loader
Foto

क्रूरपणाचा कहर! पर्यटकांच्या सेल्फीसाठी छाव्याचे पाय तोडले

मॉस्को: समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना फोटो काढण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी एका सिंहाच्या छाव्याचे पाय तोडले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमानवीय घटनेची राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनीदेखील दखल घेतली असून तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काही आठवड्यांचाच हा छावा असून त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला त्याच्या आईपासून दूर करण्यात आले.

डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, सिंबा नावाच्या या छाव्याची प्रकृती ढासळत चालली होती. दोन्ही पायांना गंभीर इजा झाल्यामुळे त्याला उठता येत नाही. सिंबाच्या मणक्याला गंभीर जखम झाली असून आणि त्याला अनेक दिवस उपाशी ठेवण्यात आले असल्याचे या छाव्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या युलिया अगिवा यांनी दिली. अनेकदा वन्य प्राण्यांची हाडे मोडली जातात. जेणेकरून हे पर्यटकांना पाहून पळून जाता कामा नये. सिंबावर उपचार करण्यात येत असून अजूनही त्याच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली नसल्याची माहिती आहे.

राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना इकॉलॉजिस्टसोबत झालेल्या बैठकीत या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Recent Posts