्यात तर करोनाचा उद्रेक झाला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक १०५१ रुग्ण याच भागातील आहेत. रुग्णालये आणि वैद्यकीय सुविधा अपुरी पडत असल्याने आता रुग्णांना गृह विलगीकरणातच ठेवले जात आहे. आता या रुग्णांना घरीच पल्स ऑक्सिमीटरसुद्धा पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे दीड हजार पल्स ऑक्सिमीटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. ( Coronavirus In Nagpur )

कामठी तालुक्यातील करोना संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यावर प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याबाबत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे म्हणाले, ‘काही रुग्णांवर आता घरीच उपचार होणार आहेत. त्यामुळे आम्ही रुग्णांनाच पल्स ऑक्सिमीटर देण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी दीड हजार पल्स ऑक्सिमीटर विकत घेतले जातील आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दिले जातील. याद्वारे त्यांच्या प्रकृतीच्या अंदाज घेणे सोपे जाईल. रुग्ण बरा झाल्यानंतर हे पल्स ऑक्सिमीटर त्याच्याकडून परत घेतले जाईल.’ तसेच कामठी तालुक्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत ठाकरे म्हणाले, ‘मुळात कामठी परिसरातील रुग्णांमध्ये आजार लपविण्याची प्रवृत्ती आहे. तसेच आजाराबाबत असलेल्या विविध भ्रामक कल्पनाही अधिक आहेत. येथील नागरिकांचे भ्रम दूर करण्यासाठी आम्हाला विविध उपाययोजना कराव्या लागल्या. येथे मी स्वत:, जिल्हा परिषदेचे आणि कामठी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत रस्त्यांवर उतरून जनजागृतीचा प्रयत्न करीत आहोत. तेथील नगरसेवकांचीही यात महत्त्वाची भूमिका असून त्यांच्याद्वारेसुद्धा जनजागृती केली आहे. आम्ही नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना व्हिडिओज तयार करण्याचे आवाहन केले आणि हे व्हिडीओज व्हायरल करण्यात आले. याद्वारे या परिसरात अधिकाधिक जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच प्रशासकीय स्तरावर अनेक उपाय करण्यात आले आहेत.

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या सिव्हिल लाइन्समधील रामगिरी बंगल्यावर लांब साप आढळून आल्याने खळबळ उडाली.

रामगिरी परिसरातच वायरलेस कक्ष आहे. तेथे सकाळी या कक्षात पोलिसांच्या बंदुकीला साप गुंडाळून असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून देण्यात आली. साप असल्यामुळे कोणाची त्या खोलीकडे जाण्याची हिंमत होत नव्हती. त्यामुळे सर्पमित्र शुभम पराळे यांना तातडीने तेथे बोलाविण्यात आले. त्यांनी पाहिले असता धामण जातीचा हा काळा साप पोलिसांच्या बंदुकीला गुंडाळून होता. शुभमने हा साप पकडून वन विभागाच्या स्वाधीन केला. त्यानंतर रामगिरीवरील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

नागपूर: अश्लील चित्रफित व्हायरल करून युवकाने ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी पांडुरंग हरीशचंद्र पारगावे (रा. लातुर) याच्याविरुद्ध अत्याचार व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला भंडारा येथील रहिवासी आहे. २०१५मध्ये तिचे पांडुरंग याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोघांचे शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पांडुरंगने त्याची मोबाइलने चित्रफित काढली. महिलेचे लग्न झाले. तिचा मुलगा हा लातूर येथे राहायला लागला. याबाबत पांडुरंगला कळले. त्याने महिलेच्या मोबाइलवर व्हिडिओ कॉल केला. मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. शारीरिक संबंधाची चित्रफित व्हायरल करण्याची धमकी दिली. पांडुरंगने महिलेला रामटेकला बोलाविले. येथील हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेला सतत ब्लॅकमेल करायला लागला. याचदरम्यान पांडुरंग याने पीडित महिलेच्या नातेवाइकांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यावर अश्लील चित्रफित पोस्ट केली. महिलेला याबाबत कळले. तिने पतीसह रामटेक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पांडुरंग याचा शोध सुरू केला आहे.

नागपूर: ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा मतदारसंघ असलेल्या उत्तर नागपुरातील लीलाधर गायधने यांनी महावितरणने पाठविलेल्या भरमसाठ बिलाचा धसका घेऊन आत्महत्या केल्याच्या आरोपाने एकच खळबळ उडाली. विद्युत मंडळावर आरोप होत असतानाच, गायधने यांनी गेले वर्षेभर वीजबिलच भरले नव्हते, अशी माहिती महावितरणने पुढे केली आहे.

महावितरणने जून महिन्यात वीजग्राहकांना सरासरी बिल पाठवल्याने वीजग्राहकांना मोठ्या रकमेची बिले आली. यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम व असंतोष होता. यावरून आंदोलने झाली. रविवारी गायधने यांनी आत्महत्या केली. विजेचे भरमसाठ बिल आल्याचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या आप्तजनांनी केला होता. त्यामुळे वातावरण ढवळून निघाले. वीजकंपनीवर टीकेची झोड उठली. दरम्यान, महावितरणने मात्र आत्महत्या आणि वीजबिलाचा संबंध फेटाळून लावला. त्यांच्या मते, गायधने यांना जून महिन्यात प्रत्यक्ष मीटर रीडिंगनुसार फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या पाच महिन्यांचे एकत्रित १ हजार ५१५ युनिट वापराचे १३ हजार २९४ रुपयांचे वीजबिल देण्यात आले. दरम्यान, गायधने यांच्याकडे जून २०१९ ते जानेवारी २०२० अशी आठ महिन्यांची मागील थकबाकी रुपये २३ हजार ७४६ होती. तसेच वीजबिलाची थकबाकी आणि मागील वर्षाची थकबाकी मिळून एकूण ३७ हजार ०४० रुपयांचे देयक देण्यात आले. यात जुलैच्या देयकानुसार ३०८ युनिट वीजवापरासाठी २,९६९ इतकी रक्कम आहे व मागील थकबाकी ३७,०४० रुपयांसह देयक ४० हजार ०१० रुपयांचे आहे. लॉकडाउनच्या काळातील वीजबिल मोठ्या रकमेचे असल्याने वीजग्राहकांना ते सुलभ हप्ते पाडून भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, गायधने यांनी त्याचा लाभ घेतला नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.

 

नागपूर: आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करोना काळात केलेली पाणी दरवाढ वर्षभर पुढे ढकलण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा, आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांवर पुन्हा बोझा वाढेल. तीन दिवसात यावर निर्णय न झाल्यास १३ ऑगस्टपासून आयुक्तांच्या कक्षासमोर भाजपचे सर्व १०८ नगरसेवक आंदोलन करतील असा इशारा देत सत्तापक्षाने दिला आहे.

सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी हा इशारा दिला आहे. पाणी शुल्क वाढ करण्यात येऊ नये यासाठी महापौर संदीप जोशी यांनीही भूमिका घेतली. आयुक्तांना सूचना केली. मात्र आयुक्तांनी त्याचीही दखल घेतली नाही. प्रशासनाने स्थायी समितीकडे पाठविलेला प्रस्ताव स्थायी समितीने परत पाठविला. मात्र त्यावरही आयुक्तांनी उलट उत्तर दिले. हा प्रस्ताव केवळ नोंदीसाठी पाठविला होता. तो मंजूर करावा अथवा नाही याचा स्थायी समितीला अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या करोना महामारीचा काळ सुरू आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. जे नोकरीत आहे त्यांना पूर्ण पगार मिळत नाही. त्यांची नोकरी कधी जाईल, याचा नेम नाही. नोकरी गेल्यावर पुन्हा नवी नोकरी कधी मिळेल, सांगता येत नाही. वीज कंपनीने तिपटीने वाढवून बिल पाठविले. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने सतत ३ महिने बंद होते. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि गरिबांचे कंबरडे मोडले आहे. त्यात पुन्हा पाणीशुल्क वाढीचा निर्णय हा जनतेला आर्थिक दरीत ढकलणारा राहील. दरवर्षी १० टक्के दरवाढ करावी, असा निर्णय झाला असला तरी या काळात ती करू नये. पाच टक्के दरवाढीने मनपाला खूप आर्थिक लाभ होईल, असेही नाही. त्यामुळे तूर्तास ही दरवाढ न करता काही काळाने करावी, अशी भूमिका जाधव यांनी मांडली आहे.

नागपूर: कामठी तालुक्यातील रुग्णसंख्या आता हजारावर गेली आहे. रुग्णसंख्येतील ही वाढ प्रशासनाची धडकी वाढविणारी आहे. शहर व ग्रामीण भागातील सर्वाधिक रुग्णसंख्या या भागातील आहे. सुरुवातीला शहरातील सर्वाधिक करोनाग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतरंजीपुरा आणि गांधीबाग या झोनचेही विक्रम या तालुक्याने मोडित काढलेत.

सोमवारी कामठी तालुक्याची रुग्णसंख्या १०५१ वर तर मृत्यूसंख्या ३४ वर पोहोचली. यातील ७६८ रुग्ण हे एकट्या कामठी शहरातील आहेत. ग्रामीण भागातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतीयांश रुग्ण आणि कन्टेनमेंट झोन हे एकट्या कामठी तालुक्यातील आहेत. याखेरीज शहरालगत असलेल्या तालुक्यांना सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येते. यात हिंगणा, कामठी, काटोल आणि नागपूर ग्रामीण या तालुक्यांचा समावेश आहे. मात्र, शहरापासून तुलनेने दूर असलेल्या भिवापूर तालुक्यात सगळ्यात कमी केवळ ८ रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सर्वाधिक
मनपाच्या आकेडवारीनुसार ६ ऑगस्टपर्यंत शहरातील सर्वाधिक रुग्णसंख्या ही सतरंजीपुरा झोनमध्ये होती. या झोनमध्ये आत्तापर्यंत ८०० तर त्याखालोखाल गांधीबाग झोनमध्ये ७८४ रुग्ण आढळून आलेत. यातील गांधीबाग झोनमध्ये ३२ तर सतरंजीपुरा झोनमध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. कामठी तालुक्यात ६ ऑगस्टपर्यंत ९०६ रुग्णांची नोंद करण्यात आली होती तर त्यातील २५ जणांचा मृत्यू झाला होता

नागपूर: विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्याची मोबाइलद्वारे चित्रफीत काढली व साथीदाराच्या मदतीने ती व्हायरल केली. या चित्रफितीमुळे संपूर्ण कळमेश्वरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलिसांनी विनयभंग व माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ३६वर्षीय विधवा महिलेच्या प्रियकराला अटक केली.

संदेश ऊर्फ पिंटू रमेश मेश्राम (२४, वाढोना) असे अटकेतील प्रियकराचे तर बालू गदाईत (रा. कळमेश्वर) असे पसार साथीदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदेश हा शेती करतो. त्याचे कळमेश्वरमधील विधवेशी प्रेमसंबंध आहेत. लग्नाचे आमिष दाखवून त्याने महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मोबाइलद्वारे याचे चित्रीकरण केले. काही दिवसांपूर्वी संदेशने ही चित्रफीत बालूच्या मोबाइलवर पाठविली. बालूने ती 'खेमारी' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केली. त्यानंतर ती संपूर्ण गावात व्हायरल झाली. महिलेच्या भावाला याबाबत कळले. त्याने कळमेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

विधवेचे पलायन
सात ऑगस्टला संदेशसोबतच्या शारीरिक संबंधाची चित्रफीत व्हायरल झाली. महिलेला माहिती मिळाली. तिनेही ती बघितली. नातेवाइकांनी तिला रागावले. स्वत:सह नातेवाइकांचीही बदनामी झाली. याचा परिणाम तिच्या मनावर झाला. त्यामुळे महिलेने ७ ऑगस्टलाच घरून पलायन केले. पोलिस महिलेचा शोध घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला वरुणराजा शनिवारी विदर्भात सर्वदूर बरसला. पूर्व भागात पावसाचा जोर अधिक असल्याने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली. देवरी, कोसमतोंडी, साकोली परिसरातील वाहतूक प्रभावित झाली. गडचिरोलीत नदी, नाल्यांचा जलस्तर वाढला. चंद्रपुरात सायंकाळी दमदार बरसल्याने खरेदीनिमित्ताने बाहेर पडलेल्यांची अडचण झाली. नागपूर, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप होती. अकोल्यात तीन दिवसांपासून पाऊस बेपत्ताच आहे.

मान्सून वेळेवर दाखल झाल्यानंतर पावसाची पुढची वाटचाल सुरळीत होणार असल्याचा विश्वास व्यक्त झाला. शेतकऱ्यांनी पेरणीही वेळेत आटोपली. नंतर दडी मारून बसलेल्या पावसाने चिंता वाढविली. पूर्व विदर्भातील चारही जिल्ह्यांतील रोवणीची कामे खोळंबली. कापूस आणि सोयाबीनला फारसा फटका बसला नसला तरी अधिक काळ पावसाची ओढ चिंता वाढविणारी ठरली होती. शुक्रवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. शनिवारी सकाळी जोर वाढल्याने नदी, नाल्यांचा जलस्तर वाढला. भंडारा जिल्ह्यात वैनगंगेची पाणीपातळी वाढल्याने धरणाचे ११ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. साकोली शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले. राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती. एमबी पटेल कॉलेज रोड पाण्यात गडप झाला होता. अनेक सखल भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली होती. साकोली-तुमसर राज्य महामार्गावर चांदोरी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्याने दोन तास वाहतूक खोळंबली होती.

 

नागपूर: कोव्हिड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यात सध्या साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला आहे. त्यानुसार सर्वच सरकारी आरोग्य संस्थांमधील मनुष्यबळाची मदत कोव्हिड विरोधातील लढ्यात घेतली जात आहे. त्याला शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयदेखील अपवाद नाही. येथील २० परिचारिकांची कोव्हिडशी संबंधित विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सलग सेवा दिल्यावर मध्ये अवकाश देत मग आळीपाळीने सेवा लावण्याकडे कुणाचेही लक्ष नाही. एकाही परिचारिकेची करोना तपासणीदेखील करण्यात आलेली नाही. परिणामी या परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले आहे.

यासंदर्भात परिचारिकांनी थेट मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे दाद मागितली आहे. उपराजधानीत करोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने आयुर्वेद महाविद्याालयातील १० परिचारिकांना व्हीएनआयटी आणि १० परिचारिकांना शालिनीताई मेघे कोव्हिड केअर सेंटरमध्ये प्रतिनियुक्ती दिली आहे. तेव्हापासून तेथे दुसऱ्या परिचारिकाच उपलब्ध केल्या जात नाहीत. त्यातच काही परिचारिकांनी दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुटी घेतली असता त्यांचे वेतन कापण्याची धमकी दिली जात आहे. सतत करोनाग्रस्तांना सेवा देत असतानाही या परिचारिकांची करोना चाचणी करण्यात आलेली नाही. याबाबत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे तक्रारही करून झाली. मात्र त्याला केराची टोपली दाखविली जात आहे.

नागपूर: गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २३ करोनाबाधितांचा मृत्यू ओढवल्याने दगावणाऱ्यांची संख्या आता ३१५पर्यंत गेली आहे. तर आणखी ३७४ जण पॉझिटिव्ह आढळले. बाधितांची आतापर्यंतची संख्याही ९ हजारांच्या उंबरठ्यावर म्हणजेच ८ हजार ७८०पर्यंत येऊन धडकली आहे. या घडामोडीत रविवारी १४६ बाधित आजारमुक्त होऊन घरी परतले. चिंताजनक बाब म्हणजे, करोनामुक्तीचा टक्का पुन्हा दीड टक्क्याने घसरत ५३. ४३वर आला आहे.

करोनाची बाधा झाल्यानंतर उपचारादरम्यान रविवारी दगावलेल्यांपैकी तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत. करोनाची लक्षणे आढळल्यानंतर जिल्ह्यात २,३२५ जणांच्या घशातील स्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यापैकी करोनाची नव्याने बाधा झालेल्यांमध्ये ३२४ जण एकट्या संत्रानगरीतील आहेत. तर उर्वरित ५० ग्रामीण भागातून पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत करोनाची बाधा झालेले ३,७७३ सक्रिय रुग्ण विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी शहरातील १,६७७ तर ग्रामीण भागातील ५६३ जणांचा समावेश आहे. करोनाचा विळखा पडल्याचे निदान झालेल्यांपैकी रविवारी अँटिजन रॅपिड टेस्टमधून सर्वाधिक २५१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याखेरीज मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६०, खासगीतून ४५ तर एम्समधून १४ जणांच्या घशातील स्राव नमुन्यांमध्ये करोना विषाणूचा अंश आढळला. रविवारी निदान झालेल्या करोनाबाधितांपैकी आसीनगर झोनमधील ५४ , लक्ष्मीनगर झोनमधील ४७, हनुमाननगर झोनधील २४ तर गांधीबाग झोनमधील २३ जणांचा समावेश आहे.

