loader
Foto

coronavirus करोना: चीनने सैनिकांना टोचली लस; जगाला मात्र प्रतिक्षा!

 करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या लशींकडे जगाचे लक्ष लागले आहे. करोनाची लस विकसित झाल्यानंतर पहिल्यांदा आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचा विचार अनेक देशांची सरकार करत आहेत. तर, दुसरीकडे चीनने आपल्या सैनिकांना करोना प्रतिबंधक लस देणे सुरू केले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या मदतीने विकसित केलेली लस सैनिकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

'फायनान्शियल टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये नागरीक व सैन्यासाठी बनवण्यात आलेल्या तंत्रज्ञानाचा वापर एकमेकांसाठी करणे ही सामान्य बाब आहे. राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या कार्यकाळात याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. करोना संसर्गाच्या काळात सैन्य व नागरीक यांच्यात संयुक्तपणे महासाथीच्या आजाराविरोधात अधिक कार्यक्रम घेण्यात आले. कॅनबरामधील चायना पॉलिसी सेंटरचे संचालक अॅडम नी यांनी सांगितले की, चिनी सैन्यातील जवानांमध्ये जैविक आणि संसर्गजन्य आजाराशी लढण्याची क्षमता आहे. त्याचाच फायदा चीनचे सत्ताधारी घेत आहेत. एका बाजूला तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला चीनने सरसकट लष्करातील जवानांना लस देण्यास सुरुवात केली आहे.

अॅडम यांनी सांगितले की, CanSinoची करोना प्रतिबंधक लस ही चिनी सैन्यासह संयुक्तरीत्या विकसित करण्यात आली आहे. CanSinoने लस चाचणी आणि लस उत्पादित करण्याच्या क्षमतेमुळे अमेरिकेची मॉडर्ना फायजर, क्योरवॅक आणि अॅस्ट्राजनेका यांना लस स्पर्धेत मागे सोडले आहे. चिनी सैन्याच्या मेडिकल सायन्स प्रमुख चेन वेई यांनी CanSinoची लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. चीन वगळता इतर कोणत्याही देशांने प्रायोगिक तत्वावर लस आपल्या सैन्यांला दिली आहे. अॅडम यांनी सांगितले की, चीनचे लष्कर देशासाठी बलिदान देण्यास कायम सज्ज आहेत, हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. त्याशिवाय, या लशीच्या साइड इफेक्टमुळे कोणी दगावल्यास त्याची माहिती समोर येण्याची शक्यताही धुसर असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts