• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, August 14, 2022
Inbcn News
  • India
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vidarbha
    • Bhandara
    • Chandrapur
    • Devri
    • Ghuggus
    • Gondia
    • Hinganghat
    • Amravati
    • Lakhni
    • Pawni
    • Yavatmal
  • JILHA
    • HINGNA
    • KAMPTEE
    • KONDHALI
    • MAUDA
    • KUHI
    • PACHKHEDI
    • PARSHIVNI
    • PAWNI/DEVLAPAR
    • RAMTEK
    • SAONER
  • Breaking News
  • English News
  • Nagpur Samachar
No Result
View All Result
  • India
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vidarbha
    • Bhandara
    • Chandrapur
    • Devri
    • Ghuggus
    • Gondia
    • Hinganghat
    • Amravati
    • Lakhni
    • Pawni
    • Yavatmal
  • JILHA
    • HINGNA
    • KAMPTEE
    • KONDHALI
    • MAUDA
    • KUHI
    • PACHKHEDI
    • PARSHIVNI
    • PAWNI/DEVLAPAR
    • RAMTEK
    • SAONER
  • Breaking News
  • English News
  • Nagpur Samachar
No Result
View All Result
Inbcn News
No Result
View All Result
Home Nagpur

महा मेट्रोच्या नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे उद्या (२० ऑगस्ट) उदघाटन , मा. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते होणार उदघाटन

नागपूर, ऑगस्ट १९: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री मा. श्री नितीन गडकरी आणि केंद्रीय गृह निर्माण, नागरी सुविधा व पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री मा. श्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते महा मेट्रो नागपूरच्या सीताबर्डी-झिरो माईल-कस्तुरचंद पार्क मार्गाचे २० ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी १२.३० वाजता उदघाटन होणार आहे. झिरो माईल पार्क मेट्रो स्टेशन येथे हा उदघाटनाचा सोहळा पार पडणार आहे |

by Team Inbcn
August 19, 2021
in Nagpur, Vidarbha
Reading Time: 1min read
0
महा मेट्रोच्या नवीन सेक्शन, फ्रिडम पार्कचे उद्या (२० ऑगस्ट) उदघाटन , मा. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते होणार उदघाटन
22
SHARES
540
VIEWS

१.६ किलोमीटर लांब या मार्गाच्या उदघाटनाअंतर्गत झिरो माईल स्टेशन आणि कस्तुरचंद पार्क स्टेशन व फ्रिडम पार्क चे देखील उदघाटन होणार आहे. मा मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री मा. श्री हरदीप सिंग पुरी. केंद्रीय राज्यमंत्री, गृहनिर्माण आणि नगर विकास, भारत सरकार (व्हिडियो लिंकद्वारे) अभ्हासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होतील. केंद्रीय मंत्री मा. श्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री मा. श्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ नितीन राऊत, पशु संवर्धन, दुग्ध व्यायसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री मा. श्री सुनील केदार, विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान सभा मा. श्री देवेंद्र फडणवीस या सोहळ्याला उपस्थित असतील. केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माण मंत्रालयाचे सचिव व महा मेट्रोचे अध्यक्ष श्री दुर्गा शंकर मिश्रा हे देखील आभासी पद्धतीने संबोधन करतील. या सोहळ्याला नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील लोक प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहतील. यात महापौर मा. श्री दया शंकर तिवारी, राज्य सभा खासदार मा. डॉ विकास महात्मे, रामटेक लोक सभा मतदार संघाचे खासदार मा. श्री कृपाल तुमाने, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य मा. श्री नागो गाणार, मा. श्री गिरीश व्यास, मा. श्री प्रवीण दटके, मा. श्री अभिजित वंजारी, तसेच महाराष्ट्र विधान सभा सदस्य मा. श्री अनिल देशमुख, मा. श्री कृष्णा खोपडे, मा. श्री विकास कुंभारे, मा. श्री मोहन मते, मा. श्री विकास ठाकरे, मा. श्री समीर मेघे, मा. श्री आशिष जैस्वाल, मा. श्री राजू पारवे आणि मा.श्री टेकचंद सावरकर.

• सीताबर्डी-कस्तुरचंद पार्क मार्गिका
या मार्गिकेवरील मेट्रो प्रवास सुरु झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठी निकड पूर्ण होईल आणि अतिशय गर्दीचे ठिकाण असलेले भाग जोडेल जातील. रोज सुमारे ५०,००० प्रवाश्यांना या माध्यमाने प्रवास करता येईल. हा मार्ग शहरातील अतिमहत्वाच्या वास्तू आणि कार्यालयांना जोडतो, जसे विधान भवन (महाराष्ट्र विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सर्वात वर्दळीची वास्तू), भारतीय रिझर्व्ह बँक, केंद्रीय संग्रहालय, संविधान चौक आणि मॉरीस कॉलेज.