मेयोत उपचार घेत असलेल्या ११ जणांचा रविवारी मृत्यू झाला. रविवारी दगावलेल्या बाधितांमध्ये टेका परिसरातल्या हमीदनगरातील ५६वर्षीय, जरीपटकाच्या सुगतनगरातील ७२वर्षीय, नारीतील म्हाडा कॉलनीतील ४२वर्षीय, टिमकीजवळच्या संभाजी चौकातील ५८वर्षीय महिलांसह गोरेवाड्यातील संगमनगरातील ७०वर्षीय, लकडगंज पोलिस चौकीजवळील ५४वर्षीय, कामठीतील ७५वर्षीय, टेलिफोन एक्स्चेंज चौकातील ५०वर्षीय, वाडीच्या विकासनगरातील ८०वर्षीय, पिवळी नदी परिसरातल्या यशोधरानगरातील ७२वर्षीय, अकोल्यातील जवाहरनगरातील ४७वर्षीय पुरुषांचा समावेश आहे.

 

नागपूर: कुटुंबातल्या एखाद्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल, चालताना दम लागत असेल, छातीत धडधडत असेल, घाबरल्यासारखे होत असेल तर घरातल्या व्यक्ती छोट्यातला छोटा बदल हेरू शकतात. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्याला रक्तदाब, मधुमेहासारख्या आजारांचे वा त्याचे बोट धरून येणाऱ्या हृदयरोगाचेही निदान करता येते. पण, दुर्लक्षित घटक असलेल्या मनोरुग्णांच्या बाबतीत सहसा हे घडत नाही. त्यामुळे हृदयरोगाचा झटकाही सहसा निदान होण्यापासून राहून जातो. नेमका हाच धोका लक्षात घेता, प्रादेशिक मनोरुग्णालयाने मनोरुग्णांच्या हृदयाचे इव्हॅल्युशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या माध्यमातून त्यांना भविष्यातील हृदयरोगाचे अचूक निदान करता येऊ शकणार आहे.

अतिउच्च रक्तदाब, ताण तणाव, मधुमेहात हृदयरोगाची पाळेमुळे दडलेली असतात, असे वैद्यकशास्त्र म्हणते. उच्च रक्तदाबामुळे हृदयाची स्पंदन क्षमता अशक्त होते. निरोगी माणसात अशुद्ध रक्त हृदयात जाणे आणि ते शुद्ध होऊन परत शरीराकडे जाण्यासाठी हृदयाच्या झडपाची वा रक्ताभिसरणाची क्षमता ६० असावी, असा निकष वैद्यकशास्त्रात आहे. वैद्यकीय परिभाषेत याला 'इजेक्शन फॅक्शन' म्हणतात.

मात्र अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे हृदयाची ही रक्ताभिसरणाची क्षमता कमी होते. मुख्य धमन्यांमध्ये अवरोध निर्माण होऊन, हृदयविकाराचा धोका त्यामुळेच बळावतो. अद्ययावत झालेल्या वैद्यकीयशास्त्रामुळे हा धोका वेळीच ओळखता येणे, आता शक्य झाले आहे. त्यासाठी सर्वांत आधी एखाद्याचा इको काढून हृदयात डोकावता येते. नुसते इको काढून हे ओळखणे शक्य नाही. त्यासाठी इसीजी आणि इकोत दिसलेल्या सूक्ष्म बदलांना टिपणेही महत्त्वाचे असते.

नागपूर: 'मानधन नको, वेनत द्या,' अशी मागणी करत नागपुरातील आशा वर्कर संघटनेने शुक्रवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात निदर्शने केली.

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत आशा वर्कर यांच्या संघटनेने ७ ऑगस्ट रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारून आंदोलन केले. या संपाच्या माध्यमातून आशा वर्करच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्यात आल्या. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

केंद्रीय कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांविरोधात ७ व ८ ऑगस्ट रोजी संप पुकारला आहे. ९ ऑगस्ट रोजी सर्व कमगार, शेतकरी, कष्टकरी जेलभरो आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनने (सीआयटीयू) पाठिंबा दिला असल्याचे सीआयटीयूचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले.

या मागण्या मान्य करा
आरोग्य, पोषण व शिक्षण यासारख्या मूलभूत सेवांच्या खाजगीकरणाचा प्रस्ताव मागे घ्या, आयसीडीएस, एनएचएम,(राष्ट्रीय आरोग्य अभियान)माध्यान्ह भोजन आदी केंद्रीय योजनांवरील केंद्राच्या आर्थिक तरतुदीत भरीव वाढ करून त्या कायम करा, भारतीय श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार आशा-गटप्रवर्तकसहित सर्व योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून मान्यता देऊन त्यांना २१ हजार रुपये किमान वेतन, १० हजार रुपये मासिक पेन्शन व इएसआय, पीएफ लागू करा आदी मागण्या करण्यात आल्या असल्याचे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनच्या महासचिव प्रीती मेश्राम यांनी सांगितले.

नागपूर: कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या लॉकडाउनमध्ये पथविक्रेत्यांवर (हॉकर्स) विपरीत परिणाम झाला आहे. व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली. अशात उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली 'पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी' या विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी राज्यातही करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या योजनेद्वारे हॉकर्सला १० हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. जास्तीत जास्त हॉकर्सना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी महापालिकेच्या दहाही झोन कार्यालयात विशेष मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे.ही योजना २४ मार्च २०२० व त्यापूर्वी शहरात पथविक्री करीत असलेल्या सर्व पथविक्रेत्यांना लागू राहील. विशेष म्हणजे, या पथविक्रेत्यांचे 'अ', 'ब', 'क' आणि 'ड' या चार प्रवर्गात वर्गीकरण केले आहे. या योजनेंतर्गत नागरी पथविक्रेते एक वर्षाच्या परतफेड मदतीसह १० हजार

रुपयांपर्यंतचे खेळते भांडवलकर्ज घेण्यास आणि त्यांची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. सदर कर्ज विनातारण असेल. विशेष म्हणजे, विहित कालावधीमध्ये किंवा त्यापूर्वी कर्जाची परतफेड करणारे पथविक्रेते वाढीव मर्यादेसह पुढील खेळत्या भांडवल कर्जासाठी पात्र ठरतील. व्याजदर बँकांच्या प्रचलित व्याजदराप्रमाणे तसेच रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित कालावधीत कर्जपरतफेड केल्यास ते ७ टक्के व्याज अनुदान मिळण्यास पात्र होतील. व्याज अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या कर्जखात्यात तिमाहीप्रमाणे जमा केली जाईल. सदर योजनेमध्ये डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल माध्यमातून व्यवहार करणाऱ्या विक्रेत्यांना 'कॅशबॅक'ची सुविधा त्यांच्या बचत खात्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागपूरः अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पती झोपेत असताना आधी त्याचे हातपाय पलंगाला बांधून मग त्याचे तोंड दाबून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत शुक्रवारी उघडकीस आली.
राजू हरिदास कुकुर्डे (वय ३७ रा. भीमनगर) असे या प्रकरणातील मृतकाचे नाव आहे. तर शुभांगी राजू कुकुर्डे (वय ३०) तिचा प्रियकर रुपेश दिलीप बीरहा (वय ३५, रा. उपजिल्हा रुग्णालय वसाहत कामठी) आणि रुपेशचा भाऊ हरिश्चंद्र राजेंद्र बीरहा (वय ३४ रा. बोरियापुरा कामठी) अशी आरोपींची नावे आहेत.

राजू कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात परिचारक पदावर कार्यरत होता. रुग्णालय परिसरातील सरकारी निवासगृहात तो पत्नी शुभांगी व पाच वर्षांच्या मुलीसह राहायचा. रुपेश या निवासगृहाच्या लगतच्या वस्तीत राहत असे. रुपेशही विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. शुभांगी व रुपेश यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती राजूला मिळाली. यावरून शुभांगी आणि राजू यांच्यात सातत्याने वाद होऊ लागले. रोजच्या वादानंतर या दोघांचे भेटणे सुरूच होते. गुरुवारी परत एकदा यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी शुभांगीने वाद मिटवण्याचा बनाव केला आणि झोपण्याचे नाटक केले. हे बघून राजूही झोपला.

शुभांगीने रात्री २ वाजता प्रियकर रुपेश व त्याचा चुलत भाऊ हरिश्चंद्र याला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांनी राजूचे हातपाय पलंगाला बांधले व उशीने तोंड व नाक दाबून त्याचा खून केला. राजूचे हातपाय बांधत असताना त्या झटापट केली आणि तो जोरजोरात ओरडू लागला. हा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होईपर्यंत राजूचा मृत्यू झाला होता. मात्र, तिन्ही घटनास्थळीच होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

नागपूर: कोव्हिड -१९ संसर्गाचा प्रादुर्भाव परिघ ओलांडून शहरभर पसरल्याने बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ आता फक्त प्रादुर्भावापुरतीच मर्यादित राहिलेली नसून विषाणूचा विळखा पडून दगावणाऱ्यांची संख्याही झपाट्याने विस्तारत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या उच्चांकी प्रादुर्भावात आता मृत्यूच्या रेकॉर्डचीही नोंद घेण्यात आली.

शुक्रवारी दिवसभरात ४० करोना बाधितांचा मृत्यू ओढवला. त्यातील ३६ जण हे एकट्या नागपूर शहरातील आहेत. तर प्रादुर्भाव साखळीत शहरातील २६७ आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १८९ अशा ४५६ जणांची नोंद घेतली गेली. त्यामुळे आतापर्यंत बाधित संख्या ७७४७ तर मृत्यूसंख्या २६९ वर पोचली आहे.

या सगळ्या घटनाक्रमात शुक्रवारी दिवसभरात २५२ बाधितांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. विषाणूने शिरकाव केल्यापासून शहरातील २५८१ आणि जिल्ह्यातील १७५६ करोनाबाधित आजारमुक्त झाले आहेत. करोना मुक्त होण्याचा टक्का पुन्हा ५५ टक्क्यांवर घसरला आहे.

सघ्याच्या स्थितीत ३१४१ करोना बाधित सक्रिय रुग्ण विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यातील ३६७ मेडिकलमध्ये ३०७ आमदार निवास तर २५७ मेयोत उपचार घेत आहेत. शहरात आज दिवसभरात ११६६ तर जिल्ह्यातून ८०२ नमुन्यांची तपासणी केली गेली. त्यातील ४५६ जणांच्या घशातील स्वाब नमुना अहवाल पॉझिटिव्ह आला. करोनाचा नव्याने प्रादुर्भाव झाल्याचे निदान झालेल्यांपैकी मेयोतून ८८, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ८४, मेडिकलमधून ७६, निरीतून ७५, एम्समधून ६३, खासगीतून ४५ तर माफ्सूतून २५ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोनाचा अंश सापडला.

नागपूर:वन्यजीवांचे भविष्य ठरविणाऱ्या महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळासारख्या महत्त्वपूर्ण प्राधिकारिणीच्या बैठकीला तब्बल एक वर्ष आठ महिन्यांनी मुहूर्त लाभला आहे. देशातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या राज्यात वन्यजीवांचा विचार करण्यासाठी डिसेंबर २०१८ नंतर आता वेळ मिळाला आहे.

राज्य वन्यजीव मंडळाची १५वी बैठक शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी वनमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत होणार आहे. या आधी १४वी बैठक ५ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर, आता सुमारे दीड ते पावणेदोन वर्षांनी ही बैठक होते आहे. एकीकडे वन्यजीव आणि पर्यावरण, यासारख्या विषयांवर लोकांमध्ये आणि विविधस्तरावर गांभीर्य आणि जागृती वाढत असताना प्रशासकीय यंत्रणेला मात्र बैठकीला २०१८ पासून वेळ मिळालेला नाही. या बैठकीत सहभागी होणाऱ्या सदस्यांना गुरुवारी सकाळी विषयसूची पाठविण्यात आली. काही सदस्यांना तर गुरुवारी सकाळपर्यंतदेखील विषयसूची प्राप्त झाली नव्हती. त्यामुळे, या बैठकीबाबत प्रशासन कितपत गंभीर आहे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नागपूर:वाढत्या सायबर गुन्ह्यांवर आळा घालण्यासह प्रकरणांचा तपास जलदगतीने व्हावा, यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सायबर पोलिस स्टेशनचा मार्ग गुरुवारी अखेर प्रशस्त झाला. या पोलिस स्टेशनमधील पदांनाही मंजुरी देण्यात आली असून, लवकरच सायबर सेलचे रुपांतर पोलिस स्टेशनमध्ये होणार आहे. पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश जारी केले.

सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी सध्यस्थितीत आर्थिक गुन्हेशाखेत सायबर सेल कार्यान्वित आहे. मात्र, गुन्ह्यांची वाढती संख्या व व्याप्ती लक्षात घेता सायबर पोलिस स्टेशनची मागणी करण्यात आली. तसा प्रस्तावही गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला होता. गुरुवारी या पोलिस स्टेशनचा मार्ग मोकळा झाला. या सायबर पोलिस स्टेशनवर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्ताचे नियंत्रण असणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त हे सायबर पोलिस स्टेशनचे विभागीय नियंत्रक म्हणून काम पाहतील. या सायबर पोलिस स्टेशनसाठी चार पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक, तीन पोलिस उपनिरीक्षक, तीन सहायक पोलिस उपनिरीक्षक, १२ हेडकॉन्स्टेबल, १५ नायक पोलिस, २६ पोलिस शिपाई आणि दोन वाहनचालक अशी ७४ पदे मंजूर करण्यात आली आहे.

सिव्हिल लाइन्समधील प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या सायबर सेलमधूनच सध्या कारभार चालणार आहे. लवकरच पूर्ण स्वरुपात या ठाण्याचे काम कार्यान्वित होईल. येथेच गुन्हे दाखल होणार असून, दाखल गुन्ह्यांचा तपासही याच ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी करतील.

नागपूरः सहकारी महिला कार्यकर्त्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सोहेल पटेल वय ५५ रा.जाफरनगर,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.

सोहेल हा विवाहित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८मध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात सोहेल याची विवाहित असलेल्या पीडित ४६ वर्षीय महिला कार्यकर्त्यासोबत ओळख झाली. त्यानंतर तो महिलेच्या घरी जायला लागला. जानेवारी २०१९मध्ये तो महिलेच्या घरी गेला. घरी कोणी नसल्याची संधी साधून त्याने पीडित महिलेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. बदनामीच्या भीतीने पीडित महिलेने याबाबत कोणालाही सांगितले नाही.

त्यानंतर सोहेल याने भंडारा व नागपुरातील अन्य ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. तिला लग्नाचेही आमिष दाखविले. तो वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करीत असल्याने महिलेने पाचपावली पोलिसांत तक्रार दिली. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सोहेल हा पसार असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.

नागपूर: शिवसेनेचे नेते व माजी शहर प्रमुख मंगेश विजय काशीकर (वय ४७,रा.शंकरनगर) यांच्याकडे ८० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी ही खंडणी मागण्यात आली असून काशीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी प्रॉपर्टी डीलरसह चौघांविरुद्ध खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ( Nagpur Crime ) साईनाथ मुरलीधर जाधव (वय ३३, रा. न्यू नरसाळा), ममता शकुर शेख (वय ३६,रा. आंबेडकरनगर, धरमपेठ), नलिनी राजेश बढिये (वय ४५,रा. सेवादलनगर, पांढराबोडी) व मीना किशोर हाडोळे (वय ३५, रा.सेवानगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जाधव हा प्रॉपर्टी डीलर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोकुळपेठेतील कॅनल रोडवर काशीकर व त्यांचे मित्र प्रशांत सातपुते यांचा प्लॉट आहे. लॉकडाऊन असताना फेब्रुवारी महिन्यात जाधव याने महिला साथीदारांच्या मदतीने या प्लॉटवर ताबा घेतला. याबाबत कळताच काशीकर यांनी जाधव याला प्लॉटवरील ताबा सोडण्याची विनंती केली. मात्र विनयभंगाच्या प्रकरणात अडकविण्याची धमकी जाधवच्या महिला साथीदारांनी काशीकर यांना दिली. त्यानंतर २३ जुलै रोजी काशीकर हे प्लॉटवर गेले. त्यांनी पुन्हा प्लॉटवरील ताबा सोडण्याची विनंती जाधव याला केली असता जाधव याने काशीकर यांना शिवीगाळ करून मारहाण केली व प्लॉटवरील ताबा सोडण्यासाठी ८० लाख रुपयांची खंडणी काशीकर यांच्याकडे मागितली. पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबत काशीकर यांनी अंबाझरी पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी जाधवसह चौघांविरुद्ध खंडणी व अन्य विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 

नागपूर: अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात लालकृष्ण अडवाणी यांचा केलेला उल्लेख संघ परिवारातील अनेकांना सुखावणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे नाव घ्यायला हवे होते, असा सूरदेखील उमटला.

