loader

Maharastra News

कोल्हापूर: चार महिन्यानंतरही लॉकडाऊन हटत नसल्याने दक्षिण महाराष्ट्रातील फाउंड्री उद्योगासमोरील संकट अधिक गडद होत आहे. यामुळे तब्बल १५०० कोटीचा दणका बसला आहे. परदेशातील निर्यातीचा वाढलेला खर्च, मागणीत झालेली घट, न मिळणारा कच्चा माल आणि परप्रांतीय मजूरांची कमतरता यामुळे हा उद्योग ‘लॉक’ झाला आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक या शहरातील कडक लॉकडाऊनचा मोठा फटका या उद्योगाला बसला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यातून परदेशासह देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात निर्यात होते. यामध्ये वाहनांचे सुटे भाग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, साखर, गूळ,सूत, गारमेंट, हळद, शेती औजारे, भाजीपाला, फुले, फळे यांचा समावेश आहे. वर्षाला आठ हजार कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात होते. मार्चपासून या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दोन महिने ही निर्यात पूर्णपणे बंद होती. त्यानंतर ती काही प्रमाणात सुरू झाली आहे. सध्या मालवाहतूक व इतर दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सुट्या भागांना फारशी मागणी नाही. कारण या वाहनांच्या खपावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे असे सुटे भाग अजूनही गोडाऊनमध्ये पडून आहेत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट दिले. पीकविमा योजनेच्या अंमलबजावणी बाबत अधिकृतरित्या शासन आदेश जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार बीड जिल्ह्यातील खरीप हंगाम २०२० सहित पुढील तीन वर्षांसाठी पीकविमा संरक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी हाणून पाडला आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी पिकविमा देण्याच्या निविदा प्रक्रियामध्ये सहभागी होण्यास कोणतीही कंपनी तयार नव्हती, अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न करून अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कम्पनी लिमिटेड यांना जिल्ह्याचा पीकविमा स्वीकारण्यासाठी भाग पाडले आहे.

मागील वर्षीच्या रब्बी हंगामात कोणत्याही कंपनीने पीक विम्याच्या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नव्हता. केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना हक्काच्या विम्यापासून वंचित राहावे लागले. परंतु यावर्षी कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काच्या पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार नाही, असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला होता. बीड जिल्ह्याला पिक विमा कंपनी मिळवून द्यायची यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कोणतीही कंपनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा घेण्यास तयार नसेल तर राज्य शासनाने याचा भाग उचलावा अशी भूमिका त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सातत्याने मांडली. त्यानंतर राज्याच्या कृषी विभागामार्फत धनंजय मुंडे यांनी अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी यांच्याशी संपर्क करून या कंपनीवर बीड जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. तसा शासकीय आदेशही जारी करण्यात आला आहे.

पुणे: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर गाडीचे फोटो काढून दंडात्मक कारवाई करणाऱ्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार सोमवारी घडला. पोलिस महिला कर्मचाऱ्याचा हात पिरगाळणाऱ्या भवानी पेठेतील एका २५ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस नाईक ए. ए. दिवेकर यांनी तक्रार दिली आहे. या आरोपी महिलेच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. सोमवारी (दि. १३) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास मुंढवा चौकात ही घटना घडली.

महिला पोलिस कर्मचारी दिवेकर मुंढवा चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या आरोपी महिलेने तिची दुचाकी झेब्रा क्रॉसिंगवर उभी केली. त्यामुळे दिवेकर यांनी त्यांचा फोटो काढून कारवाई करण्यास सुरुवात केली. दरम्यान, या गोष्टीचाा आल्यामुळे महिलेने दिवेकर यांचा हात पिरगळून अपशब्द वापरले. तसेच, त्यांच्या अंगावर धावून जात आरडा-ओरडा करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रेजितवाड करीत आहेत.

नगर: सरकार म्हणाले शेतकऱ्यांना बांधावर खत देणार, बांधावर दूरच दुकानातही मिळेना. दुकानदारांनी साठेबाजी केली म्हणून कृषिमंत्र्यांनी स्टिंग ऑपरेशन केले. खत विक्रीसाठी नियमावली तयार झाली. यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणे अपेक्षित असताना त्रासच सहन करावा लागत आहे. करोनाचा संसर्ग वाढत असताना शेतकऱ्यांना जीवावर उदार होऊन दुकानांपुढे रांगा लावाव्या लागत आहेत. खत विक्री आणि करोना प्रतिबंधक उपायांचेच जणू खत होत आहे.

यावर्षी पाऊस वेळेवर आला तरी शेतकऱ्यांची संकटे संपलेली नाहीत. एक तर अनेक भागात सदोष बियाणे पुरवठा झाल्याने दुबार पेरणीचे संकट आले. करोनासंबंधी करण्यात आलेल्या उपाययोजनांचाही शेतीला फटका बसला आहे. त्यातून मार्ग काढून शेतकऱ्यांची वाटचाल सुरू आहे. सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेतीची चर्चा सुरू असली तरी बहुतांश शेतकरी रासायनिक खतांवरच अवलंबून आहेत. पावसाळ्याच्या सुरवातीला नायट्रोजनयुक्त खत म्हणून युरिया खताला मोठी मागणी असते. यंदा खतांच्या पुरवठ्यालाही करोनाचा फटका बसला आहे. मात्र, यातही संधीचे सोने करणाऱ्या काही वितरकांकडून साठेबाजी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. तक्रारी वाढल्यानंतर कृषिमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर दुकानदारांविरुद्धची कारवाई कडक करण्यात आली.

मुंबई: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजाच्या बकरी ईद सणाला व त्या दिवशी देण्यात येणाऱ्या कुर्बानीला परवानगी देण्यात यावी,' अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

येत्या १ ऑगस्ट रोजी ईद उल अदहा म्हणजे बकरी ईद हा मुस्लिमांचा एक महत्त्वाचा सण आहे. करोनाच्या संकटामुळं धार्मिक उत्सवांवर अनेक प्रकारचे निर्बंध असल्याने हा सण कसा साजरा करायचा याबाबत मुस्लिम समाजात संभ्रम आहे. त्याच पार्श्वभूमीवर नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी बकरी ईदबाबत व कुर्बानी करण्याच्या व्यवस्थेविषयी सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

'बकरी ईद हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्या दिवशी कुर्बानी देणे अनिवार्य असते. हा सण जवळ आल्यानंतरही सरकारनं याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं मुस्लिम समाज व संघटनांमध्ये अस्वस्थता आहे,' असे नसीम खान यांनी पत्रात म्हटले आहे. 'सरकारने काही अटी शर्थीच्या आधारे गणेशोत्सवास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे बकरी ईदलाही परवानगी दिली जावी, तसंच कुर्बानीतून सूट दिली जावी,' असे खान यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद: एसटी महामंडळातून चार महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या चालकाचा पैशासाठी खून करून शीर आणी धड वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचा खळबळजनक प्रकार सोमवारी (१३ जुलै) उघड झाला. मुजीबखान अहेमदखान आबेद रशीदखान (५९, रा. शहानगर, बीड बायपास) असे मृताचे नाव आहे. नऊ जुलै रोजी देवळाई येथे हा प्रकार घडला असून, धड सातारा परिसरातून तर, शीर झाल्टा फाट्यावरून हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी लिपिक आरोपी आणि साथीदाराला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे.

मृत चालक मुजीब अहेमदखान हे चार महिन्यांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांनी विभागीय नियंत्रक कार्यालयात सेवानिवृत्ती आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळण्यासाठी अर्ज केला होता. ही रक्कम काढण्यासाठी त्यांनी विभागीय कार्यालयातील लिपिक आतिक काझीकडे स्वाक्षरी करून कोरे धनादेश दिले होते. यानंतर काही धार्मिक कार्यासाठी मुजीबखान बाहेरगावी गेले होते. दरम्यान, आरोपी आतिक काझी याने धनादेशांचा गैरवापर करून त्यांची आठ लाख रुपयांची रक्कम हडप केली होती. औरंगाबादला परतल्यानंतर मुजीबखान यांनी आतिक काझीकडे पैशासाठी तगादा सुरू केला होता. नऊ जुलै रोजी मुजीबखान हे विभागीय नियंत्रक कार्यालयात आतिक काझी याच्याकडे गेले होते. यानंतर ते अचानक बेपत्ता झाले. याप्रकरणी त्यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती.

पुणे: पर्वती येथील शाहूनगर वसाहत येथे एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून पिस्तूलातून गोळ्या घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.

अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याने तक्रार दिली. त्यानुसार आदर्श ननावरे (वय २२, रा. धायरी), बोंबल्या उर्फ अभिषेक काळे आणि यशवंत कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत कांबळे हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याच्याकडे आदर्श हा कामाला आहे. अमित याचे आरोपीच्या मुलीसोबत प्रेमसंबध होते. ते आरोपीला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने अमित याला मुलीचा नाद सोडून देण्यास सांगितले होते. तरीही अमित ऐकत नव्हता. तक्रारदार सौरभ आणि अमित रविवारी रात्री पावणेआकराच्या सुमारास शाहू वसाहत येथील 'बालाजी होलसेल' येथे थांबले होते. त्या वेळी आरोपी ननावरे हा त्याच्या साथीदारासोबत तेथे आला. त्याने थेट अमितवर पिस्तूलातून गोळीबार केला. तसेच, बोंबल्या याने अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले. यशवंत कांबळे याच्या सांगण्यावरून आरोपींनी हा हल्ला केल्याचे तपासात समोर आले. या घटनेची माहिती नागरिकांकडून मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. आरोपींचा माग काढण्यासाठी दत्तवाडी पोलिसांनी पथके तयार केली होती. त्यानुसार काही तासांतच तिघांना अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक देवीदास घेवारे अधिक तपास करत आहेत.

कोल्हापूर: 'मागील विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर राज्यात राष्ट्रवादीच्या केवळ २० आणि काँग्रेसच्या दहा जागा निवडून आल्या असत्या, असा दावा करतनाच, 'कुणाची किती ताकद आहे हे पाहायचं असेल तर पुन्हा एकदा सगळे स्वतंत्र लढू,' असं खुलं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं. (Chandrakant Patil on Sharad Pawar's interviews)

ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. 'शिवसेनेमुळंच भाजप आज महाराष्ट्रात मजबूत अवस्थेत आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले, त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेनेची साथ नसती तर भाजपच्या आमदारांचा आकडा ४० ते ५० पर्यंत खाली घसरला असता,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. पवार यांच्या या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी आज समाचार घेतला.

अलिबाग: राज्यातील आणखी एका जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्याची आफत ओढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे. याबाबत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घोषणा केली. (Complete Lockdown In Raigad )

आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय आमदारांची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील करोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता सर्वांनीच व्यक्त केली. त्यातूनच पुन्हा एकदा जिल्ह्यात कठोरपणे लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णयावर एकमत झाले. आज झालेल्या निर्णयानुसार १५ जुलै अर्थात बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरू होणार असून २४ जुलैपर्यंत हा लॉकडाऊन राहणार आहे.

पुणे: मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करतो असे आमिष दाखवून तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा परिसरात घडलेल्या या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी १८ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलैला दुपारी घडला. करिअर मार्गदर्शन करणार्‍या एका कोचिंग क्लासमध्ये मोसीन शेख हा शिक्षक म्हणून काम करतो.

तक्रारदार तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. गेल्या वर्षी आक्टोबरमध्ये शेख याने या तरुणीच्या कॉलेजमध्ये करिअर गाइडन्सवर लेक्चर दिले होते. त्यावेळी त्याने आपला मोबाइल क्रमांक तेथील विद्यार्थ्यांना दिला होता, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. तक्रारदार तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी शेख याला फोन केला. त्याने कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये शेख याला भेटली. त्याने प्रवेश परिक्षेच्या फॉर्मचे बाराशे रुपये आणि क्लासचे सात हजार रुपये फी सांगितली. आठ जुलैला क्लास सुरू झाला. पण ही तरुणी पैसे भरू शकत नसल्याने क्लासला गेली नाही.
 

मुंबईः राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक सण, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. गणेशोत्सवावरही यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळं, मुंबई, ठाणे यासारख्या अन्य मोठ्या शहरात नोकरीनिमित्त असलेल्या लाखो चाकरमान्यांना कोकणातील मूळ गावी जायला मिळणार का? असा प्रश्न भेडसावत आहे. चाकरमान्यांच्या गावी जाण्याच्या मुद्द्यावरून राजकारही तापलं असतानाच आता मनसेनंही या मुद्द्यावरुन सरकारला घेरलं आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. (kokan ganeshotsav)

खासगी बसेस कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. यासाठी सरकारनं गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात तसंच, कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास त्यांना या कठीण काळात दिलासा मिळेल. असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, यंदा करोनाचं संकट असलं तरी गणेशोत्सवासाठी कोकणाच येणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली निश्चित करुन त्यांच्या वाटेतील विघ्न दूर करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्वारंटाइन कालावधी ७ दिवसांचा करण्याची खास परवानगी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळवावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे विनायक राऊत यांनी सांगितले. याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास सुलभ मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या चाकरमान्यांनी निघायच्या ४८ तास आधी करोना तपासणी करावी. यासाठी शासनाने मोफत अथवा एक हजार रुपयांत या चाचणीची व्यवस्था करावी, असे मुद्दे बैठकीत मांडण्यात आले होते.

मुंबई: लंडनमधील वाग्दत्त पतीने शिवडी येथील एक तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांना साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघड झाले आहे. विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर आपले खोटे प्रोफाइल तयार करून ही फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे लॉकडाउन असतानाही लंडनहून भारतात आल्याचे भासवून हे पैसे उकळण्यात आले. या प्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यवसायाने आर्किटेक्ट असलेल्या २६ वर्षीय तरुणीने लग्नासाठी एका विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. संपर्कासाठी या तरुणीने आई आणि वडील दोघांचेही मोबाइल क्रमांक प्रोफाइलवर ठेवले. काही दिवसांनी अंकुश लोखंडे या नावाने या तरुणीला रिक्वेस्ट आली. तिने या तरुणाचे प्रोफाइल तपासला असता त्याने युनिव्हसिर्टी ऑफ सिंगापूरमधून बँचलर ऑफ आर्किटेक्ट तसेच मास्टर्स ऑफ ऑर्किटेक्टच्या पदव्या घेतल्याचे दिसून आले. आपल्या मनाप्रमाणे पती मिळत असल्याने या तरुणीने आईवडिलांच्या सल्ल्याने अंकुश याची रिक्वेस्ट स्वीकारली. संपर्कासाठी मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण करण्यात आल्यानंतर अंकुश या तिच्या आईवडिलांशी बोलला. सध्या लंडनमध्ये स्थायिक असल्याचे सांगून लग्न ठरले तर साखरपुडा करण्यासाठी मुंबईत येऊ शकतो असे अंकुशने सांगितले. तरुणी आणि तिच्या घरच्यांनीदेखील होकार दिला. लॉकडाउन सुरू असून विदेशांतील विमान उड्डाणे बंद आहेत याचा विचारही कुणाच्या मनाला शिवला नाही.

कोल्हापूर: धारावीच्या करोना मुक्तीचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देणाऱ्या भाजपच्या नेत्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी बिनतोड सवाल केला आहे. 'संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र काम करून धारावी करोनामुक्त केली असेल तर संघाचे मुख्यालय जिथं आहे, त्या नागपुरात करोनाचा कहर कसा? तिथं संघाचे कार्यकर्ते नाहीत का,' अशी विचारणा शेट्टी यांनी केली आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावीत करोना आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) राज्य सरकार व महापालिका प्रशासनाच्या कामाला दाद दिलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसह सर्वांचे आभार मानले आहेत. मात्र, हे श्रेय केवळ सरकारचं नाही, आरएसएसनंही इथं अहोरात्र काम केलंय, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह काही नेते, आमदारांनी केला आहे. त्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे.

शेट्टी यांनीही या वादात उडी घेतली आहे. 'खरंतर धारावीत जेव्हा करोनाचा उद्रेक झाला होता, किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, तेव्हा आरएसएसचे कार्यकर्ते मदत करताहेत किंवा जीव धोक्यात घालून काम करताहेत अशी कुठलीही बातमी कुठेही वाचनात किंवा पाहण्यात आलं नाही. मात्र, धारावीतील परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगताच सगळे श्रेय घेण्यासाठी पुढं आले,' असा टोला शेट्टी यांनी चंद्रकात पाटलांचं नाव न घेता हाणला.

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामामुळं धारावीत करोना नियंत्रणात आल्याच्या भाजपच्या प्रचाराची शिवसेनेनं जोरदार खिल्ली उडवली आहे. 'काही चांगले घडले की ते आमच्यामुळे. रेड्याला रेडकू झाले आमच्यामुळे, वाळवंटात हरभरा टरारून वर आला तरी तो आमच्यामुळेच, असं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे. संकटसमयी हे सगळं यांना सुचतं तरी कसं?,' असा अत्यंत बोचरा सवाल शिवसेनेनं केला आहे. (Shivsena attacks BJP Leaders in Saamana Editorial)

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या मुंबईतील धारावीत करोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं राज्य सरकार व महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावीकरांसह सर्वांचे आभार मानले आहेत. मात्र, हे श्रेय केवळ सरकारचं आरएसएसनंही इथं अहोरात्र काम केलंय, असा दावा भाजपचे काही नेते व आमदारांनी केला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांच्यावर तोफ डागण्यात आली आहे. ‘धारावीच्या निमित्तानं आरएसएसच्या नावानं नवा प्रचारी फंडा राबवला जातोय. हा जरा अतिरेकच आहे. पांढऱ्या कपड्यांतील देवदूतांचा अपमान आहे,' असा आरोप शिवसेनेनं केलाय.

पुणे: पर्वती ( parvati) येथील शाहूनगर वसाहत येथे एका तरुणावर पिस्तुलातून गोळ्या घालून त्याचा खून केल्याचा प्रकार रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित मिलिंद सरोदे (वय २१, रा. जनता वसाहत, पर्वती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचा मित्र सौरभ महेश मोहोळ (वय २१, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार आदर्श ननावरे, बोंबल्या आणि यशवंत कांबळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सौरभ हा अमितसोबत रविवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शाहू वसाहत येथील बालाजी होलसेल येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी ननावरे हा त्याच्या साथीदारासोबत त्या ठिकाणी आला. त्याने थेट अमित याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. तसेच, त्याच्या साथीदारांनी अमितच्या मानेवर, डोक्यात कोयत्याने वार केले.

मुंबई: 'देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केंद्रातील सध्याच्या सरकारला पर्याय देणं ही राष्ट्रीय गरज आहे. त्या एकजुटीसाठी मी पुढाकार घ्यायला तयार आहे. त्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही,' असं ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. (Sharad Pawar Interview to shiv sena mouthpiece Saamana )

शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी महाराष्ट्रातील व देशातील अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. मोदी सरकारला पर्याय देण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे.

राष्ट्रीय राजकारणात सध्या भाजपचं वर्चस्व असून विरोधी पक्ष विखुरलेला दिसत आहे. हा विरोधी पक्ष भविष्यात मोदी सरकारला आव्हान देऊ शकतो का, असा प्रश्न त्यांना विचारण्या आला. त्यावर विरोधी पक्षामध्ये ती ताकद निश्चित आहे असं ते म्हणाले. 'खरंतर २०१९ च्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली होती. त्यात चर्चा होऊन काही धोरणं ठरवण्यात आली. मात्र, नंतर करोनाच्या संकटामुळं पुढचं काम थांबलं,' असं त्यांनी सांगितलं. 'करोनाचं संकट दूर झालं आणि संसदेचं कामकाज सुरू झालं की पुन्हा एकत्र येण्याची भावना विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये आहे. आपण एकत्र आलं पाहिजे. एक सक्षम पर्याय दिला पाहिजे, असं सर्वांचंच मत आहे. हे सगळे पक्ष एकत्र येतील,' असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

औरंगाबाद: जिल्ह्यात सोमवारी (१३ जुलै) सकाळी ११३ नवे बाधित आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८५७७ झाली आहे, तर आतापर्यंत ३५४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत ५०६१ बाधित हे करोनामुक्त झाले असून, सध्या ३१६२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये नऊ व्यक्तींची शहराच्या `एंट्री पॉइंट`वर केलेली अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. (Corona cases & deaths in Aurangabad)

शहरातील बाधितांमध्ये रमा नगर येथील १, सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २, भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर १, छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन-सहा, सिडको ४, एन-चार, सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन-१२, हडको १, कोहिनूर गल्ली रोड १, एन-नऊ, पवन नगर १, एन-सात, सिडको (१), जयभवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १, नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे.

मुंबई :करोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर मदतगार ठरत असला, तरीही राज्यात या थेरपीसाठी अद्याप ठोस नियमावली जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्लाझ्माचीही विक्री केली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. दिल्लीमध्ये सुरू झालेल्या प्लाझ्मा विक्रीच्या गैरप्रकारांना पाय फुटले असून पैसे मोजण्याची तयारी असेल, तर प्लाझ्मा देणारे दाते दिल्लीहून मुंबईलाही पाठवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. या प्लाझ्मासाठी ऐंशी हजार रुपये दर आकारणी केली जाते. प्रवासाचा खर्च प्लाझ्मा हवा असलेल्या व्यक्तीला करावा लागतो. करोनामुक्त झालेल्या काही बेरोजगार तरुणांनी प्लाझ्मा विकण्याचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध आहे.

दिल्लीमध्ये अशा प्रकारे प्लाझ्माची विक्री करणाऱ्या तरुणाकडून यासंदर्भात माहिती घेतली. गाडी पाठवण्याची किंवा प्रवासखर्च देण्याची तयारी असेल, तर मुंबईला दाता पाठवण्यात येईल, असे त्याने 'मटा'ला सांगितले. प्लाझ्मादान करणारा तरुण हा करोनामुक्त असून तो प्लाझ्मा देण्यासाठी योग्य असल्याची खातरजमा करणारे वैद्यकीय चाचण्यांचे अहवालही त्याने पाठवले आहेत.

 

पुणे: प्रशांत महासागरातील तापमान सध्या सरासरीच्या दरम्यान नोंदले जात असून, मान्सूननंतर तिथे कमी तीव्रतेची 'ला निना' स्थिती निर्माण होण्याचा अंदाज हवामानशास्त्रातील आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिला आहे. दुसरीकडे हिंदी महासागरातील इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हा घटकही मान्सून काळात न्यूट्रल स्थितीत राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिला आहे. या दोन्ही घटकांची स्थिती मान्सूनसाठी अनुकूल असल्याचे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेतील क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने जगभरातील मॉडेलचा वापर करून नुकत्याच दिलेल्या अंदाजात चालू वर्ष संपेपर्यंत प्रशांत महासागरात 'एल निनो'ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. या अंदाजानुसार सध्या प्रशांत महासागराचे तापमान सरासरी इतके नोंदले जात असून, वर्षाच्या अखेरपर्यंत कमी तीव्रतेची ला निना स्थिती तयार होण्याची शक्यता आहे.

एल निनो सक्रिय नसताना, तसेच स्थानिक पातळीवर हवामानाची स्थिती प्रतिकूल नसताना बहुतेक वेळा मान्सून काळातील पावसाने सरासरी गाठल्याचे आकडेवारी सांगते. यंदा हिंदी महासागरात आयओडी हा घटक गेल्या वर्षीप्रमाणे पॉझिटिव्ह नसला; तरी तो न्यूट्रल स्थितीत राहण्याचा अंदाज 'आयएमडी'ने दिला आहे. 'आयओडी'ची निगेटिव्ह स्थिती मान्सूनसाठी प्रतिकूल मानली जाते.

 

येवला: माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून सातत्याने छळ होत असल्याने दीड महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहितेने त्रासाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यातील अंगणगाव येथे घडली आहे. याप्रकरणी तिच्या पतीसह, सासरा, दीर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पूजा संदीप आठशेरे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील बाबासाहेब भारसकळ (रा.नायगाव,ता. श्रीरामपूर) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पूजाचा विवाह दीड महिन्यापूर्वी झाला होता. शेतात पाइपलाइन करण्यासाठी व रोटर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणले नाही म्हणून या सर्वांकडून पूजाचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळेच या त्रासाला कंटाळून तिने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी मनमाड उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे तसेच पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी सासू वगळता इतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सांगली: ऑनर किलिंगच्या घटनेनं सांगली जिल्हा हादरला आहे. बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या भावानं २२ वर्षीय तरुणाचा भोसकून खून केला. त्यामुळं सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे ही ऑनर किलिंगची घटना घडली आहे. बहिणीशी प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाचा भोसकून खून करण्यात आला. ओंकार माने (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे. हल्ल्यानंतर निखील सुधाकर सुतार हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला हजर. शनिवारी रात्री उशिरा कवठेपिरान गावात घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे.

कुटुंबीयांचा विरोध झुगारून बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तिच्या पतीचा भोसकून खून करण्यात आला. सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान (ता. मिरज) येथे शनिवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला. या घटनेत ओंकार माने (वय २२, रा. कवठेपिरान) या तरुणाचा मृत्यू झाला, तर खून करणारा हल्लेखोर निखील सुधाकर सुतार (वय २२, रा. कवठेपिरान) हा स्वतःहून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला. ऑनर किलिंगच्या घटनेने सांगली जिल्हा हादरला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार माने याने सहा महिन्यांपूर्वी गावातील तरुणीशी प्रेम विवाह केला होता. कुटुंबीयांचा विरोध असल्याने निखिल सुतार याच्या बहिणीने घरातून पळून जाऊन ओंकारसोबत लग्न केले होते. लग्नानंतर हे नवदाम्पत्य जिल्ह्याबाहेर राहत होते. काही दिवसांपूर्वीच ओंकार पत्नीसह गावात आला होता. त्याने गावात राहू नये असा सुतार कुटुंबीयांचा आग्रह होता. यावरून निखील सुतार आणि ओंकार माने या दोघांमध्ये वादही झाला होता. मात्र, सुतार कुटुंबीयांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून ओंकार माने हा पत्नीसह गावात राहण्यासाठी आला होता.

मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं आज जारी केल्या आहेत. त्यानुसार घरगुती गणपतीच्या मूर्तीवर दोन फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. तसंच, गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारनं उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीच्या उंचीवर चार फुटांचे तर, घरगुती मूर्तीच्या उंचीवर दोन फुटांचे बंधन असेल.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे:

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घ्यावा लागतील

उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी.
 

मुंबई: धारावीतील करोना नियंत्रणाचं श्रेय जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) केवळ राज्य सरकारला दिल्यामुळं भाजपचे आमदार नीतेश राणे नाराज झाले आहेत. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि इतर स्वयंसेवी संस्थांनी दिवसरात्र राबून केलेल्या कामामुळं धारावीत करोना नियंत्रणात आला आहे. हे फक्त सरकारचं काम नाही,' असा दावा नीतेश यांनी केला आहे. (Nitesh Rane on WHO's Tweet).

मुंबईतील करोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीतील करोनाचा संसर्ग बराच नियंत्रणात आला आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या व अत्यंत दाटीवाटीच्या या वस्तीत करोनाला रोखण्यात यश मिळवल्यानं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO - हू) महाराष्ट्र सरकार व प्रशासकीय यंत्रणांचं कौतुक केलं आहे. सरकारनं इथं राबवलेल्या ट्रेसिंग (बाधितांचा शोध घेणे), टेस्टिंग (चाचणी करणे), आयसोलेटिंग (विलगीकरण करणे) आणि ट्रीटमेंट (उपचार करणे) या चारसूत्री कार्यक्रमाचाही संघटनेनं उल्लेख केला आहे. करोनाचा कितीही उद्रेक झाला तरी त्याला आटोक्यात आणलं जाऊ शकतं हे धारावीनं दाखवून दिल्याचं WHO नं म्हटलं आहे. 'हू'च्या या ट्विटनंतर राज्य सरकार व महापालिकेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

अहमदनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी ( ११ जुलै) समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते. (mns leader abhijit panse met indorikar maharaj)

सुमारे अर्धा तास पानसे यांनी इंदोरीकरांशी चर्चा केली. इंदोरीकर महराजांच्या भेटीनंतर पत्रकारांनी बोलताना पानसे म्हणाले, एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी यावेळी उपस्थित होते.

 

नाशिक: विरोधी पक्ष नेत्यांनी बोलावलेल्या बैठकांना सरकारी अधिकाऱ्यांनी जाऊ नये, असे फर्मान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना काढले होते. स्वत:च्याच हुकुमाचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. म्हणूनच ते वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाऊन सरकारी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यांनी स्वहुकुमाचे पालन करावे, असा उपरोधिक सल्ला राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात करोनाबाबत भुजबळ यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते. करोना संकट काळात विरोधी पक्षनेते फडणवीस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यांना सूचना करीत आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना फडणवीस प्रतिसरकार चालवित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री असताना २०१८ मध्ये फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बोलावलेल्या बैठकांना उपस्थित राहू नये, असे निर्देश सरकारी कार्यालयांना दिले होते. आता त्यांना स्वतःच काढलेल्या हुकुमाचा विसर पडलेला दिसतोय. राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन फडणवीस करोना स्थितीचा आढावा घेत आहेत. सरकार या संसर्गाच्या अटकावासाठी सर्वतोपरी उपाय करीत आहे. त्यात कमतरता असतील तर दाखवाव्यात, असे आवाहनही भुजबळांनी केले.

औरंगाबाद: वाहन चालकाची करोना चाचणी 'पॉझिटिव्ह' आल्यामुळे त्याच्याबरोबर आलेले बँक अधिकारी चालकाला सोडून आपल्या गावाला निघून गेल्याचा प्रकार शुक्रवारी झाल्टा फाटा येथील 'एन्ट्री पॉइंट'वर घडला.

त्याचे असे झाले की, सोलापूरहून एका बँकेचे दोन अधिकारी स्वतंत्र वाहनातून काही कामासाठी औरंगाबादला येत होते. झाल्टा फाटा येथे महापालिकेच्या पथकाने त्यांची गाडी थांबवली. गाडीमध्ये चालकासह अन्य दोन जण होते. महापालिकेच्या पथकाने या सर्वांची 'अॅन्टिजन' चाचणी केली. त्यात वाहन चालक 'करोना पॉझिटिव्ह' असल्याचे स्पष्ट झाले. सोबतचे अधिकारी '

निगेटिव्ह' निघाले, परंतु त्यांनी 'करोना पॉझिटिव्ह' वाहन चालकाची धास्ती घेतली आणि ते वाहन चालकाला तेथेच सोडून गाडी घेऊन सोलापूरकडे रवाना झाले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकाला 'कोविड केअर सेंटर'मध्ये दाखल केले.

मुंबई: करोना विषाणूचा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची करोनामुक्तीकडं वेगानं वाटचाल सुरू आहे. मुंबई महापालिका व राज्य सरकारनं यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांची दखल थेट जागतिक आरोग्य बँकेनं (World Health Organization - WHO) घेतली आहे. 'कोविड १९' थोपवला जाऊ शकतो हे धारावीनं दाखवून दिलं आहे,' असं WHO ने म्हटलं आहे. (WHO Praises Dharavi's fight against Covid 19) जागितक आरोग्य संघटनेनं एका ट्विटच्या माध्यमातून जगभरात करोनाविरोधात राबवण्यात येत असलेल्या आक्रमक उपाययोजनांचं कौतुक केलं आहे. न्यूझीलंड, व्हिएतनाम, इटली, स्पेन, कोलंबिया, थायलंड या देशांतील करोना लढ्याचा उल्लेख करताना 'हू' ने धारावीचाही गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. 'मुंबईतील एक अत्यंत दाटीचा परिसर असलेल्या धारावीत प्रशासनानं अत्यंत नियोजनबद्ध काम केलं. लोकसहभागाचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं. विषाणूची साखळी तोडण्यावर भर देण्यात आला. त्यासाठी स्वत:हून संभाव्य बाधितांचा शोध घेणं, त्यांची चाचणी करणं, विलगीकरण करणं आणि उपचार करणं हे उपाय वेगानं राबवण्यात आले. त्यातूनच धारावी भोवती पडलेला करोनाचा विळखा सैल झाला.
'जगभरात करोना रुग्णांची संख्या १ कोटी २० लाखांच्या वर गेली आहे. मागील सहा आठवड्यांत दुपटीहून अधिक रुग्ण वाढले आहेत. कोविडचा असा उद्रेक झाला असला तरी तो नियंत्रणात आणला जाऊ शकतो हे जगभरातील अनेक देशांनी दाखवून दिलंय. मुंबईतील धारावी हे सुद्धा त्यातलंच एक उदाहरण आहे,' असं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस ग्रेब्रेसस यांनी म्हटलंय.

मुंबई: '२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचा मोठा वाटा होता. शिवसेना नसती तर भाजपचे अवघे ४० ते ५० आमदार निवडून आले असते,' असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. (NCP Chief Sharad Pawar criticises Maharashtra BJP)

सामना'साठी शरद पवार यांनी मॅरेथॉन मुलाखत दिली आहे. शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. त्यात पवार यांनी लॉकडाऊन, आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोलपासून ते शिवसेना-भाजप युती बाबतच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली आहेत.

१०५ आमदारांचं बळ असताना आणि राज्यात सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजप सत्ता स्थापन करू शकला नाही. हा काय चमत्कार होता, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर पवारांनी सविस्तर उत्तर दिलं. ते म्हणाले, 'भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात प्रमुख पक्ष कसा बनला याच्याही खोलात जायला पाहिजे. विधानसभेला भाजपचे जे १०५ आमदार निवडून आले त्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं होतं. शिवसेना भाजपसोबत नसती तर १०५ चा आकडा ४०-५० च्या आसपास दिसला असता,' असं पवार ठामपणे म्हणाले.

 पुणे: करोनाच्या अत्यवस्थ रुग्णांच्या शरिरातील विषाणूंचे प्रमाण कमी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या'रेमडेसिव्हीर' या इंजेक्शनचा तुटवडा असल्याचा गैरफायदा घेऊन काळाबाजार होत असल्याचे वृत्त आहे. दोनच कंपन्यांकडून थेट रुग्णालयांना औषधपुरवठा होत असून, ५४०० रुपयांच्या इंजेक्शनची १६ ते २० हजार रुपये दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्या वेळी विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्ण अत्यवस्थ होण्याची शक्यता अधिक असते. परिणामी रुग्णाची ऑक्सिजन पातळी कमी झाल्यास त्याला ऑक्सिजन द्यावे लागते किंवा व्हेंटिलेटरवरही ठेवण्याची वेळ येते. त्या वेळी विषाणूंचा प्रभाव कमी करण्यासाठी'रेमडेसिव्हीर'चा वापर केला जातो.

काही औषधविक्रेत्यांच्या मते, सिप्ला, तसेच हिटेरो या दोन कंपन्याकंडून 'रेमडेसिव्हीर' या औषधाचे उत्पादन केले जाते. तसेच, या दोन्ही कंपन्यांकडून औषध विक्रेत्यांना न देता थेट रुग्णालयांना पुरविण्यात येत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढत आहे. या इंजेक्शनची एका व्हायलची किंमत सद्या ५४०० रुपये आहे. इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, मुंबईतून पुण्यात आणि पुण्यातून मुंबईत चौकशी करण्यात येत आहे.

नाशिक: करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्राला फटका बसला तसा तो सांस्कृतिक क्षेत्राताही बसला. स्वरांची साधना करणारे हजारो शिष्य आणि त्यांच्या गुरूंची भेट या लॉकडाउनमुळे दुर्लभ झाली. स्वरांचा अभ्यास, मैफल, रियाज मागे पडला. मात्र तरही शहरातील काही गुरूंनी ऑनलाइनच्या माध्यमातून आपल्या शिष्यांशी सूर आणि स्वर जुळवले आहेत

ऑनलाइन क्लासने सुरू झाली स्वरसाधना
सांस्कृतिक संस्कांरांचे वैभव लाभलेल्या नाशिकमध्ये अनेक जण गायन, कथ्थक, बासरी वादनाचे शिक्षण घेत आहेत. मात्र करोनामुळे ओढावलेल्या लॉकडाउनमध्ये काही दिवस हे क्लास बंद होते. मात्र आता मिळालेल्या शिथिलतेचा फायदा घेत काही गुरूंनी शिष्यांशी थेट संपर्क येऊ न देता ऑनलाइनचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे करोनासोबत न्यू नॉर्मल आयुष्य जगताना जगताना ही बाब अंगवळणी पाडून घेणे गरजेचे असल्याचे मत क्लासेसच्या संचालकांनी व्यक्त केले. या बाबत बोलताना बासरी वादक मोहन उपासनी म्हणाले की, २० मार्चपर्यंत समोरासमोर सुरू असलेले बासरीवादनाचे क्लास करोनामुळे अचानक बंद झाले. क्लासला येणाऱ्या ४० ते ५० मुला-मुलींच्या साधनेत अचानक खंड पडला. सुखासुखी चाललेला क्लास अचानक बंद झाल्याने शिष्य आणि गुरूंमध्ये निर्माण होऊ पाहणारा शिक्षणाचा बंध आता तुटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. याचा परिणाम आर्थिक स्तरावर पण उमटू लागला. आलेले संकट संधी सुद्धा घेऊन येते असे म्हणतात, त्यानुसार ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. थोडा किचकट असला तरी न्यू नॉर्मलमध्ये शिकून घेणे गरजेचे होते. अगदीच जो दुरावा निर्माण झाला होता त्यापेक्षा हे साधन ठिक आहे. दगडापेक्षा वीट मऊ असे म्हणायची वेळ आली आहे.

