loader
Foto

काय सांगता...ऑफिसपेक्षा घरातून करोनाचा अधिक संसर्ग!

करोनाच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केला. दोन-महिन्यानंतर लॉकडाउनचे निर्बंध शिथील केल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, करोनाचा संसर्ग हा कार्यालयातून नव्हे तर घरातूनच होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी हा दावा केला आहे.

हँकॉक यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसचा (NHS)हवाला दिला आहे. NHS ने केलेल्या चाचणीनुसार, अनेकजणांना एका घरातून दुसऱ्या घरात जात असल्यामुळे करोनाची बाधा होत आहे. ब्रिटनमध्ये करोनाचा संसर्ग फैलावण्याचे मुख्य कारण हे घरातून होणारा संसर्ग आहे. घराच्या तुलनेत कामाच्या ठिकाणी बाधित झालेल्यांची संख्या कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

जगभरात आतापर्यंत दोन कोटी २७ लाख २० हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, सात लाख ९३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये तीन लाख २२ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ४१ हजार ४०३ जणांचा मृ्त्यू झाला आहे. करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. किमान सहा लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. मात्र, त्यावरही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Recent Posts