गेल्या पाचशे वर्षांत अयोध्येतील रामजन्मभूमीसाठी अनेक संघर्ष झाले असले तरी अलीकडच्या काळातील अडवाणींच्या रथयात्रेचे योगदान या संपूर्ण आंदोलनात मोठे होते. सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेने लोकांच्या मनातील राम जागविला गेला होता. भाजपच्या लोकसभेतील संख्याबळातही या यात्रेनंतर उल्लेखनीय वाढ झाली होती. दरम्यानच्या काळात बरेच पाणी वाहून गेले. २०१४ साली केंद्रात मोदींच्या नेतृत्वात भाजपचे सरकार आले. राम मंदिराचा मुद्दा जेव्हा जेव्हा चर्चेला यायचा, त्यावेळी अडवाणींच्या त्या रथयात्रेची आठवणही व्हायची. त्यामुळेच भूमिपूजन सोहळ्यात अडवाणी उपस्थित राहतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजकेच निमंत्रित होते. अडवाणींची ही अनुपस्थिती अनेकांना खटकणारी होती. मात्र, सरसंघचालकांनी अडवाणींच्या राम मंदिरासाठीच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख करून, 'जुन्या नेत्यांना आम्ही विसरलो नाही', असा दिलेला संदेश परिवारातील अनेकांना त्यामुळेच सुखावून गेला.

नागपूर; हिंदूधर्मीयांच्या परम श्रद्धेचा विषय असलेल्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यादिनी संत्रानगरी अक्षरश: राम रंगात न्हाऊन निघाली. भगव्या पतका, जय श्रीराम लिहिलेले ध्वज, गल्लीबोळांत-चौकाचौकांत काढलेल्या आकर्षक रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी, श्रीराम पूजन, मिठाई वाटप करून अवघे वातावरण राममय करण्यात आले. 'अयोध्येसी आले दशरथकुमार। नगरीं होत आहे आनंद थोर' या शब्दांमध्ये वनवास पूर्ण करून आलेल्या रामाचे वर्णन करण्यात आले आहे. तसाच आनंद बुधवारी सर्वत्र दिसून आला. अयोध्येत झालेल्या आनंदसोहळ्याचे ऊर्जादायी, उत्साही पडसाद शहरात उमटले.

राम मंदिर भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे निश्चित झाल्यापासूनच वातावरण निर्मितीला सुरुवात झाली होती. बुधवारी घरोघरी, चौकाचौकात, सार्वजनिक स्थळी प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बऱ्याच ठिकाणी एलईडी वॉलच्या सहाय्याने अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या पूजनप्रसंगी विविध चौकांमध्ये फटाके फोडण्यात आले. दिवाळी-दसऱ्यापेक्षाही मोठा सण असल्यागत वातावरण संपूर्ण शहरात होते. 'भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम गायेगा' या लोकप्रिय गीताचे स्टेटस अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर दिसून आले. रस्त्यांवरही या गाण्यासह 'जय श्रीराम'चा नारा गुंजत होता. बहुप्रतीक्षित इच्छा, ऐतिहासिक आंदोलन पूर्णत्वास जात असल्याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर होता. पहाटेपासूनच या जल्लोषाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये रामरक्षा, हनुमान चालिसा पठण करण्यात आले. नागरिकांनी सायंकाळी घराच्या अंगणात, बाल्कनीत, टेरेसवर दिवे प्रज्वलित केले. महाआरती करून रामभक्तांनी आनंद व्यक्त केला. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आतषबाजीसह आनंदोत्सव सुरू होता.

नागपूर: पंतप्रधान आवास योजनेंतर्गत त्यांना घराची लॉटरी लागली.… नागपूर महानगर विकास प्राधिकरणाची डिमांड आल्यानंतर कर्ज मिळावे म्हणून त्यांनी बँकांकडे चकरा मारल्या…. सततच्या पाठपुराव्यानंतर बँकेने त्यांना कर्जमंजुरीचे पत्र दिले…. कर्ज मंजूर झाल्याची आनंदवार्ता घेऊन ते 'एनएमआरडीए'कडे गेले असता, 'मुदत संपली' असे कारण देत 'एनएमआरडीए'ने त्यांना अपात्र ठरविले. 'यात आमची काय चूक,' असा प्रश्न उपस्थित करत 'आम्हाला आमचे हक्काचे घर द्या,' अशी विनंती या लाभार्थ्यांनी प्रशासनापुढे केली.

गरिबांना घर मिळावे, यासाठी 'पंतप्रधान आवास योजना' सुरू करण्यात आली. मात्र, अवघ्या ८ ते १० लाखांत उपलब्ध होणारे हे स्वस्त घर मिळविण्यातही गरिबांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. लॉकडाउनच्या काळात ओढवलेले आर्थिक संकट, बँकांकडून उशिरा मंजूर होणारे कर्ज, अशा अडचणींमुळे अनेकांना लॉटरी लागूनही स्वस्त घर गमवावे लागले.

३१ ऑगस्ट रोजी २३ जणांना वाठोडा येथील घरांचा ताबा देण्यात आला. ४ ऑगस्ट रोजी आणखी २३ जणांना घरांचे वितरण करण्यात आले असले तरी इतर अनेकांना त्यांचे हक्काचे घर मिळालेच नसल्याने नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी निवडण्यात आलेल्या पाच उमेदवारांची कुलपती व राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गुरुवारी ऑनलाइन मुलाखती घेणार आहेत. त्यामुळे आता कुलगुरूपदाची प्रतीक्षा संपुष्टात येणार असून विद्यापीठाला नवे नेतृत्व मिळणार आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या कुलगुरू शोध समितीने गेल्या आठवड्यात ३० उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यातून पाच जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात नागपूर विद्यापीठाचे विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, माजी प्रभारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठातील माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, नॉर्वे येथील विद्यापीठातील डॉ. मोहन कोल्हे, मुंबईतील इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथील प्रो. सुनील भागवत यांचा समावेश आहे.

दरम्यान, कुलगुरू पदाकरिता होणाऱ्या मुलाखतीबाबत विद्यापीठ क्षेत्रात उत्सुकता निर्माण झालेली आहे. राज्यपालांकडे असलेल्या पाच पर्यांयांपैकी चार उमेदवार हे इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी या क्षेत्राशी संबंधित आहेत, तर डॉ. विनायक देशपांडे हेच केवळ वाणिज्य विद्याशाखेशी निगडीत आहेत. डॉ. देशपांडे यांनी प्रभारी कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, विद्याशाखा अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य यासारख्या विविध पदांवर गेल्या दहा वर्षांत कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे विद्यापीठातील प्रत्येक पदावर कार्य करण्याचा अनुभव आहे. तर विद्यमान प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी इंजिनीअरिंग शाखेचे अधिष्ठाता ते प्र-कुलगुरू अशा पदांवर कार्य केले आहे. दोघेही नागपूरचे असल्याने तसेच विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणींवर काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव असल्याने नागपूरकर उमेदवाराचीच निवड राज्यपालांनी करावी, अशी मागणी विद्यापीठ क्षेत्रातून होत आहे.

नागपूर: 'लॉकडाऊन 'च्या बंधनातून मुक्त झालेला नागपूर जिल्हा ज्या वेगाने पूर्वपदावर आला त्याच वेगाने करोना विषाणूचा विळखा करकचून आवळला जात आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून वेगाने सुरू असलेल्या या प्रादुर्भावाच्या साखळीने मंगळवारी पुन्हा एक नवा विक्रम नोंदविला. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३४० नव्या करोना बाधितांची भर पडली आहे. करोना विषाणूने शहरात शिरकाव केल्यापासूनचा आतापर्यंतचा हा विक्रमी प्रादुर्भाव विळखा आहे. ( Coronavirus in Nagpur ) एकीकडे ही करोना प्रादुर्भाव साखळी चिंताजनक स्थितीत वाढत असताना शहरातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या १७ बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत विषाणू बाधितांची संख्या ६४८३ वर तर मृत्यू संख्या १८९ पर्यंत धडकली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १२० बाधित करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे उपचाराने आतापर्यंत ३८७४ जण ठणठणीत बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत नागपूर शहर आणि जिल्ह्यात २४३० सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी १८०७ रुग्ण शहरातील तर ६१३ बाधित जिल्ह्यातील आहेत.

निदान चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी ७५ नमुने मेडिकल, ७१ नमुन्यांमध्ये मेयोतून कोव्हिड विषाणूचा अंश आढळला. त्या खालोखाल खासगीतून ६१, अँटिजन रॅपिड टेस्टमधून ५२, एम्समधून ३२, माफ्सूतून २४ तर निरीतून २१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या खेरीज आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्येही ग्रामीण भागातील १०५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत ज्या रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे मात्र लक्षणे नाहीत, अशांना २५ ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून घेतले जात आहे. रुग्ण बरे होण्याचा नागपूर जिल्ह्याचा दर सव्वा टक्क्याने घसरत आता ६० वर पोचला आहे.

नागपूर: न्यायालयीन आदेशानंतर शरयूतीरी अयोध्येत भव्य राममंदिर निर्मितीच्या भूमिपूजनाचा क्षण समीप येऊन ठेपला असताना उपराजधानीतील संघभूमीची प्राबल्यस्थळे उर्जेने रसरसून गेली असल्याचे चित्र आहे. पोद्दारेश्वर राममंदिरासह विविध प्रार्थनास्थळे आणि चौक आकर्षक रोषणाईने सजविण्यात आले असून झेंडे, पताका आणि फुलमाळांनी भगवे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. शहराचा कानोसा घेतला असता प्रामुख्याने कुतुहलमिश्रित प्रतिक्रिया ऐकू आली. 'प्रजाजनीं जें रचिलें स्वप्नीं, मूर्त दिसे तें स्वप्न लोचनीं…' या भावविभोर काव्याला साजेसा आनंद नागपूरकरांनी व्यक्त केला. तथापि, करोनाग्रस्त अडचणींच्या काळात मंदिराचा मुहूर्त काढल्याबद्दल काहींची किंचित नाराजी मात्र झळकलीच.

या मंगलक्षणांच्या प्रतीक्षेत नागपूरनगरीतील अनेक पिढ्या अक्षरश: खपल्या. रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाची केंद्रबिंदू असलेली अयोध्येतील वादग्रस्त वास्तू धाराशायी झाल्यानंतरचा उद्रेक नागपूरने बघितला. नेमक्या त्या क्षणांच्या जल्लोषाचीही ही नगरी साक्षीदार ठरली. रामनवमीच्या भव्य शोभायात्रेत बाबा ताजुद्दीनच्या प्रतीकांनाही अढळ स्थान देत नागपूरने सर्वधर्मसमभावाची शिकवण आजवर जनसामान्यांना दिली आहे. संघ मुख्यालयामुळे देशात नागपूर सतत चर्चेत असते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या नेतृत्वाची कमान संघपरिवाराने स्वत:कडे ओढून घेतल्यानंतर वेळोवेळच्या आंदोलनाचा शंखनाद नागपुरातून झाला. आधी विश्व हिंदू परिषद आणि नंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील सामान्यांपर्यंत सक्रियता पोचती करून रामजन्मभूमी आंदोलनाची धग जिवंत ठेवली. त्या काळात युवकांच्या आक्रमक फळीला कार्यक्रमांमधून व्यस्त ठेवण्याचे काम बजरंग दलाने केले. त्यातून समूहात प्रवाहित झालेल्या विलक्षण रामभक्तीने परंपरागत राजकीय प्रतिस्पर्ध्यांचा विरोध मावळून सोडण्याचे उदाहरणही नागपुरात दिसले.

नागपूरः खासगी रूग्णालयांना एकूण क्षमतेच्या ८० टक्के खाटा करोना रूग्णांसाठी राखीव ठेवत नेमून दिलेल्या दरशुल्कात उपचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही गांधीनगर येथील वोक्हार्ट रूग्णालयातर्फे रूग्णांकडून अधिकची ७० टक्के वसुली करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वोक्हार्ट रूग्णालय व्यवस्थापनास यासंदर्भात २४ तासांत लेखी खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे. अन्यथा, सध्याच्या काळातील विविध कायद्यांन्वये कारवाईचा इशारा दिला आहे.

राज्य शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार शहरातील खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा करोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. यासाठी दरशुल्कही निर्धारीत केला आहे. शहरातील वोक्हार्ट रूग्णालयात ४० खाटा करोना रूग्णांसाठी आरक्षीत आहे. या सर्व खाटा फुल्ल आहेत. २६ जुलै रोजी या रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांवरील उपचार व शुल्काबाबत मनपाच्या पथकाने माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

पथकाला रूग्णांकडून नमुद करून दिलेल्या सेवांव्यतिरीक्त इतर सेवा घेत नसतानाही अतिरीक्त शुल्क आकारले जात असल्याचे आढळले. शिवाय, ज्या ठिकाणी अशा रूग्णांना उपचारार्थ भरती करावयाचे आहे. त्याव्यतिरीक्त इतर खोल्यांमध्येही भरती करण्यात आले. ही बाब ४ जूनच्या नियमांचे सरळसरळ उल्लंघन असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वोक्हार्ट रूग्णालयाच्या व्यवस्थापनास साथरोग कायदा,१८९७, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५, महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा (सुधारीत)२०११, मुंबई नर्सीग हेम (सुधारीत)कायदा, २००६, बॉम्बे नसींग होम नोंदणी(सुधारीत)कायमा २००६ आणि बॉम्बे पब्लीक ट्रस्ट अॅक्ट, १९५० अंतर्गत नोटीस बजावत तातडीने खुलासा करण्याचे निदेंश देण्यात आले. अन्यथा, कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

नागपूर: महिलेचा आंघोळ करताना व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन नोकराने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोकराविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरमधील अजनी भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. चेतन खडतकर (रा. नंदनवन) असे नोकराचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अजनी भागात पीडित ४० वर्षीय महिला राहते. तिचे पती सीए असून चेतन हा त्यांच्याकडे काम करतो. घरातच कार्यालय असल्याने चेतन याचा घरात सतत वावर असायचा. याच दरम्यान तो पीडित महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. नोकर असल्याने महिला त्याकडे दुर्लक्ष करायची. ६ जुलैला महिला बाथरूममध्ये आंघोळ करत होती. याचदरम्यान चेतन याने महिलेचा मोबाइलद्वारे व्हिडिओ काढला. त्यानंतर त्याने महिलेच्या घरातीलच संगणकावर धमकीचे पत्रही तयार केले. हे पत्र पीडित महिलेला पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे महिला प्रचंड घाबरली. सुरुवातीला तिने चेतन याच्या काही मागण्या मान्य केल्या. तो महिलेशी अश्लिल चाळे करायला लागला. त्यानंतर त्याने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. महिलेने त्यास नकार दिला. त्यावर आंघोळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याने महिलेला दिली. अखेर तिने याबाबत पतीला सांगितले. पतीने महिलेसह अजनी पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चेतन याचा शोध घेण्यात येत आहे.

नागपूर: देशात नुकतेच नवे शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे त्या धोरणाशी सुसंगत योजना आखून संस्कृत भाषेचा सर्वसामान्यांपर्यंत प्रचार आणि प्रसार करण्यात यावा. संस्कृत पुन्हा एकदा जनभाषा व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाचे ऑनलाइन उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल, राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत प्रमुख अतिथी होते. तर सारस्वत अतिथी म्हणून संस्कृत संस्थानचे माजी कुलगुरू प्रो. व्ही. कुटुंबशास्त्री हजर होते तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, 'संभाषण संदेश'चे संपादक डॉ. जनार्दन हेगडे, कुलसचिव प्रो. विजयकुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.

संस्कृतचे केवळ भाषाज्ञान असणे पुरेसे नाही, तर या भाषेतील विविध शास्त्रांचेही ज्ञान आत्मसात करायला हवे. भारतीय संस्कृती ही संस्कृत मिश्रित आहे. या भाषेच्या अध्यापनाने व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.

संस्कृत ही केवळ ग्रंथीय भाषा नव्हे, तर त्यात ज्ञान, विज्ञान, योगशास्त्र, अंतराळशास्त्राचाही समावेश आहे. त्यामुळे या भाषेचा वैज्ञानिक अंगानेही अभ्यास व्हायला हवा, असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल म्हणाले.

संस्कृत ही सनातन भाषा आहे. आधुनिक ज्ञानविज्ञानाच्या प्रवाहात संस्कृतला परत आणण्याची आवश्यकता आहे. उत्तराखंड राज्याने संस्कृतला द्वितीय राजभाषेचा दर्जा दिला. त्याप्रमाणे देशातील इतर राज्यांनी संस्कृतला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रो. कुटुंबशास्त्री म्हणाले.

नागपूर: रविवारच्या मध्यरात्री पावसाने एकच धुमाकूळ घातला. नागरिक गाढ झोपेत असताना अनेक वस्त्या, घरांमध्ये पाणी शिरले. घरातील साहित्य, वस्तूंचे मोठे नुकसान झाले. अनेक वस्त्यांतील नागरिकांची रात्र घरातील पाणी काढण्यातच गेली. वस्त्यांत, घराघरांत पाणी शिरल्याने प्रशासनाचे दावे मात्र फोल ठरले.

शहराच्या सर्वच भागांतील रस्ते, नाले दुथडी भरून वाहत होते. मध्यरात्री १२ वाजेनंतर पावसाने घेतलेला वेग दोन तास कायम होता. परिणामी, मनपाच्या अग्निशमन विभागाचे फोन रात्रभर खणखणत होते. काही ठिकाणी झाडेही पडली. म्हाळगीनगर परिसरातील अनेक झोपड्यांमध्ये पाणी शिरले. या भागातील राजापेठ, शिवाजी कॉलनी, आनंदनगर, श्यामनगर, सेंट पॉल शाळेच्या परिसरात तलाव साचले. या भागात मजुरांची संख्या मोठी आहे. पाऊस जोरात असल्याने रात्रीपासून अनेकजण घरात शिरलेले पाणी काढत होते. पिपळा मार्गावरही असेच चित्र होते. संतोषीनगर, धनगवळीनगर, दुबेनगर, मेहरबाबा धाम मंदिर या भागांत रस्त्यांवर पूर आला होता. रस्त्यांवरील दुकानदारांची मोठी तारांबळ उडाली. शाहूनगर भागात गुडघाभर पाणी साचले होते. बेसा मार्गावरील दीप कमल लेआउट, बेसा-घोगली मार्गावरील नालेही दुथडी भरून वाहत होते. त्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. सावरबांधे लेआउट येथील विहीर या पावसाने तुडुंब भरली. त्याचे पाणी घरांत शिरून नागरिकांच्या घरातील धान्यही ओले झाले. पहाटे चारपासून अनेक भागांत मोठी धावपळ उडाली. सकाळ झाली तेव्हा अनेक भागांत पळापळ अनुभवायला मिळाली. याच भागातील काही रस्त्यांवर झाडेही पडली होती. अंबाझरी तलावही रात्रीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला. सध्या या तलावाची पातळी चांगली असल्याने दोन तासांच्या पावसांत तलाव ओव्हरफ्लो होत आहे. गोरेवाडाही तुडुंब भरला आहे.

नागपूर: गेल्या काही वर्षांपासून देशातीलच नाही तर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीतही नागपूरचा क्रमांक लागू लागला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तसा अनुभवही आला. मात्र यंदा पहिल्यांदाच देशातील सर्वाधिक पर्जन्यमान होणाऱ्या शहरांच्या यादीत नागपूरचा क्रमांक लागला आहे. रविवारी ३ ऑगस्ट रोजी नागपुरात देशातील चौथ्या क्रमांकाच्या पर्जन्यमानाची नोंद करण्यात आली.

गेल्या तीन दिवसांपासून शहरात दमदार सरी कोसळत आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर शहरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळी ८.३० ते सोमवारी सकाळी ८.३० या दरम्यान शहरात अतिवृष्टीची (१२ सेंटीमीटर अर्थात ११७.१ मीमी पावसाची) नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या मोसमातील ही दुसरी अतिवृष्टी आहे. यापूर्वी जून महिन्यात एक दिवस १०० मीमी पावसाची नोंद करण्यात आली होती. रविवारी देशात केरळ राज्यातील वडाकरा येथे सर्वाधिक १६ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल तामीलनाडूमधील देवाला येथे १५, तर अंदमान निकोबारमधील लाँग आयलँड येथे १३ आणि नागपूर येथे १२ सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

नागपुरात अतिवृष्टी
गेल्या आठवड्यात पावसात खंड पडला होता. मात्र हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारपासून शहरात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली. रविवारी संध्याकाळी शहरातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. पुढे रविवारी मध्यरात्रीनंतर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले. तसेच काही पुलसुद्धा पाण्याखाली गेल्याने वाहतूकीस अडथळे निर्माण झाले. मंगळवारीसुद्धा नागपुरात काही भागात अतिवृष्टीचा इशारा आहे. पुढे पावसाचा जोर कमी होणार असला तरीही शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज कायम आहे.

नागपूर: अत्याचार करून प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला बुटीबोरी पोलिसांनी अटक केली आहे. पंकज दिलीप चौधरी (वय ३३, रा. घाटंजी, यवतमाळ) ,असे अटकेतील प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज व २२ वर्षीय तरुणी बुटीबोरीतील हॉटेलमध्ये काम करायचे. यादरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळले. करोनामुळे हॉटेल बंद झाले. त्यानंतर तरुणीने पंकज याच्या मागे लग्नाचा तगादा लावला. ३१ जुलैला पंकज हा तरुणीला घेऊन बुटीबोरीतील पुलाखाली आला. तेथे तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने लग्नाची गळ घातली असता पंकज याने वायरने गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. तरुणी बेशुद्ध झाली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून पंकज पसार झाला. काही वेळाने तरुणी शुद्धीवर आली. घरी गेली. नातेवाइकांनी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी पंकज याच्याविरुद्ध अत्याचार व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.बी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी यवतमाळ येथून पंकज याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करुन पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

नागपूर: नागपूर : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनापुढे करोनारूपी संकटानेही गुडघे टेकले आहेत. करोनामुळे बहिणीकडे कसे जायचे, यंदा राखी बांधायची राहून तर नाही ना जाणार, असे प्रश्न अनेकांच्या मनात घर करून होते. पण, या सर्वांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मात करत यावर्षी हा सण विशेष करण्याचा संकल्प काही बहीण-भावांनी केला आहे.

करोनामुळे काहींना बहिणीकडे जाणे शक्य नसल्याने ओवाळणी, शुभेच्छांची देवाणघेवाण, गिफ्ट हे सारे काही ऑनलाइन पद्धतीने होत आहे. याबाबत सांगताना प्रा. सतीश चाफले म्हणाले, 'शेजारच्या अपार्टमेंटमधील दोन व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाल्याने परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे मला बहिणींकडे जाणे वा त्यांनी माझ्याकडे येणे शक्य नाही. त्यावर उपाय म्हणून दोन्ही बहिणींचे (कांचन घोडखांदे आणि दर्शना मस्के) पती अपार्टमेंटबाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राखी पोहचविणार आहेत. त्यांच्याचद्वारे दोन्ही बहिणींना ओवाळणी देण्यात येईल.' 'पुणे येथे असलेला भाऊ (डॉ. दिनेश सोलंके) हा राखीनिमित्त कधी यायचा. तर कधी मी स्पीडपोस्टने त्याला राखी पाठवायची. सध्या पुण्यात करोनाने घातलेला थैमान पाहता ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून राखी आणि गिफ्ट भावाला पाठविले. त्यानेदेखील राखी मिळाल्यानंतर लागलीच रिटर्न गिफ्ट धाडले. आता राखीच्या दिवशी व्हिडीओ कॉलिंगद्वारे ओवाळणी करणार आहे,' अशी माहिती दीपाली ढोमणे यांनी दिली.

नागपूर : कोव्हिड- १९ विषाणूवर मात करून आजारमुक्त झालेल्यांच्या शरीरात विकसित होणाऱ्या (आयजीजी अॅण्टिबॉडीज) रोग प्रतिकारशक्तीचा आधार घेऊन या विषाणूशी झुंजणाऱ्यांना बरे करता येते. त्यासाठी करोनामुक्त झालेल्यांच्या रक्त घटकातील प्लाझ्मा वेगळे करून त्याचे आजारी माणसाला रक्तसंक्रमण केले, तर दाहकता कमी करता येते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे 'करोनामुक्त झालेल्यांनी प्लाझ्मा दानासाठी पुढे यावे,' अशी साद सर्वत्र घालण्यात आली. मात्र, याचाच आधार घेऊन करोनामुक्त झालेल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील दलाल ५० ते ८० हजारांचे आमिष दाखवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.

यातील आणखी संतापजनक बाब म्हणजे, कोव्हिडशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे दलाल अॅण्टिबॉडीज नसलेला बनावट प्लाझ्मादेखील रुग्णांच्या माथी मारला जाण्याची शक्यता वैद्यकीय वर्तुळातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

शहरातील करोनाबाधितांची संख्या पाच हजारांपुढे सरकली आहे. त्यापैकी मृत्यूच्या संख्येनेही शतक ओलांडले. विषाणूची बाधा झाल्यानंतर उपचाराने करोनामुक्त झालेल्यांचा आकडाही ३,३००चा पल्ला ओलांडत आहे. एकीकडे ही समाधानाची बाब असताना शहरात एका नव्याच काळाबाजारीने शिरकाव केला आहे.

दुर्बल घटकातील जे रुग्ण करोनामुक्त झालेत, अशांचा शोध घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील दलालांनी नवी दुकानदारी थाटली आहे. अवैध मार्गाने व्यवहार करणाऱ्या रक्तपेढ्या आणि रुग्णालयांसाठी काम करणारे हे दलाल करोनाशी झुंजणारे रुग्ण आणि करोनामुक्त झालेले रुग्ण, या दोघांशी थेट संपर्क साधत आहेत. करोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दानासाठी ५० हजारांचे आमिष दाखवले जात आहे. तर प्लाझ्माची गरज असलेल्यांना एका प्लाझ्मा युनिटसाठी ८० हजारांचा दर सांगितला जात आहे.

नागपूर : भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या अत्याधुनिक लढाऊ राफेल विमानांची जगभरात चर्चा सुरू आहे. असे असताना देशाने नव्याने ऑर्डर दिल्यास नजीकच्या भविष्यात 'द बर्डस्'ची निर्मिती उपराजधानी होण्याची दाट शक्यता आहे.

केंद्रातील मोदी सरकारने फ्रान्सकडून राफेलची खरेदी केली. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात १२५ विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता. नंतर मोदी सरकारने ३६ विमानांचा करार केला. राफेल करार व किंमतीवरून काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशव्यापी आंदोलन केले होते. दोन दिवसांपूर्वी पाच राफेल विमाने देशात येताच भाजपकडून जल्लोष करण्यात आला.

भारताच्या करारानुसार सर्व विमाने फ्रान्सहून येतील. देशाची गरज आणि यापूर्वी करण्यात आलेला करार भविष्यात विमानांची मागणी होऊ शकते. त्यामुळे यापुढील ऑर्डरची पूर्तता नागपुरातून होण्याची दाट शक्यता या क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली. नागपुरातील प्रकल्पाचे अजूनही काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर व सुट्या भागांच्या उत्पादनाला वेग येईल. सद्यस्थितीत नागपुरात फाल्कन विमान तयार होत असून डिसेंबर २०२२ पर्यंत येथून संपूर्ण विमानाने उड्डाण घ्यावे, असे कंपनीचे प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

नागपूर: करोनाबाधितांची वाढती संख्या आणि सणांचे दिवस बघता नागपूर शहरात पुन्हा लॉकडाउन लागू शकतो या चर्चेला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि महापौर संदीप जोशी यांनी, शहरात आता लॉकडाउन लागणार नाही, असे जाहीरपणे सांगितले. प्रशासनाने लॉकडाउनचा धाक दाखविणे बंद करावे. यादृष्टीने हालचाली जरी दिसल्या तरी सर्व लोकप्रतिनिधी आंदोलनाची भूमिका घेऊ, असा इशारा महापौरांनी दिला.

महापौर जोशी यांनी शुक्रवारी दुपारी शहरातील लोकप्रतिनिधींची तर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकांनंतर महापौर आणि पालकमंत्र्यांनी लॉकडाउनबाबतची भूमिका स्पष्ट केली. मागील आठवड्यात शनिवार आणि रविवार असे दोन उपराजधानीमध्ये जनता कर्फ्यू होता. आजची बकरी ईद आणि सोमवारच्या राखी पौर्णिमेमुळे शहरात लॉकडाउन लागू शकतो, अशी जोरदार चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाउनबाबत स्पष्टीकरण देण्यात आले.

करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी स्मार्ट अॅक्शन प्लान तयार करा, अशी सूचना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली. वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची अॅण्टीजेन टेस्ट केली पाहिजे. आगामी काळात चतुर्थ श्रेणी कर्मचारी व स्वच्छता कर्मचाऱ्यांची कमतरता भासू शकते. ती भरून काढण्यासाठी खासगी संस्थेची मदत घ्यावी, असेही निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

नागपूर: मनपा प्रशासनाने स्थायी समितीकडे दिलेला पाच टक्के पाणी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळावा, असे निवेदन ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी सभापती पिंटू झलके यांना शुक्रवारी दिले. सध्या करोना काळात नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असून, गेल्या दहा वर्षांपासून ही दरवाढ होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

आयुक्तांना पाच टक्के पाणी दरवाढीचा अधिकार आहे. त्यानुसार स्थायीकडे हा प्रस्ताव देण्यात आला आहे. ३ ऑगस्टच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येणार आहे. प्रस्तावात १ ते २० युनिटपर्यंत ८.१३ पैसे, २० युनिटपेक्षा जास्त वाढ आहे. २१ ते ३० युनिटपर्यंत १३.०३ पैसे, ३१ ते ८० युनिटपर्यंत १६ रुपये ९३ पैसे तर, ८० युनिटपेक्षा जास्त वापरास २४.४३ रुपये असा दर आकारला जाणार आहे. ही दरवाढ सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा आहे. नागपूरकर आधीच विविध देयक वाढीवरून त्रस्त आहेत. मालमत्ता कर, वीज देयके यावरून नागरिकांमध्ये संताप आहे. अशात पाणी दरवाढ ही आर्थिक बोझा वाढविणाारा ठरेल, असे पांडे यांनी नमूद केले आहे.

नागपूर: 'सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात मनी लाँड्रिंगचाही एक अँगल समोर आलाय. सुशांतच्या बँक खात्यातील कोट्यवधी रुपये वळवण्यात आल्याचं उघड झालंय. अशा परिस्थितीत सक्तवसुली संचालनालय (ईडी) हस्तक्षेप करू शकते. ईडीनं या प्रकरणी ईसीआयआर दाखल करावा,' अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

सुशांतसिंहच्या आत्महत्येला महिना उलटून गेला असला तरी या प्रकरणात रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून अद्याप चौकशी सुरू आहे. या प्रकरणी सर्व बाजू तपासल्या जातील, असं गृहमंत्रीअनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, सीबीआय चौकशीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतला फसवल्याचा आरोप झाला आहे. सुशांतच्या खात्यातून तब्बल १५ कोटींची रक्कम गायब आहे, असंही तपासात पुढं आलं आहे. हे सगळ्या घडामोडींमुळं या प्रकरणाची गुंतागुंत वाढली आहे. राजकीय पातळीवरही याची दखल घेतली गेली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ यांनी गृहमंत्र्यांना पत्र देऊन सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता भाजपनंही या प्रकरणात लक्ष घातलं आहे.

