loader
Foto

भारतावर अणूबॉम्ब टाकू; पाकच्या वाचाळवीर मंत्र्याची धमकी

पाकिस्तानमधील वाचाळवीर रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अहमद यांनी भारताला थेट अणूबॉम्ब हल्ल्याची धमकी दिली आहे. आता भारतासोबत छोटे युद्ध होणार नाही, तर थेट अणूबॉम्बनेच हल्ला करण्यास पाकिस्तान सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. याआधीही शेख रशीद अहमद यांनी भारताविरोधात गरळ ओकली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेख रशीद यांनी जागतिक राजकारणावरही भाष्य केले. चीनच्या विरोधात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटन हे देश उभे आहेत. तर, चीन नवा मित्र नेपाळ, श्रीलंका, इराण, रशिया या देशांसोबत एकत्र येत आहे. पाकिस्तानलाही चीनसोबत उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे त्यांनी म्हटले, आता भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास छोटी लढाई, युद्ध वगैरे होणार नाही. आता थेट शेवटची लढाई होईल. पाकिस्तानचे शस्त्र अगदी योग्य ठिकाणी हल्ला करण्यास सक्षम आहे. पाकिस्तान भारताच्या आसामपर्यंतही हल्ला करण्यास सक्षम आहे. त्यामुळे भारतासोबत आता थेट अणूयुद्धच होईल अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

Recent Posts