loader
Foto

करोना: जिनपिंगवरील टीका भोवली? अब्जाधीशाला १८ वर्षाचा तुरुंगवास

बीजिंग: करोना संसर्गाच्या मुद्यावरून चीनचे राष्ट्रापती शी जिनपिंग यांच्यावर टीका करणे एका उद्योजकाला महागात पडल्याची चर्चा सुरू आहे. एका सरकारी रिअल इस्टेट कंपनीच्या माजी अध्यक्ष आणि उद्योजक रेन झिकियांग यांना १८ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले होते.

रेन झिकियांग यांनी कोट्यवधी डॉलरची रक्कम लाच म्हणून स्वीकारली असल्याचे त्यांच्यावर आरोप होतो. रेन यांना बीजिंगमधील कोर्टाने १८ वर्षाच्या तुरुंगवासासह सहा लाख २० हजार डॉलरचा दंड ठोठावला. रेन यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे कोर्टाने म्हटले. रेन यांच्याजवळ बेहिशोबी मालमत्ता आढळली होती.

अमेरिकन वृत्तवाहिनी 'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले जाते. त्याशिवाय प्रसारमाध्यमांवरही नियंत्रण ठेवण्यात आले असून अन्य संवेदनशील विषयांवर परखड मत मांडणारा रेन झिकियांग यांचा एक लेख ऑनलाइन प्रकाशित झाला होता. या लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ते सार्वजनिकरीत्या दिसले नाहीत. या लेखामध्ये रेन यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. डिसेंबरमध्ये सुरू झालेला करोनाचा संसर्ग रोखण्यास त्यांना अपयश आले असल्याची टीका त्यांनी केली होती.

Recent Posts