loader
Foto

Coronavirus काळजी घ्या...'या' वयोगटातील बालकांकडून करोना संसर्गाचा धोका अधिक!

वॉशिंग्टन: करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले असताना करोनाच्या विषाणूवर संशोधन सुरू आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनातील निष्कर्ष हे काळजी वाढवणारे आहेत. पाच वर्षाखालील बालके हे इतर वयोगटातील बालके, वयस्कर नागरिकांच्या तुलनेत करोना व्हायरसचे मोठे वाहक ठरू शकतात. या वयोगटातील बालकांमध्ये करोना विषाणूची जेनेटिक मटेरियल १० ते १०० पटीने अधिक असतात.

JAMA पीडियाट्रिक्सने केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नर्सरी आणि शाळा सुरू करण्यासाठी आग्रही असतानाच हा संशोधन अहवाल समोर आला आहे. २३ मार्च ते २७ एप्रिल दरम्यान शिकागो येथील रुग्णांची नोजल स्वॅबच्या आधारे हे संशोधन करण्यात आले. या बाधितांमध्ये एक आठवड्यांपासून करोनाची लक्षणे होती. करोनाबाधितांची तीन गटात विभागणी करण्यात आली. यामध्ये पाच वर्षाखालील बालके ४६ होती. तर, ५१ बालकांचे वय हे ५ ते १७ वर्षादरम्यान होते. १८ ते ६५ या वयोगटातील ४८ करोनाबाधित होते.

एन अॅण्ड रॉबर्ट एच लुरी चिल्ड्रेन हॉस्पिटलचे डॉक्टर टेलर हिल्ड सर्जेंट यांच्या नेतृत्वात संशोधन करण्यात आले. लहान मुलांच्या श्वसननलिकेत SARS-CoV-2 च्या विषाणूचे प्रमाण १० ते १०० पटीने अधिक होते. त्याशिवाय, जेनेटिक मटेरियलच प्रमाणचे जेवढे अधिक असेल तेवढाचा करोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका अधिक असतो.

लहान मुले हे करोना संसर्गाचे महत्त्वपूर्ण वाहक आहेत. याआधी लहान मुले करोनाच्या आजाराने गंभीर आजारी होतात आणि त्यांना संक्रमणाचा धोका नसतो, असेही काही संशोधनात आढळले होते. मात्र, या संशोधनातील दावा त्याच्या अगदी उलट आहे. त्याशिवाय या संशोधनाची अधिक चिकित्सा झालेली नाही.

Recent Posts