 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आगामी मुलाखत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. 'मी स्वत: तेव्हा संसदेतील नरेंद्र मोदी यांच्या चेम्बरमध्ये गेलो होतो, असं पवारांनी या मुलाखतीत म्हटलंय. 'मोदींच्या चेम्बरमध्ये जाऊन पवार त्यांच्याशी नेमकं काय बोलले होते,' याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. (NCP Chief Sharad Pawar's interview to shiv sena mouthpiece Saamana)

येत्या ११ जुलैपासून, म्हणजेच उद्यापासून शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. लॉकडाऊनपासून ते राम मंदिर आंदोलनाच्या विषयावरही पवारांनी मतं मांडली आहेत. देशाच्या राजकारणातील किस्से आणि अनुभव सांगितले आहेत. बाळासाहेब ठाकरे, भाजप व महाविकास आघाडी यांच्या बाबतीत पवार यांनी व्यक्त केलेली मतं हा यातील सर्वाधिक उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहे.संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मुलाखतीचा तिसरा प्रोमो ट्विट केला आहे. त्यात शरद पवार हे मोदी-शहा जोडगोळी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर तोफ डागताना दिसतात. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अलीकडंच केंद्र सरकारनं दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस दिली होती. त्याबद्दल बोलताना हे क्षुद्रपणाचं लक्षण असल्याची टीका त्यांनी केली आहे. सत्ता ही विनयानं वापरायची असते. सत्तेचा दर्प डोक्यात गेला ती डोक्यात गेली की अशा गोष्टी होतात, असं त्यांनी म्हटलं आहे.
'उद्धव ठाकरे यांची कामाची पद्धत ही शिवसेनेची पद्धत आहे. भाजपच्या हातात सरकार जाऊ देणं हे शिवसेनेच्या हिताचं नाही,' असंही पवार या मुलाखतीत म्हणालेत. राज्यात सेन्सॉर ऑफ पावर एकच असली पाहिजे, असंही पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील आजच्या विरोधी पक्षाला तुम्ही काय सल्ला द्याल? ठाकरे सरकारचं भविष्य काय? या प्रश्नांची उत्तरही पवारांनी दिली आहेत.

राजकीय नेते व सेलिब्रिटिंच्या मुलाखती हा प्रकार मीडियासाठी नवा नाही. अशा मुलाखती होतच असतात. निवडणुकांच्या काळात तर राजकीय नेत्यांच्या मुलाखतींना बहर आलेला असतो. एखाद्या मोठ्या नेत्यानं मुलाखत दिल्यानंतर त्यातील वक्तव्यामुळं अनेकदा वादळंही उठतात. देशात यापूर्वी असं अनेकदा झालं आहे. मात्र, एका होणाऱ्या मुलाखतीची (झालेल्या नव्हे) सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ही चर्चा फक्त मीडियातच आहे असं नव्हे तर देशभरातील राजकीय वर्तुळात आहे. ती मुलाखत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची. शरद पवार हे काही वादग्रस्त किंवा सनसनाटी वक्तव्य करणारे नेते म्हणून ओळखले जात नाहीत. तरीही त्यांच्या आगामी मुलाखतीबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. शरद पवार हे काय बोलणार याकडं लक्ष लागलं आहे. अर्थात याला कारणंही बरीच आहेत. बदललेल्या महाराष्ट्रात आणि देशातही बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवारांच्या प्रत्येक भूमिकेला कमालीचे महत्त्व आहे.

शरद पवारांच्या मुलाखतीबद्दल होणाऱ्या चर्चेचं पहिलं कारण आहे ते म्हणजे ही मुलाखत ते शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'ला देणार आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत ही मुलाखत घेणार असून ती उद्या, ११ जुलैपासून ती प्रसिद्ध होणार आहे. शरद पवार हे सात महिन्यांपूर्वीपर्यंत शिवसेनेचे विरोधक होते. मूळचे काँग्रेसी असल्यामुळं ते नेहमीच शिवसेनेच्या निशाण्यावर होते. त्यांची ही भूमिका आता बदलली आहे. त्यानंतर 'सामना'ला त्यांनी दिलेली ही पहिली मुलाखत आहे.

औरंगाबाद: भूमिपूत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 'महाजॉब्स पोर्टल' सुरू केले, मात्र नोंदणीसाठी 'डोमिसाइल' प्रमाणपत्र (अधिवास) नसल्याने अनेक बेरोजगारांना नोंदणीसाठी अडचणी येत आहेत. 'लॉकडाऊन' सुरू असल्याने औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सेतू सुविधा केंद्रातील प्रक्रिया बंद असल्याने अडचण निर्माण झाली आहे. दहावीच्या शाळेच्या दाखल्यावर नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यास अडचण नसावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

करोना पार्श्वभूमीवर राज्यात अनेकांना नोकरी गमवावी लागली. त्यात अनेकांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भूमिपूत्रांनाच उद्योग, व्यवसायात संधी देण्यासाठीची भूमिका स्पष्ट केली. स्थानिक बेरोजगारांना 'महाजॉब्स पोर्टल'च्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात विविध क्षेत्रातील संधी विद्यार्थ्यांना एकाच छताखाली खुल्या करून देण्यात आल्या असल्या तरी, अनेकांना नोंदणीसाठी आवश्यक असलेले अधिवास प्रमाणपत्र 'लॉकडाऊन'मुळे काढता येत नाही. अनेकांकडे हे प्रमाणपत्र नाही. त्यात सध्याच्या परिस्थितीत प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रक्रिया करणे अडचणीचे आहे. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना अर्ज भरता येत नाही. राज्यसरकारने 'पोर्टल'द्वारे ५० हजार रोजगार उपल्बध असल्याचे सांगितले. त्यानुसार प्रक्रिया सुरू झाली. विद्यार्थी, बेरोजगारांनी त्याचे स्वागत केले, परंतु करोनामुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता येत नसल्याचे अडचणीत भर पडली आहे.

 मुंबई : केईएम रुग्णालयातील डॉक्टरला इन्स्टाग्रामवरून मैत्रीच्या जाळ्यात ओढून त्याची तब्बल सव्वा दोन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

मूळचा बीड जिल्ह्यातील २८ वर्षीय डॉक्टर केईएम हॉस्टेलमध्ये वास्तव्यास आहे. या डॉक्टरची इन्स्टाग्रामवर इला मनीषा अशी ओळख सांगणाऱ्या तरुणीसोबत मैत्री झाली. दोघांनी मोबाइलवरून गप्पाही सुरू केल्या. याचदरम्यान मनीषाने डॉक्टरला संदेश पाठवून, तिने त्याच्यासाठी पाठवलेले पार्सल दिल्ली विमानतळावरील कस्टम कार्यालयात ३६ हजार रुपये ऑनलाइन भरून घेण्यास सांगितले. मैत्रिणीसाठी डॉक्टरने पैसे भरण्याची तयारी दर्शवली. काही वेळातच डॉक्टरला एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. कस्टम अधिकारी बोलत असल्याचे सांगत त्याने पैसे पाठविण्यासाठी बँकेच्या खात्याचा तपशील दिला. डॉक्टरने त्या खात्यावर ३६ हजार रुपये भरले. त्यानंतर कस्टम क्लियरन्ससाठी आणखी १ लाख ९९ हजार भरावे लागतील, असे सांगण्यात आले. स्वतःच्या खात्यामध्ये इतके पैसे नसल्याने डॉक्टरने आपल्या दोन मैत्रिणीच्या खात्यामधून ही रक्कम ऑनलाइन पाठवली. तरीही पैसे भरण्यास सांगण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

अकोला: भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार अंतर्विरोधानेच पडणार असल्याचं विधान केलं असून त्यांच्या या विधानाची वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खिल्ली उडवली आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. राज्यातलं सरकार कधी पडणार हे त्यांनाच माहीत. ते तारीख आणि वेळही सांगतील, असा चिमटा प्रकाश आंबेडकरांनी काढला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यात प्रसारमाध्यमांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातलं आघाडी सरकार कधी पडणार हे मला माहीत नाही. मला एबीसीडीही माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांची माणसं आहेत तिथे. त्यामुळे त्यांना माहिती मिळते. फडणवीस हे महाराष्ट्राचे ज्योतिषी आहेत. त्यांना विचारा. ते तारीख, महिना, वेळ आणि वर्षही सांगतील, असा चिमटा आंबेडकरांनी काढला. पाच वर्षांपूर्वी जे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले. त्यांना पाच वर्षानंतर घरी बसावं लागेल, असं स्वप्नातही वाटलं नसेल, असं ते म्हणाले.

यावेळी काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या वादावर भाष्य करताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपला अपमान होतोय असं ज्या पक्षाला वाटतं त्यांनी सरकारमध्ये राह्यचं की नाही हे स्वत: ठरवायचं आहे. निर्लज्जासारखं राह्यचं असेल तर राहतील. अपमान वाटला असेल तर बाहेर पडतील. हा त्या त्या पक्षाने प्रश्न आहे. त्यांनीच त्याबाबत निर्णय घ्यावा, असा टोलाही त्यांनी काँग्रसेला लगावला.

पुणे : पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी 'रिअल टाइम डाटा सिस्टीम' (आरटीडीएस) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे परिस्थितीवर बारकाईने नजर राहणार आहे. राज्य सरकारने सांगली आणि कोल्हापूर भागात महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास माणसांबरोबर जनावरांचे प्राण वाचविण्यासाठी जनावरांना स्वतंत्र वाहनांतून हलविण्याचे नियोजन केले असून, त्यासाठी चारा छावण्यांप्रमाणे सुरक्षित ठिकाणी छावण्या उभारल्या जाणार आहेत.

विभागातील पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीवर नजर ठेवण्यासाठी 'आरटीडीएस' कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पावसाला सुरुवात झाल्यानंतर ठरावीक काळात सतत माहिती ही संकलित होणार आहे. त्यामुळे नागरिकांना वेळीच मदत मिळू शकणार आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवानंतर विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी विभागातील पुण्यासह सांगली, कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांचा आढावा घेऊन नियोजन केले आहे. त्यानुसार 'आरटीडीएस' प्रणाली सुरू करण्यात आली आहे.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी महापुरात अनेक जनावरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घराच्या माणसांप्रमाणे सांभाळलेली जनावरे पाण्यात मृत्यूशी झुंज देत असताना अनेक माणसांनी घराचा परिसर सोडला नाही. त्यामुळे काहींना प्राण गमवावे लागले. हा कटू अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने यंदा माणसांप्रमाणे जनावरांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार माणसांप्रमाणे जनावरांनाही स्वतंत्र वाहनांनी सुरक्षित परिसरात हलविण्यात येणार आहे. त्यामुळे जनावरांच्या मृत्यूंमुळे होणारे नुकसान टळणार असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

औरंगाबाद: केंद्र शासनाने रेल्वेचे खासगीकरण करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार औरंगाबाद ते मुंबई या मार्गावर खासगी रेल्वे चालविण्यात येणार आहे. याशिवाय नांदेडहूनही मुंबईला रेल्वे सोडण्यात येणार आहे.

खासगी कंत्राटदारांमार्फत रेल्वे चालविण्यासाठी १२ कल्स्टर तयार केले आहेत. मुंबईहून सोडण्यात येणाऱ्या खासगी रेल्वेच्या यादीत नांदेड-मुंबई, मुंबई-नांदेडसह अकोला-मुंबई आणि मुंबई-अकोला या दोन रेल्वेचा समावेश आहे. याशिवाय शिर्डी-मुंबई ही रेल्वेही चालविण्यात येणार आहे. नांदेड-मुंबई ही रेल्वे ११ तासात सोडण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

औरंगाबादहून मुंबईला जाणाऱ्या जनशताब्दी रेल्वेच्या वेळेवर खासगी रेलवे सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ही रेल्वे ६.१५ वाजता मुंबईकडे निघेल. मुंबईला ही रेल्वे दुपारी १२.२५ वाजता पोहोचणार आहे. तसेच मुंबईहून ही रेल्वे दुपारी ३.४५ वाजता निघेल औरंगाबादला ही रेल्वे ९.४५ वाजता पोहोचणार आहे. सध्याच्या मुंबई रेल्वेपेक्षा या खासगी रेल्वेला वेळ कमी लागणार आहे.

अधिकृत माहिती नाही
खासगी रेल्वेबाबत रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. कोणत्या रेल्वे चालणार आहे. कोणत्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही, अशी माहिती नांदेड रेल्वे विभागाकडून देण्यात आली.
 

कल्याण: अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये पाच नगरसेवक फोडून शिवसेनेला शह देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेनं कल्याणमध्ये मात दिली आहे. कल्याण पंचायत समितीमध्ये शिवसेनेनं थेट भाजपशी हातमिळवणी करत राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला आहे.

कल्याण पंचायत समिती सभापती व उपसभापतीसाठी नुकतीच निवडणूक झाली. इथे भाजपचे पाच, शिवसेनेचे ४ तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आहेत.

शिवसेना-राष्ट्रवादी राज्यात सत्तेत असल्याने कल्याण पंचायत समितीत या दोन्ही पक्षांचेच सभापती, उपसभापती निवडून येतील, असा अंदाज होता. सभापती व उपसभापतीपद राष्ट्रवादीला देण्याचे आधीच निश्चित झाले होते. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच रविवारी चक्रे फिरली. भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क करून खलबतं केली. त्यांच्यातील चर्चेअंती भाजपनं शिवसेनेला विनाअट पाठिंबा जाहीर केला.

 

नाशिकरोड: चेहेडी येथे शनिवारी रात्री बिबट्याच्या हल्ल्यात आयुष जयंत सातपुते हा मुलगा जखमी झाल्याची घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वन विभागाच्या बचाव पथकाने चेहेडी गावाजवळील पालिकेच्या मलनिस्सारण केंद्राच्या परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे ठेवल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांनी दिली. रविवारी या ठिकाणी पिंजरे ठेवून वन विभागाचे बचाव पथक माघारी परतत नाही तोच सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सागर दिनकर ताजनपुरे यांच्या घरासमोर अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याने दर्शन दिल्याची घटना घडली.

बिबट्याच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या पथकाने परिसरास भेट देऊन पाहणी केली आणि रविवारी दोन पिंजरेही ठेवले. नागरिकांना सुरक्षिततेबाबत सूचना देऊन वन विभागाचे बचाव पथक माघारी परतताच साडेसातला मलनिस्सारण केंद्राजवळच वास्तव्यास असलेले सागर ताजनपुरे यांच्या घरासमोरील अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांवर हल्ल्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने दर्शन दिले. मात्र, बिबट्या दिसताच सागर ताजनपुरे यांच्या कुटुंबीयांनी अंगणातील मुलांना तत्काळ घरात घेतल्याने बिबट्या शेजारच्या पिकांत निघून गेला.

क्षणभर जरी विलंब झाला असता तरी बिबट्याने खेळणाऱ्या मुलांवर झडप घातली असती; परंतु ताजनपुरे कुटुंबीयांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच चेहेडीत वन विभागाचे बचाव पथक दाखल झाले. शनिवारच्या घटनेतील जखमी आयुष या मुलाला रविवारी सिन्नर फाटा येथील रुग्णालयातून नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय झालं हे देवेंद्र फडणवीस यांनाच माहीत असेल. पण शरद पवार हे जेव्हा एखाद्या पक्षाला प्रस्ताव देतात, तेव्हा तोच प्रस्ताव दुसऱ्या पक्षाला दिला नसेल याची शाश्वती नाही. राजकीयदृष्ट्या पवारांवर विश्वास ठेवून पुढं जाणं योग्य नाही हे फडणवीसांनी कायम लक्षात ठेवावं,' असा सल्ला राज्याचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे यांनी दिला आहे. (Narayan Rane's advice to Devendra Fadnavis)

राज्यातील करोनाची परिस्थिती व २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडींबद्दल ते 'बीबीसी मराठी'शी बोलत होते. २०१९च्या निवडणुकीनंतर थेट शरद पवार यांच्याकडून भाजपशी युती करण्याचा प्रस्ताव आला होता. पण ऐनवेळी पवारांनी वेगळी भूमिका घेतली, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी अलीकडंच केला होता. त्याबद्दल राणे यांनी आपलं मत मांडलं. 'राजकीयदृष्ट्या शरद पवारांवर विश्वास ठेवणं कितपत योग्य आहे हा प्रश्नच आहे. शरद पवार हे काहीही घडवू शकतात,' असं राणे म्हणाले.

भारत-चीन संघर्षाच्या मुद्द्यावरून शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे काँग्रेसला एकाकी पाडण्यासाठी केलं होतं, असं मी मानत नाही. पवार हे संरक्षण मंत्री होते. त्यामुळं त्यांना अनेक गोष्टी माहीत आहेत. त्यातून राष्ट्रीय भावनेतून ते बोलले असावे,' असंही राणे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले आहे. ते ५४ वर्षांचे होते. भोसरीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. साने यांच्या निधनामुळं राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. (NCP Corporator from Pimpri-Chinchwad dies due to Covid 19)

लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी व प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी दत्ता साने हे सातत्यानं कार्यरत होते. याच दरम्यान त्यांना करोनाची लागण झाली होती. करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २५ जून रोजी साने यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना श्वास घेण्याचाही त्रास होत होता. तिथं गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना यश आलं नाही. त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला. साने यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेते पदही भूषवले होते.

मुंबई, ठाणे व पुण्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर देखील करोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. येथील करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. महापालिका कार्यालयातही करोनानं शिरकाव केला असून येथील ३० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे.

नाशिक: अभिनेता अक्षय कुमार यांच्या नाशिक येथील हेलिकॉप्टर दौऱ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. राज्यातील मुख्यमंत्र्यासह एकाही मंत्र्याला हेलिकॉप्टरची सुविधा मिळत नसताना अक्षय कुमारला नाशिक जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी सुविधा कशी दिली याची चौकशी होणार आहे.

अक्षय कुमार हा चार दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील एका खासगी रिसॉर्टवर आला होता. त्यासाठी अक्षय कुमारच्या हेलिकॉप्टरला विशेष परवानगी देण्यात आली होती. अक्षय कुमारने त्रंबकेश्वरजवळील एका रिसॉर्टवर मुक्काम केला होता. राज्यातील मंत्र्यांना व्हीआयपी सुविधा मिळत नसताना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुविधेवरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

'नियम डावलून अक्षय कुमारला व्हीआयपी ट्रीटमेंटचा हा प्रकार धक्कादायक आहे. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एस्कॉर्ट कसा?, याबद्दलही भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळं सध्या अनेक गोष्टींवर निर्बंध आहेत. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनाही आपापल्या गाड्यांनी दौरे करावे लागत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईला यायचे होते. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी विशेष विमानाची परवानागी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली होती. त्यामुळं त्यांना आजारी अवस्थेत १२ तासांचा प्रवास करून अॅम्बुलन्सने मुंबईला यावे लागले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमारला हेलिकॉप्टर कसे मिळाले आणि नाशिक जिल्ह्यात त्याला परवानगी कशी मिळाली,' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सांगली: जमीन खरेदीसाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सांगलीतील संजयनगर पोलिस ठाण्यात पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुष्पराज प्रकाश केडगे, आशा प्रकाश केडगे, प्रकाश शंकर केडगे, प्रसाद प्रकाश केडगे, पल्लवी मान्तेश कोरे (रा. चिकोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी सुप्रिया पुष्पराज केडगे (वय २९, सध्या रा. जयसिंगपूर) हिने गुरुवारी रात्री उशिरा फिर्याद दिली होती. (Harassment for Dowry)

याबाबत अधिक माहिती अशी की, सुप्रिया हिचा पुष्पराज यांच्याशी चार वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यानंतर सुप्रियाने माहेरहून दहा लाख रुपये आणावेत यासाठी पतीसह अन्य संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करत मानसिक, शारीरिक छळ केला. २० जून २०१७ ते १० ऑक्टोबर १०१९ या काळात सुप्रियाने टप्प्याटप्प्याने माहेरहून ८ लाख ६६ हजार ७९८ रुपये आणून पतीला दिले. तरीही उर्वरित रकमेसाठी त्यांचा छळ सुरू होता. वारंवार सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी होणाऱ्या छळाला कंटाळून अखेरीस त्या माहेरी आल्या.

माहेरी आल्यानंतरही पतीने सुप्रियाकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे पतीसह सासरच्या छळाला कंटाळून सुप्रिया हिने गुरुवारी या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

मुंबई: लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja) यंदा गणेशाची प्रतिष्ठापना न करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील प्रसिद्ध जीएसबी सेवा मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहे. 'करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून साधेपणानं हा उत्सव साजरा केला जाईल. मात्र, जीएसबीच्या गणेशमूर्तीला चार फूट उंचीचे बंधन घालू नये,' अशी विनंती मंडळानं राज्य सरकारकडं केली आहे. (GSB Ganpati Mandal requests to State Government)

जीएसबी सेवा मंडळानं तसं निवेदन काढलं आहे. वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा गणेशोत्सव हा मुंबईतील एक प्रमुख उत्सव असतो. राज्यभरातून भाविक या उत्सवात सहभागी होत असतात. यंदा २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत उत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. सामाजिक अंतर, मुखवटे परिधान करणे, स्वच्छता व इतर निकषांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाणार आहे. भाविकांना मंडपाच्या आत प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय केली जाणार आहे. तर, सेवेदारांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म द्वारे घरपोच प्रसाद वाटप करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. महागणपतींच्या आगमनामुळे कोविड-१९ च्या साथीचे संकट दूर होईल; कारण तोच सर्व अडथळ्यांचा नाश करणारा आहे,' असा विश्वासही मंडळानं व्यक्त केला आहे.

नगर :यंदा शिर्डी येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नाही. त्यामुळे कोणालाही साई दर्शनासाठी शिर्डीला येण्यासाठी प्रवासी पास देऊ नये, असे पत्रच नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना पाठवले आहे.

यंदा रविवारी (५ जुलै) रोजी गुरुपौर्णिमा उत्सव आहे. दरवर्षी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा उत्सव साजरा होत असतो. त्याच अनुषंगाने शिर्डी येथे सुद्धा दरवर्षी हा उत्सव उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लाखो भाविक शिर्डी येथे येत असतात. मात्र या वेळेला करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये कोणालाही शिर्डी येथे येण्यासाठी अथवा दर्शनासाठी पास देण्यात येऊ नये, अशा स्पष्ट प्रकारच्या सूचना नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांना तसे पत्रच पाठवले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त देशभरातून साई पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. मात्र साईबाबा संस्थानाकडून साईमंदिर बंद असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर साई पालखीसाठी पास वितरित केल्यास शिर्डी येथे वादाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होणार नसल्यामुळे व साई मंदिर बंद ठेवण्यात आलेले असल्याने शिर्डी येथील साई दर्शनासाठी प्रवास पास देऊ नये व संबंधित यंत्रणांना तशा आपल्या स्तरावर सूचना द्याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई: लॉकडाऊनवरून राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या गोंधळावर टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. आज त्यांनी थेट महाराष्ट्र विकास आघाडीतील सुंदोपसुंदीवर टीकास्त्र सोडलं आहे. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, असा चिमटाच चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीला काढला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आघाडीतील वादावर टीकास्त्र सोडलं. हे सरकार मुंबईबाबत एकही धड निर्णय घेत नाही. केवळ मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आजार राहिला बाजूला मुंबईकर वैतागले आहेत. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात आम्हाला सत्तेची हाव लागलीय. तुमच्यात मतभेद आहेत हे आम्ही बोलायच नाही का? चौथीची पोरगी पण सांगेल की यांचं काही खरं नाही, अशी टीका चंद्रकांतदादांनी केली.

सरकारला नक्की काय करायचं आहे. लॉकडाऊन कडक करायचा आहे की अनलॉक करायचं आहे? एकीकडे अनलॉक सुरू करत आहोत सांगितलं जात आहे. दुसरीकडे कडक निर्बंध लादले जात आहेत. नक्की काय चालू आहे हेच कळत नाही. लॉकडाऊनपेक्षा सरकारच्या अनलॉकमध्ये अधिक गोंधळ आहे. त्यामुळे नागरिकांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल पाटील यांनी केला.
 

मुंबई:करोना बाधित रुग्णाकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसे उकळल्या प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध नानावटी रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ( Fir Agaist Nanavati Hospital )

करोना बाधित रुग्णांवरील उपचारांबाबत शासन, मुंबई महापालिका यांनी उपचार शुल्क आकारणीबाबत सूचना जारी केल्या आहेत. या आदेशांचे पालन होते का?, हे पडताळण्यासाठी महापालिकेने खासगी रुग्णालयांवर निरीक्षक नेमले आहेत. दादर येथे राहणारी करोना बाधित महिलानानावटी रुग्णालय येथे ३१ मे रोजी दाखल झाली. उपचारादरम्यान १३ जूनला या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित कुटुंबाने महापालिकेकडे रुग्णालयाने जास्त शुल्क आकारल्याबाबत तक्रार केली. याबाबत पालिकेच्या खासगी रुग्णालय निरीक्षकाने चौकशी, तपासणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. महिलेच्या उपचारांसाठी प्रतिदिन पाच पीपीई किट, तीन एन ९५ मास्क (उपलब्ध असूनही), ऍस्पिरिन, पॅरासीटामॉल, बी कॉम्प्लेक्स आदी नियमित वापराची औषधे 'पॅकेज'मध्ये समाविष्ठ असूनही त्याचे वेगळे शुल्क आकारले गेले. काही वैद्यकीय चाचण्या अनेकदा केल्या गेल्या. तर काही मध्यरात्री १ ते ३ या वेळेत करण्यात आल्या, अशी माहिती निरीक्षकाला मिळाली.

नातेवाईकांच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निरीक्षकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी रुग्णालय विश्वस्त मंडळावर भारतीय दंड संहितेतील कलम १८८ (शासकीय आदेशाचे उल्लंघन), ३४ (सामाईक इरादा) नुसार गुन्हा नोंदवला.

दरम्यान, बिलाच्या संदर्भातील कथित फरकामुळे एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील एफआयआरची प्रत आम्हाला अजून प्राप्त झालेली नाही. या प्रकरणामध्ये तपासास आम्ही पूर्ण सहकार्य देऊ, नानावटी सुपर स्पेशालिटी रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रुग्णालयाने ई-मेलद्वारे माध्यमांकडे आपले म्हणणे मांडले आहे.

मुंबई: जम्मू-काश्मीरमध्ये अधूनमधून होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून शिवसेनेनं केंद्र सरकारला जोरदार टोले हाणले आहेत. 'दिल्लीत इतके मजबूत सरकार असूनही कश्मीर खोर्‍यात शांततेचा चोथा का झाला आहे? दहशतवाद्यांकडून मारल्या गेलेल्या आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाचे चित्र ही केंद्र सरकारची नामुष्की आहे. हे चित्र देशाच्या इभ्रतीला व हिंमतबाज सरकारच्या प्रतिष्ठेला डाग लावणारे आहे,' अशी खंत शिवसेनेनं व्यक्त केली आहे. (Shivsena takes a jibe at Modi Sarkar over terrorist attacks in Kashmir)

काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात ‘सीआरपीएफ’चा एक जवान हुतात्मा झाला. या हल्ल्यात त्याच परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक मारला गेला. त्यावेळी त्याचा नातू सोबत होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आजोबांच्या छातीवर बसून हा नातू त्यांना उठवत राहिला. हे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले व दहशतवादाचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला. केंद्रातील काही मंत्र्यांनीच हे छायाचित्र ट्विटरवरून शेअर केले. त्यावरून शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून सरकारवर हल्ला चढवला आहे. 'जेव्हा सरकारचा अधिकृत मंत्रीच त्याच्या ट्विटर हँडलवर अशी छायाचित्र टाकतो, तेव्हा कश्मीर खोर्‍यातील रक्तपाताची जबाबदारी सरकारवर येते. अजाण नातू मृत आजोबांना जागे करण्याचा प्रयत्न करतोय अशी विदारक छायाचित्रे आजवर फक्त सीरिया, इजिप्त, सोमालिया, अफगाणिस्तानसारख्या देशांतील विध्वंसानंतर समोर आली आहेत. हे चित्र प्रसिद्ध करणार्‍या केंद्रीय मंत्र्यांना एक कळायला हवे की हे चित्र म्हणजे केंद्र सरकारची नामुष्की ठरू शकेल. जवानांनी आपला जीव धोक्यात घालून आजोबांच्या छातीवर बसून रडणार्‍या नातवाला वाचविले हे खरेच, पण त्या नातवाचे भविष्य काय? सरकारकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे?,' असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

मुंबई:काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केंद्र सरकारनं दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करण्याची नोटिस बजावल्यापासून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कट्टर समर्थक व भाजपचे माजी खासदार, अभिनेते परेश रावल यांनीही या वादात उडी घेतली आहे.

मोदी सरकारनं काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांना दिल्लीतील लोधी इस्टेटमधील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस केंद्र सरकारनं बजावली आहे. बंगला खाली करण्यासाठी त्यांना १ ऑगस्ट २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीनंतरही सरकारी बंगल्यात राहिल्यास भाडं किंवा दंड भरावा लागेल, असंही बजावण्यात आलं आहे. एसपीजी सुरक्षा हटवण्यात आल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं कारण नोटिशीत देण्यात आलं आहे. त्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलं आहे.

भाजप सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. गांधी कुटुंबाला अजूनही धोका आहे. मात्र, भाजप सरकार जाणीवपूर्वक त्यांना त्रास देत आहे. प्रियांका गांधी व राहुल गांधी जनतेचा आवाज बनून केंद्र सरकारला सातत्यानं प्रश्न करत आहेत. त्यांची उत्तरं सरकारकडं नसल्यानंच अशा प्रकारे धाकदपटशा दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असं काँग्रेसनं म्हटलं आहे.

 

ठाणे: शहरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक २०.१ टक्के रुग्ण अद्यापही ३१ ते ४० वयोगटातीलच आहेत. मात्र, इतर वयोगटातील रुग्णसंख्येचे आकडेही या संख्येच्या जवळपास पोहचले आहेत. ४१ ते ५० वर्षे वयोगटातील रुग्णांची टक्केवारी १९.९ टक्के तर ५१ ते ६० वयोगटातील रुग्णांची टक्केवारी १९.५ टक्के आहे. तिन्ही वयोगटांमधील रुग्णसंख्येमध्ये आता खूपच कमी फरक असल्याचे दिसत आहे.

ठाणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून ८५००पेक्षा अधिक रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर ३००हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी ठाण्यात पुन्हा २ ते १२ जुलै या कालावधीत लॉकडाउन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. आतापर्यंत शहरात सर्वच वयोगटांतील रुग्ण आढळले आहेत.

रुग्णांमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. मात्र, पालिकेच्या मंगळवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण ३१ ते ४० वयोगटातील असून या गटातील रुग्णांची संख्या १ हजार ७६१वर गेली आहे. हे प्रमाण २०.१ टक्के आहे. यामध्ये ५७६ महिला आणि ११८५ पुरुष रुग्ण आहेत. परंतु, आता अन्य वयोगटांतील रुग्णांची संख्या वाढत आहे.

 

वसई: करोना रुग्णालयात रुग्णांच्या उपचारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पालिका हद्दीतील प्रत्येक करोना रुग्णालयात सीसीटीव्ही लावणे पालिकेने बंधनकारक केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दाखल केलेल्या याचिकेअंतर्गत दिलेल्या आदेशानुसार पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोनाबाधितांना खासगी आणि सरकारी करोना उपचार केंद्रांत विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर अशा आरोग्य संस्थांमध्ये योग्य त्या सुविधा पुरविल्या जाव्यात व यावर देखरेख तसेच नियंत्रण राहावे, यासाठी सीसीटीव्हींच्या माध्यमातून पालिकेमार्फत लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे उपचार केंद्रांमध्ये उपचारासंबंधित पारदर्शकता येणार आहे. उपचार केंद्रांमध्ये बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील छायाचित्रणाची तपासणी पर्यवेक्षण तज्ज्ञ समिती करेल.

या उपचार केंद्रांमध्ये रुग्णांना उपचारासह नातेवाईकांना संपर्क करण्यात अडचण आल्यास रुग्णांच्या एका नातेवाईकास या केंद्रामध्ये समन्वयासाठी उपचार केंद्रांनी निश्चित केलेल्या ठिकाणी थांबण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासंबंधीची विचारपूस व रुग्णांना लागणाऱ्या अन्य खासगी सुविधा पुरविण्यात यामुळे मदत होणार आहे.


 

मुंबई/नेरळ: रेल्वेचं फाटक बंद असताना जीवावर उदार होऊन एका चालकाने कार रुळांवरून नेल्याचा धक्कादायक प्रकार नेरळजवळ घडला. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे रुळ ओलांडणे आणि फाटक बंद असतानाही त्याखालून दुचाकी घुसविणे गुन्हा आहे. अशा प्रकारे रेल्वे रुळ ओलांडण्याने अनेकांचे अपघात होऊन प्राण गेले आहेत. रेल्वेकडून रुळ ओलांडणाऱ्यांवर कारवाईही केली जाते. तसेच अपघात घडू नयेत यासाठी प्रवाशांमध्ये जनजागृतीही केली जाते. मात्र, तरीही रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही किंवा फाटक बंद असताना रुळांवरून वाहने घेऊन जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. नेरळ रेल्वे स्थानकाजवळील फाटकातही बुधवारी असा धक्कादायक प्रकार घडला. एका चालकाने फाटक बंद असतानाही रेल्वे रुळांवरून कार पुढे दामटवली. त्याचवेळी कर्जतच्या दिशेने जाणारी ट्रेन आली. सुदैवाने तोपर्यंत कार रुळांच्या पलीकडे गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

करोनासंबंधी उपाययोजना करण्यासाठी निधीची जमवाजमव करीत असलेल्या राज्य सरकारने आता केंद्र सरकारकडून थेट गावांना मिळालेल्या निधीवर हात मारला आहे. अर्सेनिक अल्बम-३० औषधासाठी म्हणून ग्रामपंचायतींकडे १३ व १४ व्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी राज्य सरकारकडे जमा करण्याचा आदेश काढण्यात आला आहे. या माध्यमातून केंद्र सरकारने ग्रामविकासासाठी पाठविलेल्या निधीवर राज्य सरकार डल्ला मारत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

केंद्र सरकारकडून ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतींना थेट निधी दिला जातो. यावर्षी विविध कारणांमुळे बराच निधी अखर्चित राहिला आहे. गावांच्या खात्यावर जमा असलेला हा निधी पंचायत समिती, जिल्हा परिषद या माध्यमातून राज्य सरकारकडे जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी हा खर्च केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही आयोगांच्या काळात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी व्याजासह ग्रामपंचायतीकडे आहे. एकट्या नगर जिल्ह्यातच सुमारे २६ कोटी रुपयांची ही रक्कम असेल. आदेशानुसार काही ग्रामपंचायतींनी हा निधी परत पाठविलाही आहे.

नवी दिल्ली : देशाचे माजी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी कोर्टात बाजू मांडण्यासाठी टिकटॉकला नकार दिला आहे. कोर्टात स्वतःच्याच देशाविरोधात बाजू मांडू शकत नाही, असं सांगत त्यांनी नकार दिला. केंद्र सरकारने टिकटॉकसह ५९ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. या प्रकरणात केंद्र सरकारविरोधात याचिका दाखल झाल्यास बाजू मांडणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

टिकटॉक, हेलो यांसह चीनचे अॅप प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहेत. भारतीय युझर्ससाठी हे अॅप्स आता उपलब्ध नाहीत. युझर्स डेटाच्या सिक्युरिटीचं कारण देत या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. पण भारतीय कायद्यांनुसार भारतीय युझर्सचा डेटा आणि प्रायव्हसीची काळजी घेतली जाते, असं टिकटॉकने म्हटलं आहे. आपण कोणत्याही परदेशातील सरकारला किंवा चीनला भारतीय युझर्सचा डेटा पुरवलेला नाही, असंही टिकटॉकने स्पष्ट केलं.

टिकटॉकची बाजू मांडलेलं पत्रक टिकटॉकचे भारताचे प्रमुख निखिल गांधी यांनी स्वाक्षरी केलेलं होतं. टिकटॉकसह हेलो, शेअर इट, कॅम स्कॅनर या कोट्यवधी युझर्स असणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिकटॉक हे गेल्या काही दिवसात सर्वात लोकप्रिय झालेलं चायनीज अॅप होतं. दरम्यान, ही बंदी अंतरिम असून संबंधित कंपन्यांच्या प्रमुखांना सरकारसमोर बाजू मांडण्याची संधी दिली जाईल, असं सरकारने म्हटलं आहे.

