loader
Foto

सावत्र मुलापासून दिवस गेले, आता बांधली त्याच्याशी लगीनगाठ

मॉस्को: काही प्रेमप्रकरणांची जगभरात चर्चा होते असते. त्याला वेगवेगळी कारणे असतात. सध्या असंच एक प्रेमप्रकरण चर्चेत आहे मात्र, त्याच कारण चक्रावणारे आहे. रशियात धक्कादायक प्रकार समोर आला. एका आईचा आपल्याच मुलावर जीव जडला. मुलापासून दिवस गेल्यानंतर दोघेही विवाह बंधनात अडकले आहेत.

सध्या या दोघांच्या प्रेम प्रकरणाची आणि लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मुलाचे व्लामदिमीर असून त्याचे वय २० वर्ष आहे. तर, ३५ वर्षीय मरिना ही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. मरिनाचे लग्न व्लामदिमीरचे वडील अलेक्स यांच्यासोबत झाला होता. त्यावेळेस अलेक्स यांचा मुलगा व्लादिमीर हा सात वर्षांचा होता. त्यावेळेस मरिनाचे वय २२ वर्ष होते. काही वर्षांपूर्वी अलेक्स आणि मरिना यांचा घटस्फोट झाला होता. आता मरिना ही ३५ वर्षांची असून व्लादिमीर हा २० वर्षांचा असून सध्या तो शिक्षण घेत आहे. मरिना ही मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणून प्रसिद्ध आहे.

अलेक्सी आणि मरिना यांच्यातील घटस्फोटाचे कारण व्लादिमीर असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. मरिना आणि व्लादिमीर यांच्यात प्रेमसंबंध सुरू असल्याची कुणकुण अलेक्सीला लागली होती. त्यानंतर त्यांना एकांतात पाहिल्यानंतर अलेक्सीने मरिनाला काही वर्षापूर्वी घटस्फोट दिला. मरिना सध्या गरोदर असून काही महिन्यातच व्लादिमीर आणि मरिना बाळाचे पालक होणार आहेत. मरिनाने नोंदणीकृत लग्न केल्यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Recent Posts