• झिरो माईल फ्रिडम पार्क स्टेशन:
नागपुरात स्थापत्य कलेचे उत्कृष्ट उदाहरण असलेले हे झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन निर्माण करण्याची प्रेरणा शहरातील हेरीटेज स्मारक असलेल्या झिरो माईल स्मारकामुळे मिळाली आहे. तत्कालीन ब्रिटिश सरकारने १९०७ मध्ये संपूर्ण देशात ग्रेट ट्रिग्नॉमेट्रिकल सर्व्हे केला होता. या सर्वेक्षणातून निघालेल्या निष्कर्षा नंतर झिरो माईल स्मारकाचे निर्माण झाले आहे. हे स्मारक मेट्रो स्थानकाच्या जवळ आहे. झिरो माईल स्टेशन नागपूर मेट्रो प्रकल्पाची अतिशय महत्वाची आणि तितकीच अनोखी वास्तू असेल. हे देशातील अश्या प्रकारचे पहिले मेट्रो स्थानक असेल जे एका भव्य २० मजली इमारतीचा भाग असेल आणि ज्याच्या चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेन अवागमन करेल.

या इमारतीत दोन मजले वाहन तळाकरता राखीव असतील. चौथ्या मजल्यावरून मेट्रो ट्रेनचे आवागमन होईल आणि त्यावरचे मजले पीपीपी तत्वावर व्यावसायिक वापरकरता बांधले जातील. प्लॅटफॉर्मवरून असलेल्या लिफ्टच्या माध्यमाने प्रवाश्यांना व्यावसायिक कामाकरता बांधलेल्या मजल्यांवर जाता येते. या स्थानकावर फ्लोटिंग ट्रॅक स्लॅब टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे, ज्यामुळे आवाज आणि कंपन कमी होण्यास मदत मिळेल. या नवीन तंत्रज्ञानामुळे फ्रिडम पार्क स्टेशन हे देशातील एकमेव मेट्रो स्थानक असेल. या स्थानकावर चौथ्या मजल्या पर्यंत कोन्कोर्स भागात किरकोळ विक्री करता प्रशस्त गाळे निर्माण केले जातील ज्यामुळे महा मेट्रोला अतिरिक्त नॉन-फेयर बॉक्सच्या स्वरूपात महसूल प्राप्त होईल.

• कस्तुरचंद पार्क स्टेशन:
कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन, नागपूरच्या कस्तुरचंद पार्कच्या शेजारी आहे. नागपुरातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी हे एक आहे. येथे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात. या ठिकाणी विविध प्रदर्शन, व्यापारा संबंधी मेळावे, खेळांच्या स्पर्धा आणि इतर तत्सम कार्यक्रम होत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे येणे-जाणे होते. कस्तुरचंद पार्कची स्थापत्य कला पारंपरिक राजपूत पद्धतीने साकारली असून कस्तुरचंद पार्क मेट्रो स्थानकाचा दर्शनी भाग आणि त्याची स्थापत्य कला याच धर्तीवर साकारली आहे. हे स्थानक सदर बाजारपेठेच्या अतिशय जवळ आहे, जेथे मोठ्या प्रमाणात दुकाने, हॉटेल, खानावळ आणि इतर व्यावसायिक महत्वाचे स्थान आहेत

राजपूत स्थापत्य कलेचे सांकेतिक भाग जसे छत्री, तोरण, राजपूत जाळी, कॉलमवरील नक्काशी मेट्रो स्थानकात दर्शवल्या गेली आहे. यामुळे शहरात एक अनोखी वास्तू निर्माण होण्यास मदत मिळाली आहे. हे स्थानक संविधान चौकाच्या अतिशय जवळ आहे, जथे विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रम सातत्याने होत असतात. कस्तुरचंद पार्क स्थानक अतिशय गजबजलेल्या सिव्हील लाईन्स भागाजवळ स्थित आहे. या भागात विधान भवन, भारतीय रिझर्व्ह बँक, सारखे महत्वाचे शासकीय कार्यालय आहेत. या भागातील नागरिकांची वर्दळ बघता या भागात मेट्रो मार्गीका झाल्यावर येथील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

• फ्रीडम पार्क:
देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने, झिरो माईल स्थानकाच्या भोवताली ४०,००० चौरस फुट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले असून या स्थानकाचे नाव आता झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन ठेवले आहे. अतिशय अनोख्या पद्धतीने साकार केलेल्या या पार्क म्हणजे नागरी भागातील लँडस्केपिंगचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यात पब्लिक प्लाझा, हिस्ट्री वॉल सारख्या अनोख्या संकल्पना राबवल्या आहेत. उयुद्धात वापरलेला T -५५ रणगाडा देखील येथे नागपूरकरांना बघता यावे म्हणून स्थापित केला आहे. फ्रिडम पार्कच्या आत डाव्या बाजूला अँफी थियेटर आहे. येथील हिस्ट्री वॉल शाहिद स्मारक पर्यंत आहे.