पंढरपूर:आषाढी यात्रेच्या इतिहासात यंदा प्रथमच करोनामुळे आषाढ शुद्ध दशमीला पंढरपूर नगरी वारकऱ्यांविना ओस पडल्याचं वेदनादायी चित्र पाहायला मिळालं. आषाढी यात्रा म्हटलं की ज्या मंदिर परिसरात यात्रेच्या आदल्या दिवसापासून मुंगी शिरायलाही जागा नसायची त्या संपूर्ण परिसरात मंगळवारी शुकशुकाट पसरला होता. ( Ashadhi Yatra 2020 )

मानाच्या संतांच्या पादुका आज सायंकाळी सरकारी नियमांच्या चौकटीत वाखरी येथे पोहचल्या. या पादुका पहिल्यांदाच अवघ्या २० भाविकांसह एसटी बसेसमधून वाखरी येथे आणल्या गेल्या. पादुका उतरल्यावर सोबत आलेल्या सर्व मानकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पादुका वाखरी पालखीतळावर नेण्यात आल्या. जे पालखी सोहळे लाखोंचा वारकरी भक्तमेळा घेऊन चालतात त्यांना यंदा करोनामुळे बसेसमधून येण्याची वेळ आली. वाखरी येथे शासनाच्या वतीने पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर या पालख्यांच्या भेटीला पंढरपुरातून संत नामदेवरायांच्या पादुका सजवलेल्या बसमधून पंढरपूरच्या विसाव्यापर्यंत गेल्या आणि येथून सर्व मानाच्या पालख्यांचे बसमधूनच पंढरपुरात आगमन झाले.

मुंबई: करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर 'लालबागचा राजा' सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा गणपती उत्सव साजरा न करण्याचा अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना न करता 'देश हाच देव' मानून यंदा आरोग्यउत्सव साजरा करण्याचं मंडळानं ठरवलं आहे. (Lalbaugcha Raja Mandal Cancelled Ganesh Festival)

करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व धर्मीयांनी आपापले सण साधेपणाने व शक्यतो घरात राहूनच साजरे करावेत, असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच केलं आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्यातील गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत बैठकाही घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये उत्सव नेमका कसा साजरा करायचा, मूर्तीची उंची किती असावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन कसे करावे, या संदर्भात चर्चा झाली होती व मंडळांना याबाबतचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनेक मंडळांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उत्सवात बदल करण्याचे निर्णय घेतले होते.

मुंबईतील गणेश गल्ली येथील 'मुंबईचा राजा' मंडळानंही यंदा उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापना न करता केवळ पूजेची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' मंडळानं आगमन मिरवणूक सोहळा व पाटपूजन सोहळा रद्द केला आहे. मुंबईसह राज्यातील अन्य अनेक मोठ्या मंडळांनीही असेच निर्णय घेतले आहेत. 'लालबागच्या राजा' मंडळानं त्याही पुढं जाऊन उत्सवच साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी राजाच्या मंडपात रक्तदान व प्लाझ्मा दानाची शिबिरं घेतली जातील, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. त्यामुळं 'लालबागचा राजा' यंदा भक्तांना अगदी वेगळ्या रूपात दर्शन देणार हे स्पष्ट झालं आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे ८७ वे वर्ष आहे.

 पुणे: कोरेगाव पार्क परिसरात एका रिक्षा चालकावर अज्ञातांनी मध्यरात्री भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल विनायक जगताप (वय ४७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे रिक्षा चालक आहेत. ते राहण्यास कोरेगाव पार्क येथील कवडेवस्ती लेन नंबर पाच येथे होते. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा घेऊन लेन नंबर पाचमधून जात असताना अचानक आलेल्या हल्लेखोरानी त्यांना अडवून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिल्यानंतर कोरेगाव पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी चौकशी सुरू केली असून, त्यांचे कोणाशी वाद होते याबाबत माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच परिसरात असणाऱ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.

मुंबई: 'लॉकडाऊमुळं आज सगळीकडं धार्मिक स्थळं बंद असताना तिथला देव तुमच्या रूपानं आम्हा सगळ्यांना दिसतोय. हजारो रुग्ण तुमच्या प्रयत्नांमुळं बरे होऊन घरी जात आहेत. तुमचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत,' अशा भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Rajesh Tope's Letter to Doctors)

डॉक्टर दिनाचं औचित्य साधून टोपे यांनी आज डॉक्टरांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. 'तुमचा असा कुठलाही एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस नसतो. तो दररोज आपल्यात हवा असतो,' असं टोपे यांनी म्हटलं आहे.

'गेल्या जवळपास साडेतीन महिन्यांपासून तुम्ही-आम्ही सर्वच जण करोनाला हरवण्याच्या ध्येयाने लढतोय. आरोग्य कर्मचारी, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्यासोबत आहेत. आपल्या सर्वांच्या प्रयत्नांमुळं करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत आहे. डॉक्टर, आपली जबाबदारी मोठी आहे. करोनाच्या कल्पनेने हादरून गेलेल्या रुग्णांवर उपचार करून, त्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना पूर्ववत करण्याचं काम आपण करत आहात. रुग्णांच्या संपर्कात राहून व त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवून त्यांना आजारातूनच नव्हे मानसिक पाठबळ देऊनही नव्यानं उभं करत आहात. आपल्या या सेवेचं मोल कशातही मोजता येणार नाही,' अशी कृतज्ञता टोपे यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई: चीनच्या मुद्द्यावर १९६२ पासून चर्चा करायला तयार आहोत, असं सांगणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेनं जोरदार टोला हाणला आहे. 'पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशाचे राजकारण तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न विचारून केंद्र सरकारला लक्ष्य करत आहेत. तर, भाजपही काँग्रेसच्या आरोपांना उत्तर देत आहे. चिनी फंडिंगवरून दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देताना अमित शहा यांनी १९६२ पासून चर्चेची तयारी दाखवली आहे. आम्ही चर्चेला घाबरत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या अनुषंगानं शिवसेनेनं 'सामना'तून भाष्य केलं आहे.

'खरे म्हणजे, १९६२ पर्यंतच्या खोलात जायची गरज आहे काय? तो भूतकाळ आता विसरायला हवा. चीनचे संकट नव्याने उसळले आहे व आपल्याला त्याच्याशी वर्तमानात सामना करून राष्ट्राचे भविष्य घडवायचे आहे. पंडित नेहरूंनी १९६२ साली चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ सालात का रांगताय? आता २०२० उजाडून जग पुढे गेले आहे,' असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.


 

जुन्नर: करोनाबाधित व्यक्तीवर 'पतंजली'ने तयार केलेल्या कोरोनील औषधाने उपचार केल्यास ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन कोरोनामुक्त होते, असा दावा पत्रकार परिषद घेऊन करणाऱ्या बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात आता जुन्नर येथील प्रथमश्रेणी न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आळेफाटा येथील विधी अभ्यासक विद्यार्थी मदन कुर्हे याने ही तक्रार दाखल केली आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता करोनावरील उपचारासाठी औषध तयार करून विक्रीस उपलब्ध करण्याची प्रक्रिया बेकायदा आणि ग्राहकांची फसवणूक असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. करोना विषाणूवरील औषध शोधून काढल्याच्या रामदेव बाबांच्या दाव्याविरोधात महाराष्ट्रात दाखल झालेली ही पहिलीच तक्रार आहे. पुण्यातील अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत ही न्यायालयीन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, राजस्थान सरकारनेही बाबा रामदेव यांचा करोनावरील 'कोरोनिल' या औषधाचा दावा म्हणजे फसवणूक असल्याचे म्हटले असून करोना साथीच्या आजाराचा देशभरात कहर सुरू असताना अशा प्रकारे औषध विकण्याचा प्रयत्न करणे ही चांगली बाब नाही असे राजस्थानचे आरोग्य मंत्री रघु शर्मा म्हणाले होते. या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. तसेच एका डॉक्टरनेही त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले होते.
 

मुंबई: मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. पाकिस्तानमधून हा धमकीचा फोन करण्यातआला आहे. काल, मध्यरात्री १२.३० च्या सुमारास हा धमकी देणारा कॉल आला होता. याशिवाय मुंबईतील कुलाबा आणि ताज लँड्स एंड या हॉटेलांनाही धमकीचे फोन आले होते. यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेले ताज हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणारा फोन आल्यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हॉटेल ताज पॅलेजच्या कर्मचाऱ्याने फोन उचलला. लश्कर-ए-तोयबा या संघटनेचा दहशतवादी असून, हॉटेल बॉम्बस्फोटाने उडवून देऊ. नोव्हेंबर २००८मध्ये ज्या प्रकारे हल्ला केला होता, तसाच हल्ला करू, अशी धमकी समोरून फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने दिली. या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था तातडीने वाढवण्यात आली आहे.

यानंतर काही वेळातच वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये दुसरा फोन केला. तेथील कर्मचाऱ्याने फोन उचलला असता, अशाच प्रकारे धमकी देण्यात आली. दोन्ही ठिकाणी एकाच क्रमांकावरून फोन करण्यात आला होता आणि तो क्रमांक पाकिस्तानातील होता, असे सांगितले जाते.

 

मुंबई: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत हजारो ग्राहकांना या महिन्यात मोठ्या रकमेच्या वीज बिलाचा 'शॉक' बसला आहे. अचानक आलेल्या अव्वाच्या सव्वा रकमेच्या बिलांमुळे सगळेच चक्रावून गेले आहेत. मात्र, हे विजेचं बिल जास्त येण्यामागे काही कारणे आहेत.

करोनानंतरच्या लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झाल्याने वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन मीटर वाचन बंद केले होते. या काळात मागील तीन महिन्यांच्या बिलाची सरासरी काढून त्यानुसार ग्राहकांना बिल पाठवण्यात आलं होतं. राज्य वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसारच कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्यात आलेले

वीज बिल हे जानेवारी, फेब्रुवारी व मार्चच्या बिलाच्या रकमेच्या सरासरीवर आधारीत होते. या तीनही महिन्यात उकाडा तुलनेनं कमी होता. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा, कॉलेज व कार्यालये सुरू असल्यानं लोक नित्यनेमानं घराबाहेर पडत होते. साहजिकच या तीन महिन्यात विजेचा वापर कमी होता. परिणामी बिलाचा आकडाही कमी होता.

एप्रिलपासून उकाडा वाढत गेला. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळं सगळेच लोक घरात होते. साहजिकच एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ३१ मे नंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे मीटर वाचन सुरू केले. त्यानुसार पाठवलेले बिल हे एप्रिल व मे महिन्यातील प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत होते. तो आकडा आधीच्या तुलनेत मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना आता 'शॉक' बसला आहे.

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर एका कंटेनरने स्वीफ्ट कारला मागील बाजूने दिलेल्या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहेत, तर पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक ठप्प झाली होती. ती आता पूर्ववत झाली आहे. (Accident on Mumbai-Pune Expressway)

आज सकाळी सव्वा सातच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कंटेनर मुंबईच्या दिशेनं येत होता. खोपोलीजवळ एका उतारावर असताना या कंटेनरने एका स्विफ्ट कारला मागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात स्विफ्ट कारचा चुराडा झाला आहे. कारमधील दोघे जागीच ठार झाले आहेत. अचानक झालेल्या या अपघातामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या गाड्यांचेही नियंत्रण सुटले आणि आणखी दोन गाड्या कंटेनरला धडकल्या.

अपघातामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महामार्ग पोलीस व अन्य यंत्रणा अपघातस्थळी पोहोचून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्याचे काम सुरू केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर गाड्या बाजूला काढण्यात आल्या असून वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

करोनानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक जवळपास बंद होती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता वाहतूक हळूहळू वाढली आहे. त्यानंतर एक्स्प्रेस वे वर झालेला हा पहिला मोठा अपघात आहे.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत Sushant Singh Rajput याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस Mumbai Police करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात २७ जणांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. रिपोर्टनुसार, पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं आहे. त्यांची चौकशी पुन्हा का केली जाणार आहे याचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.

सुशांतसिंह राजपूत याचा अंतिम शवविच्छेदन अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. गळफास घेतल्यानेच सुशांतचा मृत्यू झाल्याचे त्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. वेगवेगळ्या अंगाने या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबीयांना पुन्हा जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, त्यांची पुन्हा जबाब नोंदणी कशासंदर्भात केली जाणार आहे, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुशांतच्या फायनान्सबाबत आणि कंपनीत रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाच्या भूमिकेबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कसून तपास सुरू
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचे गूढ निर्माण झाले असून, त्याबाबत वांद्रे पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. सोशल मीडियासह सर्वसामान्यांमध्ये सुशांतसिंहच्या आत्महत्येबाबत वेगवेगळे तर्क, कयास मांडले जात आहेत. त्यामुळे हायप्रोफाइल ठरलेल्या प्रकरणात शनिवारी शवविच्छेदन अहवालही पोलिसांना प्राप्त झाला. त्यात सुशांतसिंहचा मृत्यू हा गळफास घेतल्याने झाल्याचे नमूद केले आहे. या अहवालावर अंधेरीतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी स्वाक्षरी केली असल्याचे परिमंडळ ९ चे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले होते.

धुळे: 'धनगर समाजातील काही तरुणांना हाताशी धरून आणि शरद पवारांच्या जातीचा उल्लेख करून धनगर समाजाला मराठा समाजाविरोधात भडकविण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे. हा छुपा अजेंडा राबवण्याचे काम शाखा-शाखांमधून कुजबुज आंदोलनाद्वारे सुरू आहे,' असा घणाघाती आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवारांनी छोट्या समूहांना राजकारणासाठी वापरून घेतले. पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत, असं पडळकर म्हणाले होते. पडळकरांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रक काढून पडळकर व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला होता. भाजपनंही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला. त्यानंतर गोटे यांनी पुन्हा एकदा पत्रक काढून भाजप जाती-जातींमध्ये भांडणं लावत असल्याचा आरोप केला आहे

'नरेंद्र मोदी व अमित शहा जोडीनं करोनाचा आधार घेऊन हिंदू-मुस्लिम समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला. त्या आधारे हिंदू मतांच्या गाठोड्याची बांधाबांध सुरू केली आहे. तर, राज्यातील भाजप नेते पडळकरांच्या नथीतून मराठा समाजावर तीर चालवत आहेत. धनगरांना चिथावणी देत आहेत,' असा आरोप गोटे यांनी केला आहे.

धुळे:देवेंद्र फडणवीस यांना पडलेलं 'टरबुज्या' हे नाव आणि चंद्रकांत पाटलांचा 'चंपा' असा होणारा उल्लेख ही भाजपच्या नेत्यांनीच केलेली नामकरणं आहेत. आपसातील द्वेष आणि टोकाच्या स्पर्धेतून ही गुपचूप बारसी झाली आहेत,' असा दावा माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.

भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. पवारांनी छोट्या समूहांना राजकारणासाठी वापरून घेतले. पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेले करोना आहेत, असं पडळकर म्हणाले होते. पडळकरांच्या या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पडळकरांच्या निमित्तानं भाजपलाही लक्ष्य केलं होतं. भाजपनंही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या टीकेचा प्रतिवाद केला. 'चंपा, टरबुज्या' असं म्हणून भाजपच्या नेत्यांना हिणवणं चालतं का, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष

मुंबई: 'आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत. भाजपला काँग्रेस पक्षाशी नंतर कधीही लढता येईल. पण आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला,' असा टोला शिवसेनेनं मोदी सरकारला हाणला आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यापासून काँग्रेसनं मोदी सरकारला घेरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रोजच्या रोज नवे प्रश्न उपस्थित करून सरकारला कात्रीत पकडत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपनं काँग्रेसला मिळणाऱ्या चिनी पैशांचा मुद्दा उपस्थित केला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली, असा आरोप भाजपनं केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलं आहे. 'सध्या चीनबरोबर लढण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे,' असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. 'हे संकट भाजप किंवा काँगेसवर नाही; तर देशावरील संकट आहे. संपूर्ण देशाचीच प्रतिष्ठा आणि प्रतिमा पणास लागली आहे. चीन दगाबाज आहे व त्याच्या कुरापती सदैव सुरूच राहतील. पण या कुरापती थांबविण्यासाठी आमची योजना काय आहे, असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे.

ठाणे: भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षावरून देशात राजकारण प्रचंड तापले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत यावर खुलासा केल्यानंतरही विरोधकांचे समाधान झालेले नाही. चीनच्या घुसखोरीविषयी आणि शहीद जवानांबद्दल केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती सुरूच आहे.

भारतीय सैन्य देशाच्या सार्वभौमत्व जपण्यास सक्षम आहे. चीननं भारताची एक इंचही जमीन बळकावलेली नाही. भारतीय भूभागावर कुणीही घुसखोर नाहीत, असं पंतप्रधान मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं होतं. मात्र, काँग्रेसनं पंतप्रधानांच्या या खुलाशाला आक्षेप घेतला आहे. चीननं घुसखोरी केली नसेल तर भारताचे २० जवान शहीद कसे झाले, असा प्रश्न काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना केला होता. त्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत एक ट्विट केलं आहे. भारताच्या चीनमधील राजदूतांच्या वक्तव्याचा हवाला देत आव्हाड यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, 'नियंत्रण रेषेवरील परिस्थिती सुधारावी असं वाटत असेल तर चीनने वेळोवेळी घुसखोरी करून तेथे नवीन पायाभूत सुविधा उभारण्याचे बंद करावे, असं भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी सीमावादावर केलेल्या भाषणात नेमकी उलट माहिती दिली आहे. मग खरं कोण बोलतंय? राजदूत की पंतप्रधान?'

पुणे शहरातील आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. कोथरूड परिसरात राहणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी हा प्रकार समोर आला. या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. सूर्यकांत सुभाष बामणे (वय २४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्याालय रस्ता, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Suicide in Kothrud, Pune)

सूर्यकांत कला शाखेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील सातारा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्याालयात प्राध्यापक असून आई शिक्षिका आहे. बामणे कुटुंबीय कोथरूड भागात वास्तव्यास आहेत. ते राहत असलेल्या इमारतीचा पुनर्विकास करण्यात येत असल्याने गेल्या दिवसांपासून ते शिल्पा सोसायटीत भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहत आहेत. शुक्रवारी सकाळी सूर्यकांतचे वडील सातारा येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी तो झोपेतून जागा झाला. वडील घरातून बाहेर पडल्यानंतर तो पाणी पिऊन पुन्हा झोपायला गेला. थोड्या वेळाने त्याला जागे करण्यासाठी त्याच्या आईने खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र, प्रतिसाद न दिल्याने आईने सूर्यकांतच्या मामाला घटनेची माहिती दिली. मामाने दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी सूर्यकांतने पंख्याला दोरी बांधून गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव, पोलिस उपनिरीक्षक यशवंत पडवळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली नव्हती. या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी काम करणाऱ्या दोन व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे. या दोन्ही व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. (Corona enters Raj Thackeray's home)

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना व दोन चालकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यापैकी चालकांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून सुरक्षा रक्षक करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं धोका टळला असं वाटत असतानाच आता राज यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळं मनसैनिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

धारावीनंतर मुंबईतील दादर, माहीम भागात करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात रोजच्या रोज रुग्ण सापडत आहेत. दादर येथील शिवसेना भवनातही काही दिवसांपूर्वीच करोनानं धडक दिली आहे. शिवसेना भवनात नियमित येणाऱ्या एका शिवसैनिकाला करोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आलं असून संपूर्ण इमारतीचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं आहे.

मुंबईतील करोना रुग्णांचा आकडा ७० हजारच्याही पुढं गेला आहे. यापैकी ३९ हजारांहून अधिक रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत तर २८ हजारांहून अधिक रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबई: 'गोपीचंद पडळकर हे काही राजकारण किंवा समाजकारणातले महान व्यक्तिमत्त्व नाही. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजातील एक धडपड्या तरुण म्हणून त्यांना भाजपच्या सोयीसाठी वापरले आहे. त्यामुळे गोपीचंद महाशयांनी पवारांबाबत जे घाणेरडे वक्तव्य केले ते फडणवीस किंवा त्यांच्या भाजपची ‘मन की बात’ तर नाही ना, अशी शंका शिवसेनेनं व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांना मागे ठेवून भाजपने त्यांच्या राजकीय पडद्यावर नवा गोपीचंद आणला आहे. या गोपीचंदच्या करामतींमुळे भाजपवर गावागावात चपलांचा प्रसाद खाण्याची वेळ आली आहे, असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे. (Shivsean targets Gopichand Padalkar and BJP)

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत', अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये एका पत्रकार परिषदेत केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून या प्रकरणावर भाष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेनं पडळकरांबरोबरच भाजपवरही निशाणा साधला आहे. 'गोपीचंद यांनी पवारांबाबत जी वक्तव्ये केली तशी भाजपच्या काही नेत्यांनी अधूनमधून केलीच आहेत. पडळकर यांच्या विधानाशी भाजपचा संबंध नाही असा साळसूदपणाचा आव आता भाजपने आणला. हे सगळ्यात मोठे ढोंग आहे. मोदी यांच्यावर टीका करणार्‍यांना हे लोक देशद्रोही ठरवतात आणि पवारांवर तशीच टीका करणार्‍यांपासून मात्र स्वतःला झटकतात, असा संताप व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई: 'बिहारची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढं ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैन्य दलातील बिहार रेजिमेंटच्या नावाचा वापर करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. 'देशावर यापूर्वी अनेकदा संकटे आली, तेव्हा इतर रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय,' असा सवालही शिवसेनेनं मोदींना केला आहे. (Shivsena targets Modi in Saamana Editorial)

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार आज शिवसेनेनंच मुखपत्र दैनिक 'सामना'तून घेण्यात आला आहे. त्याच अनुषंगानं भाजपच्या आणि मोदींच्या राजकारणावरही टीका करण्यात आली आहे. 'पवारांनी छोट्या समूहांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप पडळकर यांनी केला होता. त्याला उत्तर देताना शिवसेनेनं भाजपच्या राजकारणाचेही दाखले दिले आहेत. 'गोपीचंद पडळकर यांना भाजपनं आमदार केलं यामागे देखील लहान समूहांना वापरण्याचं राजकारणच आहे. या राजकारणात पंतप्रधान मोदीही तरबेज झाले आहेत,' असं शिवसेनेनं मोदींच्या एका भाषणाचा दाखला देऊन म्हटलं आहे.

सिंधुदुर्ग: 'राष्ट्रवादी काँग्रेसकडं गृहखातं असल्यानं त्यांना मस्ती आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. पण महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे हे लक्षात ठेवा. अंगावर आलात तर जशास तसं उत्तर देऊ,' असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना दिला आहे. (Nilesh Rane Warns NCP)

शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला करोना आहेत. त्यांच्याकडं कुठलीही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला, असं वक्तव्य भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं. त्यावरून राजकीय वादंग माजलं होतं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पडळकरांच्या तोंडाला काळं फासण्याचा व चोप देण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं वातावरण तापलं होतं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व प्रवीण दरेकर यांनी पडळकर यांचं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांच्या मताचा भाजपशी संबंध नसल्याचं सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नीलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली आहे.

मुंबई: 'माझ्या आजारपणाच्या काळात बहीण पंकजा हिनं फोन केला आणि सदिच्छा दिल्या, याचा आनंद वाटला,' अशी भावनिक प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

धनंजय मुंडे यांनी नुकतीच करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्यानंतर दहा दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात अर्थातच पंकजा यांनी फोन करून त्यांच्याशी केलेल्या चर्चेचाही उल्लेख होता.

धनंजय मुंडे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळताच पंकजा यांनी तातडीनं त्यांना फोन केला होता. 'बंधू तब्येतीची काळजी घे आणि लवकर बरा होऊन घरी ये,' अशा सदिच्छा पंकजा यांनी व्यक्त केल्या होत्या. त्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे म्हणाले, 'आमच्यात संघर्ष झाला होता. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा आल्या. असं असतानाही बहिणीचा फोन आल्याचा आनंद झाला.'

'आपल्याला काही होणार नाही हा आत्मविश्वास मला नडला. करोना पॉझिटिव्ह झाल्याचं समजताच कुटुंबाची चिंता लागली. घरात कुणाला करोनाची लागण झाली नसेल ना, हा विचार सतत यायचा. सर्वात आधी आईचा चेहरा समोर आला. मुलींनी सगळं समजून घेतलं. आता माझी प्रकृती चांगली आहे. सध्या घरातचं क्वारंटाइन आहे. जनतेच्या आशीर्वादानं व आई-वडिलांच्या पुण्याईमुळं मला हे जीवन पुन्हा मिळालं आहे,' अशी कृतज्ञता त्यांनी यावेळी व्यक्त केली. 'मानसिकदृष्ट्या खचून जाऊ नका. खूप आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन त्यांनी लोकांना केलं आहे.

मुंबई: राज्यात अखेर २८ जूनपासून (रविवार) सलून पुन्हा एकदा सुरू होणार आहेत. मुंबई सह राज्यभरात सलून सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतची मार्गदर्शक तत्वे आखून देण्यात आली असून सलून व्यावसायिकांना त्याचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे. दरम्यान, सलूनमध्ये तूर्त फक्त केस कापण्यास परवानगी असेल, दाढी करण्यास परवानगी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ( Maharashtra Salons Open )

राज्यात सलून सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी ब्युटी पार्लर आणि स्पा सुरू करण्यास मात्र तूर्त परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत सलूनबाबत सांगोपांग चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सलूनसाठी नियमावली तयार करण्यात आली असून सोशल डिस्टन्सिंगचं पालन, मास्कचा वापर, सॅनिटाइझेशन बंधनकारक असेल, असे सांगण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'तूर्त सलूनमध्ये केस कापण्याचीच परवानगी देण्यात आलेली आहे. दाढीबाबत निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. सलूनमध्ये केस कापण्यासाठी जाणाऱ्याने मास्क वापरणे बंधनकारक आहे. त्याचवेळी जो केस कापणारा आहे, त्यानेही मास्क वापरायचा आहे. सोशल डिस्टन्सिंगचे अन्य सर्व नियम पाळणेही सक्तीचे असणार आहे. पुढचे काही दिवस याचे बारीक निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येतील.'

मुंबई: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर पवारांचे नातू व आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'खालच्या पातळीवरचं हे राजकारण पाहिलं की दु:ख होतं आणि चीडही येते. पण त्यात लोकांचा फायदा नाही म्हणून आम्ही त्याकडं दुर्लक्ष करतो,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. (Rohit Pawar slams Gopichand Padalkar)

'शरद पवार यांनी बहुजन समाजावर नेहमीच अन्याय केला असून छोट्या समूहाला भडकवण्याचं काम केलं आहे. पवार हे महाराष्ट्राला लागलेले करोना आहेत', अशी टीका पडळकर यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती. पडळकरांच्या या वक्तव्याचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलताना रोहित यांनीही यावर भाष्य केलं. 'लोकप्रिय नेत्याबद्दल उलटसुलट बोललं की राजकीय प्रसिद्धी मिळते, असं काही लोकांना वाटतं. टीव्हीवर व वर्तमानपत्रात येण्यासाठी हे केलं जातं. पण या राजकारणाचा लोकांना काही फायदा नसतो. त्यामुळं आम्ही सर्वच जण त्याकडं दुर्लक्ष करतो,' असं ते म्हणाले.

शरद पवार हे गेल्या ५५ वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. लोकांसाठी काम करताहेत. लोकांच्या मनात आहेत. ज्या लोकांना काही काम नाही, तेच शरद पवारांच्या बदनामीसाठी हे प्रयत्न करत आहेत. शरद पवारांनी जितकी वर्षे काम केलंय, तितकं याचं वयही नाही,' असा टोला रोहित यांनी पडळकर यांना हाणला.

मुंबई : राजकीय स्तरावर असा कोणताच प्रश्न नसतो, ज्याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नसेल. बुधवारीही राज्यातील खाजगी बस चालकांना याचा अनुभव आला. गेल्या ४६ दिवसात परिवहन विभागासोबत चालू असलेल्या चर्चेत जे समाधान निघालं नाही, ते शरद पवार यांनी अवघ्या दोन तासात काढलं. बस चालकांकडून कर सवलती आणि कठोर नियम मागे घेण्याची मागणी केली जात होती. या बस चालकांना आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडूनच आश्वासन मिळालं असून कॅबिनेटसमोर हा विषय येणार आहे.

हजार बसेस आहेत. बस व्यावसायिकांनी महिन्याला ७०० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याचा दावा केला आहे. यासाठीच ८ मे रोजी परिवहन विभागाला पत्र लिहून व्यावसायिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. परराज्यातील बसेसना परवानगी दिली आहे. पण राज्यातील बसेसना ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे थांबवून चौकशी केली जात असल्याचं बस चालकांनी सांगितलं. या पत्रात इतरही मागण्या होत्या. पण परिवहन विभागाने या बस चालकांची भेट घेण्यासही नकार दिला होता. त्यामुळेच संतापलेल्या बस चालकांनी गुरुवारपासून संपावर जाण्याचा इशारा दिला.

अखेरचा प्रयत्न म्हणून या बस व्यावसायिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवारांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी ११ वाजता भेट ठरली. पवारांनी या बस व्यावसायिकांना सर्व मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं. आपल्या अपेक्षेपेक्षाही कमी वेळेत पवारांनी समाधान शोधल्यामुळे बस व्यावसायिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबई: शेजारच्या अल्पवयीन मुलीला बळजबरी किस केल्याप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने आरोपीला पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या आरोपी आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पॉक्सो अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या दोषीचं नाव अब्दुल रहमान महबूब लोहार (वय ३०) आहे. त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दोषी लोहारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिलमधील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ जून २०१८ रोजी शेजारी राहणाऱ्या लोहार याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याची आठ वर्षांची मुलगी आहे. पीडितेचे वडील कामावरून घरी परतत होते. त्याचवेळी त्याच्या बहिणीचा फोन आला. तिने घटनेची माहिती दिली. त्याने तातडीने घरी धाव घेतली आणि नेमके काय घडले हे जाणून घेतले. घटनेबाबत पत्नी आणि मुलीने सर्व हकिकत सांगितली.

त्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही मुली सार्वजनिक शौचालयात गेल्या होत्या. मुली शौचालयात गेल्या असता, तिथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अंधार होता. मोठ्या मुलीने तिच्या लहान बहिणीला मोबाइल आणायला सांगितले. आठ वर्षांची मुलगी मोबाइल घेऊन शौचालयाकडे जात असताना, अंधारात दबा धरून बसलेला शेजारचा लोहार याने मुलीला पकडले. त्यानंतर तिला जबरदस्ती किस केला. मुलीने आरडाओरडा केला. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. घडलेल्या घटनेबाबत तिने मोठ्या बहिणीला सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या दोन्ही मुली आपल्या घरी गेल्या. घडलेली सर्व घटना तिने आईला सांगितली.

सोलापूर: 'मागील तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,' अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Prakash Ambedkar opposes Corona Caller Tune)

देशात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मोबाइलवर एक कॉलर ट्यून वाजत आहे. करोनापासून सावध कसे राहायचे याची माहिती या कॉलर ट्यूनमधून दिली जाते. देशात अनलॉकचे पर्व सुरू झाल्यानंतर सूचनांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र, कॉलर ट्यून सुरूच आहे. नंबर डायल करताच सुरू होणाऱ्या या ट्यूनमुळं लोक त्रस्त आहेत. प्रकाश आंबेडकरांनी यामागे षडयंत्र असावं, असा संशय व्यक्त केला आहे. 'करोनाच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल करत आहे. एकाकी जीवन जगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मुंबई: महाराष्ट्रात करोना विषाणू संसर्गाचा सर्वात मोठा फटका पोलीस दलाला बसला आहे. महाराष्ट्र पोलीस दलाने आतापर्यंत या महामारीच्या संकटात ५१ पोलीस गमावले आहेत तर आतापर्यंत ४ हजार २८८ पोलिसांना करोना संसर्गाची लागण झाली आहे. पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ( Maharashtra Police Corona News )

महाराष्ट्र गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळापासून करोना संसर्गाच्या संकटाविरुद्ध लढा देत आहे. या दरम्यान राज्यात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने

लॉकडाऊन लागू करण्याचे पाऊल उचलले. त्यासोबत राज्यात सर्वत्र जमावबंदीही लागू करण्यात आली. सरकारच्या या आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वस्वी पोलीस दलावर होती. अर्थातच पोलीस आपलं आरोग्य धोक्यात घालून जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र पहारा देत आहेत. त्यातूनच पोलीस दल करोनाच्या विळख्यात सापडलं आहे. राज्याच्या सर्व विभागांत पोलीस दलात करोनाने शिरकाव केला आहे.

राज्यात करोनामुळे आतापर्यंत तब्बल ५१ पोलिसांचा मृत्यू झाला असून त्यात दोन अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती या पोलीस अधिकाऱ्याने दिली. मुंबई पोलीस दलातीलच ३४ पोलीस अधिकाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचेही हा अधिकारी म्हणाला. राज्यात एकूण ४ हजार २८८ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यात गेल्या ४८ तासांत १८५ पोलिसांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण करोना बाधित पोलिसांपैकी ३२३९ पोलिसांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला. सध्या राज्यात करोना बाधित ९९८ पोलिसांवर उपचार सुरू असून त्यात १०४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असेही या अधिकाऱ्याने नमूद केले.

मुंबईः आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील करोनाचा विळखा आता सैल होत आहे. धारावीतील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवणे पालिका आणि राज्य सरकारला यश आले आहे. केंद्र सरकारनंही राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. मुंबईतील वाढत्या करोना रुग्णांच्या संख्येवरून सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

मुंबईत करोनावर नियंत्रण मिळवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उत्तर दिलं आहे. 'धारावीतील विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा. 'सरकार काय करते?' असं विचारणाऱ्या विरोधकांनाही उत्सवात सन्मानाने बोलवा.' असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
'धारावीत व्हायरसच्या छाताडावर पाय रोवून महापालिकेनं जगात विजयपताका फडकावली. धारावीतील विजयाचा उत्सव साजरा व्हायला हवा. धारावीनं करोनानं युद्ध जिंकले असून व्हायरस पराभूत झाला. केंद्रानंही पालिकेची पाठ थोपटली आहे. धारावीच्या झोपडपट्टीत करोना रुग्णवाढीचा वेग ४.३ टक्के असून तो जूनमध्ये १.०२ टक्क्यांवर आला आहे. तसंच, दिवसाला सरासरी ४३ रुग्ण असे प्रमाण होते ते आता १९वर आलं आहे. एप्रिलमध्ये रुग्णवाढीचा वेग १२ टक्के होता तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १८ दिवसांचा होता,' असं सामनाच्या अग्रलेखात लिहलं आहे.
 

औरंगाबाद: पाच वर्षांनंतर महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आलेल्या काँग्रेसने सरकारमध्ये स्थिरावल्यानंतर आता पक्ष संघटनेत लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील विविध जिल्हे व शहरांच्या नेतृत्वात बदल केला आहे.

आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून औरंगाबाद शहर व जिल्ह्याचे प्रमुखही बदलण्यात आले आहेत. औरंगाबादचे जिल्हाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे मानले जाणारे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्याकडं देण्यात आलं आहे. तर हिशाम ओसमानी यांच्यावर शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेस समितीने बुधवारी यासंदर्भात पत्र काढले आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या पत्रात लातूर, औरंगाबाद, ठाणे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथील पदाधिकारी बदलले आहेत.

 

मुंबई: करोना रुग्णसंख्येचा मुंबईतील उद्रेकाचा काळ संपलेला आहे आणि आकडे खाली येतील, असं मत राज्य सरकार नियुक्त टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केलं. गेल्या तीन आठवड्यांपासून नवीन रुग्ण, दुप्पट दर, बरे होण्याचा दर या सर्व निकषांमध्ये सकारात्मक घसरण झाली असल्याचं ते म्हणाले. मे महिन्याच्या तुलनेत परिस्थिती चांगली असल्याचं त्यांनी सांगितलं. पण पावसाळ्यामुळे या परिस्थितीला फटका बसू शकतो. पावसात प्रत्येक जणच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो असं नाही आणि आपल्याकडे हवी तशी आरोग्य सुविधाही नाही. मुंबईतील काही भागात रुग्णसंख्येत वाढ अपेक्षित असल्याचंही त्यांनी मान्य केलं.

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार मुंबईत मे महिन्याच्या अखेरपर्यंत ७५ हजार रुग्ण असणं अपेक्षित होतं. पण मे अखेर मुंबईत फक्त ३९ हजार ४४४ रुग्ण होते, तर २२ जून रोजी मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ६७ हजार ६३५ एवढा होता. संजय ओक यांच्या मते, जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच दिवसाला ३ हजार केसेस अपेक्षित होत्या. पण सध्या एक हजारच्या आसपास केसेस येत आहेत. असं असलं तरी धोका अजून टळलेला नाही. अनलॉकिंग आणि पावसामुळे यात अजून वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने सावध रहावं, असं ते म्हणाले.

