loader
Foto

मंगळ मोहिमेची चीनकडून घोषणा...

बीजिंग: एकीकडे चीनमधून फैलाव झालेल्या करोनामुळे संपूर्ण जग चिंतेत असताना दुसरीकडे चीन मात्र, पुन्हा 'रुळावर' येताना दिसत आहे. चीनने मंगळावर स्वारीचे नियोजन सुरू केले असून, शुक्रवारी चीनने या मोहिमेचे नाव जाहीर केले. पुढील वर्षी प्रत्यक्षात येणाऱ्या चीनच्या मंगळ मोहिमेचे नाव 'तिआनवेन १' असे असणार आहे.
चीनने आपला पहिला उपग्रह 'डाँग फेंग हों-१' अवकाशात पाठवला त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ही घोषणा करण्यात आली. हा दिवस चीनकडून 'स्पेस डे' म्हणून साजरा केला जातो. भारत, अमेरिका, रशिया आदी देशांनंतर आता चीनची मंगळ मोहीम महत्त्वाकांक्षी असल्याचे म्हटले जाते.

'चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन'ने याबाबत अधिकृत घोषणा केली. 'तियानवेन' असे नाव या मोहिमेला दिले आहे. चीनमधील प्रसिद्ध कवी क्व युआन यांच्या कवितेवरून 'तियानवेन' असे नाव देण्यात आले आहे. 'स्वर्गाला विचारलेले प्रश्न' असा तियानवेन या शब्दाचा अर्थ आहे. या कवितेत युआन यांनी आकाश, तारे, नैसर्गिक घटना, विविध मिथके, वास्तव या सर्व बाबींवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. काही पारंपरिक कल्पना आणि सत्याचा शोध याचाही या कवितेत उहापोह झाला आहे. मंगळ मोहिमेची आखणी करताना या कवितेच्या संदर्भाने मोहिमेला नाव देण्यात आले आहे.

जिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या यापुढील सर्व अवकाश मोहिमांची नावे 'तियानवेन' या साखळीतीलच असतील. सत्य आणि विज्ञानाची कास धरत असनाता ब्रह्मांडाचा शोध घेण्याचा विचार असल्याचे सांगण्यात येते.

Recent Posts