loader
Foto

करोना: भारतीय महिला शास्त्रज्ञाने विकसित केली लस; ऑस्ट्रेलियात चाचणी सुरू

जगभरात करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. काही देशांकडून लस विकसित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून काहींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापक सुमी विश्वास यांनी करोनाला अटकाव करणारी एक लस विकसित केली आहे. या लशीची चाचणी ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये होत आहे.

प्रा. सुमी विश्वास यांनी २०१७ मध्ये ब्रिटनमध्ये स्पाई बायोटेक नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या कार्यरत आहेत. सुमीविश्वास यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. या जेनर इन्स्टिट्यूटने एस्ट्राजेनकासोबत करोनावर लस विकसित केली आहे.

प्रा. सुमी विश्वास यांच्या स्पाई बायोटेकने विकसित केलेल्या लशीची मानवी चाचणी सुरू आहे. ऑस्ट्रेलियात या लशीची चाचणी सुरू आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही चाचणी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने संचलित केली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटसोबत सुमी विश्वास यांच्या स्पाय बायोटेक कंपनीने लस उत्पादनाबाबतचा करार केला आहे.

Recent Posts