टास्क फोर्सच्या आकडेवारीनुसार, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असलेला १३ टक्के दुप्पट दर आता जूनच्या पहिल्या आठवड्यात ३७ टक्के आहे. ३० टक्क्यांच्या वरील दर हा सुरक्षित मानला जातो आणि उद्रेकाचा काळ मागे गेला आहे, असं ओक म्हणाले. मुंबईत मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. सध्या बरे होण्याचा दर ५० टक्के आहे, जो आता ७० टक्क्यांवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं ओक म्हणाले. रेमडेसिविर आणि फेवीपिराविर यांसारख्या औषधांमुळे या महिनाअखेरपर्यंत हा दर ७० टक्क्यांवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंढरपूर: 'करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा बाहेरील लोकांना व महाराजांना पंढरपुरात प्रवेश नाही. त्यांना प्रवेश नसेल तर उद्धव ठाकरे यांनीही एकादशीला येऊ नये. त्यांनी घरातच विठुरायाची पूजा करावी,' असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. (Gopichand Padalkar's advice to CM Thackeray)

प्रतिवर्षी आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक श्री विठ्ठलाची महापूजा करतात. त्यांच्यासोबत राज्यातील एका दाम्पत्यालाही पूजेचा मान दिला जातो. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. मात्र, यंदा करोनाच्या संकटामुळं आषाढीचा सोहळाही रद्द करण्यात आला आहे. प्रमुख पालख्या मोजक्या प्रतिनिधींसह पंढरपुरात दाखल होणार आहेत. विठ्ठलभक्तांना पंढरपुरात येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे हे विठुरायाच्या पूजेसाठी येणार का याबाबत उत्सुकता आहे. तोच धागा पकडून गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना टोला हाणला आहे. पंढरपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई : करोना संकटाच्या काळात अनेक ठिकाणी होत्याचं नव्हतं झालं आहे. दक्षिण मुंबईतील नेपियन सी रोडवरही असंच चित्र आहे. या भागातील ग्राहकांच्या आवडीचे पाणीपुरी विक्रेते भगवती यादव आता परत कधीही पाणीपुरी विकताना दिसणार नाहीत. कारण, करोनाने त्यांचा बळी घेतला. भगवती यांना बिस्लेरी पाणीपुरी मॅन असं म्हटलं जायचं. भगवती यादव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांचे ग्राहक एकवटले आहेत. या ग्राहकांनी ५ लाख रुपये जमवण्याचं नियोजन केलं आहे.

आवाहनानंतर २४ तासातच ७९ जणांकडून १.४५ लाख रुपये जमाही झाले. यापैकी अनेक जण बाहेर राहतात. भगवती यादव यांचे अनेक ग्राहक सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत. या ग्राहकांनी प्रत्येकी १०० डॉलरची मदत केली. देशातील इतर भागात स्थायिक झालेल्या त्यांच्या पूर्वीच्या ग्राहकांनीही मदत पाठवली आहे. भगवती यादव यांचे नियमित ग्राहक गिरीश अग्रवाल यांनी सांगितलं, की 'आम्ही लहानपणापासून त्यांच्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी यायचो. त्यांच्याकडील दही बटाटा पुरी आणि पाणीपुरी प्रसिद्ध होती. दररोज सायंकाळी ते न चुकता त्यांच्या जागेवर यायचे. उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो, त्यांनी ग्राहकांची सेवा करण्याचा नियम कधीही चुकवला नाही.'

 

मुंबईः मुंबईत ७० करोनाबाधित रुग्ण बेपत्त असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बेपत्ता रुग्णांचा शोध घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं मुंबई पोलिसांची मदत मागितली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याआधीही मालाड येथील शताब्दी रुग्णालयातून वृद्ध करोना रुग्ण पळून गेल्यानं खळबळ माजली होती. त्यामुळं प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मुंबईत करोना रुग्णांचा वाढता आकडा कमी करण्यासाठी पालिका नवीन उपाययोजना आखत असतानाच करोना रुग्णांना शोधण्याचं पालिकेसमोर आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईतील मालाड परिसरातून ७० रुग्ण बेपत्ता झाले आहेत. हा परिसर नुकताच करोनाचा हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या रुग्णांचा कॉल रेकॉर्डिंग डेटा तपासला असून त्यांच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

मुंबई: शिवसेना भवनात वावर असलेल्या एका ज्येष्ठ शिवसैनिकाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर खबरदारी म्हणून मुंबईतील शिवसेना भवन काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेतील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. (Shivsena Bhavan Sealed)

दादर येथील शिवसेना भवन हे शिवसेना पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आहे. शिवसेनेशी संलग्न असलेल्या विविध संघटनांची कार्यालयं शिवसेना भवनाच्या इमारतीत आहेत. त्यात स्थानीय लोकाधिकार समिती, भारतीय कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व अन्य संघटनांची कार्यालये आहेत. या संघटनांशी संबंधित अनेक पदाधिकारी रोजच्या रोज इथं येत असतात. शिवसेना भवनात कायमस्वरूपी कर्मचारी वर्गही आहे. त्याशिवाय, शिवसेनेच्या छोट्या-मोठ्या अनेक दैनंदिन बैठकाही इथे होत असतात. त्या निमित्तानं अनेक शिवसैनिकांचा इथे राबता असतो.

 

मुंबई: 'मुंबईचा राजा' अशी ख्याती असलेल्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (गणेश गल्ली) यंदा श्रींची मूर्ती केवळ ४ फुटांची ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे.

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा व्हावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मुंबई पोलीस व महापालिकेनेही मंडळांना तशी विनंती केली होती. त्यानुसार राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी सामाजिक भान जपण्याचा निर्णय घेतला आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी' नंतर आता गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानेही असाच स्तुत्य निर्णय घेतला आहे.

गणेश गल्लीतील 'मुंबईचा राजा' हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. 'मुंबईचा राजा'ची मूर्ती सुमारे २२ फुटांची असते. यंदा मंडळानं सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तीची उंची चार फुटांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पूजेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा यंदा केली जाणार असून ही मूर्ती शाडूची असेल. मूर्तीचं विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. भाविकांसाठी 'लाइव्ह दर्शन'ची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असा निर्णय मंडळाच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे.

मुंबई : करोना संसर्गाची लक्षणे दिसल्याशिवाय चाचण्या न करण्याचा निर्णय बदलत्या नियमावलीनुसार घेण्यात आला आहे. मात्र आता या चाचण्यांऐवजी एक्स-रे तसेच सिटीस्कॅन तपासण्या करून करोनाचे शंकासमाधान करून घेण्याचा कल वाढला आहे. या दोन्ही तपासण्यांच्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचा अनुभव रेडिओलॉजिस्टनी सांगितला आहे.

केईएम रुग्णालयातील करोनाची लागण झालेल्या एका निवासी डॉक्टरला लक्षणे दिसत नव्हती, मात्र चाचणी पॉझिटिव्ह आली. ही चाचणी करण्यापूर्वी सिटीस्कॅनही करण्यात आले. त्यामध्ये फुफ्फुसामध्ये संसर्गाची लागण झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे दिलासा मिळाल्याचे या डॉक्टरने सांगितले. अनेक रुग्णांमध्ये करोनाची चाचणी पॉझिटिव्ह असली तरीही लक्षणे दिसून येत नाहीत. फुफ्फुसामध्ये संसर्ग आहे का, असल्यास तो किती प्रमाणामध्ये आहे याचे निदान करण्यासाठी या दोन्ही तपासण्या करून घेतल्या जात आहेत. यासंदर्भात फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. सलील बेंद्रे यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की, संशयित करोनारुग्णाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन, एक्स-रेची मदत होते. विषाणूमुळे झालेला प्रादुर्भाव, न्यूमोनिया आहे का, हे पाहण्यासाठीही या चाचण्या केल्या जातात.

स्वॅबची तपासणी केल्यानंतर येणाऱ्या अहवालासाठी २४ ते ४८ तास थांबावे लागते. त्या तुलनेमध्ये हा अहवाल लगेच येतो. शिवाय रेडिओलॉजिस्ट सिटीस्कॅन वा एक्स-रेमधील निदान संबंधित डॉक्टरांना फोनवरून कळवत असल्याने वेळही जात नाही. मागील काही दिवसांमध्ये विविध प्रकारच्या व्याधी असलेल्या काही रुग्णांमध्ये कोविडची लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांचा अत्यल्प काळामध्ये मृत्यू ओढवला आहे. अशा प्रकरणांमध्ये वेळ कमी असताना करोनाचे निदान करण्यासाठी या तपासण्यांचा वापर सुचवला जातो.

 

पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे (पीएमपी) पुणेकरांना वातानुकूलित ई-बसची सेवा पुरविणाऱ्या चीनच्या 'बीवायडी ओलेक्ट्रा' या कंपनीशी असलेला करार रद्द करण्याबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. याशिवाय येत्या काळात पीएमपीच्या ताफ्यात दाखल होऊ घातलेल्या साडेतीनशे बसची खरेदीही स्थगित करण्यात आली आहे.

पीएमपी प्रशासनाकडून पाचशे वातानुकूलित बस दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. जानेवारी २०१९मध्ये पीएमपीच्या ताफ्यात सर्वप्रथम दहा बस दाखल झाल्या. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या बस दाखल होत गेल्या. मात्र, आता करोनामुळे या बसची सेवा २४ मार्चपासून बंदच आहे. त्यास आता तीन महिने होतील. या काळात पीएमपीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने सर्व कंत्राटी सेवा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. त्या अंतर्गत वातानुकूलित बस सेवादेखील बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत कागदोपत्री कार्यवाही झाली आहे, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे आणि संचालक शंकर पवार यांनी दिली.

मुंबई: राज्यातील सात शहरांत सुमारे ८१ हजार फ्लॅट्स तयार स्थितीत पडून आहेत. या फ्लॅट्सच्या विक्रीद्वारे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी मुद्रांक शुल्क कमी व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र उद्योग व व्यापार महासंघ अर्थात केमिटने केली आहे. राज्याचे पुनर्निर्माण करायचे असल्यास पायाभूत, पर्यटन व रrअल इस्टेट क्षेत्राच्या माध्यमातूनच शक्य आहे, असे त्यांनी महसूल मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आर्थिक राजधानी मुंबईसह राज्यातील सात शहरांत ६.५६ लाख फ्लॅट्स तयार आहेत. त्यापैकी १२ टक्के अर्थात, ८१,३०० फ्लॅट्स पूर्णपणे तयार आहेत. सर्वाधिक तयार फ्लॅट्स ४० लाख रुपयांच्या खालील किमतीचे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत आहेत. ही घरे प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेशात आहेत. रीअल इस्टेटमध्ये ७० ते ८० टक्के खरेदीदारांनी आपली गृहखरेदी तूर्तास लांबणीवर टाकली आहे. तर भाडेपट्टीच्या रुपात या क्षेत्राला १० ते १२ टक्क्यांचा फटका बसला आहे. मुद्रांक शुल्कात कपात केल्यास काही प्रमाणात तरी हे क्षेत्र सुरू होऊ शकेल, असे केमिटचे म्हणणे आहे. पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने स्वत:चे रोखे बाजारात आणावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मुंबई: 'ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावास राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना आदित्य यांनी तसं पत्रच लिहिलं आहे. (Aaditya Thackeray writes to Prakash Javadekar)

लॉकडाऊनमुळं ठप्प झालेले आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मागील महिन्यात २१ लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचबरोबर, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यानुसार कोळसा खाण उत्खननात खासगी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता पुढील प्रक्रियेला वेग आला आहे. केंद्र सरकारने एकूण ४१ खाणींच्या लिलावाला परवानगी दिली आहे. त्यात बंदर कोळसा खाणीचा समावेश आहे. ही खाण

 कोल्हापूर: 'शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच शेतक-यांना खरिपाच्या हंगामासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही,' असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. खरिप हंगामाकरिता शेतक-यांना तातडीने कर्जपुरवठा व्हावा, या मागणीसाठी त्यांनी सोमवारी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पावसाळा सुरू झाला तरी शेतक-यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत, असा आरोप करीत भाजपने सोमवारी राज्यभर शेतीचा कर्जपुरवठा सुरळीत सुरू व्हावा, या मागणीसाठी आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हाधिका-यांसह बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'शेतक-यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्र्यांनी केली. नियमित कर्ज भरणाऱ्याना ५०,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ असं सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी तर तीन महिन्यात कर्जमाफी दिली नाही तर, नाव बदलवू अशी घोषणा केली. विधानसभेत बाके वाजली. अभिनंदन करून घेतले. प्रत्यक्षात मात्र या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच त्याची अंमलबजावणी होत नाही. असं ते म्हणाले

मुंबई: परप्रांतीय मजूर पुन्हा जर महाराष्ट्रात येणार असतील तर 'आंतरराज्यीय स्थलांतर कायद्यान्वये' नोंदणी व वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात यावा. तसेच महाराष्ट्रात आता उपलब्ध होणाऱ्या रोजगारांमध्ये ८० टक्के स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी आज मनसेच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली. ( MNS on Migrant Workers )

भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या मनसेने करोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व अशा स्थितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा भूमिपुत्रांच्या रोजगाराचा मुद्दा पुढे रेटला आहे. परराज्यातील मजुरांबाबत सूचना करताना स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत मनसेने आज राज्यपालांकरवी सरकारपुढे आपली मागणी ठेवली. परराज्यातून परतणाऱ्या कामगारांची नोंदणी सक्तीची करावी, ही प्रमुख मागणी मनसेने केली. मनसे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे, आमदार राजू पाटील यांचा शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने मागण्यांचं निवेदनही राज्यपालांना दिलं आहे.

मुंबईः करोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयांकडून त्याविषयी अव्वाच्या सव्वा बिल आकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी महानगरपालिका व प्रशासनाकडे आल्या आहेत. या तक्रारींवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. जर खासगी रुग्णालय आवाजवी बिल आकारत असतील तर यांसदर्भात तातडीनं तक्रार करण्याचं आवाहन मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

खासगी रुग्णालयांकडून असंवेदनशीलता दाखवत नफेखोरीचे धोरण अवलंबले जाताना दिसत आहे. करोनाबाधित रुग्णांकडून लाखांच्या घरात बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी या आधीही पालिकेकडे आल्या होत्या. या तक्रारींची पालिका प्रशासनाने शहानिशा केल्यानंतर २६ रुग्णालयांतील १३४ बिलांमधील २३ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम कमी झाली आहे. मूळ आकारणीचा विचार करता सुमारे १५ टक्क्यांनी बिलांची रक्कम कमी होऊन रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

करोनारुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, म्हणून राज्य सरकारच्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसार शुल्क आकारणी करणे बंधनकारक आहे. असे असले तरी खासगी रुग्णालये अवाजवी आकारणी करीत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. यामुळे प्रशासनाने याची खातरजमा करण्यासाठी पालिकेच्या मुख्य लेखा परीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
 

पिंपरी : मित्रांसोबत गांजा पिताना झालेल्या भांडणातून चार जणांनी मिळून तरुणाचा गळा आवळून; तसेच डोक्यात दगड घालून खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी डिझेल टाकून दोनदा मृतदेह जाळला; तरीही मृतदेह पूर्ण न जळाल्याने अर्धा जळालेला मृतदेह पवना नदीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींना प्रथम अटक आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

बिल्लू उर्फ विकी उर्फ जसबीरसिंग गुलजारसिंग विरदी (१९, रा. मिलिंदनगर, रिव्हर रोड, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नीरज अशोक जांगयानी (२६), ललित लालचंद ठाकूर (२१), योगेश केशव पंजवाणी (३१), हरज्योतसिंग रणजितसिंग लोहिर (२२, सर्व रा. पिंपरी) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

बिल्लू घरी न आल्याने ८ मार्च २०२० ला पिंपरी पोलिस ठाण्यात बिल्लूच्या बेपत्ता होण्याची नोंद करण्यात आली होती. रविवारी (२१ जून) पिंपरी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींसोबत पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पुणे: रास्ता पेठेतील एका हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे घडली. या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वीच कॅन्सरने मृत्यू झाला. त्यानंतर अवघा १३ वर्षांचा मुलगाही गंभीर आजारी आहे. यामुळे नैराश्यातून महिलेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

वानवडी येथील ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेचा १३ वर्षांच्या मुलगा किडनी व मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्यावर रास्ता पेठेतील हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक सहा क्रमांकाच्या खोलीत उपचार सुरू होते. या खोलीच्या खिडकीला ग्रील नव्हते. या महिलेने सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. महिला खाली पडल्यानंतर येथील सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या महिलेच्या मुलावर याच विभागात उपचार सुरू असल्याचे समजले. या महिलेकडे सुसाईड नोट सापडली आहे. त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.

या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वी कॅन्सरच्या आजाराने मृत्यू झाला होता. तसेच, गेल्या चार वर्षांपासून त्यांचा मुलगा किडनी व मधुमेहाच्या आजाराने ग्रासलेला आहे. तो नियमित या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत होता. या नैराश्यातूनच महिलेने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

कणकवली: 'ग्रामीण भागातील जुन्या कडवट शिवसैनिकांना वा नेत्यांची साधी विचारपूस केली जात नाही. मग काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची 'सामना'ला इतकी चिंता का,' असा सवाल भाजपचे कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांनी केला आहे. (Nitesh Rane Criticises Shiv Sena)

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीच्या मुद्द्यावरून अलीकडेच बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर काँग्रेस नाराज नसल्याचे आणि महाविकास आघाडी भक्कम असल्याचे थोरात यांनी जाहीर केले होते. त्यावरून विखेंनी थोरातांवर टीका केली होती. काँग्रेस इतकी लाचार कधी झाली नव्हती, असं ते म्हणाले. थोरातांनी त्यांना जशास तसं उत्तर दिलं. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा सुरू आहे. या वादात उडी घेत शिवसेनेनं आज 'सामना'च्या अग्रलेखातून विखे-पाटील यांच्यावर टीका केली होती. सत्तेसाठी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही अग्रलेखातून निशाणा साधला होता. कोकण आणि तळकोकणचा उल्लेखही त्यात होता. त्यावरून नीतेश राणे संतापले आहेत.

मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे लढवय्ये नेते धनंजय मुंडे यांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलं आहे. (Dhananjay Munde beats Corona)

दहा दिवसांपूर्वी मुंडे यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यांच्या सोबतच त्यांचे दोन स्वीय सहायक, मुंबईतील वाहन चालक, बीडचा स्वयंपाकी आणि बीडचा वाहनचालक यांचे

करोना अहवालही पॉझिटिव्ह आले होते. मुंडे यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. इतर कुठलीही लक्षणं त्यांच्यात दिसत नव्हती. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं गेले दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समजतं.

 

अहमदनगर: 'काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांचे स्‍थान काय आहे? मी पक्ष सोडला म्‍हणून त्‍यांना पद मिळाले. आता मंत्रिपद टि‍कविण्‍यासाठी त्‍यांची धडपड सुरू आहे,' अशा शब्दांत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला चढवला आहे. (War of Words between Balasaheb Thorat and Radhakrishna Vikhe-Patil)

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या कथित नाराजीवरून विखे-थोरात यांच्यात गेल्या दोन दिवसांपासून वाकयुद्ध सुरू आहे. थोरात यांनी अलीकडंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री' निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावरून काँग्रेस एवढी कधीच लाचार नव्हती असा टोला विखे यांनी हाणला होता. थोरात यांनी विखेंच्या या टीकेला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या पाया पडणारा विरोधी पक्षनेता महाराष्ट्रानं पाहिला आहे, अशी बोचरी टीका थोरात यांनी विखेंवर केली होती.

लोणी येथे आज पत्रकारांशी बोलताना विखे यांनी थोरात यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'कोण कोणाच्‍या पाया पडतो हे पाहणारे थोरात मुख्‍यमंत्र्यांच्‍या बंगल्‍यात काय करायचे? भ्रष्टाचाराच्‍या फाइल काढू नयेत म्‍हणून मुख्यमंत्र्यांचे पाय दाबायचे की भाजपमध्‍ये घ्‍या म्‍हणून विनवणी करायचे यावरही त्‍यांनी बोलले पाहिजे, असं आव्‍हान विखे यांनी दिले.

ठाणे: भारत-चीन सीमेवरील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. 'भारताच्या सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केला होता. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. 'सीमेच्या आत कुणी आलंच नसेल तर २० सैनिकांच्या हौतात्म्याची जबाबदारी कोणाची,' असा सवाल राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला केला आहे. (India-China Face Off)

 

भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. यात भारताचे २० जवान शहीद झाले. चीनचे किती नुकसान झाले याबाबत कुठलीही ठोस माहिती नाही. चिनी सैनिकांच्या मृत्यूबाबत त्या देशानं अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. चीनचा एकही सैनिक मारला गेला नसल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं भारतभर चीन विरोधात प्रचंड रोष आहे. विरोधी पक्षांनी याच मुद्द्यावरून सरकारला घेरलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांना आश्वस्त केले होते. 'आपल्या हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. भारताची एकही सैनिकी पोस्ट कुणी ताब्यात घेतलेली नाही. शत्रूला धडा शिकवून आपले वीर जवान शहीद झाले आहेत,' असं मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, त्यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपवर टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या आव्हाड यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. 'जर कुणी सीमेत घुसलं नाही, कुठल्या पोस्टवर ताबा घेतला नाही मग २० सैनिकांच्या बलिदानाची जबाबदारी कोणाची,' असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

करोनाचा मुकाबला करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने स्वत:च बळी पडलेल्या पोलिसांना सध्या ‘करोना योद्धा’ म्हटले जात आहे. मात्र, २१ ऑक्टोबरला पोलिस स्मृतीदिनी होणाऱ्या सन्मानापासून हे योद्धे वंचित राहण्याची शक्यता आहे. या दिवशी मानवंदना द्यायच्या यादीत करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची नावे समाविष्ट करायची की नाही, यासंबंधी अद्याप निर्णय झालेला नाही. यादीसाठी माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले असून त्यामध्ये करोना बळींचा स्पष्ट उल्लेख नसल्याने हा संभ्रम निर्माण झाला आहे.

दरवर्षी २१ ऑक्टोबरला पोलिस स्मृतीदिन साजरा केला जातो. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनी सौनिकांसोबत लढताना केंद्रीय राखीव पोलिस दलातील दहा जवान हुतात्मा झाले होते. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा पोलिस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी मागील वर्षभरात देशभरात हुतात्मा झालेल्या पोलिसांना मानवंदना दिली जाते. यावर्षीही यासाठी माहिती संकलन सुरू झाले आहे. दरवर्षीप्रमाणेच यासाठी माहिती मागविण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आलेल्या सूचनांनुसार राज्याचा गृहविभाग ही माहिती पाठवत असतो. कर्तव्यावर असताना मृत्यूला समोरे गेलेल्या पोलिसांची माहिती मागविण्यात आली आहे. यामध्ये नैसर्गिक अपत्ती, हिंसक जमाव काबूत आणताना, एखाद्या गुन्हेगारास पकडताना मृत्यू आलेल्या पोलिसांची यादी करण्यात येत आहे. जे पोलिस कर्तव्यावर असताना नैसर्गिकरित्या मृत्यू पावले आहेत, हदयरोग, क्षयरोग, कर्करोग इतर आजारांनी मृत्यू झाले, त्यांचा यामध्ये समावेश होणार नाही. यामुळे करोनामुळे झालेले मृत्यू यासाठी ग्राह्य धरायचे का, यासंबंधी संभ्रम आहे. करोना ही एक नैसर्गिक अपत्ती मानली तर या अपत्तीत कर्तव्य बजावताना झालेला हा मृत्यू असल्याने तो समिविष्ट केला जावा, अशी अपेक्षा आहे. यासंबंधी केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिक स्पष्टीकरणाची अपेक्षा असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

रायगड: निसर्ग चक्रीवादळामुळं प्रचंड नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील लेप गावानं सहकारातून उद्धाराचा नवा आदर्श घालून दिला आहे. अनेक दिवसांपासून अंधारात असलेल्या लेप ग्रामस्थांनी सरकारच्या मदतीची वाट न पाहता प्रकाशानं गाव उजळून टाकलं आहे.

जून महिन्याच्या सुरुवातील आलेल्या निसर्ग वादळाने रायगड जिल्ह्यात घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घरांची छपरे उडाली. विजेचे खांब कोसळून पडले. त्यामुळं अनेक गावे अंधारात गेली. गर्द झाडीत वसलेले

म्हसळा तालुक्यातील लेप गावही काळोखात बुडून गेले. एरवी छोट्याशा पावसात आणि वाऱ्यातही वरचेवर वीज पुरवठा खंडित होण्याचा अनुभव असलेल्या लेप गावकऱ्यांनी चक्रीवादळानंतर वीज लवकर येईल याची आशाच सोडली होती. मात्र, गावातील तरुण मंडळींनी आशा सोडली नव्हती. त्यांनी या समस्येवर उपाय करण्याचे ठरवून कामाला सुरुवात केली.

मुंबई: करोना विषाणूचा संसर्ग कुठे आणि कोणाला होईल याचा काही नेम राहिला नाही. मुंबईतल्या जुन्या आणि प्रसिद्ध असलेल्या केईएम रुग्णालयातील कँटीनच आता करोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. या कँटीनमधील एकूण २१ कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाल्याने केईएम प्रशासनाने तातडीने ही कँटीन सील केली आहे.

परळ येथील केईएम हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत शेकडो करोना रुग्णांवर उपचार करण्यात आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांच्या सोयींसाठी रुग्णालयाच्या आवारातच मोठी कँटीन आहे. या कँटीनमधील २७ पैकी २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे ही कँटीन सील करण्यात आली आहे. आपल्याला करोनाचा अधिक धोका आहे, हे या सर्व कर्मचाऱ्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध देण्यात येत होते, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं. रुग्णालय परिसरातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थांची दुकाने बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये म्हणून बऱ्याच विचाराअंती ही कँटीन सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. आता आम्ही ही कँटीन बंद केली असून कामगारांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कँटीनच्या दोन वरिष्ठ व्यवस्थापकांमध्ये करोनाचे लक्षणं दिसून आल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर इतरांमध्ये करोनाचे सौम्य लक्षणे असल्याने त्यांना क्वॉरंटाइन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांनी कर्नाटकात जाऊन पालींच्या नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. अक्षय खांडेकर यांच्या टीमसह तेजस यांनी हा शोध लावल्याने सर्वच स्तरातून या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कर्नाटकातील हसन जिल्ह्यातल्या होंगाडदहल्ला या गावाजवळील जंगलात केलेल्या संशोधनावेळी तेजस ठाकरे आणि अक्षय खांडेकर यांच्या टीमलाही दुर्मिळ प्रजातीची पाल सापडली आहे. नव्याने शोधण्यात आलेल्या या दुर्मिळ पालीचं त्यांनी 'मँग्निफिसंट डवार्फ गेको' असं नामकरण केलं आहे. आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या 'झुटाक्सा'या नियतकालिकेत या दुर्मिळ प्रजातीच्या पालीवरील त्यांचा शोध निबंधही प्रसिद्ध झाला आहे. तेजस यांच्यासह अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार तरुण संशोधकांनी हा शोध लावला आहे. या कामी त्यांना ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशन, बंगळुरूची नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सहकार्य केले आहे.

पालीची ही प्रजाती साकलेशपूर येथील खडकाळ भागात आढळते. खासकरून उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातीच्या पाली आढळून येतात. या पालींची किमान लांबी ५८ मीटर असते. या दुर्मिळ प्रजातींच्या पालींची शेपटी हलक्या तपकिरी रंगाची असते, तसेच या पालीच्या डोक्यावर किंचित तपकिरी रंगाची पॅच (खवल्या सारखे ) असतात. गोलाकार मोठ्या बुबळांच्या आणि बाजूला काळ्या बाह्यरेखा असलेल्या या पाली त्यांच्या वेगळ्या शरीर रचनेमुळे प्राणीतज्ञांचं लक्ष वेधून घेत आहेत.

 

मुंबईः राज्यासह देशभरात करोनाचे संकट गडद होत चालले आहे. करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य व केंद्र सरकारकडून केले जात आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

करोनाचे सावट हे आपल्याकडे साजऱ्या होणाऱ्या अनेक सण-उत्सवांवरही पडत आहे. मुंबई ठाण्यामध्ये काही मोठ्या दहीहंड्यांचे आयोजित केले जात असते. घाटकोपर परिसरात राम कदम यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन केले जाते. अनेक पथके या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी येत असतात. हा

दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय या परिसरात लोटत असतो. त्यामुळे करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी यांनी हा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद: अनैतिक संबंधातून जन्मलेल्या अर्भकामुळे होणारी बदनामी टाळण्यासाठी अर्भकाचे मुंडके छाटून धड वेगळे करणाऱ्या नराधम मातेसह चौघांच्या पोलिस कोठडीत २० जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. माने यांनी गुरुवारी दिले.

गीताबाई अजय नंद (वय ३४) असे नराधम आईचे नाव असून रतनलाल भोलाराम चौधरी (वय ७५), गंगाबाई रतनलाल चौधरी (वय ७०) व हरीशकुमार सुभाषलाल पालीवाल (३८, सर्व रा. दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या पाठीमागे, छावणी मोहल्ला) अशी तिच्या साथीदारांची नावे आहेत. या प्रकरणात महापालिकेचे साफसफाई सुपरवायझर सतीश लिंबाजी मगरे (४७, रा. लेबर कॉलनी) यांनी तक्रार दिली. २९ एप्रिल रोजी सकाळी पावणेसहा वाजता मगरे हे हाताखालील कर्मचाऱ्यांना ड्युटीचे वाटप करीत होते. त्यावेळी गल्लीतील रोडवर अर्भकाचे मुंडके पडलेले असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई: महाराष्ट्राच्या विधानभवनावर पुन्हा एकदा भगवा फडकल्यानंतरचा पहिला वर्धापनदिन शिवसेना आज साजरा करत आहे. करोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या बदलललेल्या राजकीय भूमिकेबद्दल उद्धव ठाकरे बोलणार का?, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray's Speech on Shivsena Foundation Day)

उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता शिवसेनेचे नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसोबत ठाकरे यांचा संवाद व्हावा यासाठी शाखा-शाखांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे.

गेली सुमारे ५० वर्षे राजकीय विरोधक राहिलेल्या काँग्रेसशी शिवसेनेनं आघाडी केल्यानं शिवसेनेमध्ये सध्या उलटसुलट चर्चा आहे. शिवसेनेच्या विरोधकांकडून काही प्रमाणात भ्रमही निर्माण केले जात आहेत. या सगळ्यांवर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

मुंबईः सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसानं चांगलाच जोर धरला आहे. पावसामुळं कुर्ला पश्चिम येथील जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला आहे. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

मेहताब सोसायटीतील एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. जून २०१९मध्ये या धोकादायक इमारतीच्या यादीत सोसायटीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर महानगरपालिकेनं रहिवाश्यांना इमारत खाली करण्याची नोटिसही पाठवण्यात आली होती. दरम्यान, जानेवारीमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीमुळं अनेक रहिवासी दुसरीकडे स्थायिक झाले होते.

इमारत धोकादायक म्हणून जाहीर केल्याने त्यात कोणीही राहत नव्हते. इमारतीचा भाग कोसळल्याची वर्दी मिळताच पोलिस, अग्निशमन दलाचे जवान तिथे पोहोचले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईत पावसाची संततधार
महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं मुंबईसह उपनगरात जोरदार मुंसडी मारली असल्यानं मुंबईकर आनंदले आहेत. मुंबईतील सायन परिसरात सकाळपासूनच पावसानं जोर धरला आहे. उपनगरीय भागात ही बोरिवली, कांदिवली येथेही मुसळधार पाऊस झाला. वसई, विरार- नालासोपारामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

 

पुणे: राज्याच्या नगररचना विभागातील सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांनी दोन कोटी ८५ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपावरून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात त्यांची पत्नी व दोन मुलांना देखील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी केले आहे. वर्ग एकच्या अधिकाऱ्याची कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे.

हनुमंत जगन्नाथ नाझीरकर (वय ५३), पत्नी संगिता हनुमंत नाझीरकर (वय ४५), गीतांजली हनुमंत नाझीरकर (वय२३), भास्कर हनुमंत नाझीरकर (वय २३, राहणार सर्व, स्वप्नशील्प सोसायटी, कोथरुड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाझीरकर हे सध्या अमरावती येथे कार्यरत आहेत. मागील सहा ते सात महिन्यांपासून त्याच्याकडील बेहिशेबी मालमत्तेच्या बाबातीत उघड चौकशी सुरू होती. त्यांच्याविरुद्ध २३ जानेवारी १९८६ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यानच्या कालावधीतील उत्पन्नाचे परिक्षण करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी त्यांच्याकडे दोन कोटी ८५ लाख ३४ हजार २२३ रुपये इतकी बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. त्यात २००२ -२००३ मध्ये एक लाख ४४ हजार ७३७ रुपये, २०१५-१६ मध्ये दोन कोटी ४७ लाख २५ हजार ३४५ रुपये, २०१६ -१७ मध्ये ३५ लाख ५२ हजार ६३८ रुपये आणि २०१७ - १८ मध्ये एक लाख ११ हजार ५०३ रुपयांचा समावेश आहे. त्यांना या बेहिशेबी संपत्तीचे स्पष्टीकरण देण्याची संधी देण्यात आली होती. मात्र ते स्पष्ट करू शकले नाहीत. शेवटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात ही मालमत्ता त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन भष्ट्राचारातून मिळविली असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध गुरुवारी सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपअधीक्षक सीमा मेंहदळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक वर्षाराणी पाटील अधिक तपास करीत आहेत.

अवघ्या सहा तासांमध्ये ३३ ते ५९ वयोगटातील चार करोनाबाधित रुग्णांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) मृत्यू झाल्याचे गुरुवारी (१८ जून) सायंकाळी स्पष्ट झाले. त्यामुळे घाटीतील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १२६ झाली आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्युची संख्या १६९ झाली आहे. तसेच गुरुवारी सायंकाळपर्यंत ७० बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची ३१०६ बाधित झाली आहे. (Corona Deaths in Aurangabad)

आंबेडकर नगर (सिडको) येथील ३३ वर्षीय महिला रुग्णाला ११ जून रोजी घाटीमध्ये दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी प्राप्त झालेल्या स्वॅब रिपोर्टवरून ही महिला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र उपचारादरम्यान न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाब, हायपोथायरॉईडिझम आदींच्या गुंतागुंतीमुळे तिचा बुधवारी मध्यरात्री साडेबाराला मृत्यू झाला. समतानगर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाला २८ मे रोजी घाटीत दाखल केले होते व त्याच दिवशी ती करोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. मात्र न्युमोनिया, मधुमेह, उच्चरक्तदाब, हायपोथायरॉईझम आदींमुळे तिचा बुधवारी मध्यरात्री पावणे दोनला मृत्यू झाला. परळी (जि. बीड) येथील ५७ वर्षीय महिलेला ४ जून रोजी घाटीत दाखल केले होते व दुसऱ्या दिवशी ती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते. उपचारादरम्यान न्युमोनिया, मूत्रपिंडविकार, उच्चरक्तदाब, मधुमेह आदींमुळे तिचा गुरुवारी पहाटे सव्वाचारला मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत घाटीमध्ये १२६ बाधितांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, असे घाटी प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

नगर: प्रशासनाची कोणतेही परवानगी न घेता पुणे-नगर असा प्रवास करणाऱ्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना आज सकाळी महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी नावंदे यांच्यावर तब्बल ७ तासांनी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा तहसीलदार यांनी दिलेल्या पत्रावरून गुन्हा दाखल झाला आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाची परवानगी असल्याशिवाय नगर जिल्ह्यामध्ये इतर जिल्ह्यातून येण्यास तसेच इतर जिल्ह्यात जाण्यास बंदी आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तसे आदेश दिले आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा भंग जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांनी केल्याचे समोर आले आहे.

आज सकाळी नावंदे या पुणे येथून नगरला येत असताना त्यांना नगर - पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी (ता. श्रीगोंदा) येथील चेकपोस्टवर महसूल पथकाने सकाळी नऊच्या सुमारास अडवले. यावेळी नावंदे यांना पुणे-नगर प्रवास करण्याची परवानगी दिलेले पत्र पथकातील अधिकाऱ्यांकडून मागण्यात आले असता, त्यांच्याकडे प्रवासाची कोणतीही परवानगी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेऊन बेलवंडी पोलीस ठाण्यात नेले. परंतु फिर्याद कोणी द्यायची, यावर बराचवेळ पोलीस व महसूल विभाग यांच्यामध्ये एकमत होत नसल्याने नावंदे यांच्यावर गुन्हा दाखल होण्यास तब्बल ७ तास लागले.

