loader
Foto

Coronavirus करोनाने चिंता वाढवली; जगभरात भारतात एका दिवसांत सर्वाधिक मृत्यू

जिनिव्हा: संपूर्ण जगाला वेठील धरणाऱ्या करोनाबाबत धक्कादायक आकडेवारी येत आहे. मागील काही दिवसांमध्ये भारतात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता भारतात मृतांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. एकाच दिवसांत सर्वाधिक मृतांची संख्या भारतात नोंदवण्यात आली आहे. तर, अमेरिकेत दुसऱ्या क्रमाकांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे.

मंगळवारी ११ ऑगस्ट रोजी जगात एकाच दिवसात सर्वाधिक करोनाबाधितांचे मृत्यू हे भारतात नोंदवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट रोजी ८७१ जणांचा मृत्यू नोंदवण्यात आला. तर, अमेरिकेत मंगळवारी ५५८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये ५७२ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याशिवाय मंगळवारी भारतात ५३ हजार ६०१ नवीन करोनाबाधित आढळले. तर, अमेरिकेत ४७ हजार ९६४ आणि ब्राझीलमध्ये २३ हजार १० नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान भारतात इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मागील आठ दिवसांत भारतात सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. चार ऑगस्ट रोजी अमेरिकेत ४७ हजार १८३ करोनाबाधित आढळले तर भारतात ५२ हजार बाधित आढळले होते. पाच ऑगस्ट रोजी अमेरिकेत ४९ हजार १५१ आणि ब्राझीलमध्ये १६ हजार ६४१ बाधित आढळले. तर, भारतात ५२ हजार ५०९ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. सोमवारी १० ऑगस्ट रोजीदेखील अमेरिकेत ५३ हजार ८९३ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. ब्राझीलमध्ये ४९ हजार ९७० करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. भारतात ६२ हजार ६४ नवीन करोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

दरम्यान, दरम्यान, करोनाला अटकाव करणारी लस विकसित झाल्यानंतर करोना लगेच जाईल अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच स्पष्ट केले आहे.करोनाची लस ही जादूची लस नसणार. त्यामुळे करोनाविरोधात सर्वांना एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी म्हटले होते.

Recent Posts