loader
Foto

चीनने पहिल्यांदा सांगितले, गलवानमध्ये भारताने किती सैन्य ठार केले!

बीजिंग: लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारत-चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तर, चीनने अधिकृतपणे त्यांचे किती सैन्य ठार झाले, याची माहिती जाहीर केली नव्हती. तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीत चीनने भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या सैनिकांची माहिती दिली आहे.

गलवान खोऱ्यातील संघर्षात चीनचे पाच सैन्य ठार झाले असल्याची बाब चीनने मान्य केली आहे. 'द हिंदू'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात ठार झालेल्या पाच चिनी सैन्यांमध्ये एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश आहे. याआधी चीनने फक्त एकच सैनिक ठार झाला असल्याचे मान्य केले होते. चीनकडून फक्त पाच सैनिक ठार झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी भारतीय आणि अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्यानुसार, ४० चिनी सैन्य ठार झाले आहेत. देशात असंतोष निर्माण होऊ नये यासाठी चीनकडून सातत्याने माहिती लपवली जात होती.

याआधी चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'चे संपादक हू झिजिन यांनी सांगितले की, गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान ठार झाले. मात्र, त्या तुलनेत चीनचे कमी सैनिक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याशिवाय चीनच्या सैनिकांनी काही भारतीय सैनिकांना ताब्यात घेतले होते. तर, भारताच्या ताब्यात एकही चिनी सैन्य नव्हता असेही त्यांनी म्हटले. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांनीच चिनी सैन्यावर हल्ला केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Recent Posts