नागपूरः नागपुरात करोनाबाधितांची संख्या वाढतच असून गुरुवारी यात ३४२ रुग्णांची भर पडली. बुधवारप्रमाणे गुरूवारीही ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली. लॉकडाउनचे नियम शिथिल होत असताना दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन आकडी येऊ लागली आहे. दिवसाला येणारी तीन आकडी संख्या कमी कशी करायची हे मोठे आ‌व्हान आहे.

गुरूवारी ३४२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागपुरातील करोना बाधितांची एकूण संख्या आता ५ हजार १३४ झाली आहे. यातील १०७ नागपूर बाहेरील आहे. गुरुवारी १ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत मृतांचा आकडा ११८ झाला. यातील २९ मृत्यू हे नागपूर बाहेरील आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण अधिक असल्याने दिलासा देणारे आहे. गुरुवारी २२५ रुग्ण आजारातून बरे झाले. आतापर्यंत ३ हजार २३४ जण या आजारातून बरे झाले. बरे होण्याची टक्केवारी ६४.१६ आहे.

दरम्यान, राज्यात करोना संसर्गाचा वेग वाढत असून, आज ११ हजार १४७ इतक्या उच्चांकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ११ हजार ७१९ वर पोहोचली आहे. तर, गेल्या २४ तासांत राज्यात २६६ जणांचा मृत्यू झाल्यानं बळींची एकूण संख्या १४ हजार ७२९ झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ आहे. आज आठ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळं एकूण २ लाख ४८ हजार ६१५ रुग्ण करोनावर मात करुन सुखरुप घरी परतले आहेत. त्यामुळं राज्याचा रिकव्हरी रेट एक टक्क्यानं वाढून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे.

नागपूर: उपराजधानी नागपूर शहरातील बहुचर्चित दीडशे कोटी रुपयांच्या समृद्धी महाघोटाळ्यात गत १३ वर्षांपासून पसार असलेल्या तत्कालीन अध्यक्षाला सीआयडीने गुरुवारी अटक केली. किशोर ठाकरे वय ५८ रा. प्रिन्स अपार्टमेंट, छत्रपती चौक, असे अटकेतील अध्यक्षाचे नाव आहे. ( Samruddhi Scam )

समृद्धी सेव्हिंग अॅण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनीत दीडशे कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये अध्यक्षासह ५६ जणांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कालांतराने या महाघोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने ५२ जणांना अटक केली. किशोर ठाकरे व अन्य तिघे मात्र या प्रकरणात फरार होते.

किशोर ठाकरे हा छत्रपती चौकात असल्याची माहिती सीआयडीला मिळाली होती. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक अतुलचंद्र कुळकर्णी, उप महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून ठाकरे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, किशोर ठाकरे हा गेल्या १३ वर्षांपासून यंत्रणांना सतत गुंगारा देत होता. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आल्यानंतरही मुख्य आरोपी हाती लागू शकला नव्हता. आता ठाकरे जाळ्यात अडकल्याने या घोटाळ्याचा खडानखडा तपशील हाती लागणार आहे.

नागपूर:नागपूर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या वाढतच असून बुधवारी यात आणखी ३०५ रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील करोना बाधितांची एकूण संख्या आता ४ हजार ७९२ झाली आहे. बुधवारी ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने नागपुरातील मृतांची संख्या आता १०७ झाली आहे. आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून १६१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ( Coronavirus In Nagpur )

वाढती पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत असून बुधवारी यात ३०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडली. बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यातील दोघे नागपूरच्या बाहेरील आहेत. मृतांमध्ये पंचशीलनगर येथील ५० वर्षीय महिला, नारी रोड येथील येथील ६८ वर्षीय महिला, भरतनगर येथील ६५ वर्षीय महिला, गांधीबाग येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. मध्य प्रदेशातील २० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिलासा देणारे आहे. बुधवारी ३७९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ हजार ६९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याची टक्केवारी ६४.४ टक्के आहे.

करोनाची ताजी स्थिती

दैनिक करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण : २५८

पॉझिटिव्ह रुग्ण : ३०५

मृतांची एकूण संख्या : १०७

एकूण पॉझिटिव्ह : ४७९२

 

नागपूरः खाद्यतेलात भेसळ होत असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले असून अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीचा माल जप्त केला. गणेशनगर येथील चंद्रभागा तेल भंडारवर छापा टाकून १ लाख ६७ हजार रुपये किमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. गेल्या १५ दिवसातील ही दुसरी कारवाई आहे.

गणेशनगर येथील चंद्रभागा तेल भंडारचे मालक महेश जैस्वाल अन्न सुरक्षा व मानदे कायदयाच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकून खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. १५ लिटरच्या तेलाच्या डब्यात शेंगदाणा तेलाचे पॅकींग न करता खुल्या स्वरूपात विक्री करत असल्याचे आढळून आले. जप्त करण्यात आलेले खाद्यतेल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात अनंतकुमार चौधरी यांनी ही कारवाई करण्यात आली.

तर इथे साथा संपर्क
या पुढील काळात सणासुदीच्या दिवसांचा विचार करता खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता अधिक आहे. भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत काही तक्रार असल्यास ०७१२-२५६२२०४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले.

नागपूर:करोना संसर्गाची बाधा झालेल्या गर्भवती महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर हसतमुख चेहऱ्याने जगाचा निरोप घेतला. मेयोत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सारेच गहिवरले. त्या मातेला निरोप देताना डॉक्टर, परिचारिकांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ( Coronavirus In Nagpur )

ही गर्भवती महिला अत्यवस्थ स्थितीत बुधवारी मेयोत उपचाराला आली होती. तिला प्रसववेदना होत असल्याने मेयोतील कोविड रुग्णालयाने तातडीने उपचारासाठी दाखल केले. गरोदरपणातील उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या या महिलेला मेयोतील टीमने तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करून घेत कृत्रिम श्वासोच्छ्वास प्रणालीवर उपचार सुरू केले. असह्य प्रसवकळा येत असल्याने तिला तातडीने लेबर रूममध्ये शिफ्ट करण्यात आले.

अधीक्षक डॉ. रवी चौहान, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने शर्थीचे प्रयत्न सुरू केले. तोवर तिच्या घशातील स्राव नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेच्या आधारे तिची प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, यादरम्यानच्या काळात तिने बाळाला जन्म देताच अवघ्या काही क्षणांत जगाचा निरोप घेतला.

नागपूर: माओवादी समर्थक असल्याच्या आरोपाखाली नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नवी दिल्लीतील प्रा. साईबाबा याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन नाकारला. यापूर्वीदेखील न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यामुळे पूर्वीचा निर्णय कायम ठेवण्यात येत असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

प्रा. साईबाबा याला गडचिरोली न्यायालयाने युएपीए कायद्याअंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानुसार मे २०१४ पासून साईबाबा नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात आहे. सुमारे ९० टक्के दीव्यांग असलेल्या साईबाबाला अनेक आजार आहेत. मध्यवर्ती कारागृहात सध्या करोनाचे रूग्ण वाढत असल्याने साईबाबा यालादेखील करोना होण्याची शक्यता आहे, असे जामीन अर्जात नमूद केले आहे. त्यावर न्या. अतुल चांदूरकर आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रा. साईबाबा याच्यावतीने बाजू मांडताना अॅड. निहालसिंग राठोड म्हणाले, कारागृहात झपाट्याने करोना रूग्ण वाढत आहेत. त्यास्थितीत साईबाबा याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याला आधीच अनेक आजार आहे, त्यावर योग्य उपचारदेखील मिळत नाहीत. त्यामुळे ४५ दिवसांचा जामीन देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली.

साईबाबाच्या जामीनाला विरोध करताना विशेष सरकारी वकील प्रशांतकुमार सत्यनाथन म्हणाले, साईबाबाला कारागृहातील स्वतंत्र विंगमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कारागृहातील इतर कैद्यांशी त्याचा थेट संबंध येत नाही. कारागृहात करोनाची बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयात दाखल केले आहेत. नवीन कर्मचारी तिथे तैनात केले आहेत. त्याशिवाय २४ तास त्याच्याकडे लक्ष देण्यासाठी दोन सहायक नियुक्त केले आहेत. वैद्यकीय अधीक्षक देखील प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कारागृहापेक्षा बाहेर साईबाबाला करोना होण्याचा अधिक धोका आहे, असे नमूद करण्यात आले. न्यायालयाने दोन्हीकडील बाजू लक्षात घेता साईबाबा याला जामीन नाकारला.

नागपूर:जिल्हा न्यायालय परिसरात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. हेमंत वहाणे (वय ५२, मिलिंदनगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने स्वत:च्या हातावर आणि डोक्यावर ब्लेडने वार केले.

ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. वहाणे हा जिल्हा न्यायालयात स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत होता. मात्र त्याच्याविरुद्ध वागणुकीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्याची विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीअंती तो दोषी आढळला. चौकशी अहवालानुसार, त्याला सोमवारी कामावरून कमी करण्यात आले. यामुळे तो निराश झाला होता तसेच हेमंत तापट स्वभावाचा असल्याचे कळते. दुपारी तो न्यायमंदिर परिसरात आला. न्यायमंदिरातील खालच्या मजल्यावर त्याने गोंधळ घातला आणि स्वत:वर ब्लेडने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. या परिसरात पोलिस कर्मचारी उपस्थित असल्याने त्यांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले आणि उपचारांसाठी मेयोमध्ये भरती केले. हेमंतच्या वागणुकीबाबत अनेक तक्रारी होत्या. यापूर्वी त्याने एकदा स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या वेळीसुद्धा गोंधळ घातल्याचे सांगितले जाते.

नागपूर: खंडणी व अवैध सावकारी प्रकरणात नागपूर एमआयडीसीतील झीरो डीग्री बारचा मालक तपन जयस्वाल (वय ४०, रा. भेंडे ले-आऊट) याच्यासह चौघांना गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. विक्की गजभिये (वय २८,रा. खामला), बंटी बोरकर (वय ३३, रा. गोपालनगर) आणि समीर ऊर्फ बाळा राऊत (वय २८, रा. गोपालनगर),अशी अटकेतील अन्य आरोपींची नावे आहेत. तिघेही कुख्यात गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वीच तिघेही एका प्राणघातक हल्ला प्रकरणात जामिनावर सुटले होते.

चायनीज ठेलाचालक समीर दिलीपराव इंगळे (वय २८, रा.गोपालनगर) याला पैशाची गरज होती. त्याने तपन याच्याकडून १५ टक्के व्याजाने ७० हजार रुपये घेतले. समीर याने तपन याला १ लाख ७० हजार रुपये दिले. मात्र त्यानंतरही तपन हा समीर याला पैशाची मागणी करायला लागला. अन्य तीन साथीदारांच्या मदतीने त्याला धमकी दिली. समीर याच्याकडून बळजबरीने धनादेश घेतले. याशिवाय त्याला पुन्हा २० हजार रुपये व्याजाने दिले. त्यानंतर तपन हा त्याला त्रास द्यायला लागला. समीर याने गुन्हेशाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांच्याकडे तक्रार केली. गुन्हेशाखा पोलिसांनी तपन व त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध बजाजनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री तपन व त्याच्या साथीदारांना अटक केली. मंगळवारी पोलिसांनी चौघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

नागपूर: आई-वडील व पत्नीला मारहाण केल्याने संतप्त झालेल्या मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली. ही थरारक घटना मौद्यातील भुगाव येथे घडली. दशरथ विजय वंजारी वय ३०, असे मृताचे तर विकास विजय वंजारी वय ३३ ,असे आरोपी भावाचे नाव आहे. ( Nagpur Crime )

दशरथ याला दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो आई-वडील व विकास याच्या पत्नीला शिवीगाळ करायचा. त्यांना मारहाणही करायचा. शनिवारी सायंकाळी दशरथ याने आई-वडिलांना मारहाण केली. त्यामुळे संतप्त होऊन विकास याने काठीने दशरथ याच्या डोक्यावर वार केले. यात दशरथ याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून विकास याला अटक केली आहे.

आर्थिक अडचणीमुळे पुजाऱ्याची आत्महत्या: लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या पुजाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना लालगंजमधील झाडे चौक येथे सोमवारी उघडकीस आली. कमलाकर तुकाराम भट (वय ३५),असे मृताचे नाव आहे. कमलाकर हे मूळ कनार्टक राज्यातील रहिवासी होते. कमलाकर हे आईसह लालगंज येथे राहायचे. ते पुजारी होते. करोना संसर्गामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासायला लागली. यावरून त्यांचा आईसोबतही वाद व्हायला लागला. त्यातूनच रविवारी रात्री त्यांनी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

नागपूर: करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील सरकारी रुग्णालयांतील खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णहिताला प्राधान्य देऊन आतापर्यंत मोजक्याच असलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये वाढ करण्यासाठी शहरातील काही खासगी रुग्णालयांना प्रशासनाने अलीकडेच हिरवा कंदील दाखविला. मात्र, रुग्णांकडून आकारल्या जाणाऱ्या उपचारदरावरून राज्यातील काही शहरांमध्ये सातत्याने तक्रारी वाढत आहेत. हे लोण नागपुरातही येण्याची शक्यता पाहता मनपा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने अचानक ऑडिट सुरू केल्याने प्रशासनाला खासगी रुग्णालयांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. सरकारने ठरवून दिलेल्या उपचारदरावरून ही रुग्णालये पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आहे. हा आधार घेत सार्वजनिक आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांतील कोव्हिड-१९ नव्या साथरोगासह हृदयरोग, कर्करोगासारख्या दुर्धर आजारांशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी दर निश्चित केले आहेत. यासंदर्भात सरकारच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने एप्रिल २०२०मध्ये अधिसूचना जारी केली. त्यावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथील खासगी रुग्णालयांना ८० टक्के खाटांवरील रुग्णांवरील उपचारासाठी हे दर बंधनकारक केले. सरकारने हा अध्यादेश जारी केला होता, तेव्हाच विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनने त्याला विरोध सुरू केला होता. या मुद्द्यावरून खासगी रुग्णालय संघटना आणि आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याशी चर्चा केली. त्यावर मध्यंतरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतून मधला मार्ग काढला गेला. त्यानंतर गेल्या १५ दिवसांत शहरातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर सरकारी कोव्हिड सेंटरच्या खाटा अपुऱ्या पडू लागल्या. म्हणून दोनच दिवसांपूर्वी विभागीय आयुक्तांनी शहरातील १० खासगी रुग्णालयांना कोव्हिड सेंटरचा दर्जा दिल्याचे जाहीर केले. हा आदेश काढताना विभागीय आयुक्तांनी खासगी कोव्हिड सेंटरमध्ये माफक दरात उपचार मिळतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी समिती नेमली. त्यानंतर विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनने ना नफा, ना तोटा तत्त्वावर या दराबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्टिकरण प्रशासनाला दिले होते. यापूर्वीच महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी सोमवारी सर्व खासगी रुग्णालयांत दाखल झाले. त्यांनी सर्वच रुग्णांचे देयक बघून त्यातील शुल्क तपास सुरू केला.

नागपूर: 'चक्कू, छुरिया तेज करा लो...' ७० च्या दशकातील 'जंजीर' चित्रपटातील अभिनेत्री जया भादुरी यांचे हे गाणे आठवतेय. या गाण्यात बोथट झालेल्या चाकूंना धार लावणारे स्वयंचलित यंत्र दाखविले आहे. अलीकडे मोहल्ल्यात, रस्त्यावर किंवा बाजारात हे यंत्र कमीच दिसते. काही कारागीर दुकानात जाऊन चाकू, कैचींना धार करून देतात. महाल, इतवारीमध्ये धार लावणारी मोजकीच दुकाने आहेत. तेथेही सतत काम सुरू असते. चाकू, सुरी, कैची, अडकित्ते यांना धार लावणाऱ्या चाकाने कारागिरांच्या अनेक पिढ्या, कुटुंबांना रोजगाराचे साधन दिले. त्यांच्या जीवनाचे चक्र गतिमान केले.

