loader
Foto

Donald Trump मास्क वापरण्यास नकार देणाऱ्या ट्रम्प यांनी मास्क घातला!

वॉशिंग्टन: अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून तज्ञांनी मास्क घालण्याचे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाला धुडकावून लावणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मास्क वापरावाच लागला. जवळपास चार महिन्यानंतर ट्रम्प यांनी मास्क वापरला.

शनिवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी रुग्णालयाला भेट दिली. या दौऱ्याच्या वेळी त्यांनी मास्क वापरला होता. ट्रम्प यांनी यावेळी उपचारासाठी दाखल असलेले आणि करोनाबाधित सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली. वॉशिंग्टन येथील एका उपनगरीय भागात हे रुग्णालय आहे. व्हाइट हाउसमधून निघताना ट्रम्प यांनी मास्क वापरला नव्हता. मात्र, वॉल्टर रीड हॉलवेमध्ये आल्यानंतर ट्रम्प यांनी मास्क घातला. रुग्णालयात असताना मास्क घालायला हवा, असे ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 

अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर ट्रम्प यांनी सुरुवातीच्या टप्प्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे आरोप करण्यात आला होता. काही राज्यांच्या राज्यपालांनी लॉकडाउनच्या निर्णयाला ट्रम्प यांनी विरोध केला होता. त्यानंतर करोनाचा संसर्गापासून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याचा आवाहनाला गांभीर्याने घेतले नव्हते. मास्क घातल्यास आपण अमेरिकन अभिनेत्यासारखं दिसू असं म्हणत त्यांनी हा विषय थट्टेचा केला असल्याचा आरोप करण्यात आला होता. अमेरिकेत करोनाचा सर्वाधिक फैलाव झाला असून ३० लाख नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. तर, एक लाख ३० हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून २९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या माहितीनुसार वैद्यकीय प्रक्रियेच्या माध्यमातून पाच मायक्रॉनहून लहान थेंब अथवा एरोसोल तयार झाले, तरच या विषाणूचा हवेतून प्रसार शक्य आहे. मास्कचा वापर, सुरक्षित वावर आणि सतत हात धुणे ही काळजी घेतली तर करोना विषाणूपासून दूर राहता येणे शक्य आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. मात्र, विषाणू हवेतून पसरत असेल, तर गर्दीची ठिकाणे, कोंदट असलेल्या बंद जागा येथे सर्वाधिक धोका असू शकतो. बंद जागेतही मास्क घालणे आवश्यक ठरते.

Recent Posts