loader
Foto

धोका वाढला! करोनातून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा 'करोना'

करोना संक्रमणाच्या वेगात गेल्या काही दिवसांत कमालीची वाढ झालेली दिसून येतेय. अशा वेळी दिल्ली आणि मुंबईतून करोना संबंधी धक्कादायक अशी माहिती समोर येतेय. नोएडा आणि मुंबईमध्ये करोनातून बरे झालेले काही रुग्ण पुन्हा एकदा करोना संक्रमित असल्याचं आढळलं आहे. यामध्ये नोएडाच्या दोन तर मुंबईच्या चार आरोग्यसेवेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दिल्लीतल्या सीएसआयआरच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी'च्या (IGIB) संशोधनात हा खुलासा झालाय.

दिल्लीच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिमोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी'च्या संशोधनात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, नोएडाच्या एका रुग्णालयातील दोन आरोग्यसेवा कर्मचारी पुन्हा एकदा संक्रमित आढळले. दुसऱ्यांदा संक्रमण आढळलेलं हे देशातील पहिलंच प्रकरण असू शकतं.

दिलेल्या माहितीनुसार, IGIB च्या टीमनं मुंबईच्या ४ आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा करोना संक्रमण आढळल्याचं म्हटलंय. यातील तीन जण मुंबई सेंट्रल भागातील नायर रुग्णालयाचे तर माहिमच्या हिंदुजा हॉस्पीटलशी निगडीत असल्याचं समोर आलंय. मुंबईतील हे परिणाम सहा दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय मेडीकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले होते.

Recent Posts