मुंबई: 'करोनाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा नेहमीसारखा धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही. राज्यातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून हा उत्सव साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले आहे. (Uddhav Thackeray on Ganpati Festival)

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात आज मंत्रालय येथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील व शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहीबावकर, राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

'पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे. सरकारच्या निर्णयास पूर्णपणे पाठिंबा असल्याची ग्वाही गणेश मंडळांनी दिली आहे. शिर्डी, सिद्धिविनायक व अन्य संस्थांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मोठी मदत केली आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या ३० जून रोजी आषाढी एकादशीला बसद्वारे नेल्यास पादुकांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पालख्या या हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देण्यात आली असून, अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले

करोना साथरोगामुळे यंदा पायी वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी पालख्या विमान, हेलिकॉप्टर किंवा बसद्वारे ३० जून रोजी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानापेक्षा हेलिकॉप्टरने पालख्या नेणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सुचविले आहे. बसने पालख्या नेल्यास भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने पालख्या नेण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

विमानाद्वारे पालख्या नेण्याचा मार्ग स्वीकारल्यास लोहगाव विमानतळावरून सोलापूर येथील विमानतळावर पालख्या न्याव्या लागणार आहेत. तेथून पंढरपूरला पालख्या नेण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा बसचा पर्याय निवडावा लागणार आहे. सोलापूर शहर ते पंढरपूर हे अंतर सुमारे ८० किलोमीटर आहे. त्यामुळे विमानाऐवजी हेलिकॉप्टरचा पर्याय स्वीकारणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 

महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आतापर्यंत १ लाख १६ हजारच्या पुढे गेली आहे. रुग्णसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. त्यातही मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळं चिंतेचं वातावरण असलं तरी महाराष्ट्र सरकार या सगळ्या परिस्थितीशी ताकदीनं लढतंय. राज्यात आरोग्य सुविधा वाढवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोविड चाचण्यांसाठी प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत. फिल्ड हॉस्पिटल, फिव्हर क्लिनिक असं चौफेर काम सुरू आहे. 'चेस द व्हायरस' अंतर्गत घरोघरी जाऊन लोकांच्या चाचण्या घेण्याचं काम सुरू करण्यात आलंय. सरकारकडून केल्या जाणाऱ्या या सर्व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत दिली. 'महाराष्ट्र डगमगलेला नाही. लढतो आहे,' असा विश्वास त्यांनी देशाला दिला आहे.

करोनाची साथ आली तेव्हा या रोगाची चाचणी करण्यासाठी अवघ्या दोन प्रयोगशाळा राज्यात होत्या. गेल्या दोन ते सव्वा दोन महिन्यांत सरकारनं राज्यभरात १०० च्या आसपास प्रयोगशाळा उभारल्या आहेत. त्याशिवाय, मुंबई, ठाणे व औरंगाबादमध्ये अनेक कोविड सेंटर उभारली आहेत. पैकी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानात एमएमआरडीएनं उभारलेली दोन फिल्ड हॉस्पिटल कौतुकाचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या बैठकीत या रुग्णालयांचे फोटो सर्वांना दाखवले.

मुंबई: सरकारच्या निर्णयप्रक्रियेत स्थान मिळत नसल्यानं नाराज असलेले काँग्रेसचे मंत्री आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या भेटीनंतर काँग्रेसची नाराजी दूर होणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर सहा महिने सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेली काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी माध्यमांकडं नाराजीच्या बातम्यांना दुजोराही दिला होता. तसंच, काँग्रेसच्या मंत्र्यांची या संदर्भात एक बैठकही झाली होती. मुख्यमंत्र्यांना भेटून पक्षातील नेते व मंत्र्यांच्या व्यथा मांडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला होता. सोमवारी ही भेट होणार होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव पाटणकर यांचं निधन झाल्यानं ही भेट लांबणवीर पडली होती. त्याच दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीवर टिप्पणी करण्यात आली. खाट जुनी झाली की कुरकुरते असा टोला लगावण्यात आला होता. त्यामुळं नाराजीत भर पडली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री

मुंबई: अंधेरी पूर्वेतील साकीनाका येथे रविवारी रात्रीच्या सुमारास एका घरात शिरलेल्या तरुणाला चौघांनी चोर समजून केलेल्या बेदम मारहाणीत या तरुणाचा मृत्यू ओढवला. साकीनाका पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून एकाचा शोध सुरू आहे.

साकीनाका रोड येथील बत्रा निवासातील एका घरात रविवारी रात्री ११च्या सुमारास सतीश राजभर (२४) हा तरुण शिरला. ही गोष्ट तिथला स्थानिक रहिवासी असद आलम याच्या लक्षात आली. त्याने दानिश शेख, तपनदास मंडलसह आणखी एका मित्रास हे सांगितले. तेव्हा त्या घरात शिरलेली व्यक्ती चोर असल्याच्या संशयावरून चौघांनीही त्यास घेरले. पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी त्यांनी त्याला एके ठिकाणी बांधून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तो जबर जखमी झाल्याचे लक्षात येताच चौघेही तिथून सटकले. काही वेळाने बेशुद्धावस्थेत असलेल्या सतीशकडे तिथल्या सुरक्षारक्षकाचे लक्ष गेले. त्याने साकीनाका पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे पोहोचले. बेशुद्धावस्थेतील सतीशला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

जळगाव: 'हरिभाऊ जावळे यांना ज्या इंजेक्शनची गरज होती, ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. ते मिळालं असतं तर त्यांचा जीव वाचला असता,' अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

भाजपचे जळगाव ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं मुंबईतील खासगी रुग्णालयात काल निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं होतं. त्यांच्यावर दहा दिवस उपचार सुरू होते. मात्र, ते आजारातून सावरले नाहीत व काल दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

जावळे यांच्या निधनाने खडसे यांच्यासह जळगावातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला. याबाबत बोलताना खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती, ते इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होऊ शकलं नाही. रुग्णालय प्रशासनानं ड्रग 'कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडे त्यासाठी १२ जून रोजी विनंतीही केली होती. त्यानंतर १४ जून रोजी, रविवारी पहिले दोन डोस आले. सोमवारी तीन आणि मंगळवारी दोन असे सात इंजेक्शन उपलब्ध झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. इंजेक्शनचा कोर्स वेळेवर सुरू झाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते,' असं खडसे म्हणाले.

'राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून याबाबत त्वरीत प्रतिसाद आला होता. त्यांच्या सूचनेनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी जावळे यांना हव्या असलेल्या औषधांसाठी आवश्यक प्रक्रिया वेगानं पूर्ण केली होती. मात्र, आमचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. सचोटीने व्यवहार करणारा, प्रामाणिकपणाने काम करणारा, कौटुंबिक नाते निर्माण करणारा एक सहकारी आम्ही गमावला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोतच,' असं खडसे म्हणाले.

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निर्माता-दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यानं विविध क्षेत्रातील घराणेशाहीचे दाखले देत या मुद्द्यावर बॉलिवूडचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. (Ram Gopal Varma on Nepotism)

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या सुशांतसिंह (Sushantsingh Rajput Suicide) यानं रविवारी दुपारी मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या या आत्महत्येनं केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर देशही हळहळला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत सोमवारी त्याच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या आत्महत्येच्या कारणांवरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. सुशांतसिंह राजपूत याला आत्महत्येला भाग पाडण्यात आलं आहे, असं काहींचं म्हणणं आहे. तर, तो सिनेसृष्टीतील राजकारणाचा बळी ठरला आहे, असा आरोप काहींनी केला आहे. चित्रपटसृष्टीत ठराविक घराण्यांचं प्रचंड वर्चस्व आहे. त्या घराण्याशी संबंधित नसलेल्या किंवा एखादा गॉडफादर नसलेल्या नवोदितास इथं टिकून राहणं नेहमीच कठीण जात असल्याचं सांगितलं जातं. बॉलिवूडमधील कंगना राणावत सारख्या अभिनेत्री सातत्यानं त्या विरोधात आवाज उठवत आल्या आहेत. सुशांतच्या आत्महत्येनं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मुंबई: 'लडाखच्या सीमेवर भारत-चीनच्या सैनिकांमध्ये जे घडलं, त्यासाठी आता जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी किंवा राहुल गांधी यांना जबाबदार धरता येणार नाही,' असा बोचरा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला हाणला आहे.

लडाखला लागून असलेल्या भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा एकमेकांवर करण्यात आला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाल्याची माहिती आहे. तर, चीनचे ४३ सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जात आहे. अवघा देश करोनाच्या संकटाशी झुंजत असताना सीमेवर वाढलेल्या या तणावामुळं चिंतेत भर पडली आहे. पंतप्रधान

नरेंद्र मोदी यांनी या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कुठलंही भाष्य केलेलं नाही. त्यावरून विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

 

जळगाव: जिल्ह्यातील यावल शहरातील एका दाम्पत्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आज बुधवारी सकाळी यावल शहरातील फैजपूर रस्त्यालगत एका शेतातील विहिरीत त्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं. भागवत उर्फ बाळू डिगंबर पाटील (वय- ६१) व विमलबाई भागवत पाटील (वय - ५४, दोघे रा. यावल, जि. जळगाव) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.

भागवत पाटील आणि विमलबाई पाटील हे यावल शहरातील सुतारवाडा भागातील रहिवासी होते. ते बुधवारी सकाळी पावणे सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. फैजपूर रस्त्यावरील महाविद्यालयासमोर असलेल्या निर्मल चोपडे यांच्या शेतातील विहिरीत दोघांनी उडी घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही. हा प्रकार सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास निर्मल चोपडे यांच्या शेतात गेलेल्या एका व्यक्तीच्या लक्षात आला. त्यानं फैजपूर रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या काही लोकांना त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर यावल पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. पाटील कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली. तेही तिथे पोहोचले. भागवत पाटील आणि विमलबाई यांनी आत्महत्या का केली, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु, पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मुंबई: 'राज्य सरकारनं स्वत:हून करोना मृतांच्या आकडेवारीची फेरमोजणी केली होती. ते आकडे आल्यानंतर मंत्रालयातील काही खबऱ्यांनी फडणवीसांना ही माहिती पुरवली. त्यामुळं फडणवीसांनी सरकारचं बिंग फोडलं हे जे काही बोललं जातंय त्याला काहीही अर्थ नाही,' असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला हाणला आहे.

राज्य सरकारने केलेल्या फेरपडताळणीअंती मुंबई व राज्यात १३२८ अधिक करोनामृत्यू आढळून आले आहेत. त्यामुळं करोना बळींचा आकडा वाढून आता ५४५६ इतका झाला आहे. फडणवीसांनी आरोप केल्यामुळेच हे आकडे बाहेर आल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचा हा दावा खोडून काढला आहे. 'करोनाचं हे संकट इतिहासात नोंदवलं जाणार आहे. त्यामुळं काहीही लपवल्याचं पाप आपल्या माथी नको म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांपासून डीनपर्यंत सगळ्यांना पत्र लिहून मृतांच्या आकडेवारीची पुन्हा पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ही आकडेवारी दुरुस्त करण्यात आली. फडणवीसांनी ही आकडेवारी आणली नाही. माहिती मंत्रालयात आल्यानंतर विरोधी पक्षाच्या काही खबऱ्यांनी ती फडणवीसांपर्यंत पोहोचवली. हे खबरी कोण आहेत हेही आम्हाला माहीत आहे,' असं आव्हाड म्हणाले.

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्यासाठी पत्रकारिता हे चळवळीचं माध्यम होतं. त्यांनी पत्रकारितेला आंदोलनाचं रुप दिलं. त्यांच्या निधनाने शोषितांचा आवाज मूक झाला. संयुक्त महाराष्ट्रातील जडणघडणीत सहभागी असलेला ज्वालामुखी शांत झाला, अशा शब्दांत रणदिवे यांना पत्रकारिता क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झाल्याने त्यावर पत्रकारिता, समाजिक आणि राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. रणदिवे हे पत्रकार म्हणून मोठे होते. पण त्याआधी ते कट्टर चळवळे होते. ते कट्टर समाजवादी आणि संयुक्त महाराष्ट्रवादी होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात तुरुंगवासही भोगला. चळवळीत काम करतानाच ते पत्रकारितेत आले. शोषित-पीडितांच्या न्याय हक्कासाठी पत्रकारिता हे योग्य माध्यम असल्याने ते पत्रकारितेत आले. त्यांनी गोवा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान दिलं. कामगार चळवळीच्या माध्यमातून संघर्ष करणारा पत्रकार म्हणजे रणदिवे होत, असं सांगतानाच त्यांच्या जीवनाचा आशयच कामगार, समाजवादी आणि डाव्या चळवळीचा होता, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील महत्त्वाचे शिलेदार दिनू रणदिवे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. दादर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रणदिवे यांच्या रूपानं 'फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड' गमावल्याची भावना सामाजिक व पत्रकारिता वर्तुळात व्यक्त होत आहे.

नव्वदी पार केलेले दिनू रणदिवे हे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होते. वयोमानामुळं त्यांच्या हिंडण्याफिरण्यावर मर्यादा आल्या होत्या. असं असलं तरी त्यांचं काम सतत सुरू होतं. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व नव्या पिढीतील तरुणांचा त्यांच्या दादर येथील घरी सतत राबता असे. त्यांच्याशी ते अथक संवाद साधत. अनेकांना अभ्यासासाठी संदर्भ पुरवत. त्यांचे हे काम काही दिवसांपूर्वीपर्यंत सुरू होते. महिनाभरापूर्वीच त्यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचं निधन झालं होतं. त्यानंतर रणदिवे यांचीही प्रकृती खालावली होती. त्यातून ते सावरले नाहीत.

मुंबई: महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आणि येथील मृत्यूच्या आकडेवारीवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र व गुजरातमधील 'कोविड १९' मृत्युदराची टक्केवारीच आव्हाडांनी दिली आहे. (Jitendra Awhad attacks opposition)

आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये करोनाच्या संसर्गामुळं होत असलेल्या मृत्यूची टक्केवारीच दिली आहे. 'गुजरातमध्ये कोविड १९ मुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण ६.२५ टक्के आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात हे प्रमाण अवघं ३.७३ टक्के आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना महाराष्ट्र पॅटर्न काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा,' असा टोलाही त्यांनी हाणला आहे.

मुंबई : ‘सामना’च्या संपादक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना पितृशोक झाला. रश्मी ठाकरे यांचे वडील आणि उद्धव ठाकरे यांचे सासरे माधव गोविंद पाटणकर यांचे मुंबईत निधन झाले. (Rashmi Thackeray Father Madhav Patankar Dies)

वयाच्या 78 व्या वर्षी माधव पाटणकर यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत अंधेरी येथील क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. माधव पाटणकर यांची प्रकृती काही दिवसांपासून अस्वस्थ होती. त्यांच्यावर क्रिटी केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र आज (सोमवार 15 जून) त्यांचे निधन झाले.

रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवलीचे होते. माधव पाटणकर आपला कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत माधव पाटणकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. पाटणकर आणि ठाकरे कुटुंबावर कोसळलेल्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करण्यात येणार आहे. तसंच ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा उघडता येतील, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. (CM Uddhav Thackeray meeting on School Reopen again)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिक्षण विभागासोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक आयोजित केली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या देखील या बैठकीत उपस्थित होत्या. त्यांच्या उपस्थितीत या बैठकीत शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. लवकरच त्यासाठीची घोषणा केली जाणार आहे. ऑनलाईन, डिजीटल पद्धतीने प्रायोगिक स्तरावर शाळा सुरु करता येऊ शकतात. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास मंजूरी दिली आहे.

मुंबईः घटस्फोटित तसेच विधवा महिलांकडून पुनर्विवाहासाठी बऱ्याचदा विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. अनेक विवाह नोंदणी कार्यालयांकडून वेबसाइट तयार करण्यात आल्या आहेत. बऱ्याचदा पालक वा विवाहासाठी इच्छुक असणारे स्वतःच प्रोफाइल तयार करून खासगी माहिती या वेबसाइटवर अपलोड करत आहेत. याचाच गैरफायदा ऑनलाइन भामटे घेत आहेत.

विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळांचा वापर ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्यासाठी जात आहे. वेबसाइटवर अपलोड केलेला डाट डार्कनेट व इंटरनेटच्या काळाबाजारात विकणं सोप्प जातं. दुर्देवानं यामध्ये फसवल्या गेलेल्यामध्ये मुलींची संख्या अधिक आहे.

जेव्हा अशा प्रकारच्या प्रोफाईल बनवल्या जातात तेव्हा काही दिवसातच तुमच्या प्रोफाईलला अनुरुप असल्याचं एक प्रोफाइल असल्याचं नोटिफिकेशन येतं. यात बऱ्याचदा मॅच झालेली प्रोफाईल ही कोणत्यातरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाची असते. हळू हळू संवाद ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते. ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केल्यावरच व्हिडिओ कॉल होतो. मग एके दिवशी हि व्यक्ती तुम्हाला सांगते कि ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहेत . नंतर फोन येतो कि तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे. एका ठराविक अकाउंटमध्ये ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर दोन दिवसांत पार्सल तुम्हास मिळेल . पैसे अकाउंटमध्ये भरल्यानंतर ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट डिअॅक्टिव्हेट होते.

मुंबई: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चिंचपोकळीचा चिंतामणी) ने यंदाचा गणेश आगमन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांवर अतिरिक्त ताण पडू नये म्हणून श्रींची मूर्ती मंडपातच घडविण्याचं ठरवलं आहे. (Chinchpoklicha Chintamani)

संसर्गाच्या धोक्यामुळं यंदा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा होणार याबाबत गणेशभक्तांमध्ये उत्सुकता आहे. सर्व छोट्या-मोठ्या गणेश मंडळांमध्येही गेल्या अनेक दिवसांपासून यावर विचारमंथन सुरू आहे. 'चिंचपोकळीचा चिंतामणी'नं या पार्श्वभूमीवर अत्यंत स्तुत्य पाऊल उचललं आहे. गर्दी न करण्याच्या शासनाच्या निर्देशांचं पालन करण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. त्यामुळंच आगमन सोहळा रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाटपूजन सोहळाही रद्द करण्यात आला आहे.

पाटपूजन सोहळा रद्द करून ठराविक पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य यांच्या उपस्थितीत ठराविक अंतर ठेवून साधेपणाने पाटपूजन होईल.‌ यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा होईल. भव्य सजावट आणि रोषणाईवर खर्च न करता जमा होणाऱ्या वर्गणीतून सरकारी रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे तसेच गरजूंकरिता रुग्णोपयोगी साहित्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

अरविंद सावंत यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून परप्रांतीय मजूर व कामगारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात तुमचं स्वागत करू, असंही सावंत यांनी म्हटल्याचा दावा सरदेसाई यांनी केला आहे. सावंत यांच्या या भूमिकेवर नितीन सरदेसाई यांनी कडाडून टीका केलीय. 'अरविंद सावंत यांनी महाराष्ट्रातील तरुणांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. ते मुंबईचे खासदार आहेत का ही शंका यावी इतपत त्यांनी परप्रांतीय मजुरांची वाखाणणी केलीय,' असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

सरदेसाई यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून सावंत यांच्यावर टीका केलीय. 'महाराष्ट्रातील मुंबईचे खासदार असलेल्या सावंत यांनी सर्वप्रथम इथल्या तरुणांच्या रोजगाराचा विचार करायला हवा. याउलट ते बाहेरच्यांचं कौतुक करताहेत. महाराष्ट्रात आजही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. आता करोनाच्या संकटामुळं रोजगाराच्या काही संधी स्थानिकांसाठी निर्माण झाल्या आहेत. अशावेळी आपल्या तरुणांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना लागेल ती मदत केली पाहिजे. मात्र, ते सगळं राहिला बाजूला. सावंत हे आपल्याच लोकांची अवहेलना, हेटाळणी करताहेत. हे अत्यंत चुकीचं आहे,' असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

'आपल्या मुलाला एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तर त्याला आपण शिकवणी लावतो. पुढच्या परीक्षेत त्याला जास्त गुण कसे मिळतील हे पाहतो. सावंत यांनी मात्र आपल्या मुलांना थेट घराबाहेर काढलं आणि परप्रांतातल्या मुलाला दत्तक घेतलं. 'दुसऱ्याचा बाळ्या आणि आपला कार्टा' अशातला हा प्रकार आहे. सावंत यांनी यापुढं तरी हे बंद करावं आणि दिल्लीत बसून महाराष्ट्रासाठी काम करावं,' अशी विनंती सरदेसाई यांनी केली आहे.

मुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासादरम्यान विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याची मागणी करणारी एअर इंडियाच्या वैमानिकाची विनंती मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

डीजीसीएच्या २३ मार्चच्या परिपत्रकाप्रमाणे सुरक्षित वावरासाठी विमानातील तीन आसनांपैकी मधले आसन रिक्त ठेवण्याचे निर्देश असतानाही परदेशांत अडकलेल्या भारतीयांना आणण्याच्या ‘वंदे भारत मिशन’मध्ये एअर इंडियाकडून त्याचे उल्लंघन झाले, असा आक्षेप एअर इंडियाचे वैमानिक देवेन कयानी यांनी अॅड. अभिलाश पनिकर यांच्यामार्फत याचिका दाखल करून नोंदवला होता. त्यावर आज सुनावणी झाली.

'करोनाबाधित व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून कोणाला करोनाचा संसर्ग होत नाही. मधल्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन दिल्यास धोका टळेल, या तज्ज्ञ समितीच्या मताविषयी संशय घेण्यास जागा नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी तडजोड केली जात असल्याचेही म्हणता येणार नाही', असे निरीक्षण नोंदवून मधली सीट रिकामी ठेवण्याचा आदेश देण्याची एअर इंडियाच्या वैमानिकाने केलेली विनंती उच्च न्यायालयाने आज फेटाळली.

'हवाई प्रवासात विमानांमध्ये मधली सीट रिकामी न ठेवता त्या सीटवरील प्रवाशाला प्रोटेक्टिव्ह गाऊन पुरवण्यासह प्रवाशांना फेस शिल्ड, मास्क इत्यादी देण्याचे तसेच सुरक्षिततेचे अन्य उपाय करण्याच्या डीजीसीएने ३१ मेच्या परिपत्रकाद्वारे दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करा, असे निर्देशही यावेळी न्यायालयानं विमान कंपन्यांना दिले.

नागपुर. नागपुर स्थित राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) के वैज्ञानिकों का एक दल अगले हफ्ते महाराष्ट्र के बुलढाणा जिले में लोनार झील का दौरा करेगा और यह पता लगाने के लिए पानी के नमूने लेगा कि इस झील का पानी गुलाबी रंग का कैसे हो गया। अण्डाकार आकार की लोनार झील करीब 50,000 साल पहले पृथ्वी से एक उल्कापिंड के टकराने से बनी थी।

यह मशहूर पर्यटक स्थल है और दुनियाभर के वैज्ञानिक भी यहां आते हैं। हाल में इस झील के पानी का रंग गुलाबी हो गया है, जिससे न केवल स्थानीय लोग चकित हैं, बल्कि प्रकृति प्रेमी और वैज्ञानिक भी हैरानी में पड़ गए हैं। कई विशेषज्ञों ने झील के पानी में लवणता और शैवाल को इसके लिए जिम्मेदार ठहराया है। उनका कहना है कि यह पहली बार नहीं है जब पानी का रंग बदला है। हालांकि इस बार यह ज्यादा गाढ़े रंग का है। बुलढाणा की जिलाधिकारी सुमन चंद्रा ने कहा, ‘‘लोनार झील वन विभाग के क्षेत्राधिकार के तहत आती है क्योंकि इसे एक अभयारण्य घोषित किया गया है।

विभाग ने नीरी को पानी के नमूने भेजे हैं। फिर भी संस्थान अध्ययन के लिए नमूने एकत्रित करने के वास्ते 15 जून को घटनास्थल पर वैज्ञानिकों का एक दल भेजेगा।” उन्होंने कहा, ‘‘वह रंग में आए इस बदलाव के पीछे की सटीक वजह का पता लगाने के लिए पानी की जांच करेंगे।” गौरतलब है कि एक ब्रिटिश अधिकारी सी जे ई अलेक्जेंडर ने 1823 में एक विशिष्ट भौगोलिक स्थान के तौर पर लोनार झील की खोज की थी।

 

पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहाजवळ उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कैद्यांनी शनिवारी पहाटे पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघे पळाले. त्यामुळं कारागृह प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. पसार झालेल्या कैद्यांचा शोध घेतला जात आहे.


हर्षद सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) व आकाश बाबूलाल पवार (वय २४ रा. काळेवाडी, पिंपरी) अशी कारागृहातून पसार झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर जबरी चोरी, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

येरवडा येथील शासकीय वसतिगृहात तात्पुरते कारागृह तयार केले आहे. या ठिकाणी कैदी ठेवण्यात येत आहेत. त्या ठिकाणी या दोन कैद्यांनाही ठेवण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास बाथरूमच्या खिडकीचे गज उचकटून दोघांनीही पळ काढला. या घटनेची माहिती मिळतात येरवडा पोलीस ठाण्याचे तपास पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कैद्यांचा शोध सुरू केला आहे. दोन आठवड्यांपूर्वी देखील बाळासाहेब गोविंद कांबळे (वय ५०) या कैद्याने पलायनाचा प्रयत्न केला होता. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत बंदोबस्तावरील पोलिसानं त्याला पकडलं होते.

पुणे : हॉटेल व्यावसायिकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना नऱ्हे येथे शुक्रवारी सव्वासहाच्या सुमारास घडली. यामुळे नऱ्हे परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सुनील बारकू लांगोरे (वय ३५, रा. नऱ्हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लांगोरे हे नऱ्हे परिसरात राहतात. त्यांच्या राहत्या इमारतीशेजारीच त्यांचे छोटे स्नॅक्स सेंटर आहे. लॉकडाउनमुळे त्यांचे कामगार गावाकडे गेले असल्याने मागील काही दिवस ते एकटेच हॉटेल उघडत होते. चहा आणि नाष्टा असा ठरावीक मेन्यू ते पार्सल देत होते.

मुंबई: 'संकटाचे रूपांतर संधीत करण्याची हीच ‘योग्य’ वेळ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. हे संकट म्हणजे करोना व संधी म्हणजे स्वावलंबन असे आम्हाला वाटत होते. पण पंतप्रधानांच्या सांगण्याचा खरा अर्थ भाजपातील नेत्यांनी समजून घेतला आहे व करोनाचे संकट हीच संधी मानून राजस्थानमधील स्थिर सरकारचे पाय ओढायला सुरुवात केली आहे,' अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे. (Shivsena on operation lotus in Rajasthan)

ज्योतिरादित्य शिंदे यांना गळाला लावून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडल्यानंतर भाजपनं आपला मोर्चा राजस्थानकडं वळवला आहे. राजस्थानात भाजपचं सरकार आणण्यासाठी 'ऑपरेशन लोटस' सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेस आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांना विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची लालूच दाखविण्यात आल्याचा आरोप स्वत: मुख्यमंत्री अशोक गेहलोत करीत आहेत. तशी तक्रार काँग्रेसने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

'देशात सध्या करोनाचे संकट मानवी जीवनाचा घास गिळत असताना दिल्लीतील राज्यकर्त्या पक्षाला विरोधकांची सरकारे पाडण्याची थेरं सुचावीत हे धक्कादायक आहे. विरोधी पक्षाची सरकारे दोन-चार राज्यांत राहिली तर देशावर असे काय आभाळ कोसळणार आहे? ही सरकारे लोकशाही मार्गाने निवडून आली आहेत. भले सरकार बनविण्यासाठी त्यांनीही आपल्या पद्धतीने जमवाजमव केली असेल, मग हीच जमवाजमव भाजपने हरयाणा, मणिपूर, गोव्यात आणि कर्नाटकातही केलीच व मध्य प्रदेशातही राजकीय चिखल करूनच त्यात सत्तेचे कमळ फुलवले. राज्य सरकारे करोना संकटाशी लढा देत असताना त्या विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेत विरोधी सरकारचे नटबोल्ट उखडायचे हे प्रकार अघोरी आहेत,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मुंबई: करोनाच्या संकटकाळात देखील मुंबई महापालिकेचे काही अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याच आरोप मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केला आहे. 'करोनाचं संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही,' असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे. (MNS leader Sandeep Deshpande warns currupt BMC Officers)

संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून हा इशारा दिला आहे. 'सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत. पण त्यांच्यावर आमची करडी नजर आहे. हे करोनाचं संकट गेलं की त्यांना रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेत माजी नगरसेवक राहिलेले संदीप देशपांडे करोनाच्या संकटकाळात महापालिकेच्या कारभार सतत लक्ष ठेवून आहेत. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी हेळसांड, अधिकाऱ्यांचा कारभार याबाबत ते वृत्तवाहिन्या व सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं आवाज उठवत आहेत. 'महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. करोनाच्या चाचण्या नीट होत नाहीत. चाचण्या झाल्याच तर रुग्णवाहिका मिळत नाहीत. रुग्णवाहिका मिळालीच तर सरकारी रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाहीत. जागा मिळालीच तर रुग्णालयांची परिस्थिती वाईट आहे. खासगी रुग्णालयांचं बिल परवडत नाही,' अशी खंत देशपांडे यांनी व्यक्त केली होती. प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील करोना रुग्णांचं दु:ख मांडताना त्यांना अक्षरश: रडू कोसळलं होतं. आता त्यांनी महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर आरोप करत त्यांना इशारा दिला आहे.

मुंबई : नैऋत्य मोसमी वारे आता संपूर्ण महाराष्ट्र हळूहळू व्यापताना दिसत आहे. पुढच्या ४८ तासात मान्सून पूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान संस्था म्हणजेच आयएमडीने व्यक्त केला आहे. आयएमडीने ठाण्यासाठी शनिवारी यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, पालघर आणि ठाण्यासाठी रविवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या शहरांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

शुक्रवारी पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यात जून महिन्यातील पहिल्या १२ दिवसांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत पाचपट जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे मुंबईसह परिसराला तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राज्यातील बहुतांश भाग मान्सूनने याअगोदरच व्यापला आहे. सोलापूरपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि कोकणमध्ये मान्सून दाखल झाला आहे.

मुंबई: 'मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हार-तुरे आणि होर्डिंग लावण्यावर खर्च करण्याऐवजी संकटात असलेल्यांना मदत करा, असं आवाहन करणारे शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमोर कृतीद्वारे आदर्श ठेवला आहे. एका नवजात बाळाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी १ लाख रुपयांची तातडीची मदत दिली आहे. (Aaditya Thackeray Birthday)

आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र, राज्यात करोनाचे संकट असताना वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी तसं जाहीर केलं होतं. तसंच, शुभेच्छा देण्यासाठी कुणीही 'मातोश्री'वर गर्दी करू नये. त्याऐवजी केक, पुष्पगुच्छ व होर्डिंगचा खर्च करोनाशी झुंजणाऱ्या लोकांच्या मदतीसाठी करावा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. मात्र, ते केवळ बोलून थांबले नाहीत. सहा दिवसांच्या बाळाच्या हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी त्यांनी नवी मुंबईतील अब्दुल अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली आहे.

घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या बाळाच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज व एक छिद्र असल्याचं निदान झालं होतं. ऐरोलीच्या महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या या बाळाच्या जीवाला धोका असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर अन्सारी यांना नेरूळच्या मंगल प्रभू रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र, बाळाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं अन्सारी त्याला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात घेऊन आले. तिथं आल्यावर त्यांच्यासमोर शस्त्रक्रियेच्या खर्चाचा प्रश्न उभा ठाकला. पैसे जमवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब आली. त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना एक लाख रुपयांची मदत केली. अधिक मदत लागल्यास ती देण्याची तयारी देखील दर्शवली आहे. सध्या या बाळावर उपचार सुरू असून अब्दुल अन्सारी यांनी आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

पुणे:पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने शहरातील सहा मीटर रस्ता नऊ मीटर करण्याचा मान्य केलेला प्रस्ताव अडचणीत आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या मंगळवारी मुंबईमध्ये मंत्रालयात नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत या प्रस्तावाचे भविष्य ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या समवेत आज शुक्रवारी झालेल्या बैठकीस आमदार

चेतन तुपे, सुनिल टिंगरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आदी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत आमदार टिंगरे आणि शिंदे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीने सहा मीटरबाबत घेतलेला निर्णय नियमबाह्य असल्याचा दावा केला. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याने हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांनी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या शंका ऐकल्यानंतर याबाबत नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांसोबत बैठक आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत महापालिकेचा प्रस्ताव योग्य आहे का? महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन अधिनियमाच्या ३७ (१) अनुसार रस्ते रूंद करण्याची प्रक्रिया करावी का? याचाही निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी महापालिकेतील गटनेत्यांनाही बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. हा प्रस्ताव नियमबाह्य असल्यास तो रद्द केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई: करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नये, असा सूचनावजा आदेश त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. (Raj Thackeray appeals MNS Workers)

 

येत्या रविवारी, १४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दरवर्षी पक्षाकडून अनेक कार्यक्रम राबवले जातात. मनसेचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून राज यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. याच पार्श्वभूमीवर राज यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

'१४ तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. करोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात, तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत,' असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचं सुरू असलेलं मदतकार्य नक्की चालू ठेवा पण हे करताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही. सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच आहे, तेव्हा तुमच्याशी भेट होईलच,' असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

मुंबईः मुंबईतील मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेवर चार आठवड्यांसाठी करोना चाचण्या करण्यास महापालिकेनं बंदी आणली आहे. प्रयोगशाळेकडून करोना चाचणीचे आहवाल उशिरानं मिळत असल्यानं मुंबई महापालिकेनं ही कारवाई केली आहे.

मुंबईत करोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. त्यामुळं पालिकेच्या या निर्णयामुळं चाचण्या करण्याचा वेग कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. करोना चाचण्यांचे अहवाल उशिरा मिळत असल्यानं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत प्रसंगी, करोनाबाधितांवर उपचार करण्यासही विलंब होतो. त्यामुळं रुग्णांचा मृत्यूही होण्याची भिती आहे. असं महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

खासगी प्रयोगशाळेनंही अहवाल देण्यास उशीर होत असल्याचं मान्य केलं आहे. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्यानं सध्या मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळं अहवाल येण्यास उशीर होत असल्याचं या प्रयोगशाळेनं म्हटलं आहे. तसंच, करोना चाचण्याचे रिपोर्ट उशीरा येण्याचं प्रमाण कमी असल्याचंही या प्रयोगशाळेनं म्हटलं आहे.

करोना चाचणी केल्यानंतर २४ तासांत अहवाल सोपवण्याचा पालिकेचा नियम आहे. मात्र, प्रयोगशाळेनं मागील दहा दिवसांपासून करोना चाचण्यांचा अहवाल पाठवण्यास दिरंगाई केल्याचा ठपका पालिकेनं ठेवला आहे. ४ जूनला पालिकेनं अहवाल येण्यास उशिर का होत आहे. यासंबधित कारणे दाखवा नोटिस प्रयोगशाळेला धाडली होती. मात्र, प्रयोगशाळेकडून कोणतेही उत्तर न आल्यानं पालिकेनं अखेर कारवाईचा बडगा उचलला आहे. पालिकेनं चार आठवड्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत करोना चाचण्या करण्यास निर्बंध आणले आहेत.

मुंबई : महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा समोर आला. राज्यात गुरुवारी दिवसभरात एकूण ३६०७ नवीन रुग्ण सापडले आणि जवळपास १५० मृत्यू झाले. देशातील सर्वाधिक बाधित महाराष्ट्राने आता कॅनडालाही मागे टाकलं आहे. कॅनडा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगातला सर्वात मोठा दुसरा देश आहे. यापूर्वी जगातल्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनलाही महाराष्ट्राने मागे टाकलं होतं. महाराष्ट्रात सध्या ९७ हजार ६४८ केसेस असून यापैकी ४६ हजार ७८ जण बरे झाले आहेत. कॅनडाचा एकूण आकडा ९७ हजार ५३० एवढा आहे.

महाराष्ट्रात करोनामुळे ३५९० जणांचा करोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासातच १५२ जणांचा जीव गेला. तर गेल्या २४ तासात राज्यात १५६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही गेल्या २४ तासात १५४० केसेस समोर आल्या आणि यासह एकूण आकडा ५३ हजार ९८५ वर गेला आहे. एकट्या मुंबईत गेल्या २४ तासात १०४ जणांचा मृत्यू झाला आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत आतापर्यंत १९८४ केसेस समोर आल्या आहेत. दिलासादायक बाब धारावीतील संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. गेल्या २४ तासात धारावीत २० केस समोर आल्या. लॉकडाऊनमध्ये सवलती मिळाल्यामुळे लोक रस्त्यावर येत आहेत. पण पोलिसांनी धारावीत गर्दी होऊ नये यासाठी कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मुंबई: 'महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळं कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून गडबड, गोंधळ करू नका. विनाकारण कुठेही गर्दी करू नका,' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.

राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियातून पसरलं होतं. त्यामुळं पुन्हा एकदा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. काही समाज माध्यमांमध्ये व वाहिन्यांवर महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाऊन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. अशा प्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही. अशा बातम्या जनमाणसांत संभ्रम निर्माण करतात. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नयेत. अशा गैरसमज आणि अफवा पसरविणाऱ्या पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

'आपण राज्यात अर्थचक्राला गती देत आहोत. आपले व्यवहार हळूहळू सुरु करीत आहोत. पण लॉकडाऊन उठवतो आहोत याचा अर्थ एकदम गर्दी करणे आणि सुरक्षित अंतराच्या, स्वच्छतेच्या नियमांचे पालन न करणे बरोबर नाही. बाहेर पडल्यावर कायम चेहऱ्याला मास्क लावणे, साबणाने, जंतूनाशकाने हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवन पद्धती सर्वांनी स्वत:च्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगिकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई: वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नका, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केल्यानंतर आता शिवसेनेचे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही शिवसैनिक, मित्रमंडळी व हितचिंतकांना अशाच प्रकारचं आवाहन केलं आहे. जिथे असाल तिथूनच मला वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद द्या, असं आदित्य यांनी म्हटलं आहे. (Aaditya Thackeray Birthday)

द्या, १३ जून रोजी आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून दरवर्षी अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी झुंबड उडते. मात्र, यंदा करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हा निर्णय जाहीर केला असून शिवसैनिकांना आवाहनही केलं आहे.

'माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जिथे असाल, तिथूनच मला आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात. होर्डिंग्ज, हार-तुरे आणि केकचा खर्च टाळून त्याचे पैसे करोनाच्या संकटात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी खर्च करा किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्या. माझ्या वाढदिवसानिमित्तानं हे एक सत्कार्य होईल. त्याचा मला निश्चितच आनंद असेल,' असं त्यांनी म्हटलं आहे.
 

मुंबईः अनपेक्षितपणे आलेले करोना संकट आणि त्यामुळे जाहीर झालेले लॉकडाउन यांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींना चालू असलेला छोटा उद्योग बंद करावा लागला. पण, हातावर हात धरून न बसता, 'रडायचे नाही लढायचे', हा निश्चय करून नव्या उमेदीने अनेकांनी लघुउद्योग, घरगुती खाद्यपदार्थ पुरवणारी सेवा, छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. ही पुन्हा शून्यातून सुरुवात असली तरीही हिंमत न हारता आहे त्या परिस्थितीला भिडण्याचे धैर्य अनेकांनी दाखवले आहे.

यापूर्वी फुलांचा व्यवसाय करणाऱ्या मनोज घाडगे यांनी लॉकडाउननंतर दहा एक दिवस वाट पाहिली. मंदिरे बंद झाल्यामुळे फुलांच्या व्यवसायाला खीळ लागेल, ही अटकळ खरी ठरली. फुलांचे प्रकार, त्यांचे भाव आणि त्यांच्या उमलण्याचे-मिटण्याचा अंदाज असलेल्या मनोज यांना भाज्यांची उलाढाल समजून घेण्यासाठी पहिला आठवडा थोडा कष्टाचा गेला. पण, त्यांनी हिंमत हारली नाही. ग्राहकांना नेमक्या कोणत्या भाज्या हव्या असतात, कोणत्या फळांची मागणी अधिक असते. मार्च ते जून या तीन महिन्यांच्या काळामध्ये ऋतू बदलत गेल्यानंतर कोणत्या भाज्यांना अधिक मागणी असते, या सगळ्या बारीकसारीक गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सागर पवार हा यापूर्वी पहिली ते आठवीच्या मुलांसाठी शिकवणी घ्यायचा, सध्या शाळा सुरू नसल्यामुळे शिकवणीचे विद्यार्थी केव्हा परत येतील याची खात्री नाही. कांजुरमार्गला राहणाऱ्या सागरने एक जूनपासून आईच्या मदतीने पोळीभाजी विक्रीसेवा सुरू केली. संध्याकाळी घरात तयार केलेला वडापावही तो विकतो. स्वच्छतेचे सगळे निकष काटेकोरपणे पाळून त्याने हे प्रयत्न सुरू केले आहेत. मिळणारा प्रतिसादही हळूहळू वाढता आहे. त्यामुळे त्याचीही हिंमत वाढली आहे.

मुंबईसह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव आणि लॉकडाउनमुळे नाभिक आणि परीट अथवा धोबी समाजबांधवांना व्यवसायापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे या समाजघटकाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. या दोन्ही समाजातील व्यक्तींसाठी राज्य सरकारने तातडीचे मदत पॅकेज जाहीर करून दिलासा द्यावा, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बुधवारी केली आहे.

आगामी पावसाळी अधिवेशनासंदर्भात मुंबईतील विधानभवनात कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री ठाकरे विधानभवनात आले होते, त्याप्रसंगी या दोन्ही समाजाच्यावतीने त्यांच्या समस्यांबाबत पटोले यांनी मदतीचे पॅकेज जाहीर करणे आवश्यक असल्याचे निवेदनातून स्पष्ट केले. करोना लॉकडाउनमुळे नाभिक आणि धोबी समाजाच्या बांधवांना व्यवसायापासून वंचित राहावे लागत आहे. हे दोन्ही समाज पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून वर्षानुवर्षे आपला उदरनिर्वाह करीत आहेत. करोना संकटामुळे सलून आणि लॉन्ड्री येथे जाण्यास ग्राहकवर्ग तयार नाही. राज्यात सलून व्यावसायिक आणि लॉण्ड्री व्यावसायिक असे प्रत्येकी ३० लाख याप्रमाणे साधारणत: दोन्ही मिळून ६० लाख व्यावसायिक, कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय या आर्थिक संकटात होरपळून निघत आहेत, याकडेही पटोले यांनी लक्ष वेधले.

सलून सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी द्यावी, या मागणीसाठी बुधवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले.

मुंबई: करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिकेने रुग्णवाहिका वाढवल्या असल्या तरी या रुग्णवाहिकांसाठी पालिकेसमोर ड्रायव्हर मिळत नसल्याची समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा गाड्यांवरील ड्रायव्हर हे रुग्णवाहिकांसाठी नेमण्यात आले आहेत. परिणामी अंधेरी, जोगेश्वरी परिसरात कचऱ्याचे ढीग जमा झाल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली आहे.

मुंबईत करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पालिकेच्या ताफ्यात रुग्णवाहिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रशासनाने बेस्ट बस व खासगी वाहनांचा वापर रुग्णवाहिका म्हणून सुरू केला आहे. अशा विविध प्रकारच्या ४००हून अधिक रुग्णवाहिका सध्या पालिकेकडे आहेत. त्यासाठी पुरेसे ड्रायव्हर नसल्याने पालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागातील कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरील ड्रायव्हर नेमल्याचे अंधेरी येथील के-पूर्व विभागात आढळून आले आहे.

के-पूर्व विभागात अंधेरी, जोगेश्वरी परिसरातील काही भागात कचऱ्याचे ढीग पडून राहात असल्याचे येथील नगरसेवक अभिजीत सामंत यांना आढळून आले. त्याबाबत त्यांनी पालिकेच्या अंधेरी, सांताक्रूझ येथील गॅरेजमध्ये विचारणा केली असता घनकचऱ्याचे ट्रक चालवणारे चालक सध्या रुग्णवाहिकेवर नेमण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच पुरेसे ड्रायव्हर नसल्याने मुख्य गॅरेजमधून आठपैकी फक्त दोन किंवा तीनच डम्पर येत असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत विचारणा करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त आनंद वाघराळकर यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

'कंत्राटी चालक नेमा'
कचरा रोज उचलला न गेल्यास मुंबईत पावसाळी रोगांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे काही महिन्यांकरिता रुग्णवाहिका अथवा कचऱ्याची वाहने चालवण्याकरिता कंत्राटी चालक नेमावेत, अशी मागणी नगरसेवक अभिजीत सामंत यांनी पालिकेकडे केली आहे.

 

 मुंबई: मुंबईसह राज्यातील करोना संसर्गजन्य साथरोगाच्या प्रादूर्भावाचा आढावा घेतल्यानंतर राज्य विधिमंडळाचे २२ जूनपासून मुंबईत होणारे पावसाळी अधिवेशन दीड महिन्यापेक्षा अधिक काळ पुढे ढकलण्यात आले आहे. आता हे पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून मुंबईत होईल, असे उभय सभागृहाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमताने ठरले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या २२ जूनपासून नियोजित होते. तथापि, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आता ३ ऑगस्टपासून घेण्याबाबत बुधवारच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत एकमत होऊन तसा निर्णय घेण्यात आला. दरम्यानच्या काळात आवश्यकता भासल्यास ३ ऑगस्टपूर्वी पुरवणी मागण्यासांठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची गरज निर्माण झाल्यास वित्त विभागाकडून या संदर्भातील माहिती घेऊन त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल, हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बुधवारी विधानभवनात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

करोनाविरुद्धच्या लढ्यात डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या आणि अत्यावश्यक वस्तू असलेल्या एन-९५ मास्कच्या किंमतीचा निर्णय उत्पादकांवर सोपवून कसे चालेल? असा प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकार आणि केंद्रीय रसायने मंत्रालयाच्या अखत्यारीत तज्ज्ञांची समिती असलेल्या 'एनपीपीए'ला सुनावले. तसेच या मास्कच्या किंमतीच्या धोरणाविषयी फेरविचार करण्याचे निर्देशही केंद्र सरकार व 'एनपीपीए'ला दिले.

सुचेता दलाल व अंजली दमानिया यांनी अॅड. मिहिर जोशी यांच्यामार्फत याप्रश्नी जनहित याचिका केली आहे. 'सध्याच्या घडीला एन-९५ मास्कच्या किंमतीवर मर्यादा घालण्याचे पाऊल घाईचे होईल. कारण यामुळे त्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन भविष्यात तुटवडा भासण्याची भीती आहे. शिवाय केंद्र सरकारने अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत अशा वस्तूंच्या यादीत एन-९५चा समावेश केला असल्याने आणि उत्पादकांना वाजवी विक्री किंमत लावण्याची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असल्याने किंमतील ४७ टक्के घट झाली आहे', असा दावा नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटीने (एनपीपीए) प्रतिज्ञापत्रात केला होता.

मात्र, 'एन-९५ मास्क औषधांच्या वर्गवारीत अधिसूचित केलेले आहे आणि २०१३च्या औषध किंमत नियंत्रणच्या आदेशातही त्याचा समावेश आहे. त्यामुळे त्याची किरकोळ किंमत दरवर्षी कमाल दहा टक्केच वाढवली जाऊ शकते', या कायदेशीर तरतुदीकडे एनपीपीएने दुर्लक्ष केले असल्याचे निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

मुंबईः चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईचे डबेवाले करोनाच्या संकटात अडचणीत सापडले आहेत. डबेवाल्यांचं काम बंद होऊन आता जवळपास तीन महिने उलटून गेले आहेत प पुढे ही त्याचं काम कधी सुरू होईल याबाबत त्यांनाही खात्री देता येत नाहीये. लॉकडाऊननंतर अनेक डबेवाले आपापल्या गावी परतले असून तिथेच कामाच्या शोधात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या डबेवाल्यांनी शेतीचा पर्याय निवडलाय मात्र, अलीकडेच झालेल्या चक्रीवादळानं घरांसोबत शेतीपण उद्धवस्त झाली आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं मुंबई डबेवाल्यांनी १९ मार्चला काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारनं खासगी व सरकारी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, डबेवाल्याची सेवा कधी सुरू होणार याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. डबेवाल्यांसाठी राज्य सरकारकडून २ हजारांची मदत जाहीर करण्यात आली असली तरी त्याचा व्यवसाय कधी आणि कसा सुरू होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. अशी माहिती मुंबई डबेवाला ओसोशिएशनचे प्रवक्ता सुभाष तळेकर यांनी दिली.

लोकल रेल्वेवर अवलंबून
डबेवाल्यांची सेवा पूर्णपणे लोकल सेवेवर अवलंबून आहे. लोकल ट्रेन सुरू होईपर्यंत आम्ही कामही सुरू करत नाही. ट्रेन जुलै किंवा ऑगस्टमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तसंच, ग्राहकांची प्रतिक्रिया अशी असेल हे याबाबतही आम्ही अनभिज्ञ आहोत. असेही तळेकर म्हणाले.

मुंबई: 'माझ्या कोकण दौऱ्याबाबत शरद पवार जे बोलले ते मी ऐकलं. खरंतर माझ्या खांद्यावरून त्यांना वांद्र्याच्या सीनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल. काही तरी करा असं त्यांना सांगायचं असेल,' अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

कोकण दौरा काल पार पडला. दोन दिवसांच्या या दौऱ्यात रायगड व रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांनी स्थानिकांना दिलासा दिला. केंद्र व राज्य सरकारकडं येथील वस्तुस्थिती पोहोचवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. त्याचवेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांच्या संभाव्य दौऱ्याबद्दलही त्यांनी मिश्किल टिप्पणी केली होती. 'फडणवीस कोकणात आले तर चांगलंच आहे. ते नागपूरचे आहेत. नागपूरचा आणि विदर्भाचा संबंध नाही. त्यामुळं इथं त्यांच्या ज्ञानात भर पडेल,' असं पवार म्हणाले होते.

फडणवीस यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना पवारांच्या या टीकेला उत्तर दिलं. 'पवार जे बोलले ते मी ऐकलं. समुद्राबद्दल ते बोलले. पण मी अनेकदा बारामतीतही गेलो आहे. तिथंही मला समुद्र दिसला नाही,' असं ते म्हणाले. 'पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहे. माझे वडील हयात असते तर ते त्यांच्याच वयाचे असते. आपल्या पोराला आपल्यापेक्षा कमी समजतं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. पोरगा कितीही पुढे गेला तरी बापाची तशीच भावना असते. त्यातून त्यांनी हे वक्तव्य केलं असेल. कदाचित त्यांना माझ्या खांद्यावरुन वांद्र्याच्या सिनियरवर आणि बारामतीच्या ज्युनियरवर बंदूक चालवायची असेल. तुम्ही देखील काही तरी करा असं सांगायचं असेल,' असा चिमटाही त्यांनी काढला.

मुंबईः मुंबईनं करोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. करोना रुग्णांच्या संख्येत मुंबईनं चीनलाही मागे टाकलं आहे. शहरात आता ५० हजारांच्यावर करोनाचे रुग्ण आहेत. मुंबईत करोनाचा प्रसार रोखण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाने कंबर कसली आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या असलेल्या भागात पालिकेनं कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. मुंबईतील २४ विभागांत एकूण ७९८ कंटेन्मेंट झोन आहेत. यात १८९५७ करोना रुग्ण आढळले आहेत. तर या झोनमधील ४५८८ इमारतींना सील करण्यात आलं आहे. तर, मुंबईतील एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकं कंटेन्मेंट झोनमध्ये राहत आहेत.

महापालिकेनं जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, या ७९८ कंटेन्मेंट झोनमध्ये ४२ लाख लोकं राहतात. तर, पालिकेनं सील केलेल्या इमारतींमध्ये ८लाखांहून अधिक लोक राहतात. या आकडेवारीनुसार, १.२५ कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत जवळपास ५० लाख लोकं कंटेन्मेंट झोन व सील केलेल्या घरात राहत आहेत.

शहरात सध्या २९,००० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील ६५टक्के रुग्ण हे झोपडपट्टी व चाळीतील आहे. झोपडपट्टी व चाळीत करोनाचा प्रसार थांबवणे हे महानगरपालिकेसमोर आव्हान आहे. पालिकेनं तिथं फिव्हर क्लिनिक सुरू केल्यामुळं जास्तीत जास्त करोनाच्या टेस्ट केल्या जात आहेत.

मुंबईः शताब्दी रुग्णालयातून पळालेल्या ८० वर्षीय करोनाबाधिताच्या मृत्यूचं गुढ उलगडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या करोना रुग्णाचा मृत्यू सोमवारी ट्रेनच्या धडकेत झाला आहे. मालाड पूर्वेला कुरार व्हिलेजमध्ये हा व्यक्ती राहत असून घरी परतत असताना हा अपघात घडली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू केला आहे.

करोनाची लक्षण आढळल्यानंतर शनिवारी तीन वाजता आजोबांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखलं केलं होतं. तिथं त्यांची स्वॅब टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा फोन रुग्णालयाकडून कुटंबाला केला गेला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही आजोबा कुठेचं न सापडल्यामुळं अखेर मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली . सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास रेल्वे पोलिसांना बोरीवली स्थानकाजवळ मृतदेह आढळला.

मुंबईः येत्या दोन- तीन दिवसांतचं मान्सून मुंबईत धडकणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेमार्गावर पाणी साचून लोकल विस्कळित होणं हे आता मुंबईरांना सवयीचं झालं आहे. मान्सूनमध्ये रेल्वे सेवा कोलमडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. यंदा पाऊस सामान्य असल्यानं मुंबईतील रेल्वे मार्गात पाणी तुंबणार नसल्याचा दावा मध्य आणि पश्चिम रेल्वेनं केला आहे.

रेल्वे प्रशासनाने मागील वर्षीच पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा काढला होता. ट्रॅकची उंची वाढवणे, ओव्हरहेड वायरची तपासणी या समस्या मार्गी लावल्या होत्या. तसंच, यंदा मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत सुरू राहील अशी आशाही व्यक्त केली आहे..

२४ तासांत २५० मीमीपेक्षा अधिक पाऊस तर, ३ तासांत ७५ मीमीपर्यंत पाऊस पडला तरीही लोकलसेवा सुरळीत सुरू राहिलं अशी व्यवस्था रेल्वेनं केली आहे. मागील वर्षी रेल्वेनं २४ तासांत २०० मीमी तर २४ तासांत ६० मीमी पावसाची तयारी केली असल्याचं पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ, रविंद्र भास्कर यांनी सांगितलं.

नालेसफाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून पाण्याचा निचरा होण्यासाठी इलेक्ट्रिकल पंपाची व्यवस्था केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा नालेसफाईची दुसरी फेरीही घेण्यात येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे प्रशासनाने ४८ टक्के पंप मशीनच्या तुलनेत वाढ केली आहे. मागील वर्षी फक्त मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकात फक्त ९८ पंप उपलब्ध होते.

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला 'सर्कस' म्हणणारे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'जशास तसं' उत्तर दिलं आहे. 'रिंगमास्टरच्या हंटरवर चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही सरकारला सर्कस म्हणतात,' असा बोचरा टोला मलिक यांनी हाणला आहे. (Nawab Malik Slams Rajnath Singh for criticising maha vikas aghadi sarkar)

महाराष्ट्र जनसंवाद रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी सोमवारी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. 'महाराष्ट्रात सरकारच्या नावावर सर्कस सुरू आहे. या सरकारकडं कसलीही दूरदृष्टी नाही,' असं ते म्हणाले होते. स्थलांतरीत मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदचं कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी शिवसेनेचाही समाचार घेतला होता.

राजनाथ सिंह यांनी सरकारवर केलेल्या या टीकेला मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून जोरदार उत्तर दिलं आहे. 'महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीनं निवडून आलेलं सरकार आहे. हे सरकार उत्तम काम करतंय. लोकशाही मार्गानं चालणाऱ्या या सरकारला रिंगमास्टरच्या हंटरवर चालणारे मंत्री सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत,' असा चिमटा मलिक यांनी काढला आहे. कोविड १९ साथीच्या विरोधात राज्य सरकारनं दिलेल्या लढ्याचं इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनंही (ICMR) कौतुक केलं आहे,' याची आठवणही नवाब मलिक यांनी करून दिली आहे.

मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सरकारी यंत्रणाही करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, असं असताना रुग्णालयांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सोमवारी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय करोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह बोरीवली स्थानकात आढळला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

८० वर्षांचे हे आजोबा मालाडमध्ये राहत होते. करोनाची लक्षण आढळल्यानंतर शनिवारी तीन वाजता त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखलं केलं होतं. तिथं त्यांची स्वॅब टेस्ट केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी सकाळच्या सुमारास आजोबा रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचा फोन रुग्णालयाकडून कुटंबाला केला गेला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी शोधाशोध करूनही आजोबा कुठेचं न सापडल्यामुळं अखेर मालाड, बोरिवली आणि कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार केली .

सोमवारी रात्री १०.३०च्या सुमारास रेल्वे पोलिसांनी बोरीवली स्थानकाजवळ एक मृतदेह आढला. तो मृतदेह शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता करोना रुग्णाचाच असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळं आजोबांचा जीव गेल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

भाईंदर: महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या संख्येबरोबर मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

गेल्या आठ दिवसांपासून संबंधित नगरसेवकावर ठाण्यातील वेदांत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत नगरसेवकाची पत्नी, आई व भावालाही करोनाची लागण झाली होती. पत्नीला उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर, इतरांवर अजूनही उपचार सुरू आहेत.

संबंधित नगरसेवक दोनदा मिरा-भाईंदर महापालिकेत निवडून आले होते. शिवसेनेचे गटनेते म्हणून ते कार्यरत होते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे ते निकटवर्तीय होते. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

लॉकडाऊनच्या काळात विविध पक्षांचे राजकीय नेते व लोकप्रिय नेते आपापल्या मतदारसंघातील व वॉर्डातील जनतेला मदत करण्यासाठी प्रयत्नशील होते. या काळात त्यांचा अनेकांशी संपर्क आला. त्यातून अनेक पदाधिकारी व नेत्यांना करोनाची लागण झाली. राज्य सरकारमधील दोन मंत्र्यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यांनी करोनावर मातही केली होती. मात्र, मिरा-भाईंदरमधील नगरसेवकाच्या मृत्युमुळं लोकांमध्ये मिसळून काम करणारे राजकीय नेते व लोकप्रतिनिधींच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महाराष्ट्राला पडलेला करोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होत असून बाधितांची संख्या ८८ हजारांच्याही पुढं गेली आहे. आतापर्यंत ४० हजारांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, बरे होणाऱ्यांच्या तुलनेत बाधित रुग्णांचं प्रमाण अधिक असल्यानं चिंता वाढत आहे.

मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित केला होता. या लॉकडाऊनच्या काळात परराज्यातील नागरिक व श्रमिकांना त्यांच्या राज्यात परतण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेसप्रमाणे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही राज्याच्या चहुबाजूच्या सीमेपर्यंत धावल्या. एकूण ४४ हजार १०६ बस फेऱ्यांमधून ५ लाख ३७ हजार ५९३ स्थलांतरीत नागरिकांना रेल्वेस्टेशनपर्यंत तसेच त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ३१ मे पर्यंतच्या या अभियानात एस.टी बसेसनं तब्बल १५२.४२ लाख कि.मीचा प्रवास केला.

परराज्यातील नागरिकांना सुखरुप त्यांच्या राज्यात परतता यावे यासाठी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या. एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सुखरूप त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्यासाठी राज्य शासनाने तब्बल १०४.८९ कोटी रुपयांचा खर्च केला. औरंगाबाद, मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती अशा सहा प्रदेशातून नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी, रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्यासाठी एस.टी महामंडळाने बसची सुविधा उपलब्ध करून दिली.

२ लाखाहून अधिक लोकांना रेल्वेस्टेशनवर पोहोचवले
उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि आसाम, राजस्थान, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, हिमाचलप्रदेश, पंजाब, तामिळनाडू अशा विविध राज्यात रेल्वेने जाणाऱ्या मजूरांना रेल्वेस्टेशनपर्यंत सोडण्याचे काम एस.टी महामंडळाच्या बसेसने केले. २ लाख २८ हजार १०० नागरिकांनी बसच्या या सुविधेचा लाभ घेतला.

मुंबई: अभिनेता सोनू सूद यांच्या हेतूवर शंका उपस्थित करून त्यांच्यावर जोरदार टीका करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी अत्यंत कडवट शब्दांत टीका केली आहे. राऊतांवर टीका करतानाच वाघ यांनी सोनू सूदला एक कानमंत्रही दिला आहे. (Chitra Wagh's advice to Sonu Sood)

मुंबई लॉकडाऊनमुळं महाराष्ट्रात अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम सोनू सूद करतो आहे. आजवर हजारो मजुरांना त्यानं खासगी बस व रेल्वेनं घरी जाण्यासाठी मदत केली आहे. त्याच्या या कार्याचं देशभर कौतुक होत आहे. राजकीय वर्तुळातूनही त्याच्यावर स्तुतीसुमनं उधळली जात होती. मात्र, खासदार संजय राऊत यांनी 'सामना'त लिहिलेल्या लेखातून सोनूच्या एकूण कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी व्हॉट्सअॅपवरील एक मेसेज फॉरवर्ड करून राऊतांवर निशाणा साधला आहे. सोनू सूदचं कौतुक करतानाच वाघ यांनी त्याला एक सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, 'डिअर सोनू सूद, तू खूप चांगलं काम करत आहेस. राऊतांकडं लक्ष देऊ नकोस. आपल्याला रोगाशी लढायचं आहे. रोग्याशी नाही...'
 

मुंबईः मुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत मागील काही महिन्यांपासून करोनाचा फैलाव वाढला होता. धारावी मुंबईतील करोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. मात्र, आता धारावीतून एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ३० मे ते ७ जूनपर्यंत धारावीतील एकही करोनामुळ मृत्यू झाला नाहीये. धारावीतून आतापर्यंत १९१२ करोना बाधितांचा आकडा होता. तर, आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे

धारावीत करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनानं खबरदारी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. करोना रुग्णांच्या वाढते संख्येला आळा घालण्यात अखेर प्रशासनाला यश आलं आहे. धारावीत २९ एप्रिलला कोव्हिड-१९चे ९१ रुग्ण आढळले होते. तर, ७ मेला ८४ नवीन रुग्ण आढळले होते. फिव्हर कॅम्पमध्ये अधिकाधिक लोकांची स्क्रिनिंग टेस्ट करण्यात आली असून त्यांना लगेच आयसोलेट करण्यात आलं. त्यामुळं धारीवीतीस करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. तसंच, वेळेवर उपचार मिळाल्यानं मृत्यूदरही कमी झाला आहे.

घरा घरांत पोहोचवले सामान
उत्तर वॉर्डात तीन रुग्णालयांत कोव्हिड रुग्णालय उभारले आहेत. त्यातील साई रुग्णालयात ५१ खाटा, फॅमिली केअर रुग्णालयात ३० बेड तर, प्रभात नर्सिंग होममध्ये ३० खाटांची व्यवस्था एप्रिलच्या दोन आठवड्यातच करण्यात आली होती. तर, अन्य रुग्णांना सायन रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तसंच, धारावीत राहणाऱ्या नागरिकांना घरपोच किराणा सामान पोहोचवण्यात आले आहे. नागरिकांना घरातच राहण्याच आवाहन सातत्याने करण्यात येत होतं. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

मुंबई: 'करोनाचं निदान झाल्यानंतर महाराष्ट्रातील असंख्य चाहत्यांचे मला फोन आले. त्यात विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचाही फोन होता. त्यांनी माझी विचारपूस केली आणि लवकर बरे व्हा अशा शुभेच्छाही दिल्या होत्या,' अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

करोनावर मात करून रुग्णालयातून घरी परतलेले अशोक चव्हाण सध्या होम क्वारंटाइन आहेत. 'बीबीसी मराठी' या न्यूज वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आपले अनुभव सांगितले.

करोना झाल्यानंतर नांदेड सोडून अशोक चव्हाण मुंबईला उपचारासाठी आले व इथे एका खासगी रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये एक चांगलं रुग्णालय उभारतं आलेलं नाही. त्यांना मुंबईत जाण्याची गरज का लागली,' अशा चर्चा सोशल मीडियात सुरू झाल्या होत्या. त्या चर्चांना व आरोपांना चव्हाण यांनी उत्तर दिलं. 'माझ्या आजारानंतर नांदेडमधील आरोग्य व्यवस्थेबद्दल ठरवून चर्चा घडवून आणली गेली. हे केवळ एका व्यक्तीचे उद्योग होते. त्याबद्दल विरोधकांना दोष देण्याचं कारण नाही. कारण अनेक विरोधकांनीही मला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण येनकेन प्रकारे प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका व्यक्तीनं हे सगळं केलं,' असं ते म्हणाले. या व्यक्तीचं नाव घेणं मात्र त्यांनी टाळलं.

मुंबईः राज्यात करोनाचे संकट व निसर्ग चक्रीवादळामुळं झालेलं नुकसान असं दुहेरी संकट ओढावलेलं असतानाच राज्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. येत्या दोन- तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून धडणार असल्याची शक्यता हवामान विभागनं व्यक्त केली आहे.

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक व गोवा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलंय.

मोसमी वारे सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये कर्नाटकातील काही भाग व तामिळनाडूतील काही भागांत मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. पोषक वातावरणामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत तळकोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

सरासरीइतका पाऊस
यंदा जून ते सप्टेंबर या मान्सून काळातील सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या सुधारीत अंदाजात वर्तवली आहे. मान्सूनसाठी संपूर्ण हंगामात हवामान अनुकूल राहणार असल्यामुळे सरासरीइतक्या पावसाची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे. वायव्य भारतात यंदा त्या भागातील हंगामी सरासरीच्या १०७ टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणाऱ्या मध्य भारतात सरासरीच्या १०३ टक्के, दक्षिण भारतात १०२ टक्के, तर ईशान्य भारतात ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

नवी मुंबई: करोनाच्या साथीच्या काळात आरोग्य व्यवस्थेतील सावळागोंधळ व अनेक गैरप्रकारही समोर येत आहेत. नवी मुंबईतील एका लॅबनं करोना बाधितांचे चुकीचे अहवाल दिल्याचं समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या लॅबमधील करोना चाचणी बंद पाडली आहे.

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. करोना सदृश लक्षणे दिसल्यास कोविड १९ चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळं चाचण्यांचं प्रमाणही वाढलं आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यानं आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढला असून त्याचा परिणाम चाचणी अहवालांवर होत आहे. राज्यातल अनेक ठिकाणी कोविड रुग्णांच्या चुकीचे अहवाल आल्याच्या तक्रारी आहेत

नवी मुंबईच्या तुर्भे येथील थायरो केअर लॅबने सहा लोकांचे कोविड टेस्टचे चुकीचे अहवाल दिल्याची तक्रार करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी संबंधित लॅबला भेट दिली. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळं संबंधित लॅब चालकांना करोना चाचणी तात्काळ बंद करण्यास सांगण्यात आलं आहे.

 

 महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्घव ठाकरे ने शनिवार को वीडियो कॉन्फ्रेंसिंग के जरिये नागपुर के पास वेस्टर्न कोलफील्ड्स की अदासा कोयला खान का उद्घाटन किया। इस मौके पर उन्होंने इस तरह की खानों के उचित इस्तेमाल के साथ प्रदूषण के स्तर को कम करने पर जोर दिया। ठाकरे ने कहा कि यदि गुणवत्ता वाले कोयले के उत्पादन पर ध्यान दिया जाए, तो इससे देश में बिजली की कमी को दूर किया जा सकता है।उन्होंने इस बात पर क्षोभ जताया कि कोयला खानों की संख्या के मामले में भारत दुनिया में चौथे स्थान पर है, लेकिन इसके बावजूद हमें कोयले का आयात करना पड़ता है। इसके साथ-साथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने भी दो खानों का उद्घाटन किया। केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री नितिन गडकरी और कोयला एवं खान मंत्री प्रह्लाद जोशी भी वीडियो कॉन्फ्रेंसिंग से जुड़े। ठाकरे ने कहा कि बिजली उत्पादन के लिए कोयला अत्यंत महत्वपूर्ण है, लेकिन हमें गुणवत्ता वाले कोयले के उत्पादन पर ध्यान देना चाहिए। इससे देश में बिजली की कमी को दूर किया जा सकता है। उन्होंने कहा कि विशेषरूप से इससे ग्रामीण क्षेत्रों के किसानों को सस्ती बिजली की आपूर्ति की जा सकती है।

लॉकडाउन काळात सवलती मिळाल्यानंतर अत्यावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबर कंपन्यांच्या अॅप बेस्ड टॅक्सीसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावरच्या नियमांचे पालन करून नागरिकांना प्रवास करता येईल. शहरांतर्गत सेवेसह आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ही सेवा सुरू करण्याची घोषणा ओला-उबरने केली आहे.

राज्य सरकारने अर्थचक्र सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली केल्यानंतर सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रवास कसा करायचा, याची चिंता सतावत होती. त्यातच लोकल बंद असल्याने एसटी-बेस्ट फेऱ्यांमध्ये गर्दी होत असल्याने करोना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यामुळे कार्यालय कसे गाठायचे, असा नवा पेच नोकरदार वर्गासमोर उपस्थित झाला होता.

मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अन्य शहरांत ही सेवा सुरू करण्यात आली आहे, असे ओलाचे प्रवक्ते आनंद सुब्रमण्यम यांनी सांगितले. तर आज, शुक्रवारपासून उबरच्या माध्यमाने अत्यावश्यक प्रवासासाठी प्रवाशांना उबर गो, प्रीमीयर आणि ऑटो रिक्षा प्रवास करण्याची मुभा आहे. सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवाशांना आवश्यक कागदपत्रांसह सुरक्षित वावरच्या नियमांचे योग्य पालन करून प्रवाशांना प्रवास करता येईल, असे उबरच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

 

तब्बल अडीच महिन्यांच्या लांबलचक लॉकडाउन निर्बंधांनंतर अखेर शुक्रवारी मुंबई व अन्य शहरांतील अनेक दुकानांची दारे उघडली गेली. लॉकडाउनमुळे तिजोरीत झालेला खडखडाट 'पुनश्च हरिओम'च्या निमित्ताने काही प्रमाणात भरून काढता येणार असल्याने दुकानदारांच्या मास्क लावलेल्या चेहऱ्यांवर हास्य खुलले होते. घरात अडकून पडलेल्या लाखो नागरिकांनीही खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत मास्क लावून का होईना मोकळा श्वास घेतला. यावेळी काही अपवाद वगळता सर्वत्र शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे चित्र दिसून आले.

लॉकडाउनचे जवळपास चार टप्पे पार पडल्यानंतर 'अनलॉक १'च्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यानुसार सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बाजारपेठा, दुकाने (मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स वगळून) सम, विषम तारखेला सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यांवर दुकानांच्या बाहेर सुरक्षेचे निकष पाळत खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दुकाने उघडण्यापूर्वी अनेक दुकानमालकांकडून ग्राहकांना स्वतःहून सुरक्षित वावर राखता येईल यादृष्टीने विशेष सोय करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. तसेच सामानाची देवाण-घेवाण करताना ग्लोव्हज वापरले जात होते. दुकान परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. सर्व कामगारांना मास्क, ग्लोव्हजचे वाटप करण्यात आले.

 

औरंगाबादः मनोरुग्ण व्यक्तीनं वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयाच्या पाठीमागील भिंतीवरून चालत असताना त्यानं अचानक वाघाच्या आतल्या पिंजऱ्यात उडी घेतली. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले.

सोमवारी मध्यरात्री या तरुणानं वाघाच्या पिंजऱ्यात उडी मारली. या पिंजऱ्याला लागूनच खंदक असल्यामुळं त्याला पिंजऱ्यातून बाहेर पडणं शक्य नव्हते. त्यामुळं रात्री तो पिंजऱ्यातच झोपला. हा सर्व प्रकार मंगळवारी प्राणीसंग्रहालयाच्या सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. त्यावेळी तत्काळ पोलिसांनी बोलावण्यात आले व तरुणाची सुटका करण्यात आली. पण. गेले सात तास तो वाघाच्या पिंजऱ्यात अडकला होता.

एक अनोळखी व्यक्ती दोन जूनच्या सकाळी वाघाच्या पिंजऱ्याची जाळी काढून आत आल्याचं लक्षात आलं तेव्हा त्याला लगेचच पोलिसांच्या स्वाधीन केले. तो मनोरुग्ण असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणाला वडिलांचा फोन नंबर लक्षात असल्यानं त्याच्यांशी संपर्क करून त्याला त्यांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. असं क्रांतीचौक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे.

 

मुंबईः करोनाच्या संकटात माणुसकी जपत अहोरात्र सेवा देणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सतर्कतेच आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथं समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी जीव धोक्यात घालून वाचवलं आहे.

मुंबई पोलिस दलातील कॉन्स्टेबल माने आणि शिगवन यांनी सतर्कता दाखवत त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. दोर टाकत त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलं मात्र, दोर अपुरा पडत होता तरही त्यांनी प्रयत्न करत दोर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवला व त्या व्यक्तीपर्यंत दोर पोहोचल्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आलं.

संकटात सापणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तत्परता दाखवल्याबद्दलं सोशल मीडियावर या दोन्ही कॉन्स्टेबलचं कौतुक होतंय. मुंबई पोलिसांनीही आम्ही नेहमीचं तुम्ही संकटात असताना सोबत आहोत असं म्हटलं आहे.