स्वयंपाकगृह, हॉटेल, खाद्यपदार्थांच्या ठेल्यांमध्ये चाकूचा, सलून, टेलर, मेडिकल, पानटपरी दुकानात कैचीचा, सुपारी फोडण्यासाठी अडकित्ते आणि गवत कापण्याकरिता मोठ्या कैचीचा वापर केला जातो. सातत्याने वापर होत असल्याने चाकू, कैचींची धार बोथट होते. त्यांना वारंवार धार लावावी लागते. पूर्वी चाकू, कैचींना धार करणारे बाजारात, मोहल्ल्यात फिरत असत. धार करण्यासाठी स्वयंचलित यंत्र असायचे. लाकडी किंवा लोखंडी ढाचामध्ये सायकलची रिंग बसवून ती गरागरा फिरवत. त्या वेगावर फिरणाऱ्या दगडी चाकावरती धार लावली जात. काम झाले की, कारागीर हे यंत्र पाठीवर घेऊन आवाज देत ग्राहक शोधत फिरायचे. काहींनी जुगाड टेक्नॉलॉजीचा उपयोग करीत सायकलवरच यंत्र तयार केले. सायकलच्या रिंगचा आधार घेत पॅडल मारून चाकाला वेग देत आणि त्या गतीवर चाकूंना धार केली जात. काम झाले की, कारागीर सायकलवर स्वार होऊन शहरभर ग्राहक शोधत फिरायचे. सुट्टीच्या दिवशी, आठवडी बाजारात चाकूंना धार करून देणारे कारागीर हमखास दिसत. कमी भांडवलात सुरू होणाऱ्या या व्यवसायावर अनेक कारागिरांची रोजीरोटी चालत. हा व्यवसाय चालू लागल्याने काहींनी पक्की दुकाने सुरू केली. नागपुरात इतवारी, महाल परिसरात चाकूंना धार लावणारी काही दुकाने आजही सुरू आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने वाडवडिलांचा व्यवसाय सांभाळला आहे. आता दुकानांमध्ये विजेवर चालणाऱ्या यंत्रांचा वापर केला जात आहे. ग्रँडरवर काम केले जाते. वीजपुरवठा खंडित झाला तर जनरेटरची सुविधा आहे. ग्राहकांना वेळेत काम करून दिले जाते. नागपुरात गुणवत्तापूर्ण काम होत असल्याने शहराबाहेरूनही लगतच्या भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील दुकानदार कैचींना धार करण्यासाठी नागपूरला पसंती देतात.

नागपूरः करोनाबाधित असलेल्या रेल्वेच्या निवृत्त स्टेशन मास्तरकडे घरफोडी करून चोरट्यांनी ११ लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना नवीन कामठीतील रविदासनगर भागात उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६५ वर्षीय निवृत्त स्टेशन मास्तर हा पत्नी व दोन मुलांसह रविदासनगरमध्ये राहातो. १९ जुलैला त्याच्या पत्नीची प्रकृती खालावली. त्याने पत्नीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तपासणीदरम्यान निवृत्त कर्मचाऱ्याची पत्नी करोनाबाधित असल्याचे आढळले. त्यामुळे निवृत्त कर्मचारी व त्याच्या दोन मुलांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. तपासणीदरम्यान दोन्ही मुलेही करोनाबाधित असल्याचे समोर आले. दोघांना मेयोत दाखल करण्यात आले. कर्मचारी पाचपावलीतील विलगीकरण होता. यादरम्यान चोरट्यांनी कर्मचाऱ्याकडे घरफोडी करून ११ लाखांचे दागिने, लॅपटॉप मोबाइल चोरी केला. दरम्यान कर्मचाऱ्याचा अहवाल नेगिटिव्ह आल्याने त्याला सुटी झाली. तो घरी गेला असता घरफोडीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

नागपूर: सर्वसामान्य कर्जदारांना बँकेकडून कर्ज मिळवताना अनेक बाबींची पूर्तता करावी लागते. इतकेच नव्हे कर्जाचा एखादा हफ्ता चुकला तरी बँकांकडून तो भरण्यासाठी तगादा लावण्यात येतो किंवा संबंधिताला थकबाकीदार ठरवून कारवाई सुद्धा करण्यात येते. दुसरीकडे, याच बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज घेतल्यानंतर ती भरण्यास असमर्थता दाखवणाऱ्या मोठ्या कर्जदारांना मात्र जणू 'सूट' मिळत असल्याचे पुढे आले आहे. देशभरातील अशाच काही कर्ज थकवणाऱ्यांच्या यादीत नागपूरच्याही काही बड्या व्यावसायिकांचा समावेश आहे. या व्यावसायिकांकडून अलीकडच्या काळात राष्ट्रीयीकृत बँकांकडून घेतलेली सुमारे अडीच हजार कोटींची कर्ज थकवण्यात आली असल्याचे पुढे आले आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयईबीए) या बँक कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीयीकृत संघटनेने बँकांच्या राष्ट्रीयीकरण दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात कर्ज थकवणाऱ्या 'विलफुल डिफॉल्टर्स'ची यादी नुकतीच तयार केली. यात किंगफिशर एअरलाइन्स, गीतांजली जेम्स, विनसम डायमंड्स या काही बड्या समूहांसह नागपुरातील पद्मेश गुप्ता यांच्या गुप्ता समूह, अभिजित समूह, टॉपवर्थ ग्रुप, रसोया प्रोटिन्स यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गुप्ता समूहानेच राष्ट्रीयीकृत बँकांचे सर्वाधिक असे १,८०० कोटी रुपयांचे कर्ज थकवले आहे. एआयबीईएच्यावतीने देशभरातील कर्ज थकवणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली. ती ५ कोटी, २०० कोटी आणि ५०० कोटी अशा श्रेणीत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या यादीत कोणत्या बँकेकडून किती कर्ज घेण्यात आले आहे, त्याची माहितीही देण्यात आली आहे.

नागपूर: ग्रींडर, ब्ल्यूड या एलजीबीटी डेटिंग अॅपवरून संपर्क साधत एका तरुणावर घातक हल्ला करीत त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कामठी मार्गावर घडली. या हल्ल्यात २१ वर्षीय तरुण थोडक्यात बचावला. नागपुरातील एलजीबीटी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी वेळीच धावाधाव केल्याने हल्लेखोर पसार झालेत. या हल्ल्यात सहभागी एकाचा क्रमांकही पीडित तरुण व एलजीबीटी स्वयंसेवकांनी मिळविला आहे.

एलजीबीटी डेटिंग अॅपवरून कामठी मार्गावरील जाहिब नावाच्या एका तरुणाने एका २१ वर्षीय तरुणाशी संपर्क साधत त्याला कामठी मार्गावरील एका निर्जन मार्गावर भेटण्यासाठी बोलाविले. यावेळी जाहिबचे अन्य चार मित्र अंधारात दबा धरून बसले होते. २१ वर्षीय तरुण तेथे येताच त्यांनी या युवकावर हल्ला केला. त्याच्या जवळील मोबाइल, पैसे आणि इतर साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणाला गंभीर इजाही झाली. हल्लेखोरांच्या तावडीतून या तरुणाने कशीबशी आपली सोडवणूक करीत पळ काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मोबाइलवरून 'एलजीबीटी कम्युनिटी'मधील काही सदस्यांशी संपर्क साधला. त्यांनी वेळीच घटनास्थळ गाठले. मात्र, तोवर हल्लेखोर पसार झाले होते. स्वयंसेवकांनी तातडीने जखमी युवकाला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले. दरम्यान कुटुंबाच्या भीतीमुळे या पीडित युवकाने पोलिसांत तक्रार देण्याचे टाळले. मात्र, या घटनेमुळे नागपुरातील एलजीबीटी समुदायात संतापाची लाट उसळली आहे. लवकरच ही मंडळी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेणार आहे.

नागपूर: राज्यासह संपूर्ण देशात करोनाचा कहर सुरू असल्याने प्रत्येकाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. करोनाच्या या संकटातून वाचण्यासाठी नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एक जालीम उपाय सूचवला आहे. समोरचा प्रत्येक व्यक्ती हा करोनाबाधित आहे, असं समजून स्वत:ची काळजी घ्या. तुम्ही आपोआप करोनापासून वाचाल, असा आरोग्यमंत्रच तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

तुकाराम मुंढे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शहरातील करोना परिस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी करोनाला पराभूत करायचं असेल तर स्वत: काळजी घेणं महत्त्वाचं तर आहेच. पण हे करताना समोरचा व्यक्ती करोनाबाधित आहे. असं समजून जर स्वत:ची काळजी घेतली तर करोनाला दूर ठेवाल, असं मुंढे म्हणाले. नागपुरातील करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढली. मृत्यूचं प्रमाणही वाढलं. लोक नियम पाळत नाही. अनलॉक केल्यामुळे फिरण्याची मुभा मिळाली असा लोकांचा गैरसमज होत आहे, असं सांगतानाच करोनाचं संकट हे जागतिक संकट आहे. त्याबाबत गंभीर असलं पाहिजे. करोना रोखण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करा, असं आवाहनही त्यांनी केलं.

 

नागपूर: करोना संशयिताच्या विलगीकरणासाठी वापरण्यात येत असलेले विधी कॉलेज परिसरातील वसतिगृह तातडीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे तसेच तेथील विलगीकरण केंद्र इतरत्र स्थानांतरित करावे, अशी मागणी करणारे निवेदन माजी कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम आणि सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांना दिले. या मागणीवर निर्णय न घेण्यात आल्यास १ ऑगस्टपासून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

राज्य सरकारचा आदेश आणि विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक वेळापत्रकानुसार १ ऑगस्टपासून शैक्षणिक सत्र सुरू आहे. मात्र, अद्यापही विद्यापीठाच्या वसतिगृहात विलगीकरण केंद्र सुरू आहे. वसतिगृहात सुमारे ३८० विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. शैक्षणिक सत्रासाठी विद्यार्थी वसतिगृहात परतणार आहेत. त्यास्थितीत विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे विलगीकरण केंद्र स्थानांतरित करावे, तेथील सगळ्या निवासी खोल्या आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात यावे तसेच वसतिगृहात एका खोलीत बंद करून ठेवण्यात आलेले विद्यार्थ्यांचे सामान, त्यांचे कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारले. त्यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. पुरणचंद्र मेश्राम, सिनेट सदस्य डॉ. ओमप्रकाश चिमणकर, डॉ. केशव मेंढे, प्रा. प्रशांत डेकाटे तसेच स्नेहल वाघमारे, डॉ. नीरज बोधी उपस्थित होते.

नागपूर:नागपूर मध्ये करोना विषाणूची साखळी खंडीत होण्याऐवजी चिंताजनक स्थिती वाढत चालली आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून नागपुरात सुरू असलेला प्रकोप म्हणजे समूह संसर्गाचे संकेत तर नाहीत ना, अशी नवी धास्ती नागपूरकरांच्या मनात घर करत आहे. त्यात आज नागपुरात आणखी १४४ बाधितांची भर पडली तर या आजाराची लागण झाल्यानंतर उपचार घेत असलेल्या तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत बाधित संख्या ३१७१ वर तर मृत्यू संख्या ५८ अशी झाली आहे. ( Coronavirus In Nagpur )

नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये आज खासगी प्रयोगशाळांनी धक्का दिला. खासगीत आज जवळजवळ ४९ जणांच्या घशातील स्त्राव नमुन्यांमध्ये करोनाचा विषाणू सापडला. त्या नंतर ३५ नमुन्यांचा अहवाल एम्समधून, निरीतून २९, मेयोतून २६, मेडिकलमधून २ तर अँटिजेन रॅपिड टेस्ट मधून तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेयोत मृत्यूची नोंद झालेला करोना बाधित ४५ वर्षीय व्यक्ती कन्हानचा रहिवासी असून त्याला दगावलेल्या अवस्थेत नातेवाईकांनी मेयोत आणले होते. प्रशासनाने घशातील स्त्राव नमुना तपासला असता आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर मेडिकलमध्येही एका व्यक्तीच्या मृत्यूची सोमवारी नोंद झाली. त्यामुळे शहरातील आजपर्यंत दगावलेल्या एकूण बाधितांची संख्या थेट ५८ वर पोहचली आहे.

नागपूर: करोनाची लागण झाल्याने कुटुंबीयांसह विलगीकरण कक्षात असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याकडे घरफोडी करून चोरट्यांनी रोख व तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, असा लाखो रुपयांचा रुपयांचा ऐवज चोरी केला. ही घटना मंगळवारी सकाळी कुशीनगर भागात उघडकीस आली. नागपूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत अधिकारी व त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाली. त्यामुळे अधिकारी व त्याच्या नातेवाइकांना आमदार निवासातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले तसेच कुशीनगर परिसर सील करण्यात आला. संधी साधून चोरट्याने पोलिस अधिकाऱ्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. आलमारीतील दागिने व रोख चोरी केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच जरीपटका पोलिस तेथे पोहोचले. पोलिसांनी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने घराचे निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर पंचनामा करून घरफोडीचा गुन्हा दाखल केला.

नागपूर: माणसाच्या क्षमतांना आणि कल्पकतेला योग्य वाव मिळाला की, प्रगतीचे रस्ते मोकळे होत जातात. युरोपातील देशांमध्ये अशा संधी मिळत असल्याचे त्यांनी अनुभवले होते. नव्या देशाने अनेक गोष्टी दिल्या होत्या आणि मातृभूमीचे ऋण अपार होते. 'आपल्याला मिळाले त्यातले शक्य तितके चांगले आपल्या जन्मभूमीला परत द्यायचे,' हा त्यांचा निर्धार आहे. याच भावनेतून त्यांनी नॉर्वेच्या शिक्षणाची धारा विदर्भ आणि मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांशी जोडून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपली संस्कृती अभिमानाने जपताना युरोपकडून अनेक गोष्टी शिकण्यासारखे असल्याचे वेदीश सहजपाल नमूद करतात.

वेदीश यांचा प्रवास छत्तीसगडमधील भिलाई ते ऑस्लो व्हाया नागपूर असा झाला आहे. भिलाई येथे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठ, मुंबई आयआयटी, मुंबई आणि नंतरच्या काळात नॉर्वेतील बर्गेन आणि ऑस्लो विद्यापीठातूनही गणित, फिजिक्स, जिओफिजिक्स आणि कम्प्युटर सायन्स यांचे शिक्षण घेतले. १९९० मध्ये ते नॉर्वेला गेले. मात्र, सहा वर्षांत त्यांना आईच्या कर्करोगामुळे भारतात परत यावे लागले. वेदीश यांनी नागपुरातील आयटी कंपन्यांमध्ये काही वर्षे काम केले. दरम्यानच्या काळात त्यांचे कुटुंब नागपुरात स्थायिक झाले. आठ वर्षे भारतात राहिल्यानंतर त्यांनी २००४ मध्ये पुन्हा एकदा नॉर्वेला जाण्याचा निर्णय घेतला.

सध्या ते नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे एका कंपनीचे पॉवर मॉडेलिंग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पॉवरग्रीडमध्ये विजेची मागणी आणि उपलब्धता या आधारे किंमतीचे निर्धारण करण्याचे काम ते करतात. विजेचे दर तेथे भारतासारखे ठराविक नसून दिवसागणिक बदलत असतात. या दरांचे निर्धारण आणि अंदाज गणितीय प्रारुपांच्या आणि सुपर कॉम्पुटरच्या आधारे मांडणे, हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. विविध संसाधने आणि मालमत्तांच्या प्रभावी उपयोगाच्या दृष्टीने गणितीय प्रारुपांची मांडणी करण्याचे कामही सुमारे दोन दशकांहून अधिक काळ ते करीत आहेत.

नागपूर: ब्ल्यू फिल्म दाखवून दाम्पत्याने महिलेशी अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील प्रतापनगर भागात उघडकीस आली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

रामकिशन जांगिड (वय ४४) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सरोज रामकिशन जांगिड (वय ४०, दोन्ही रा. शांतीविहार रेसिडेन्सी, दाते ले-आउट, सोनेगाव),असे रामकिशन याच्या पत्नीचे नाव आहे. पीडित ३८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. रामकिशन हा फर्निचर कंत्राटदार आहे.

