loader
Foto

चीनकडून सुरू आहे 'ही' तयारी; भारतानेही कंबर कसली

स्टॉकहोम: जगात महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनकडून आणखी एक मोठे पाऊल उचलले जात आहे. चीन अतिशय वेगाने आपल्याकडील अणवस्त्राचा साठा वाढवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे चीन आता पहिल्यांदा जमीन, हवा आणि समुद्रातून डागण्यात येणाऱ्या अणवस्त्रांची निर्मिती करत आहे. तर, दुसरीकडे भारतानेही पाकिस्तान आणि चीनच्या दुहेरी आव्हानांचा सामना करण्यासाठी कंबर कसली असून अणवस्त्रांची संख्या वाढवत आहे.

जगभरातील अणवस्त्रांबाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था सिप्रीच्या या ताज्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. भारत आणि चीनने मागील वर्षीच आपल्या अणवस्त्रांच्या साठ्यात वाढ केली असल्याचे या अहवालात म्हटले आहे. भारताकडील अणवस्त्रांची संख्या ही चीनच्या तुलनेत निम्मी आहे. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे १५० आणि चीनकडे ३२० पाकिस्तानकडेही भारताच्या तुलनेत अधिक अणूबॉम्ब असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडे १६० अणूबॉम्ब आहेत. पाकिस्तानकडे भारताच्या तुलनेत अधिक अणवस्त्र असली तरी भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या अणवस्त्रविरोधी क्षमतेवर विश्वास आहे. भारत आणि चीनदरम्यान सीमाप्रश्नी तणाव वाढल्यानंतर सिप्रीचा हा अहवाल समोर आला आहे.
 

Recent Posts