मुंबई : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आयसीएमआरने गेल्या आठवड्यात करोना चाचणीसाठी ४५०० रुपयांची मर्यादा काढून टाकली आणि राज्य सरकारला दर निश्चित करण्याची मुभा दिली. आयसीएमआरच्या निर्देशांनुसार, राज्य सरकार मान्यताप्राप्त प्रयोगशाळांसोबत बोलून चाचणीचे दर निश्चित करणार आहे. पण महाराष्ट्र सरकारने यावर अजून निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे एकीकडे खाजगी लॅबमध्येही चाचणीसाठी २ हजार रुपये घेतले जात असताना मुंबईकर ३ ते ४ हजार रुपये मोजत आहेत.

टेस्टिंग लॅबसाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने निविदा मागवाव्या, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार आणि विरोधी पक्षांनी केली आहे. या स्पर्धेमुळे चाचणीचे दर निम्म्यावर येतील आणि मुंबईकरांनी दोन हजार रुपयांमध्येच करोनाचं निदान करता येईल. कर्नाटक सरकारने यापूर्वीच २२५० रुपये प्रति चाचणी असे दर निश्चित केले आहेत.

मुंबई महापालिकेकडे असलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि महानगर प्रदेशात खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये दररोज ६००० चाचण्या होतात. मुंबईत आतापर्यंत दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी चाचण्या केल्या आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत आयसीएमआरने निश्चित केलेला प्रति चाचणी ४५०० रुपये दर लागू होता. पण हा दर आता लागू नसेल, असं आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी राज्याच्या सचिवांना पत्राद्वारे सांगितलं होतं. देशात आता चाचण्यांची पुरेशी क्षमता असून सुविधा उपलब्ध आहेत, असं भार्गव म्हणाले होते.

 

मुंबई: करोनानंतरच्या काळात स्वच्छता, सुरक्षितता वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग बनणार आहे. त्यावेळी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच पर्यावरण स्वच्छतेचीही काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातील जनतेला अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. 'संपूर्ण जग करोना संकटाशी लढत असताना पर्यावरण संरक्षण व पर्यावरण संवर्धनाची गरज ठळकपणे जाणवते आहे. मानवी जीवनात निसर्गाचं आणि निसर्गातील वनं, वन्यप्राण्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे', असेही अजित पवार म्हणाले.

करोनाच्या टाळेबंदीमुळे निसर्गातील मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे. परिणामस्वरूप ओढे, नाले, नद्या, पाण्याचे स्त्रोत, प्रवाह स्वच्छ झाले आहेत. हवेतील प्रदूषण कमी होऊन मोकळा श्वास घेता येऊ लागला आहे. स्वच्छ वातावरण मनाला आनंद देत आहे. वन्यप्राण्यांचे दुर्मिळ दर्शन घडू लागले आहे. निसर्गाचे, पर्यावरणाचे हे स्वच्छ स्वरूप भविष्यात अधिक समृद्ध करायचे आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई: राज्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गुरुवारी आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या वादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या रायगड जिल्ह्याचा पाहणी दौरा करणार आहेत. यावेळी रायगड जिल्ह्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.

निसर्ग वादळाने निम्मा रायगड जिल्हा विस्कटून गेला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत वादळामुळे मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख घरांची पडझड झाली असून ५ हजार हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून ८ तालुक्यांत वीज यंत्रणा व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे. किमान १७०० गावे दोन दिवस अंधारात आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्ते अजूनही बंद आहेत. या स्थितीचा गुरुवारीच आढावा घेऊन आवश्यकते निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता मुंबईतून बोटीने रायगड जिल्ह्यात जाणार आहेत. गोल्डन गेट ते मांडवा जेटी असा प्रवास मुख्यमंत्री बोटीने करतील. तिथून मोटारीने ते अलिबागमधील थळ येथे पोहचतील. तेथीन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री आढावा घेतील, असे सांगण्यात आले.

औरंगाबाद:औरंगाबाद शहर परिसरातील ३० वर्षीय करोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ( घाटी ) गुरुवारी (४ जून) मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९३ करोना बाधितांनी आपला जीव गमावला आहे. तसेच आज आणखी ५९ बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १८२८ झाली आहे, तर आतापर्यंत ११२६ करोना बाधित हे करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत व सध्या ६०९ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये भारतमाता नगर येथील १, इंदिरानगर, न्यू बायजीपुरा १, न्यू कॉलनी, रोशन गेट १, भावसिंगपुरा १, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी १, बेगमपुरा (१), चिश्तिया कॉलनी १, फाझलपुरा १, रेहमानिया कॉलनी १, गांधी नगर १, युनूस कॉलनी २, जुना मोंढा, भवानी नगर १, शुभश्री कॉलनी, एन-सहा १, संत ज्ञानेश्वर नगर, एन-नऊ १, आयोध्या नगर, एन-सात ७, बुढीलेन ३, मयूर नगर, एन-अकरा १, विजय नगर, गारखेडा ३, सईदा कॉलनी १, गणेश कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजलपुरा १, रोशनगेट परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, औरंगपुरा २, एन-आठ, सिडको १, समता नगर ४, ‍मिल कॉर्नर २, जवाहर कॉलनी ३, मोगलपुरा २, जुना मोंढा १, नॅशनल कॉलनी १, राम मंदिर, बारी कॉलनी १, विद्यानिकेतन कॉलनी १, देवडी बाजार १, एन-सात सिडको १, एन-बारा १, आझाद चौक १, टी.व्ही. सेंटर, एन-अकरा १, कैलास नगर १ व आणखी एका ठिकाणच्या रहिवाशाचा समावेश आहे. यामध्ये १९ महिला आणि ४० पुरुषांचा समावेश आहे.

कोल्हापूर:करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

दरवर्षी रायगडावर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो. राज्यभरातून वीस ते पंचवीस हजार शिवभक्त शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थित राहतात. पण यावेळी करोना साथीच्या पार्श्वभूमीवर रायगडावर हा दिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी खासदार संभाजीराजे, समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांच्यासह निवडक कार्यकर्ते रायगडला गेले. शनिवारी निवडक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ केला जाणार आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शिवराज्याभिषेक दिन शिवभक्तांनी घरात राहूनच विविध उपक्रमांनी साजरा करावा. घरासमोर स्वराज्याचा भगवा ध्वज लावावा, शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करावे, स्वदेशी जातीचे एखादे झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, शिवरायांवरील पुस्तकांचे वाचन करावे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रायगडावर येण्याचा प्रयत्न करू नये,' असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी केले होते.

नुकसान होत असून, टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने कीटकनाशक फवारणीचा प्रयोग बुधवारी नागपुरात करण्यात आला. टोळधाडीच्या निर्मूलनासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याची घोषणा अलिकडेच कृषीमंत्री दादा भुसे यांनी केली होती. त्यानुसार नागपूरच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या बॉटनिकल गार्डन येथे ड्रोनच्या प्रात्यक्षिकांची पाहणी मंत्र्यांनी केली.

एअरोनिका कंपनीच्या दोन ड्रोनचा वापर यासाठी करण्यात येत आहे. ड्रोनची क्षमता १० लिटर कीटकनाशक व पाणी घेऊन फवारणी करण्याची आहे. यासाठी क्लोरोपायरोफॉस हे कीटकनाशक वापरण्यात येत आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत ही टोळधाड आली. त्यामुळे पिकांचे, भाजीपाला, फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ही टोळधाड मध्य प्रदेशातील जंगलात निघून गेली. परंतू पुन्हा जिल्ह्यात दाखल होऊ शकते. त्यामुळे टोळधाडीवर कीटकनाशकांची फवारणी हाच एकमेव उपाय असल्यामुळे ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.
आतापर्यंत कृषी व महसूल विभागाने अग्निशमन बंबांच्या सहाय्याने कीटकनाशकांची फवारणी केली आहे. जंगलातील अतिउंच व घनदाट झाडे, दरी तसेच नदीकाठावरील आणि दुर्गम भागातील झाडांवर फवारणी करण्यास मर्यादा येत होत्या. त्यामुळे दुर्गम भागांत टोळधाड नियंत्रणासाठी ड्रोनची मदत घेण्यात आली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना दोन दिवस म्हणजे ५ जूनपर्यंत निरीक्षणाखाली ठेवले जाणार असून, त्यांची आरोग्य तपासणी (स्क्रीनिंग) केल्यानंतरच त्यांना घरी सोडण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

चक्रीवादळामुळे संभाव्य धोका पोहोचू शकणाऱ्या भागांमधील सुमारे १९ हजार नागरिकांना जवळपासच्या शाळांमध्ये व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. चक्रीवादळाचा धोका टळला असला, तरी या नागरिकांना त्वरित घरी पाठवणे सध्याच्‍या करोनाच्या काळात योग्य नाही, ही बाब नजरेसमोर ठेवून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी प्रशासनाला या नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयुक्तांचे आदेश

- विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या पथकाने सर्व स्थलांतरितांचे स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे.

मुंबई: 'राज्यपाल व राज्य सरकारमध्ये सध्या पदवीच्या अंतिम परीक्षा घेण्यावरून मतभेदांचे जाहीर प्रदर्शन सुरू आहे. राज्यपालांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे, पण राजभवनाच्या दारावर काही ‘चक्रम’ वादळे अधूनमधून आदळत असतात. राज्यपाल हे भले गृहस्थ आहेत. त्यांनी अशा चक्रम वादळांपासून सावध राहायला हवे. अन्यथा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याचा धोका आहे', अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आवाहन करण्यात आलं आहे. वारंवार राजभवनाच्या वाऱ्या करणाऱ्या भाजप नेत्यांना अग्रलेखात चक्रम वादळाची उपमा देण्यात आली आहे.

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना मागील सत्रातील गुणांचे मूल्यांकन करून सरासरी गुण दिले जातील, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले असून त्यावर बोट ठेवत शिवसेनेच्या मुखपत्रातून हा निर्णय कसा योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचवेळी राज्यपालांच्या भूमिकेवरही खोचक मतप्रदर्शन करण्यात आलं आहे.

मुंबई: 'करोना साथीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारनं मुंबईत काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू करायला हव्यात,' अशी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (Mumbai Local for emergency services)

आव्हाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. 'मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी दूर उपनगरांत किंवा मुंबईबाहेर राहतात. लोकल ट्रेनची सोय असल्याशिवाय ते कामावर रुजू होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोदी सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू कराव्यात, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र सध्या करोनाच्या मोठ्या संकटाला तोंड देत आहे. मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्याही पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांत बेड असूनही कर्मचारी नसल्यानं ते मोकळेच पडून आहेत. आरोग्य कर्मचारी उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांनाही पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवा करणं शक्य होणार आहे.
येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करता आव्हाड यांच्या मागणीला महत्त्व आहे.

मुंबई: करोना रुग्णांवर उपचारांसाठी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) उभारण्यात आलेले कोविड रुग्णालय पूर्णपणे सुरक्षित आहे. निसर्ग चक्रीवादळामुळं या रुग्णालयाची कुठलीही हानी झालेली नाही,' असा खुलासा मुंबई महापालिकेनं केला आहे.

कोकण किनारपट्टीवर काल निसर्ग चक्रीवादळानं धडक दिली होती. हे वादळ प्रत्यक्ष मुंबईच्या किनाऱ्यावर धडकलं नसलं तरी सोसाट्याचा वारा व पावसामुळं मुंबईत बऱ्याच प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी झाडं पडली. या वादळामुळं बीकेसीमध्ये उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचं प्रचंड नुकसान झाल्याची चर्चा होती. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी देखील या संदर्भात काही व्हिडिओ शेअर केले होते. असल्या तकलादू सुविधांवर करदात्यांचा पैसा का खर्च केला जात आहे, असा सवाल त्यांनी केला होता. या सगळ्या चर्चांबद्दल आज मुंबई महापालिकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हॅँडलवरून स्पष्टीकरण दिलं आहे. बीकेसीतील कोविड रुग्णालयाचं नुकसान झाल्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे. या सगळ्या अफवा आहेत,' असं महापालिकेनं म्हटलं आहे.

मुंबई: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या मुंबईपासून हे वादळ २५० तर अलिबागपासून २०० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून २०० व अलिबागपासून १५५ किमी अंतरावर आणि साडेसात वाजता हे अंतर अनुक्रमे १९० आणि १४० किमी इतकं कमी झाल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे.

निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.

मुंबई : बेस्ट, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि एमएसईडीसीएल या वीज पुरवठा कंपन्या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर आहेत. एमएसईडीसीएलमधील सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वीज पुरवठा कंपन्या पुरवठा खंडीत करण्याची शक्यता आहे. प्रभावित क्षेत्रातील ट्रान्सफॉर्मर आणि फीडर्स केले जातील, जेणेकरुन विजेपासून काही धोका निर्माण होऊ नये. तर आणखी एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सर्व वीज वितरण कंपन्या राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागाच्या संपर्कात आहेत.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली या क्षेत्रात बहुतांश वीज वाहिन्या उघड्यावर आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला जाऊ शकतो. मंगळवारी सायंकाळीही कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापारूमध्ये दोन तासांसाठी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. बरवे स्विचिंग स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा पुरवठा खंडीत करण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईसाठी बेस्टने तयारी केली आहे. बेस्टने काही जनरेटर स्टँडबायवर ठेवले असून अतिरिक्त मनुष्यबळही तैनात केलं आहे. बेस्टच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'सर्व रुग्णालयांचा वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्यावर आमचा भर असेल. विशेषतः कोविड केंद्र आणि कॉरेंटाईन झोनमध्ये असलेला वीज पुरवठा प्राधान्याने सुरळीत केला जाईल. दुसरीकडे टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटीनेही त्यांची पथके स्टँडबायवर ठेवली आहेत. अदानी इलेक्ट्रिसिटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वीज पुरवठ्याबाबत कोणत्याही चौकशीसाठी ग्राहक १९१२२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
 

मुंबई : भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीच्या अंदाजानुसार निसर्ग हे तीव्र चक्रीवादळ ठरलं तर १९०८ नंतर पहिल्यांदाच अरबी समुद्रात सलग दोन वर्षे चक्रीवादळ येण्याची ही वेळ असेल. कारण, गेल्या वर्षीही वायू चक्रीवादळ आलं होतं. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात हे वादळ ९ जून रोजी गेल्या वर्षी आलं होतं. अरबी समुद्रात यापूर्वी सलग दोन वर्षे जूनमध्ये चक्रीवादळ १९०२ आणि १९०३ मध्ये आले होते. यानंतर पुन्हा जून १९०७ आणि १९०८ या सलग दोन वर्षात पुन्हा तीव्र चक्रीवादळ तयार झालं. आता शंभर वर्षांच्या खंडानंतर वायू आणि निसर्ग चक्रीवादळाचा या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे.

आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या किनाऱ्यातून चक्रीवादळ जाणे ही अत्यंत दुर्मिळ परिस्थिती असते. १८९१ पासून असलेल्या नोंदींनुसार आतापर्यंत फक्त तीन चक्रीवादळे आली आहेत.

'हवामानशास्त्रानुसार, वर्षाला उत्तर भारतीय महासागरात पाच चक्रीवादळांची निर्मिती होते, ज्यात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचाही समावेश आहे. साधारणपणे बंगालच्या उपसागरात चार आणि अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होतं. अरबी समुद्रात चक्रीवादळ ही दुर्मिळ बाब आहे. अरबी समुद्रात तयार होणारं एक वादळ हे सर्वसाधारणपणे गुजरात किंवा ओमनच्या दिशेने जातं,' अशी माहिती मोहपात्रा यांनी दिली. दरम्यान, २०१९ या वर्षात बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात आठ चक्रीवादळांची नोंद झाली होती.
 

मुंबई: मुंबईच्या दिशेनं येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळानं रौद्ररूप धारण केले आहे. रत्नागिरीजवळ 'बसरा स्टार' हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे. (Basara Star ship stuck in Cyclone)

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं उठलेलं चक्रीवादळ आता मुंबईच्या दिशेनं कूच करत आहे. सध्या रत्नागिरीत हे वादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. त्यांनी वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. 'टोइंग' प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे.

'निसर्ग' वादळ दुपारपर्यंत अलिबागच्या किनाऱ्यावर पोहोचेल. त्यानंतर १ ते ४ वाजण्याच्या दरम्यान मुंबईत धडकेल, असा अंदाज आहे. गुजरातमधील नवसारी आणि वलसाडला पोहोचेपर्यंत वादळाचा वेग ताशी ६०-८० किमी असेल. तर आज मध्यरात्रीपर्यंत 'निसर्ग'चा वेग आणखी कमी होईल आणि गुरुवारी सकाळपर्यंत वादळ बऱ्यापैकी ओसरेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, हे वादळ ५० किलोमीटरने दक्षिण दिशेला सरकलं आहे, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे.
 

मुंबई:निसर्ग चक्रीवादळ व पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं सर्व आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर, मुंबईकरांनाही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. पुढचे दोन दिवस वादळवाऱ्याचे असून पावसामुळं शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा वेळी दक्षता म्हणून कार चालकांनी चाकू किंवा तीक्ष्ण हत्यार सोबत ठेवावे. जेणेकरून गाडी पुरात अडकल्यास गाडीतून बाहेर पडण्यासाठी त्याची मदत होईल,' असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाबरोबर मोठ्या पावसाची शक्यता आहे. हे दोन दिवस बाहेर पडणे टाळावे अशा सूचना महापालिकेनं आधीच दिल्या आहेत. मात्र, तरीही कुणाला बाहेर पडावेच लागले आणि छोट्या चारचाकीनं प्रवास करावा लागला तर तीक्ष्ण हत्यार सोबत ठेवावं, असं महापालिकेनं सांगितलं आहे. यापूर्वी चारचाकी गाड्या पुरात अडकून त्यांची लॉक सिस्टिम बंद झाल्यानं अनेकांचा गुदमरून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन ही सूचना करण्यात आली आहे. एखाद्या वेळेस गाडी पुराच्या पाण्यात अडकली आणि दरवाजे लॉक झाले तर तीक्ष्ण वस्तूच्या मदतीनं गाडीच्या काचा फोडून बाहेर पडता येईल, हा यामागचा उद्देश आहे. महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी मंगळवारी सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या.

देशात व्याघ्रसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू असताना मागील पाच महिन्यांत ४५ वाघांचा मृत्यू झाला. त्यातील २८ व्याघ्रमृत्यू लॉकडाऊन काळातील असल्याची माहिती समोर आली आहे.

जगातील एकूण वाघांपैकी ७० टक्के भारतात आहेत. २००६मध्ये भारतात केवळ १,४११ वाघ उरले होते. गेल्या दहा वर्षांत वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. २०१८च्या आकडेवारीनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आहेत. मागील चार वर्षांत राज्यातील वाघांच्या संख्येत ६५ टक्के वाढ होऊन आता ही संख्या ३१२वर पोहचली आहे. पण, चालू वर्षात आतापर्यंत ४५ वाघांचा मृत्यू झाला आहे. यातील ६४ टक्के घटना व्याघ्रप्रकल्पातील अतिसंरक्षित भागात झाल्या आहे. परिणामी आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागात करडी नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

२३३ बिबट्यांचा मृत्यू
मागील काही वर्षांत बिबट्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात काही प्रमाणात घट झाली होती. २०१८मध्ये ५०० बिबट्यांचा मृत्यू झाला होता. तर २०१९मध्ये ४९१चा आकडा नोंदविण्यात आला. चालू वर्षात मागील पाच महिन्यांत देशात एकूण २३३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. त्यात १७० बिबटे मृत्यूमुखी पडले असून शिकार व जप्तीतून ६३ मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे.

कोव्हिडपासून सुरक्षित असलेली चहा केंद्रे सुरू करण्याचे नियोजन टी अँड कॉफी असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांतच चहाविक्रेत्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येणार असून, करोना संकटामुळे गायब झालेल्या रस्त्यांशेजारील वाफाळत्या चहाचा आस्वाद पुन्हा घेणे शक्य होणार आहे.

मुंबईत जवळपास १२ हजारांहून अधिक चहाविक्रेते कार्यरत असून यापैकी बहुतांश विक्रेते आपापल्या मूळगावी परतले आहेत. मात्र भूमिपुत्र असलेले चहाविक्रेते भविष्यात आपला व्यवसाय सावरण्यासाठी संचारबंदी शिथिल होण्याची आदेश पाहत होते. त्यानुसार केंद्र तसेच राज्य सरकारकडून शिथिलता आणण्याबाबत सकारात्मक इशारा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र कुठलाही खाद्यव्यवसाय सुरू करताना यापुढे ग्राहकांची मागणी लक्षात घ्यावी लागणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तर संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक आमच्याकडे येतील का, असा प्रश्न विक्रेत्यांना पडला आहे. त्यामुळे चहाविक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या टी अँड कॉफी असोसिएशनने यावर तोडगा म्हणून कोव्हीड विशेष मार्गदर्शक तत्त्वे (नियमावली) तयार केली आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी सांगितले.

या नियमावलीनुसार, असोसिएशनने नियुक्त केलेली डॉक्टरची टीम चहाविक्रेत्यांची तपासणी करून त्यांना फिट असल्याचे प्रमाणपत्र देईल. त्यानंतरच सदर विक्रेत्यास व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच सुरक्षित वावर राखून चहाची विक्री कशी करावी याबाबत नियमावलीत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचसोबत प्रत्येक नोंदणीकृत चहावाल्यास ड्रेसकोड बंधनकारक असणार आहे.

आमचा व्यवसाय सांभाळताना आमच्या ग्राहकांचे आरोग्य जपणे याला निश्चितच प्राधान्य असणार आहे. त्यासाठी सुरुवातीच्या काळात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याबाबत आयुष मंत्रालयाने शिफारस केल्यानुसार ब्लॅक मसाला चहाची विक्री करण्याबाबत विक्रेत्यांना प्राथमिक सूचना देण्यात आल्या आहेत. वेळोवेळी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रशिक्षणही दिले जाईल.

केरळमध्ये दाखल झालेला मान्सून व मुंबईसह काही उपनगरांत पावसाने सोमवारी दिलेल्या सलामीमुळे जनमानस सुखावले असले तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काळजीचेही वातावरण निर्माण झाले आहे.

अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाच्या पट्ट्याचे आज, मंगळवारी पहाटे ५.३०च्या सुमारास चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. निसर्ग चक्रीवादळ रात्री ११.३०पर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होईल. त्यानंतर ३ जूनला रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दमणदरम्यानच्या पट्ट्यात त्याचा जमिनीवर प्रवेश होईल. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे नुकसान होऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तवला. एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. मान्सूनचे दुसऱ्या टप्प्यातील दीर्घकालीन पूर्वानुमान सोमवारी प्रसिद्ध करण्यात आले, त्यावेळी या चक्रीवादळाविषयी विस्तृत माहिती देण्यात आली.

अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वेगाने उत्तरेकडे सरकत आहे. आज, मंगळवारी हाटे ते उत्तरेकडे सरकेल आणि त्यानंतर त्याचा प्रवास ईशान्येकडे होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे २ आणि ३ जून रोजी दक्षिण कोकण आणि गोवा येथे बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ३ जून रोजी उत्तर कोकणामध्ये तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊसही पडू शकेल. ४ जून रोजीही उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस चक्रीवादळामुळे आलेला असेल. हा मान्सूनचा पाऊस नसेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. चक्रीवादळानंतर काही दिवसांच्या विलंबाने मान्सूनचा प्रवास पुढे सुरू होईल असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबई: लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर मुंबईतील काही हॉटेलांनी पार्सल सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू होताच दादरमधील मनसेच्या काही नेत्यांच्या पार्सल आले आहेत. अचानक आलेल्या या पार्सलमुळं नेते चकित झाले होते. मात्र, पार्सलचे हे गूढ काही वेळातच उकलले.
मनसेचे नेते व माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली आहे. गेले ७० दिवस बंद असलेल्या दादरमधील मराठमोळ्या प्रकाश हॉटेलनं पार्सल सेवा सुरू केली आहे. ही सेवा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रकाश हॉटेलमधून माझ्या घरी पार्सल आलं. सुरुवातीला मला आश्चर्य वाटलं. मात्र, हे पार्सल खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पाठवल्याचं नंतर कळलं. माझ्याप्रमाणेच इतर अनेक मित्र व स्नेह्यांना त्यांनी अशी पार्सल पाठवली आहेत,' असं सरदेसाई यांनी म्हटलं आहे.

आपल्या पोस्टमध्ये नितीन सरदेसाई पुढे म्हणतात, 'धारगळकर यांची माहीमची ‘प्रसाद बेकरी’ असो, चितळे बंधू असो की रत्नागिरीतले भिडेंचं ‘योजक’ असो. मराठी उद्योजकांकडूनच खरेदी करण्याचा त्यांचा कटाक्ष असतो. परदेशात गेल्यावर सुद्धा तिथे एखाद्या मराठी माणसाचे दुकान अथवा व्यवसाय असल्यास राज ठाकरे हटकून त्याच्याकडेच खरेदी करतात.'

'काही वर्षांपूर्वी आम्ही लंडनमध्ये असताना तिथे वडापावचे हॉटेल सुरू करत असल्याचे काही मराठी तरुणांनी भेटून सांगितले. राजसाहेबांनी आत्मीयतेने त्यांच्याकडून सगळी माहिती आणि त्यांच्या भविष्यातील योजना ऐकून घेतल्या आणि मुंबईत आल्यावर भेटायचे आमंत्रण सुद्धा दिले. एवढेच नव्हे, जितके दिवस आम्ही लंडनमध्ये होतो तितके दिवस, भेटणाऱ्या प्रत्येकाला आणि नंतरही मुंबईतून लंडनला जाणाऱ्या प्रत्येक मित्राला तिथे जाऊन वडापाव खाण्याचा आदेशवजा आग्रह ते करत होते. 'महाराष्ट्र धर्म वाढवावा' हा एकमेव उद्देश यामागे असतो,' असं सरदेसाई यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इचलकरंजी: मद्यप्राशन करून वारंवार घरात शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या मुलाचा आईने डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केला. इचलकरंजीजवळ कोरोची येथे सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडली. रविशंकर तेलशिंगे (वय ३४, रा. कोरोची) असे मृताचे नाव आहे, तर त्याची आई लक्ष्मी तेलशिंगे (५४) हिला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. आईनेच मुलाचा निर्घृन खून केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


शहापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोची येथील तेलशिंगे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. ३४ वर्षीय रविशंकर याचे लग्न झाले होते, मात्र त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. मद्यप्राशनाच्या व्यसनातून रविशंकर हा वारंवार घरात आई आणि वडिलांना शिवीगाळ, मारहाण करीत होता. पैशांसाठी आई-वडिलांकडे तगादा लावत होता.

सततच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी यांनी सोमवारी रात्री उशिरा मुलगा रविशंकर याच्या डोक्यात दगडी वरंवटा घातला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने जखमी रविशंकर याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी लक्ष्मी यांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.

मुंबई : करोनाबळींच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणाऱ्या स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनी करोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली आहे. कारण, दररोज येणाऱ्या मृतदेहांची व्यवस्थित पॅकिंग केलेली नसते, त्यामुळे आमच्याही जीवाला धोका आहे, असं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. करोनाबळींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. यानुसार, मृतदेहांपासून संसर्ग होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी रुग्णालयांवर आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मृतदेहापासून करोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मृतदेह हा लीक प्रूफ प्लास्टिक बॅगमध्ये व्यवस्थित गुंडाळलेला असावा. बॉडी बॅगच्या बाह्य आवरणावर एक टक्के हायपोक्लोराईट लावले जाऊ शकते. मृतदेह शवगृहातील किंवा कुटुंबाने दिलेल्या शीटमध्ये ठेवला जाऊ शकतो, असं नियमात म्हटलं आहे.

दरम्यान, केईएम रुग्णालयाकडून या नियमांचं पालन केलं जात नसल्याचा आरोप शिवाजी पार्क इलेक्ट्रीक स्मशनाभूमीतील कर्मचाऱ्यांनी केला. त्यामुळे कर्तव्य निभावताना आम्हालाही करोनाची लागण होण्याची भीती असल्याचं या कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. 'नुकतंच एका रुग्णावाहिकेतून तीन मृतदेह आणण्यात आले. हे मृतदेह व्यवस्थित गुंडाळलेले नव्हते. हे फक्त ठरलेल्या नियमांच्या विरोधातच नाही, तर यामुळे कर्मचाऱ्यांच्याही जीवाला धोका आहे. आम्ही वरिष्ठांना याबाबत कळवलं असून तातडीने यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. पण दुर्दैवाने परिस्थितीत कोणताही बदल नाही', अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली.

मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाने केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी याबाबतची माहिती दिली. पुढच्या चार महिन्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात देशात सरासरीच्या ७५ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातही पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि उर्वरित राज्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात सध्या पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कोकणसह राज्यातील विविध भागात पूर्व मोसमी पाऊस कोसळणार आहे.

मुंबई: लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली रेल्वेसेवा पुन्हा एकदा रुळावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. आजपासून देशभरात २०० विशेष ट्रेन धावणार असून पहिली विशेष ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून उत्तर प्रदेशमधील वाराणसीसाठी रवाना झाली.

विशेष ट्रेनचा पहिला मान सीएसएमटी येथून वाराणसीला जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेस गाडीला मिळाला. सोमवारी मध्यरात्रीनंतर १२ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन रवाना झाली. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या गाइडलाइन्सचे काटेकोरपणे पालन करत ही ट्रेन सोडण्यात आली. थर्मल स्क्रिनिंग, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला. सर्व प्रवाशांना मास्क लावूनच प्रवास करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या सुविधेबद्दल प्रवाशांनी रेल्वेचे आभार मानले.

करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. यालाच अनलॉक-१ असंही नाव देण्यात आलं आहे. अनलॉक-१ मध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यात विशेष ट्रेनची सुविधा महत्त्वाची ठरणार आहे. आजपासून या २०० विशेष ट्रेन धावत आहेत. आज पहिल्याच दिवशी १.४५ लाखांहून अधिक प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणार आहेत. १ मेपासून चालवण्यात येत असलेल्या श्रमिक विशेष गाड्या तसेच १२ मेपासून चालवण्यात येत असलेल्या एसी स्पेशल ट्रेन्सनंतरचे हे मोठे पाऊल आहे. १ ते ३० जून या संपूर्ण महिन्याचं आरक्षण झालं असून सुमारे २६ लाख प्रवाशी प्रवास करतील असा अंदाज आहे. या सर्व नियमित धावणाऱ्या गाड्या असून त्यात एसी, नॉन एसी आणि जनरल कोच असणार आहेत. या गाड्यांसाठी तात्काळ कोटाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
 

आजपासून विशेष रेल्वे धावणार असून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय परिवहन आयुक्तालयाने घेतला आहे. टॅक्सींसाठी ताटकळत राहणे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून टॅक्सी आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई सेंट्रल, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस या स्थानकांवर टॅक्सी उपलब्ध राहणार आहे. टॅक्सींच्या माध्यमातून 'घर ते स्थानक' आणि 'स्थानक ते घर' या टप्प्यांसाठी ही टॅक्सी सेवा असणार आहे. टॅक्सीची शोधाशोध टाळण्यासाठी स्थानकावरच मुंबई टॅक्सी मेन्स संघटनेचे प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. ज्या प्रवाशांना टॅक्सी आरक्षित करायची आहे, अशा प्रवाशांनी कॉल करुन अथवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करुन प्रवास करता येईल. शक्यतो प्रवाशांना स्थानकात पोहचण्यापूर्वी किंवा घरातून निघण्यापूर्वी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून नोंदणी करावी, असे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिक्षा, दुचाकीवरुन प्रवासास बंदी - भारतीय रेल्वेने एक जूनपासून देशभरात विशेष प्रवासी रेल्वे चालवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई विभागात येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांतून आंतरराज्य प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिलेली आहे. यामुळे या गाड्यांतून राज्यांतंर्गत प्रवास करता येणार नाही. खासगी गाड्यांनी प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या ई-तिकिटांवर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, पाच आसनी वाहनात तीन आणि सात आसनी वाहनात पाच प्रवाशांना (वाहन चालकांसह) परवानगी असेल. स्कूटर, मोटार सायकल, रिक्षा यांमधून प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे परिवहन आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. करोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित वावरचे नियम पाळून प्रवास करावा. तसेच प्रवासावेळी मास्कचा वापर अनिवार्य असून टॅक्सीत प्रवेश करण्यापूर्वी सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन परिवहन आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. 'निसर्ग' असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र २४ तासांमध्ये अधिक तीव्र स्वरूपाचे होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुढील २४ तासांमध्ये त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते. या चक्रीवादळाचे बांग्लादेशने सुचविल्यानुसार निसर्ग असे नामकरण करण्यात येईल. निसर्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळून जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे किनारपट्टीजवळील भागामध्ये जोरदार पाऊस अपेक्षित आहे. तसेच, वाऱ्यांचा जोरही अधिक असेल.

आज, सोमवारी दक्षिण कोकण आणि गोव्यामध्ये अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. २ आणि ३ जून रोजी कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ३ आणि ४ जून रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज आहे. मात्र काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांपैकी एक असलेल्या साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते.

वाजिद खान व्हेंटिलेटरवर होते. रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. आठवडाभरापूर्वीच त्यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या आजारांच्या गुंतागुंतीतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूड एका उमद्या संगीतकाराला मुकलं आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिद या जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.

करोनाची लागण झाली असली तरी वाजिद यांचं निधन किडनी निकामी होऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वाजिद यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. प्रियांका चोप्रा, सोनू निगम, शंकर महादेवन, वरूण धवन, सलीम मर्चंट यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलावंतांनी ट्विटरच्या माध्यमातून वाजिद खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. साजिद-वाजिद जोडी आणि सलमान खान यांचं 'हिट कॉम्बिनेशन' होतं. सलमानच्या अनेक चित्रपटांना या जोडीने संगीत दिलं. अलीकडेच सलमानच्या भाई-भाई आणि प्यार करोना या चित्रपटांसाठी या जोडीने संगीत दिलं आहे.

मुंबई: 'आपल्या महान देशाला फक्त सहा-सात वर्षांचाच इतिहास आहे. त्याआधी हा देश नव्हता. स्वातंत्र्य लढा नव्हता. त्यातील संघर्ष आणि बलिदाने हा फक्त आभास होता. देशातील सामाजिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, औद्योगिक क्रांती वगैरे सगळे झूट आहे. साठ वर्षांत काहीच घडले नाही असं एकंदरीत दिसतं,' अशी बोचरी टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. 

पंतप्रधान मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निमित्तानं भाजपच्या नेत्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांवर व सोशल माध्यमांवर सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. मोदींनी ऐतिहासिक चुका दुरुस्त केल्या, करोनाच्या संकटकाळात मोदी पंतप्रधान आहेत हे भाग्य आहे,' अशी स्तुतीसुमनं भाजपच्या प्रमुख नेत्यांनी उधळली आहेत. 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारच्या एकूण कामकाजावर भाष्य करतानाच भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

'नरेंद्र मोदी हे आजचे सक्षम नेते आहेत, पण साठ वर्षांत चुका झाल्या तशा मागच्या सहा वर्षांतही झाल्या. मोदी सरकार साधारण सहा वर्ष सत्तेवर आहे. पूर्ण बहुमत असल्याने त्यांचे सरकार पांगुळगाड्याच्या आधारे चाललेले नाही, पण देशाचा अनेक बाबतीत पांगुळगाडा झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत चुकीच्या पद्धतीने केलेले लॉकडाऊन व त्यानंतर स्थलांतरित मजुरांची ससेहोलपट ही फाळणीतील निर्वासितांचीच आठवण करून देणारी आहे. ही चूक कशी दुरुस्त करणार? नोटबंदी आणि लॉकडाऊन काळात जे नाहक मेले ते कोणत्या अमृताने जिवंत करणार?,' असा खडा सवाल शिवसेनेनं भाजपला केला आहे.

'महाराष्ट्रातला सह्याद्री पर्वत, हिमालय, कांचनजुंगा, गंगा-यमुना, कृष्णा-गोदावरी हे सर्व सहा वर्षांतच निर्माण झाले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग ही माणसे अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या हातून जे कार्य घडले ते सर्व बोलबच्चनगिरीचे नमुने आहेत, असं मानायचं का,' असाही प्रश्न शिवसेनेनं केला आहे.