या शिवाय येथे तीन आर्चेस ऑफ ग्लोरी देखील येथे साकारल्या आहेत. १८५७ ते १९४७ दरम्यान स्वातंत्र्य युद्धातील परमौख घटना यात साकारल्या आहेत. या शेजारी एक छोटासा त्री-स्तरीय धबधबा आहे, जो तिरंगाच्या स्वरूपात चमकतो. त्याच्या बाजूला ‘#NAGPURMETRO’ हे अतिशय आखीव-रेखीव चित्र आहे. येथील अँफीथियेटर मध्ये विविध सांस्कृहतक, ऐतिहासिक किंवा अन्य कुठल्याही विषयावर कार्यक्रम सादर करता येतात. नागपूरशी संबंधित स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धापासून तर १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाया पर्यंतच्या काळातील विविध घडामोडी हिस्ट्री वॉलच्या माध्यमाने साकारल्या आहेत.

Related Posts

खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो  93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज
Nagpur

खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो 93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज

August 9, 2022
हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान
Nagpur

हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान

August 9, 2022
राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि –  पंचभाई
Nagpur

राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि – पंचभाई

August 9, 2022
रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर
Nagpur

रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर

August 9, 2022
मेधावी छात्रों को किया समान्नित
Vidarbha

मेधावी छात्रों को किया समान्नित

August 9, 2022
वणा नदी में आई तीसरी बार बाढ़   प्रशासन ने दिया सर्तकता का इशारा
Vidarbha

वणा नदी में आई तीसरी बार बाढ़ प्रशासन ने दिया सर्तकता का इशारा

August 9, 2022

Stay Connected

  • 12.9k Fans
  • Trending
  • Comments
  • Latest
inbcn news

सेक्स रैकेट में मिली भोजपुरी फिल्म की आइटम गर्ल

April 10, 2021
inbcn

शहर के तीन वार्ड कंटेनमेंट झोन में

April 7, 2021
inbcn

मानसिक तनाव को दूर करने के बहाने बनाये अनैतिक शारारिक संबंध 

March 30, 2021
hinganghat

शहर के प्रसिध्द कपडा दुकानदार घर पें दुकान चलाते पकडे गये

April 15, 2021

महापौर को न्याय, समिति पर अन्याय

0
inbcn news

 हार्डवेयर की दुकान में शार्ट सर्किट के वजह से लगी आग   

0

सावनेर शहरपर मंडराया बर्डफ्लू का खतरा

0

मराठा युवक का आत्महत्या का प्रयास

0
खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो  93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज

खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो 93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज

August 9, 2022
हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान

हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान

August 9, 2022
राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि –  पंचभाई

राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि – पंचभाई

August 9, 2022
रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर

रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर

August 9, 2022

Recent News

खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो  93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज

खिंडसी जलाशय भी हो सकता हैं ओव्हरफ्लो 93 प्रतिशत स्टॉक, रामटेक तहसील में 85 प्रतिशत बारिश दर्ज

August 9, 2022
हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान

हर हर शंभु के जयघोष से गूंजा कन्हान

August 9, 2022
राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि –  पंचभाई

राज्य में शिंदे- फडणवीस सरकार स्थापना होते ही अपराध में भारी वृद्धि – पंचभाई

August 9, 2022
रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर

रनाला नाग मंदिर जीर्णोद्धार का कार्य प्रगति पर

August 9, 2022
Inbcn News

INBCN NEWS 24x7 Digital News , It is central india news channel , My channel is politics, Sports, Bollywood, Crimes, Fashion & Interview , Advertisement, Etc InBcn News watching up Channel No : 746 Its inDigital set top box

Follow Us

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2021 INBCN - Powered by FTS.

No Result
View All Result
  • India
  • Maharashtra
  • Nagpur
  • Vidarbha
    • Bhandara
    • Chandrapur
    • Devri
    • Ghuggus
    • Gondia
    • Hinganghat
    • Amravati
    • Lakhni
    • Pawni
    • Yavatmal
  • JILHA
    • HINGNA
    • KAMPTEE
    • KONDHALI
    • MAUDA
    • KUHI
    • PACHKHEDI
    • PARSHIVNI
    • PAWNI/DEVLAPAR
    • RAMTEK
    • SAONER
  • Breaking News
  • English News
  • Nagpur Samachar

© 2021 INBCN - Powered by FTS.