loader
Foto

ट्रम्प यांची चीनसोबत भारतावरही टीका; सांगितले 'हे' कारण!

वॉशिंग्टन: चीनविरोधात भारताला साथ देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता चीनसोबत भारतावरही टीका केली आहे. ग्लोबल वार्मिंगच्या मुद्यावर ट्रम्प यांनी रशिया, चीनसह भारतावर टीका केली आहे. भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ट्रम्प यांनी पॅरिस करारावरही टीका करत अमेरिकेने यातून बाहेर पडण्याचे समर्थन केले.

ट्रम्प यांनी म्हटले की, पॅरिस करारावर अंमल केला असता तर अमेरिका हा स्पर्धक देश राहिला नसता. अमेरिकेच्या विकासावर याचा परिणाम झाला असता. अनेक अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या, उद्योग, कारखाने हे चीनमध्ये अथवा इतर देशांमध्ये गेले असते. अमेरिकेने आपल्या हवेच्या दर्जाकडे लक्ष द्यावे. मात्र, स्वत:च्या देशातील हवेच्या दर्जाकडे चीन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतानेही आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले आहे. रशियाही याच मार्गावरून चालत असून फक्त अमेरिकाच आपल्या देशातील हवेच्या गुणवत्तेकडे लक्ष देत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. पॅरिस करारामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाले असते. अब्जावधी रुपये रक्कम दंड भरण्यासाठी द्यावी लागली असती असे त्यांनी सांगितले.

Recent Posts