 नागपूर: पब्जीच्या नादात पोलिसाच्या मुलाने चेहऱ्याला पिलो कव्हर गुंडाळून गळफास घेतला. ही थरारक घटना योगेंद्रनगरमधील नर्मदा अपार्टमेंट येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. राजवीर नरेंद्र ठाकूर (वय १३) असे मृतकाचे नाव आहे. तो सातवीत शिकत होता. त्याचे वडील नरेंद्र हे गुन्हेशाखेत कार्यरत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर हुशार होता. त्याचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वीच नरेंद्र यांनी त्याला मोबाइल व टॅब घेऊन दिला. अभ्यास संपल्यानंतर तो मोबाइलवर पब्जी खेळायचा. रविवारी मध्यरात्री दीड वाजता तो मोबाइलवर पब्जी खेळला. त्यानंतर अखेरची पातळी गाठण्यात त्याला अपयश आले. यादरम्यान त्याने खिडकीला ओढणी बांधली. तोंडाला 'पिलो कव्हर' गुंडाळून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आई प्रियंका या जागी झाल्या. त्यांनी नरेंद्र यांना जागे केले. नरेंद्र हॉलमध्ये आले. राजवीर गळफास घेतलेला दिसला. नरेंद्र यांनी भावाच्या मदतीने राजवीरला अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. राजवीरच्या मागे वडील, आई व बहीण आहे. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अब मॉर्निंग वॉक करने कौन आयेगा?
राजवीरचे पब्जीचे वेड सुटावे, यासाठी नरेंद्र यांनी बरेच प्रयत्न केले. रोज सकाळी ते त्याला मॉर्निंग वॉकला घेऊन जायचे. तोही उत्साहाने वडिलांसोबत जायचा. नरेंद्र मॉर्निंग वॉकला गेले नाही तरी राजवीर एकटाच जात होता. 'अब मेरे साथ मॉर्निंग वॉक करने कौन आयेगा', अशा शब्दांत नरेंद्र दु:ख व्यक्त करीत आहेत.

आयुक्त मुंढेही उतरले रस्त्यांवर, सीताबर्डीतील दुकानांची पाहणी

नागपूर: लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही असा होत नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा, नियम पाळा अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. सोमवारी सीताबर्डी बाजारपेठांमध्ये मुंढे यांनी स्वत: जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

आयुक्त मुंढे यांनी सोमवारी शहरातील बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. झांशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची त्यांनी शहानिशा केली. नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली.

यानंतर बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागरदरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फूटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नसतानाही ते कसे काय दुकान थाटून बसले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा हॉकर्सवरही यावेळी कारवाई करण्यात आली.

नागपूर: लॉकडाउनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही असा होत नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा, नियम पाळा अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. सोमवारी सीताबर्डी बाजारपेठांमध्ये मुंढे यांनी स्वत: जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील वाढत्या करोना पॉझीटीव्ह रूग्णांच्या संख्येवर चिंता व्यक्त करीत आठवडयाभरापुर्वी मेडीकल व मेयोतील कोव्हीड सेंटरची पाहणीही केली. यावेळी त्यांनी देण्यात येणाऱ्या सोयी, उपचार व व्यवस्थेचा आढावाही घेतला. पीपीई कीटचा वापर करून मुंढेंनी काही रूग्णांशी संवादही साधला.

मे अखेरपर्यत उपराजधानीत करोना नियंत्रणात होता. जून व जुलैमध्ये करोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा कडक लॉकडाउन वा संचारबंदी करण्याची वेळ आली आहे. अशात मनपाकडे अनेकांच्या नजरा आहेत. आयुक्त मुंढे काय निर्णय घेतात, यावर खल सुरू असतानाच त्यांनी आठवडयाभरापुर्वी मेडीकल व मेयोत उपचार घेत असलेल्या करोना केंद्राला आकस्मिक भेट दिली. यात त्यांनी उपचार घेत असलेल्या काही पॉझीटीव्ह रूग्णांसोबत संवादही साधला. त्यांच्याकडून माहितीही घेतली. यावेळी त्यांना मेडीकल व मेयोतील डॉक्टरांनी माहिती दिली.

आयुक्त मुंढे यांच्या फेसबुक लाईव्हवर अनेक नागपूरकरांनी अनेक सूचना दिल्या. या सूचना नजरेखालून घालताना आयुक्तांकडून काही कारवाईही करीत आहेत. यातीलच एक भाग म्हणून या दोन्ही रूग्णालयातील कोव्हीड सेंटरची भेट असल्याचे बोलल्या जाते. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थीती जाणून घेण्याचा प्रयत्नही यानिमीत्ताने होता. या पाहणीवेळी त्यांनी सोबत फार कमी अधिकाऱ्यांना सोबत घेतले. पाहणीनंतर या सेंटरला भेट दिल्याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही दिवसानंतर दिली.

नागपूरः टोळीयुद्धातून कुख्यात गुंड व त्याच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला. यात दोघेही जखमी झाले. ही थरारक घटना सोमवारी सकाळी कळमेश्वरमधील लोहकरे ले-आऊट येथे घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने ग्रामीण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गणेश मेश्राम (३२) व त्याची पत्नी प्रिया मेश्राम (वय २८), अशी जखमींची नावे असून, दोघांवर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या गोळीबार प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गोलू ऊर्फ निखिल मलिये, माकोडे आणि फारुख या तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांपूर्वी गणेश हा कुटुंबासह जयताळा येथून कळमेश्वर येथे आला. तो खाडे यांच्याकडे पहिल्या माळ्यावरील घरात भाड्याने राहायला लागला. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोंडाला कापड बांधलेले चार हल्लेखोर तेथे आले. घरमालकीनने त्यांना हटकले. एकाने घरमालकीनला पिस्तूलचा धाक दाखविला. तिघे पहिल्या माळ्यावरील गणेश याच्या घरात घुसले. गणेश याला बघताच तिघांनी गोळीबार केला. एक गोळी गणेश याच्या पाठीत तर दुसरी मांडीत घुसली. गोळीबाराच्या आवाजाने त्याची पत्नी आली. तिच्या पोटावर हल्लेखोराने गोळी झाडली. गणेश हा उडी मारुन दुसऱ्या इमारतीवर गेला. याचदरम्यान गोळीबाराच्या आवाजाने नागरिक जमले. नागरिक पकडतील या भीतीने चारही हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हेशाखचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी चौकशीदरम्यान गोलू व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिपर्यंत तिघांची कसून चौकशी सुरू होती.

नागपूरः कळमना परिसरातील गुलमोहर नगरातील नाल्यात वाहून गेलेल्या दहा वर्षीय मुलाचा दुसऱ्या दिवशीही मनपाच्या अग्निशमन पथकाने शोधाशोध केली. तब्बल चोवीस तास ही मोहिम सुरू होती. मंगळवारी परत सकाळी शोधमोहिम सुरू करण्यात येणार आहे. शहराबाहेर वाहून जाणाऱ्या नागनदीच्या १० किमी पर्यंतच्या पात्रापर्यंत हा शोध सुरू होता. नाल्यातील कचऱ्यामुळे शोधकार्यातील बोटही बंद पडली.

रविवारी दुपारी एक १० वर्षाचा मुलगा नेहल शेखर मेश्राम गुलमोहर नगरातील सिमेंट पोलवरुन पाय घसरुन वाहून गेला. पाण्याचा वेग जास्त असल्याने तो क्षणात दिसेनासा झाला. रविवारी सायंकाळपर्यंत भरतवाडयापर्यंत शोधमोहिम राबविण्यात आली. सोमवारी सकाळी परत शोध सुरू करण्यात आला. गुलमोहरनगरचा नाला पिवळी नदी व पुढे नाग नदीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संगमाजवळ एक वळण आहे. तेथे मुलगा सापडू शकतो, अशी शक्यता असल्याने या संपूर्ण पात्रात पथकाने कसून शोध घेतला. यासाठी अग्निशमन विभागच्या दोन बोटीही नाल्यात उतरविण्यात आल्या होत्या. यातील एक बोट दुपारच्या सुमारास कपडा अडकल्याने बंद पडली. त्यानंतर दुसऱ्या बोटीने मुलाचा सातत्याने शोध सुरू ठेवला. गेल्या दोन दिवसात किमान दहा किमीच्या परिसरात पथकाने शोधकार्य सुरूच ठेवले. यात कळमना, गंजीपेठ आणि सक्करदरा अग्निशमन केन्द्राचे जवानाच्या चमूंनी पवनगांव, महालगांव - भंडारा पूल, जबलपुर राष्ट्रीय महामार्ग पर्यंत नदीपात्रापर्यत शोध घेतला. परंतु दुर्देवाने त्याचा शोध अद्यापही लागलेला नाही. या शोधकार्यात पथकाला मुलाचे कुटुंबीय व शेजारी नागरिकांनीही मदत केली. या शोध कार्यात अग्निशमन विभागाचे सब ऑफीसर शौकत अली, ज्ञानेश्वर मोहूतूरे, फायरमन राजू पवार, शरद न्यूमंड, योगेश खोडके, पुंडलीक मोहूर्ले, शिवचरण यादव, ड्रायवर सर्वश्री. अकलिम शेख, मंगेश राणे, ज्ञानेश्वर डोंगे, संदीप देशमूख, धनराज बावणे इत्यादी सहभागी आहेत.

नागपूर: मध्यप्रदेशनंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं जाण्याची जोरदार चर्चा सुरू असून या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. सरकार पाडणं इतकं सोपं असतं का? असं सांगतानाच सरकार पाडणं इतकं सोपं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार कधीच पाडलं असतं, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलेल्या एका मुलाखतीत ऑपरेशन लोटसवर भाष्य केलं होतं. तर संजय राऊत यांनीही ऑपरेशन लोटसवरून भाजपवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर सुधीर मुनंगटीवार यांनी ही टीका केली आहे. सरकार पडण्याची आघाडी सरकारच्या मनात एवढी भीती का आहे? असं कोणतंही सरकार पाडता येतं का? सरकार पाडणं एवढं सोप्पं असतं तर देशातील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन २४ तास काहीही न खाता-पिता बैठकांवर बैठका घेऊन केंद्रातील मोदी सरकार एव्हाना पाडलं असतं, असा चिमटा मुनगंटीवार यांनी काढला आहे. तुमचं सरकार बहुमताचं सरकार आहे. मग कशाला एवढी भीती बाळगता, असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

दरम्यान, काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. महाविकास आघाडीमधील घटकांना सरकार पडणार असल्याची भीती वाटते. या भीतीमुळे त्यांना झोप येत नाही. सरकारमधील घटकांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात. तुम्ही सरकार चालवा. अगदी निवांत सरकार चालवा. जोपर्यंत चालतं तोपर्यंत चालवा. आम्ही सरकार पाडणार नाही, असे पाटील म्हणाले होते. 

नागपूर: पबजीच्या वेडापायी पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना योगेंद्र नगरमधील नर्मदा अपार्टमेंटमध्ये आज, सोमवारी सकाळी उघडकीस आली. राजवीर नरेंद्र ठाकूर (वय १३) असे मृताचे नाव आहे. तो सहावीत शिकत होता. त्याचे वडील नरेंद्र हे गुन्हे शाखेत कार्यरत आहेत.

राजवीर याचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाल्याने काही दिवसांपूर्वीच नरेंद्र यांनी त्याला मोबाइल व टॅब घेऊन दिला. अभ्यास संपल्यानंतर तो मोबाइलवर पबजी खेळायचा. रविवारी रात्री दीड वाजता तो मोबाइलवर पबजी खेळला. त्यानंतर अखेरची पातळी गाठण्यात त्याला अपयश आले. या दरम्यान त्याने खिडकीला ओढणी बांधली. तोंडावर उशी ठेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी त्याची आई प्रियंका या झोपेतून जाग्या झाल्या. त्यांनी नरेंद्र यांना जागे केले. नरेंद्र हे हॉलमध्ये आले. राजवीर हा गळफास लावलेला दिसला. नरेंद्र यांनी लगेच त्याच्या गळ्यातील फास काढला. भावाच्या मदतीने राजवीर याला अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून राजवीर याला मृत घोषित केले. पबजीच्या वेडापायी त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

 

नागपूर: नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि भाजप नेते दयाशंकर तिवारी यांना 'हनीट्रॅप'मध्ये अडकविण्याच्या मुद्द्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रतिआव्हान दिले आहे.

वादग्रस्त ऑडिओ क्लिपची कोणत्याही पातळीवरून आणि फडणवीस यांनी सुचविलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यास सरकार तयार असल्याची तयारी देशमुख फडणवीस यांच्या पत्रावरील उत्तरात दर्शविली आहे. उपराजधानीतील वादग्रस्त ऑडिओ क्लिप सध्या सर्वत्र गाजत आहे. यातील संभाषणावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये पत्रयुद्ध रंगले. मुख्य न्यायाधीशांकडे क्लिप देऊन चौकशीची मागणी करण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला असता, त्यावर गृहमंत्र्यांनी कोणत्याही पातळीवर चौकशीची तयारी दर्शवली.

ऑडिओ क्लिपबाबत आपण दोन पत्रे पाठवली. १४ जुलै रोजीच्या पहिल्या पत्राची तत्काळ दखल घेऊन गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे यांच्यामार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यानंतरही चौकशी करणार नसाल तर मुख्य न्यायाधीशांकडे ऑडिओ क्लिप सादर करून चौकशी मागणी करणार असल्याचे म्हणणे वस्तुस्थिताला धरून नाही, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
 

नागपूर :कारागृहातील वाढत्या करोनाच्या प्रादूर्भावाला आळा घालण्यासाठी बंदीवांनाना पुन्हा आकस्मिक रजा देण्याचा निर्णय लवकरच राज्य सरकारद्वारे घेण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यभरातील कारागृहात बंदी असलेल्या सुमारे १३ हजार बंदीवानांना या रजेचा लाभ मिळणार आहे. अशा बंदीवानांच्या नावांची यादी तयार करण्यात येत असल्याची विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कारागृहातील कैद्यांना करोनाची लागण होत असल्याने राज्यातील कारागृह लॉकडाउन करण्यात आले होते. यात नागपूर कारागृहाचा समावेश होता. कारागृह अधीक्षकांपासून ते जवानांपर्यंत १२५ पेक्षा अधिकारी व कर्मचारी ४५ दिवस कारागृहात होते. त्यामुळे करोना आटोक्यात आला. मात्र काही दिवसांपूर्वीच कारागृहातील तब्बल २०० पेक्षा अधिक बंदीवानांना करोनाची लागण झाली. यात डॉन व कुख्यात गुन्हेगारही करोना पॉझिटिव्ह आढळला. राज्यभरातील कारागृहातील बंदीवानांमध्ये करोनाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने आकस्मिक रजा उपभोगणाऱ्या कैद्यांना पुन्हा या रजेवर पाठविण्यात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नियमाप्रमाणे आकस्मिक रजा घेऊन बाहेर गेलेले व वेळेवर कारागृहात परतलेल्या बंदीवानांना पुन्हा आकस्मिक रजा देण्याचा विचार सुरू आहे. यात नागपूर कारागृहातील बंदीवानांची संख्या २५० पेक्षा अधिक आहेत. नागपूर कारागृहात सध्या १,८७८ कैदी आहेत.

नागपूर: कळमना भागातील गुलमोहरनगर येथील नाल्यात रविवारी दुपारी एक दहा वर्षाचा मुलगा नाल्यात वाहून गेला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, सायंकाळपर्यत अग्निशमन पथकाकडून शोधकार्य सुरू होते. मुलगा अद्याप सापडला नसून, सोमवारी पहाटे ५ पासून परत शोधकार्य सुरू करण्यात येणार आहे. गुलमोहनरनगरकडून पुढे भरतवाडयाला हा नाला नाग नदीत मिसळतो.

नेहल शेखर मेश्राम (वय १०) असे या मुलाचे नाव आाहे. गुलमोहरनगर या नाल्यावर असलेल्या सीमेंटच्या खांबावरून तो नाल्याच्या दुसऱ्या भागाला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. खांबावरून जात असताना त्याचा तोल गेला. त्यानंतर तो थेट नाल्यात पडला. नाल्यातील पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तो नाल्यातून थेट वाहत केला. दुपारी दीड ते दोन वाजताची ही घटना आहे. अग्निशमन विभागाला दुपारी २.१० वाजता ही माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच अग्निशमन दलाचे कळमना,सक्करदरा आणि गंजीपेठ या स्थानकातील पथक घटनास्थळी हजर झाले. सोबत बोटही घेण्यात आली. तथापि, बोटचे काम पडले नाही. या नाल्यात अनेक ठिकाणी दुरूस्तीचे काम सुरू असल्याने नाल्यात काही ठिकाणी पारे आहेत. त्यातील एखादी भागात तो मुलगा अडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुलमोहरनगरकडून भरतवाडयापर्यतच्या नाल्यापर्यत रविवारी सायंकाळपर्यंत शोधकार्य करण्यात आले.

गेल्या दोन दिवसात शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे या नाल्याचा प्रवाह वाढला आहे. हा नाला पुढे नाग नदीला मिळतो. त्यामुळे किमान नाल्यातच मुलगा सापडू शकतो. सध्या शाळा बंद असल्याने मुले अनेक ठिकाणी खेळत असतात. नाल्यावर वीजेचा सीमेंटचा खांब गुलमोहरनगर जवळ टाकण्यात आला आहे. या नाल्यावरून दुसऱ्या भागाकडे जाणे अत्यंत जोखमीचे काम आहे. असे असतानाही हा मुलगा खांबावरून जात होता. घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पी.बी. चंदनखेडे यांच्यासह अनिल गोएल, अनिल बरडे, सुनील गोरडे यांच्यासह पथक घटनास्थळी मदतकार्यात जुंपली होती.

नागपुर. शहर में नालों और मलजलवाहिनियों पर भारी अतिक्रमण के चलते ही बारिश का पानी लोगों के घरों में घूसने का सबसे कारण बना हुआ है. मुसलाधार बारिश होते ही नालों के किनारे की बस्तियों में इस तरह की त्रास्दी देखी जाती है. इस विषय पर किए गए अध्ययन के अंत में नाला और मलजलवाहिनी पर अधिकांश जगह अतिक्रमण पाया गया है.

अत: ऐसे अतिक्रमणों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने के संकेत मनपा आयुक्त मुंढे ने दिए. लोगों के घरों में बारिश का पानी घूसने तथा मलजलवाहिनियां अवरूद्ध होने की लगातार शिकायतें मनपा को प्राप्त हो रही थी. शिकायतों को देखते हुए आयुक्त मुंढे और अति. आयुक्त राम जोशी के नेतृत्व में जलप्रदाय विभाग की अधीक्षक अभियंता श्वेता बैनर्जी और अन्य अधिकारियों की समिति गठित कर अध्ययन करने के निर्देश दिए गए थे. समिति की रिपोर्ट में उक्त मामला उजागर किया गया.

275 से अधिक स्थानों पर पक्के निर्माण
मुंढे ने कहा कि मलजलवाहिनियों पर अतिक्रमण शहर के लिए बड़ा सिरदर्द बना हुआ है. मलजलवाहिनियों पर पक्के निर्माण के चलते ही सुधार और सफाई का कार्य नहीं हो पाता है. इसमें कई बार अवरोध होता है. शहर में लगभग 275 से भी अधिक स्थानों पर पक्के मकानों का निर्माण, मलजलवाहिनी पर निर्माण किया गया है. बारिस के दौरान मलजलवाहिनियां अवरूध होन से गंदा पानी बाहर निकलकर लोगों के घरों में घूसता है. आलम यह है कि नालों के संदर्भ में भी इसी तरह की त्रास्दी है. नालों पर 70 से अधिक हिस्सों में पिलर्स, स्लैब, नालों के किनारे की सोसाइटी के निर्माण में बिल्डर द्वारा नालों की दीवार को ऊंचा किया गया. नालों की जगह पर कब्जा कर निर्माण किए जाने से नाले के पानी का प्रवाह अवरूद्ध हुआ है. शहर में 227 नाले है. लेकिन अब इसकी संख्या 130 रह गई है. जिससे इसके खिलाफ अब अभियान छेड़ा जाएगा. 

अतिक्रमण निकाले, अन्यथा कार्रवाई
प्राकृतिक प्रवाह को रोके जाने से बारिश का पानी लोगों के घरों में जा रहा है. जिसके लिए अतिक्रमण सबसे बड़ा कारण बना हुआ है. अत: जिन सम्पत्तिधारकों ने नालों तथा मलजलवाहिनियों पर अतिक्रमण किया है, उसे तुरंत निकालने की कार्यवाही करनी होगी. अन्यथा आपत्ति व्यवस्थापन कानून के अंतर्गत अतिक्रमण करनेवालों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की चेतावनी भी मनपा आयुक्त मुंढे ने दी.

नागपुर. कोरोना की दहशत बढ़ती ही जा रही है. मार्च से शुरू हुआ सिलसिला अब भी खत्म होने का नाम नहीं ले रहा है. इस बीच शुक्रवार को तीन और मरीजों की मौत हो गई. पिछले 16 दिनों के भीतर 19 मरीजों ने दम तोड़ दिया. वहीं 125 नये मरीजों में संक्रमण की पुष्टी हुई है. बिनाकी मंगलवारी, न्यू मंगलवारी, मानकापुर अब हॉट स्पॉट बनते जा रहे हैं. शुक्रवार को एक ही परिवार के बच्चों सहित बड़ों तक में संक्रमण पाया गया है. अब प्रशासन संपर्क में आने वालों की पहचान कर उन्हें क्वारंटाइन करने की प्रक्रिया में जुट गया है.

जिन तीन मरीजों की मौत हुई है, तीनों मेयो में ही भर्ती थे. 34 वर्षीय कामठी इमलीबाग निवासी की मौत हो गई. इसी तरह 70 वर्षीय गोलीबार चौक निवासी और 48 वर्षीय विनोबाभावे नगर निवासी की भी मौत हो गई. तीनों मरीजों को पहले निमोनिया हुआ था. बाद में उनकी रिपोर्ट कोरोना पाजिटिव आई. उक्त मौत के बाद अब माना जा रहा है कि निमोनिया के मरीजों की संख्या बढ़ने लगी है. निमोनिया में भी कोरोना जैसे ही लक्षण पाये जाते हैं. यही वजह है कि प्रशासन ने लोगों से सतर्क रहने का आहवान किया है. 

2 वर्ष से 68 वर्ष के वृद्ध का समावेश
शुक्रवार को बिनाकी मंगलवारी से 10 लोगों की रिपोर्ट पाजिटिव आई. इसी तरह बिनाकी मंगलवारी मेहदीबाग से 3, न्यू मंगलवारी से 12 और कोराडी रोड मानकापुर से 3 नये मरीज मिले हैं. वहीं खामला, श्याम नगर हुडकेश्वर रोड, काले लेआऊट अंजनादेवी मंगल कार्यालय, नंदनवन जगनाड़े चौक, जरीपटका, नाईक तालाब, ओम नगर शिवाजी चौक, लकड़गंज, शांतिनगर, निर्मल नगरी, न्यू सुभेदार ले-आऊट, माता मंदिर खामला चौक, उमंग काम्लेक्स सिविल लाइन्स, सिविल लाइन्स बंगला न 58, पांचपावली गोंडपुरा, शांति अपार्टमेंट का समावेश रहा. शुक्रवार की रिपोर्ट में 2 दो वर्ष के बच्चे, 7 और 8 वर्ष के बच्चे सहित 17 वर्ष से लेकर 68 वर्ष के वृद्ध तक पाजिटिव शामिल है. 

नागपुर. धोखाधड़ी और ब्लैकमेल करके अवैध रूप से प्रापर्टी जमाने वाले साहिल सैयद पर राष्ट्रवादी कांग्रेस और भारतीय जनता पार्टी आमने-सामने आ गई है. पूर्व मुख्यमंत्री व विपक्ष के नेता देवेन्द्र फडणवीस द्वारा साहिल के खिलाफ गहन जांच की मांग पर गृहमंत्री अनिल देशमुख ने पलटवार करते हुए साहिल को भाजपा कार्यकर्ता बताया. साथ ही लिखा कि भाजपा के कई नेताओं का बिजनेस पार्टनर भी है. हालांकि न्यायालयीन प्रक्रिया को प्रभावित करने वाली आडियो रिकार्डिंग मामले की जांच जारी है. उधर, तहसील थाने में वरिष्ठ भाजपा पार्षद दयाशंकर तिवारी द्वारा साहिल पर एक और एफआईआर दर्ज की गई. दूसरी तरफ, साहिल अब भी फरार है.

पूर्व विधायकों का करीबी
गृहमंत्री अनिल देशमुख ने अपने जवाब में फडणवीस को बताया कि साहिल के भाजपा के पूर्व विधायकों से बहुत करीबी संबंध है. उन्होंने ऊर्जा मंत्री रह चुके चंद्रशेखर बावनकुले और दक्षिण पश्चिम नागपुर के पूर्व विधायक सुधाकर देशमुख का नाम लिखा. उन्होंने कहा कि साहिल के इन दोनों के साथ काफी घनिष्ठ संबंध हैं और वह दोनो पूर्व विधायकों का बिजनेस में भागीदार भी है. यही भाजपा कार्यकर्ता अब अपनी ही पार्टी के नेताओं को हनीट्रैप करने का प्रयासा कर रहा है. यह बेहद आश्चर्यजनक बात है. दूसरी नजर में यह आपकी पार्टी का आंतरिक मामला दिखता है. हालांकि न्यायालय व्यवस्था को मैनेज करने वाली आडियो क्लीप के संबंध में जांच जारी है. 

झूठ बोल रहे गृहमंत्री, माफी मांगे : बावनकुले
साहिल को अपना बिजनेस पार्टनर बताये जाने पर चंद्रशेखर बावनकुले ने गृहमंत्री अनिल देशमुख को झूठा करार देते हुए माफी की मांग कर ली. बावनकुले ने विपक्ष के नेता फडणवी को पत्र लिखकर अपने पर लगे आरोपी का खंडन किया. उन्होंने बताया कि स्वयं गृहमंत्री द्वारा लिखित रूप से साहिल को मेरा बिजनेस पार्टनर बताया है. यह पत्र सफेद झूठ से भरा है. उन्होंने कहा कि गृहमंत्री द्वारा यह आरोप तत्काल प्रभाव से वापस लेना चाहिए. उन्होंने चुनौती देते हुए कहा कि अब या तो गृहमंत्री मेरे और आरोपी साहिल के बीच बिजनेस पार्टनरशिप का सबूत दें या फिर तुरंत माफी मांगे.

नागपुर. कोरोना संक्रमणकाल में लाकडाऊन के चलते तमाम त्रास्दियों को देखते हुए राज्य सरकार की ओर से मिशन बिगिन अगेन अंतर्गत लाकडाऊन में कुछ छूट प्रदान की. दिशा निर्देशों के अनुसार नियमों का पालन करने की शर्त पर राहत दी गई. यहां तक कि लोगों की ओर से समय-समय पर दिशा निर्देशों का पालन करने के लिए अपील भी की गई. किंतु लोगों की ओर से नियमों का पालन नहीं किए जाने से अब न केवल कोरोना मरीजों की संख्या बढ़ रही है, बल्की मृत्यु की संख्या में भी इजाफा हो रहा है. जिससे अब नियम तोड़नेवालों के खिलाफ तत्काल प्रभाव से संक्रमण रोग नियंत्रण कानून के अंतर्गत सीधे मामले दर्ज करने के निर्देश मनपा आयुक्त मुंढे ने दिए. शुक्रवार को मनपा मुख्यालय में मनपा अधिकारी और पुलिस विभाग के अधिकारियों की संयुक्त बैठक ली गई.

पुन: लाकडाऊन की नौबत से बचने की कवायद
उन्होंने कहा कि राज्य भर के कई शहरों में मरीजों की संख्या लगातार बढ़ते देख लाकडाऊन की घोषणा की जा रही है. शहर में भी इस तरह से लाकडाऊन की नौबत से बचने के लिए अब कड़ाई से नियमों का पालन करने पर मंथन किया गया. उन्होंने कहा कि मिशन बिगिन अगेन शुरू होने से पहले तक शहर में केवल 400 मरीज थे. जबकि अब यह संख्या 2100 तक पहुंच गई है. केवल डेढ माह के समय में 1700 मरीज बढ़ गए हैं. बाजारों में व्यापारियों को सख्त निर्देश देने के बावजूद इसका पालन नहीं किया जा रहा है. चर्चा के दौरान उन्होंने रात के कर्फ्यू का गंभीरता से पालन करने की अपील पुलिस विभाग से की. साथ ही यदि जनता नियमों को नजरअंदाज कर रहे हो, तो आन द स्पाट मामले दर्ज करने के निर्देश भी दिए. 

नागपुर. शहर में कोरोना के बढ़ते कहर का अंदाजा इसी बात से लगाया जा सकता है कि लगातार हर दिन अलग-अलग जोन में कई इलाकों को सील करने की प्रक्रिया मनपा की ओर से की जा रही है. आलम यह है कि अब शहर में जहां 21 परिसर को सील किया गया, वहीं सर्वाधिक हनुमाननगर जोन में 8 क्षेत्रों को प्रतिबंधित घोषित किया गया है. हनुमान नगर जोन के प्रभाग 29 और प्रभाग 31 में 3-3 परिसर सील किए गए, वहीं प्रभाग 32 में भी 2 परिसर सील करने का निर्णय लिया गया. प्रभाग 29 के नरसाला स्थित नील विहार अपार्टमेंट, इसी प्रभाग के रामभाऊ म्हालगीनगर स्वतंत्रता संग्राम कालोनी और हुडकेश्वर दुबे नगर, प्रभाग 31 स्थित चंदननगर रमाई बगीचे के पास का परिसर, पुरानी शुक्रवार, लभानतांडा परिसर और रघुजीनगर गजानन महाराज प्रवेश द्वार का परिसर, प्रभाग 32 में विश्वकर्मा नगर गली नंबर-4 का परिसर, नया सुभेदार ठवरे कालोनी परिसर सील किया गया.

गांधीबाग जोन में 4, धंतोली जोन के 3 परिसर सील
कोरोना के कहर के चलते मनपा की ओर से गांधीबाग जोन में भी 4 परिसर तथा धंतोली जोन के 3 परिसर सील किए गए. गांधीबाग जोन के प्रभाग 8 स्थित गरीबनवाज मस्जीद और मोमीनपुरा जामा मस्जीद का परिसर सील किया गया. जबकि इसी जोन के प्रभाग 22 स्थित मछली बाजार चौक, बुरूजकार राम मंदिर के सामने का परिसर एवं प्रभाग 19 स्थित ज्योतिनगर खदान परिसर को सील किया गया. इसके अलावा धंतोली जोन अंतर्गत प्रभाग 35 के ही 3 परिसर सील करने की कार्रवाई की गई. प्रभाग 35 स्थित गोकुल अपार्टमेंट, जयदुर्गा सोसाईटी नंबर-1 का परिसर, वर्धा रोड, चिंचभवन के शांति अपार्टमेंट का परिसर और पार्वती नगर का धाडीवाल लेआऊट परिसर सील किया गया. 

लकडगंज जोन के भी 2 परिसर सील
मनपा आयुक्त मुंढे के आदेशों से लकडगंज जोन अंतर्गत प्रभाग 25 स्थित पुनापुर के नवीन नगर परिसर और भांडेवाडी के समता नगर परिसर को सील किया गया. धरमपेठ जोन अंतर्गत प्रभाग 15 स्थित गोकुलपेठ में लोंढे ज्वेलर्स के पीछे का परिसर, आसीनगर जोन अंतर्गत प्रभाग 3 स्तित विनोबा भावे नगर की गली नंबर 10 का परिसर, मंगलवारी जोन अंतर्गत प्रभाग 9 में मानसरोवर टेरेस न्यू कालोनी का परिसर और सतरंजीपुरा जोन अंतर्गत प्रभाग 5 स्थित नई मंगलवारी बिनाकी का परिसर सील करने की कार्रवाई की गई.

नागपुर. राज्य शिक्षा मंडल द्वारा 12वीं का परिणाम घोषित होने के बाद अब कालेजों में प्रवेश की प्रक्रिया आरंभ हो गई. लेकिन कोरोना की वजह से छात्रों को कालेज में जाने की बजाय विवि की बजाय विवि की वेबसाइट पर रजिस्ट्रेशन करना अनिवार्य है. रजिस्ट्रेशन होने के बाद 28 जुलाई तक जिस कालेज में प्रवेश लेना है, वहां आवेदन जमा करना होगा.

विवि ने पिछले वर्ष प्रथम वर्ष प्रवेश के लिए कॉमन शेड्यूल जारी किया था. इस बार भी प्रवेश प्रक्रिया के लिए समान शेड्यूल जारी करने का निर्णय लिया गया है. पहले रजिस्ट्रेशन के बाद 31 जुलाई को मेरिट सूची जारी की जाएगी. रजिस्ट्रेशन के दौरान ही छात्रों को सभी दस्तावेज अपलोड करना होगा. इस प्रक्रिया से गुजरे बिना छात्रों को सीधे तौर पर कालेजों में प्रवेश नहीं मिलेगा. मेरिट सूची