पुणे: 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहताना बहिणीला त्रास देत असल्याच्या रागातून २४ वर्षीय तरुणाचा दगडांनी ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथे रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अक्षय गागोदेकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. इंद्रजीत गायकवाड याच्या बहिणीसोबत तो धानोरी येथे 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होता. अक्षय आपल्या बहिणीला त्रास देत असल्याची तक्रार इंद्रजीतच्या कानावर आली होती. तो राग मनातून धरून इंद्रजीतनं काही साथीदारांसह रविवारी रात्री अक्षयवर हल्ला चढवला. त्याला दगडांनी मारहाण केली. या हल्ल्यात अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अक्षयला वाचवण्यासाठी आलेला त्याचा मित्रही हल्ल्यात जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या युनिट आठने तात्काळ शोधमोहीम सुरू केली आणि काही तासांतच सर्व आरोपींना खडकी येथील होळकर पुलाजवळच्या ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरातून अटक केली. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या मदतीनं पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, हवालदार मचे, खुनवे, शेलार यांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये इंद्रजीत गुलाब गायकवाड (वय २३, रा. गोकुळ नगर, धानोरी), निलेश विश्वनाथ शिगवन (वय २४, धानोरी), विजय कालुराम फंड (वय २५ रा. खडकी), सागर राजू गायकवाड ( वय १७, रा. खडकी) आणि कुणाल बाळू चव्हाण (वय २२, रा. बोपखेल, विश्रांतवाडी) यांचा समावेश आहे. चौकशीसाठी या सर्वांना विश्रांतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मुंबई: करोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासनाच्या विनंतीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपला ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. 'मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे,' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

येत्या ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची सहावी पुण्यतिथी आहे. मुंडे यांचे कार्यकर्ते व समर्थक हा दिवस 'संघर्ष दिन' म्हणून साजरा करतात. त्या निमित्त दरवर्षी गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर कुठलाही मोठा सोहळा होणार नाही. त्याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटासा कार्यक्रम होणार आहे, असं पंकजा यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, आता पंकजा स्वत: देखील गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत.

'पंकजा मुंडे परळीत आल्यास स्थानिक व इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल. नियमांचा भंग होईल आणि कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली होती. प्रशासनाची ही अडचण लक्षात घेऊन पंकजांनी परळी दौरा रद्द केला आहे.

बालाघाट, मध्य प्रदेश : मध्यप्रदेशातील बालाघाट इथं शुक्रवारी एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. बेरोजगारीला कंटाळून एका पित्यानं आपल्या चिमुकल्या मुलाला हात बांधून वाहत्या नदीत फेकून दिलं. हा पिता आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी आपल्या चिमुकल्यासहीत घराबाहेर पडला होता.

आरोपीचं नाव सुनील जयस्वाल असल्याचं समजतंय. सुनीलची मोठी मुलगी निशा हिचा शनिवारी वाढदिवस होता. त्याचनिमित्तानं सुनील आपल्या ८ वर्षांच्या मुलाला - प्रतिकला घेऊन घराबाहेर पडला.

सुनीलनं मुलाला घेऊन बाजाराचा एक फेरफटका मारला. घरी परतताना मात्र त्यानं आपल्या मुलाचे दोन्ही हात बेल्टनं बांधले आणि त्याला वैनगंगा नदीच्या पाण्यात बुडवून ठार केलं.

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेलं लॉकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी किती घातक ठरत आहे, याचं उदाहरण समोर आलं आहे. ग्राहक वस्तू कंपन्यांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात ६ लाखांपेक्षा जास्त छोटी दुकाने बंद झाली असावीत. या दुकानांना रोकड तरलतेचा अभाव, दुकाने परत सुरू न होण्याची भीती किंवा दुकान मालक गावी जाणे अशी कारणे आहेत. हीच परिस्थिती मोबाइल क्षेत्रातही दिसत आहे. अखिल भारतीय मोबाइल विक्री संघटनेच्या मते, बिगर जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीला परवानगी दिल्यानंतरही मोबाइल विक्री करणारी दीड लाख दुकाने उघडलेली नाहीत. हा आकडा एकूण दुकानांच्या ६० टक्के आहे.

या क्षेत्रातील जाणकारांच्या मते, दुकानदारांच्या आणखीही काही अडचणी आहेत. वितरक आता रोकडमध्ये व्यवहार करत असून पूर्वीप्रमाणे ७-२१ दिवसांच्या क्रेडिटची सुविधा बंदी केली आहे. यामुळे बाजारपेठ पुन्हा रुळावर येण्यासाठी आणखी विलंब होऊ शकतो, अशी भीती जाणकार व्यक्त करतात. पार्ले प्रोडक्टच्या मते, घर, रस्ते किंवा चौकांमध्ये पान, चहा विकणारी ५८ लाख छोटी किराणा दुकाने एप्रिल आणि मे महिन्यात बंद पडली आहेत. यामुळे वितरकांना मोठं नुकसान झाल्याचं पार्लेने म्हटलं आहे.

लॉकडाउनमुळे जवळपास दोन महिने केशकर्तनालय बंद राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी केस आणि दाढीसाठी दुप्पट, तर इतर सेवांसाठी ५० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय सलून-ब्युटीपार्लर असोसिएशनतर्फे घेण्यात आला आहे. ही दरवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली असून या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

करोनाचे संकट ओढवल्यानंतर रोजंदारीवर अवलंबून असलेल्या सलून कामगारांच्या उत्पन्नाचाही प्रश्न निर्माण झाला. केवळ कारागीरच नव्हे, तर सलून मालकांना देखील लॉकडाउनचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी स्वच्छतेचे निर्बंध घालून आठवड्यात एका दिवसाआड केशकर्तनालय (सलून) सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यात लॉकडाउन उठताच शासनाकडून सुरक्षेसंबंधित जाहीर होणाऱ्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांनुसार हातमोजे, मास्क तसेच निर्जंतुकीकरण आदी खर्च वाढणार आहेत. तसेच सुरक्षित वावर राखताना कदाचित खुर्च्यांची संख्या कमी करावी लागणार आहे. अनेक परप्रांतीय कारागीर मूळ गावी परतल्याने स्थानिक कुशल कारागिरांना आकर्षित करण्यासाठी वेतनवाढ करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे संभाव्य वाढता खर्च तसेच लॉकडाउनच्या काळातील नुकसान लक्षात घेता नाईलाजास्तव हा निर्णय घेणे भाग पडल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे.

वाढीव दर घेण्यास परवानगी
नव्या दरवाढीनुसार, साध्या केशकर्तनासाठी २०० रुपये, तर दाढीसाठी १०० रुपये आकारण्यात येतील. फेशिअल, मसाज आदी इतर सेवांसाठी ५० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अतिखर्चिक डेकोरेशन केलेल्या आणि भाडेतत्त्वावरील दुकानात त्या-त्या परिसरानुसार वाढीव दर घेण्यास सलून चालक आणि मालक यांना संपूर्ण परवानगी आहे.

करोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशीसंबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, मानसेवी कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा करोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, करोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये रुग्णांचे सर्व्हेक्षण, शोध, प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचणी, उपचार, मदतकार्य अशा अनेक जबाबादाऱ्या पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ जोखीम पत्करून कर्तव्य बजावत आहे. या कर्मचाऱ्यांची सुरक्षा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या भवितव्याबाबत राज्य सरकार गंभीर असून, त्यादृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय जारी करण्यात आला आहे. आरोग्य सेवेच्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारच्या केंद्रीय योजनेचा लाभ आधीपासून मिळत आला आहे.

शासन निर्णयानुसार, करोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरीपुरवठा, पाणीपुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, मानसेवी असे सर्वं कर्मचारी) अशा सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणार असली, तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे ५० लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधितांना देण्यात येणार आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
 

'करोनाची आकडेवारी पाहून हे संकट आटोक्यात आले आहे, असे वाटत असले तरीही येत्या १५ दिवसांमध्ये आणखी काळजी घेण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. त्याचबरोबर एक जूनपासून लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढवावा लागणार असल्याचे सूचित करतानाच त्यांनी त्यामध्ये काही सवलती देण्याचा विचार करता येईल, असेही सांगितले. त्याचबरोबर श्रमिकांचे स्थलांतर करण्यामध्ये राज्य सरकारची बरीच शक्ती वाया गेल्याचे सांगून, त्यांनी याबाबतच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

करोनाचे संकट सुरू झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांनी प्रसिद्धी माध्यमांतील निवडक संपादकांशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल उपस्थित होते. सुरुवातीला मेहता व चहल यांनी राज्यातील आणि मुंबईतील सध्याचे रुग्ण, उपलब्ध असलेल्या सुविधा, नव्याने तयार होत असलेल्या सुविधा यांची माहिती दिली. त्याचबरोबर महात्मा फुले योजनेचा लाभ आता राज्यातील बहुतेक सर्वांना मिळणार असल्याने सर्वांना उपचार मिळतील, असेही सांगितले. चहल यांनी याबाबतच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्याची गरज असल्याचे सांगितले. दररोज करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा बघून छाती दडपून जात असली तरीही त्यामध्ये बरे झालेल्या, कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे घरी राहून उपचार घेणाऱ्या रुग्णांचाही समावेश असतो. त्यामुळे प्रत्यक्षात उपचारांची गरज असलेल्या रुग्णांचा आकडा हा कमी असतानाही त्यामुळे चुकीचे मत तयार होते, असे चहल यांनी सांगितले.

मुंबई: जीवाची पर्वा न करता करोनाविरोधातील लढ्यात उतरलेल्या योद्ध्याला अर्थात पोलीस दलाला करोना विषाणूच्या साखळीचा विळखा घट्ट बसला आहे. गेल्या २४ तासांत ११४ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. तर एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे.

राज्यात करोनाचा कहर सुरूच आहे. करोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २ हजार ०९८ झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. करोनाशी लढा देताना राज्याच्या पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. मुंबई पोलीस दलात सर्वाधिक कर्मचारी करोनाबाधित आहेत. लॉकडाउन लागू झाल्यापासून राज्यातील पोलीस दलावर प्रचंड ताण आहे. पोलिसांवर सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या जबाबदारीसह करोनाला रोखण्याचं आव्हान असताना विषाणूचा घट्ट विळखा बसला आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील ११४ पोलीस कर्मचारी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर एका पोलीस कर्मचाऱ्याचा या करोना विषाणूनं बळी घेतला आहे. राज्यातील एकूण करोनाबाधित पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांची संख्या आता २,३२५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा काल, शुक्रवारी करोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील मृत्यूची संख्या १६ झाली आहे. करोनामुक्त झालेल्या पोलिसांची एकूण संख्या ९७० एवढी आहे.

दरम्यान, राज्यात फक्त पोलिसांसाठी विशेष रुग्णालय उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. करोनाविरोधात लढा देणाऱ्या राज्यातील पोलिसांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्देश दिले आहेत. पोलिसांसाठी विशेष रुग्णालय असावे ही सूचना योग्य वाटते. त्यादृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि उद्धव सरकार और सहयोगी दलों में भारी असंतोष है, पहले शिवसेना उसको सही करने की कोशिश करे. शिवसेना के बयान पर फडणवीस की प्रतिक्रियाफडणवीस बोले- जिन दिन चाहेंगे नंबर बढ़ा लेंगे
महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि भारतीय जनता पार्टी (बीजेपी) गीदड़ भभकियों से डरने वाली नहीं है. आजतक से खास बातचीत में देवेंद्र फडणवीस ने कहा कि उद्धव सरकार और सहयोगी दलों में भारी असंतोष है, पहले शिवसेना उसको सही करने की कोशिश करे. हमारा नंबर जिस दिन बढ़ाने का तय करेंगे, उस दिन बढ़ जाएगा.

दरअसल, शिवसेना ने अपने मुखपत्र सामना में लिखा था कि विपक्ष के 105 विधायक हैं और हमारे पास 170. अगर हमारे पास 200 हो जाएं तो विरोधी, सरकार को दोषी न मानें. इस बयान पर प्रतिक्रिया देते हुए पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि बीजेपी से कोई विधायक टूटने वाला नहीं है. एमएलसी चुनाव में सरकार को डर था कि उनके वोट टूटेंगे. पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि शिवसेना यह सब बातें करके एजेंडा बदलना चाहती है. वे चाहते हैं कि कोरोना की चर्चा कम से कम हो. महाराष्ट्र सरकार की नाकामी के सामने आने के डर से रोज नया शिगूफा छोड़ देते हैं, ताकि कोई यह न पूछे कि महाराष्ट्र में कोरोना से लोग कैसे मर गए. महाराष्ट्र सरकार के सहयोगी दलों में रार का जिक्र करते हुए पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि सरकार में खटपट है. पृथ्वीराज चव्हाण या कांग्रेस के नेताओं का बयान देख लीजिए. एनसीपी के कुछ नेताओं का बयान देख लीजिए. शिवसेना के अंदर बहुत असंतोष है. संजय राउत पहले मंत्री और विधायक से बात करके देखें. पूर्व सीएम देवेंद्र फडणवीस ने कहा कि बीजेपी देश में राज करने वाली पार्टी है. अनेक राज्यों में हमारी सरकार है. यहां पर विपक्ष में होकर भी इन तीनों पार्टियों से दोगुनी सीटें हमारे पास हैं. शिवसेना को अपनी चिंता करनी चाहिए. हमारी चिंता करने की जरूरत नहीं है.

:पुणे शहरात गेल्या २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखींची संख्या वाढताना दिसत असली तरी बुधवारी शहर जिल्ह्यातील करोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. शहर जिल्ह्यात करोनाचे १६३ नवे रुग्ण आढळले असून समाधानाची दुसरी बाब म्हणजे १८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, १७१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून मृतांच्या संख्येने तीनशेचा आकडा गाठला आहे.
राज्यात पुणे व मुंबई या शहरांसह अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढला असला तरी महिन्यापूर्वी रुग्ण दुप्पटीचा होणारा वेग आता चक्क १४.७ दिवसांवर येऊन ठेपला असल्याची समाधानाची बाब आरोग्य खात्याच्या अभ्यासातून समोर आली आहे. त्याशिवाय राज्यात आजमिताला ५६ हजार ९४८ जणांना लागण झाली असली तरी त्यांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ३१.५ टक्क्यांवर असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

रोहित पवार यांनी दिला रुग्णांना धीर
कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससून हॉस्पिटलला आज भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांना अतिदक्षता विभागात जाण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आवर्जुन तिथे जाऊन जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची व करोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. 'काळजी घ्या' असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या अडचणी व तेथील परिस्थितीही त्यांनी जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे. करोना वॉरियर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पीपीई किट, गॉगल व एन-९५ मास्क रोहित पवार यांचेकडे देण्यात आले होते. हे सर्व साहित्य ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील वरिष्ठ मंत्री करोनाबाधित असल्याचं निदान झालं असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी ठाण्यातील काँग्रेस नेत्यानं मुंबईतील सिद्धिविनायकाला साकडं घातलं. यासाठी हा नेता ३३ किलोमीटर पायी चालला. हे अंतर कापण्यासाठी त्याला साडेपाच तास चालावं लागलं.
करोनानं मुंबईत थैमान घातलं आहे. करोनाविरोधात लढा देणारी आरोग्य यंत्रणा, पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनाही विळखा घातला आहे. राज्यातील काही नेत्यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. राज्यातील एका राजकीय पक्षाचा नेता करोनातून बरा झाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ मंत्र्यालाही करोनाची बाधा झाली आहे. या मंत्र्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांचे समर्थक प्रार्थना करत आहेत. ठाणे शहरातील काँग्रेसचे प्रवक्ते मेहेर चौपाने यांनी आपल्या नेत्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी बाप्पाकडे साकडं घातलं आहे. बुधवारी ते आपल्या घरातून पायी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी निघाले. त्यांनी ३३ किलोमीटर अंतर साडेपाच तासांत कापलं. मात्र, मंदिर दर्शनासाठी बंद असल्यानं मेहेर यांनी बाहेरूनच बाप्पाची पूजा केली आणि आपल्या नेत्याची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना केली. दरम्यान, करोनाबाधित नेत्यावर सध्या मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री करोनाबाधित असल्याचं निदान झालं होतं. गेल्या रविवारी करोनाची लक्षणं दिसून आल्यानं ते स्वतःच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. ते चाचणी अहवालात करोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, आता या नेत्याची प्रकृती ठणठणीत आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाही करोनाचा संसर्ग झाला होता. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उपचार सुरू होते. आता ते करोनामुक्त झाले असून, आपल्या घरी परतले आहेत.

हिंगोली: विलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गावात परतलेल्या वडार समाजातील एका कुटुंबाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्यामध्ये गावच्या उपसरपंचाचाही समावेश होता. धक्कादायक म्हणजे, नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलादेखील मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हट्टा येथील सुरेश जाधव यांचे कुटुंब करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याचे समोर आल्यानंतर या कुटुंबास १४ दिवसांकरिता विलग करण्यात आले होते. त्यामुळे हे कुटुंब आपल्या शेतामध्ये राहात होते. १४ दिवसांचा काळ पूर्ण झाल्यामुळे बुधवारी, २७ मे रोजी कुटुंबातील काही सदस्य गावात आले. 'तुम्हाला करोना झाला आहे. तुम्ही गावात का फिरता' या कारणावरून गावातील सोमनाथ शेळके, गोविंद शेळके, चंद्रकांत शेळके, नितीन गौतम, राहुल, भीमा, राहुल, ससाने व सिद्धांत शेळके यांनी सुरेश जाधव त्याची पत्नी बेबी जाधव, रावसाहेब जाधव व त्याची पत्नी पूजा जाधव यांना शेतात जाऊन काठीने व रॉडने मारहाण केली. नऊ महिन्यांची गरोदर असणाऱ्या बेबी जाधव (वय २८) या महिलेला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला.

या प्रकरणी बेबी जाधव यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, याच प्रकरणी सदर कुटुंबाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई: स्थलांतरितांसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. 'करोनाच्या संकटकाळात महाराष्ट्राची फजिती कशी करता येईल यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे,' असं देशमुख यांनी म्हटलं आहे. याचा पुरावा म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांचे पत्रच देशमुख यांनी सादर केलं आहे

महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकार पुरेशा गाड्या उपलब्ध करून देत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. केंद्रानं हा आरोप फेटाळला आहे. कालच रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी एक ट्विट करून राज्य सरकार मजुरांची व्यवस्था करण्यात कमी पडत असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र सरकारला मंगळवारी आम्ही ८५ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. पण त्यांना प्रवाशांची सोय न करता आल्यानं फक्त २७ गाड्या चालवता आल्या, असं गोयल यांनी म्हटलं होतं.

गोयल यांच्या या आरोपाला देशमुख यांनी आज पुराव्यासह उत्तर दिलं. 'पीयूष गोयल यांनी केलेलं विधान दिशाभूल करणारं आहे. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी २२ तारखेला केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. २६ मे पर्यंत कुठल्याही रेल्वे गाड्या आमच्या राज्यात पाठवू नये, अशी विनंती त्यांनी केली होती. अम्फान वादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली होती. असं असतानाही रेल्वे प्रशासनानं महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला सोडण्यासाठी ३४ गाड्या पाठवल्या. पण त्या गाड्या सोडणं शक्य नव्हतं. हे माहीत असतानाही पीयूष गोयल आता महाराष्ट्र सरकार कसं कमी पडतंय असं बाहेर सांगत आहेत. महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव यामागे आहे. संकटाच्या परिस्थितीत गोयल यांनी अशा प्रकारचा खोटारडेपणा आणि असलं राजकारण करू नये,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा बुधवारी करोनाने मृत्यू झाला आहे. दादर पोलिस ठाण्यात नेमणुकीला असलेले हेड कॉन्स्टेबल शरद मोहिते (५५) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. दरम्यान, राज्यात करोनाने मृत पावलेल्या पोलिसांची संख्या आता २१ वर पोहोचली असून आतापर्यंत १९६४ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे.

महाराष्ट्रात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन सुरू आहे. राज्या सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या स्थितीत पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण आहे. लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन व्हावे व

कायदा-सुव्यवस्था राखली जावी म्हणून पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. आपले आरोग्य धोक्यात टाकून पोलीस रस्त्यांवर २४ तास पहारा देत आहेत. त्यामुळेच पोलीसदलात करोनाचा धोका वाढत चालला आहे.

राज्यात मुंबईमध्ये करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोलीसही करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. मुंबईत शरद मोहिते यांच्या रूपाने आणखी एका पोलिसाला करोनामुळे प्राणास मुकावे लागले असून आतापर्यंत मुंबईत करोनाने १३ पोलिसांचा मृत्यू झाला आहे तर राज्यात हाच आकडा २१ वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यातील तब्बल १९६४ पोलीस आतापर्यंत करोनाच्या विळख्यात सापडले असून सततच्या ड्युटीमुळे पोलिसांवरील ताण वाढत चालला आहे.

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केलेल्या मागणीवर भाजपने हातवर केले आहेत. राणेंनी राष्ट्रपती राजवटीची केलेली मागणी ही भाजपची अधिकृत भूमिका किंवा मागणी नाही, असं भाजपनं आज स्पष्ट केलं. त्यामुळे राणेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजपची अधिकृत भूमिका मांडत राणेंना झटका दिला आहे. राणेंची राष्ट्रपती राजवटीची मागणी ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही. तशी मागणी भाजपने केलेली नाही. ती राणेंची वैयक्तिक मागणी आहे, असं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपने दुसऱ्यांदा राणेंच्या भूमिकेवरून हातवर केल्याने राणे भाजपमध्ये एकटे पडल्याचंही बोललं जात आहे.

दरम्यान, काल नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली होती. ठाकरे सरकार करोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून या सरकारला नारळ देऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी राणेंनी केली होती. मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. करोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावर मुनगंटीवार यांनी हा खुलासा केला आहे.

मुंबई: करोनाच्या महासाथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लिहिलं आहे. 'विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व भवितव्याच्या या प्रश्नात कुठल्याही राजकारणाला थारा देऊ नये,' अशी विनंतीही राज यांनी केली आहे. 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षावरून सध्या राज्यपाल व राज्य सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा विचार विद्यापीठ अनुदान आयोगानं करावा, असं मत राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आहे. तर, राज्यपाल परीक्षा घेण्याबाबत आग्रही आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यांनीही परीक्षा रद्द केल्या जाव्यात अशीच मागणी केली आहे.

'करोनामुळं उद्भवलेल्या परिस्थितीमुळं संपूर्ण देश गेले दोन महिने टाळेबंदीत आहे. मुंबई आणि पुण्याची परिस्थिती पाहता टाळेबंदी किती दिवस राहील हे कोणीच सांगू शकत नाही. टाळेबंदी शिथिल झाली तरी करोना संपला असं होणार नाही. अशा परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कोणासाठी,' असा थेट सवाल राज यांनी आपल्या पत्रातून राज्यपालांना केला आहे.

मुंबई: 'राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी हे माझं वैयक्तिक मत आहे. ते राज्यपालांपुढं मांडलं. ते मांडताना मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,' असा टोला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना हाणला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,' अशी भूमिका मुनगंटीवारांनी मांडली होती. त्याबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणेंनी आपले मत मांडले. 'राष्ट्रपती राजवटीबद्दल पक्षाचं मत काय आहे ते प्रदेशाध्यक्ष मांडतील. मी माझं मत मांडलं. राज्यात करोना रुग्णांची संख्या दररोज अडीच ते तीन हजारांनी वाढतेय. मुंबईत आतापर्यंत हजारच्या वर मृत्यू झालेत. लोकांचे जीव वाचवण्यात हे सरकार अपयशी ठरतंय हे मी राज्यपालांच्या निदर्शनास आणलं आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. परिस्थिती पाहूनच मी ही मागणी केलीय. मुनगंटीवारांनी मृतांचे आकडे पाहावेत आणि मग बोलावं,' असं राणे म्हणाले.

'राज्यपालांकडं जाताना मी त्याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्षांना व फडणवीसांना दिली होती. मुनगंटीवारांना विचारलं नाही. कुणीही मला काही सांगितलं नाही. भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर नेते असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,' असं राणे म्हणाले.

 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल संध्याकाळी तातडीची व महत्त्वाची बैठक झाल्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सकाळी अचानक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. मात्र, पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडामोडी घडत असल्याची चर्चा तेव्हापासूनच सुरू झाली. त्यातच माजी मुख्यमंत्री व सध्या भाजपचे खासदार असलेले नारायण राणे यांनी संध्याकाळी राज्यपालांची भेट घेऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं.

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी बैठक झाली. महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊतही या बैठकीला उपस्थित होते, अशी सूत्रांची माहिती आहे. तब्बल दीड तास ही चर्चा चालली. या बैठकीत करोनाच्या परिस्थितीबरोबरच केंद्र सरकारच्या संभाव्य भूमिकेवर चर्चा झाल्याचं कळतं. अर्थात, संजय राऊत यांनी आज ट्विट करून सरकारला कुठलाही धोका नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'सरकारच्या स्थिरतेबाबत कुणी बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

औरंगाबाद: गेल्या ९ तासांत औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद शहरातील चार आणि सिल्लोडमधील एकाचा समावेश आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त झाल्याने आज ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर हिंगोलीत मुंबई, पुणे आणि रायगड येथून आलेल्या ८ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हिंगोलीतील करोना रुग्णांची संख्या १६९ झाली आहे.

औरंगाबाद येथे आज करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, बारी कॉलनी, रेहमानिया कॉलनी, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील रुग्णांचा समावेश आहे. कटकट गेट येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा २४ मे रोजी आणि गारखेडा येथील ४८वर्षीय रुग्णाचा २४ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आज मध्यरात्री एक वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथील ३५ वर्षीय महिलेचा, कैलास नगरातील ७५ वर्षीय महिलेचा पहाटे सव्वा तीन वाजता आणि सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिला रुग्णाचा पहाटे साडे सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. घाटीत आतापर्यंत ५०

करोनाचा संसर्ग रोखण्यात राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला अपयश आले, याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या वतीने घरच्या आंगणात उभे राहून सरकारविरोधात फलक दाखविले. भाजपच्या या आंदोलनातील एक फोटो सोशल मीडियावर व्हयरल झाला असून, यामध्ये काळ्या रंगाच्या कपड्याने तोंड झाकलेली एक महिला मुस्लिम महिलांप्रमाणे बुरख्यामध्ये दिसत आहे. परंतु, महिलेने कपाळावर टिकली लावली असल्याने भाजपमध्येही या फोटोबद्दल कुजबुज सुरू आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा फोटो शेयर केला गेला आहे. परंतु, तो मुस्लिम युवतीचा आहे, असे कुठेही म्हटलेले नाही, अशी सारवासारव याबाबत भाजपकडून केली जात आहे. राज्यातील सरकार हे करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यात अपयशी ठरलेले आहे, दोन महिने सर्व उद्योगधंदे बंद आहेत, त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर करावे, या मागणीसाठी प्रदेश भाजपने 'मेरा आंगण,मेरा रणांगण',असे आंदोलन केले.यात अडीच लाख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्याचा दावा भाजपने केला. या आंदोलनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर झळकले. सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाईच यातून सुरू झाली.
 

मुंबई: 'उत्तर प्रदेशातील मजूर व कामगारांना ह्यापुढं महाराष्ट्रात येताना महाराष्ट्र सरकारची व पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. अन्यथा त्यांना येता येणार नाही,' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेश सरकारला दिला आहे. 

उत्तर प्रदेशचे कामगार हवे असतील तर ह्यापुढं आमची परवानगी घ्यावी लागेल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. योगींच्या या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी लगेचच मनसेची भूमिका मांडली आहे. 'योगी आदित्यनाथांची हीच भूमिका असेल तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की ह्यापुढं महाराष्ट्रात येताना आमची, महाराष्ट्राची आणि आमच्या पोलिसांची परवानगी घेतल्याशिवाय येता येणार नाही,' असं राज यांनी म्हटलं आहे.

मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना विरुद्ध राज्यपाल व भाजपमध्ये रंगलेल्या वादाचा पुढचा अंक आता सुरू झाला आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या मुद्द्यावरून आता राज्यपाल व शिवसेना आमनेसामने आले आहेत. 'परीक्षांच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका गोवा, गुजरातमध्ये एक आणि महाराष्ट्रात वेगळी का?,' असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊ नयेत व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार ग्रेड प्रदान करणे शक्य आहे काय? असं मत राज्याचे उच्च व शिक्षणमंत्री

उदय सामंत यांनी व्यक्त केलं होतं. तसं पत्र त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगास पत्र पाठवलं होतं. त्यामुळं राज्यपाल नाराज झाले आहेत. शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखातून या वादावर भाष्य केलंय. 'उदय सामंत यांनी केवळ मत व्यक्त केलं आहे. निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे. त्याचबरोबर गोवा, गुजरातमध्ये याच मुद्द्यावर भाजपनं घेतलेली भूमिका आणि महाराष्ट्रात घेतलेली भूमिका यातील फरकही शिवसेनेनं दाखवून दिला आहे.

मुंबई: रेल्वेगाड्यांच्या मागणीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, या वादात आता राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आहे. एकीकडे राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं हे योग्य नाही, असा आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल, रविवारी राज्यातील नागरिकांशी फेसबुक व्हिडिओद्वारे संवाद साधला. त्यावेळी स्थलांतरित मजुरांसाठी रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी केली असली तरी, प्रत्यक्षात रेल्वेकडून ४० ट्रेन सोडल्या जात आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर मजुरांची यादी आम्हाला द्या, असं उत्तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलं होतं. त्याचवेळी आर्थिक मदतीच्या पॅकेजवरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला होता. आता यात फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

मुंबई: करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईतील धारावी आणि माहीम परिसरातून स्थलांतरीत मजूर आपापल्या गावी मोठ्या संख्येने जात आहेत. या ठिकाणी बहुतांश मजूर हे उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि ओडिशा, तसंच नेपाळचे देखील आहेत. जगलो- वाचलो तर, पुन्हा मुंबईला कधीच परतणार नाही, असं हे मजूर बोलू लागले आहेत.

मुकुंद नगर परिसरात सरासरी ४० ते ४० करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळं येथील लोकांमध्ये भीती आहे. त्यामुळे आता येथील स्थलांतरित मजूर आपल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात आहेत, असं येथील रहिवासी अफरोजनं सांगितलं. चमडा नगरमधील राजेंद्र मोची हा चपला तयार करतो. पैसा आणि हाताला काम नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असं तो सांगतोय. जवाहरनगरातील दिलखुश अन्सारी हा शिवणकाम करतो. त्याला कुटुंबीयांना घेऊन मूळगावी जायचं आहे. तो सायन-धारावी लिंक रोडवरील रांगेत उभा होता. दीपक यादव माहीमच्या मोरी रोड परिसरात राहतो. जगलो वाचलो तर परत कधीच मुंबईला येणार नाही, असं तो सांगतो. पैसे आणि रेशनही मिळत नाही, असंही तो म्हणाला. ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारा गुल मोहम्मद अली शिवणकाम करतो. त्याचं दुकान बंद आहे. तो आपल्या पत्नीसोबत पटनामार्गे किशनगंज जाणार आहे.

काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री व माजी मुख्यमंत्री यांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नांदेड येथून मुंबईला विमानाने हलविण्यासाठी मागितलेली परवानगी प्रशासनाने दिली नाही. प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील संबंधित मंत्र्यांना तात्काळ विमानाने मुंबईला घेऊन येण्यासाठी सांगितलेले असतानाही झारीतील शुक्राचार्यांनी आपल्या लालफितीचा तडाखा काय असतो ते दाखवून दिल्याने या प्रकरणाबाबत राजकीय क्षेत्रात उलट सुलट चर्चांना उत आला आहे.

राज्याचे एक माजी मुख्यमंत्री व सध्या राज्यमंत्री मंडळातील एक महत्त्वाचे खाते असणारे काँग्रेसचे नेते हे दोन दिवसांपूर्वीच नांदेड येथे गेले होते. त्यांनी मुंबईत दोनदा स्वतःच्या करोनाच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. त्या निगेटीव्ह आल्या होत्या. मात्र नांदेडला गेल्यावर त्यांनी पुन्हा एकदा चाचणी करून घेतली ती पॉझिटिव्ह आली. खरेतर त्यांना करोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नव्हती. मात्र अनेकदा लोकांमध्ये वावरावे लागते त्यामुळे त्यांनी काळजी म्हणून या चाचण्या करून घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे आणखी काही वैद्यकीय गुंतागुंत वाढायला नको म्हणून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवले. उद्धव यांनीही त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे सांगून मी लगेचच विमानाद्वारे तुम्हाला मुंबईला आणण्यासाठी योग्य ते निर्देश देतो, असे त्यांनी सांगितल्याचे समजते. मात्र करोनाच्या रुग्णाला विमानाद्वारे हलवता येणार नाही, असा नियम राज्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दाखवत याबाबत काहीही करण्यास असमर्थता दर्शविल्याचे समजते. यानंतर संबंधित मंत्रीमहोदय हे अॅम्ब्युलन्सने नांदेड ते मुंबई हा ५७३ किलोमीटरचा प्रवास रस्त्याने करत निघाले.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमागचं कारण काय याची चर्चा लगेचच राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं सांगत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून 'राजभवन' कधी नव्हे इतके चर्चेत आले आहे. विधान परिषदेच्या नुकत्याच बिनविरोध झालेल्या निवडणुकीच्या निमित्तानं राज्यपाल कोश्यारी यांच्या भूमिकांवर अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. कोश्यारी हे भाजपच्या कलानं वागत असून सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोपही झाला होता. भाजपच्या नेत्यांच्या राज्यपालांसोबत होणाऱ्या सततच्या गाठीभेटींमुळं यात भर पडली होती.

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानं ही चर्चा थांबल्याचं वाटत असतानाच आत सत्ताधारी नेते राज्यपालांच्या गाठीभेटी घेऊ लागले आहेत. अलीकडंच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांवर कडवट टीका करणाऱ्या राऊत यांनी कोश्यारींची भेट घेतल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. ती चर्चा संपते न संपते तोच आज पवारांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं होतं.

राष्ट्रवादीनं मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं आहे. 'राज्यपालांनी पवार साहेबांना चहासाठी बोलावलं होतं. त्यांच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यामुळं त्यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही,' असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी भेटीनंतर सांगितलं.

दरम्यान, भाजपचे राज्यसभेतील खासदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील राज्यपालांची भेट घेणार असल्याचं कळतं.

मुंबई: सोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्हायरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.


सोशल मीडियावरून महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ आणि पोस्ट व्हायरल होत आहेत. त्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून अशा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सायबर क्राइमच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवरून महिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणारे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. अफवा पसरविल्या जात असून धार्मित तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टही टाकण्यात येत असून हा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
टिकटॉकवर अॅसिड अटॅक आणि बलात्काराला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ व्हायरल केले गेले. त्याचीही गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्यात आल्याचं देशमुख यांनी सांगितलं. सायबर गुन्ह्यांप्रकरणी आतापर्यंत ४१० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून २१३ जणांना अटक करण्यात आली आहे, असं सांगतानाच सोशल मीडियावर महिलांवरील अत्याचाराला प्रोत्साहन देणारे, धार्मिक तेढ निर्माण करणारे व्हिडिओ आणि अफवा पसरविणाऱ्या पोस्ट टाकू नका. तुमच्या प्रत्येक कृतीकडे महाराष्ट्र सायबर क्राइम विभाग लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई: राज्यपाल राज्याचे घटनात्मक प्रमुख आहेत. ते प्रियच असतात. ते आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्यात आणि आमच्यात दुरावा येण्याचा प्रश्नच नाही, असं सांगतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे असून दोघांमध्येही जिव्हाळ्याचे नाते आहे, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बॅकफूटवर गेलेले दिसले. राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्यावगैरे वाढत नाही, असं सांगतानाच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला. मधल्या काळात मी देसभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही ते म्हणाले

ठाणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपनं केलेल्या आंदोलनावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील जोरदार टीका केली आहे. 'भाजपला जनता कधीच माफ करणार नाही,' असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

करोनाच्या साथीमुळं राज्यात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपनं काल महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. 'मेरा आंगन मेरा रणांगण' नावानं करण्यात आलेल्या या आंदोलनात भाजपचे राज्यातील मोठे नेतेही सहभागी झाले होते. हातात काळे फलक घेऊन व तोंडाला काळे मास्क लावून भाजपच्या नेत्यांनी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

राज्य संकटात असताना भाजपनं केलेल्या या आंदोलनावर अनेक सत्ताधारी नेत्यांनी टीका केली होती. भाजपवर नेहमीच टीकेचे आसूड ओढणाऱ्या आव्हाड यांनीही आज ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षावर तोफ डागली आहे. 'संकटात सापडलेला तुमच्या-माझ्या महाराष्ट्रला सावरण्यासाठी आज एकी महत्त्वाची आहे. अशा वेळी आंदोलन करून भाजपनं दुहीची बीजे पेरली आहेत. जनता हे विसरणार नाही आणि माफही करणार नाही,' असं आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. #महाराष्ट्रद्रोहीBJP असा हॅशटॅगही आव्हाड यांनी त्यात वापरला आहे.

मुंबई: पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्राच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमदार रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'फडणवीसजी, पवार साहेबांच्या पत्राची चिंता करण्याऐवजी राज्यासाठी आपण काय करतो यावर आत्मपरीक्षण करा,' असा टोला रोहित पवार यांनी हाणला आहे. 

'करोना'च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळं विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शरद पवार हे पत्राच्या माध्यमातून अधूनमधून हे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देत आहेत. अलीकडंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी पंतप्रधानांकडं केली आहे. त्यावरून फडणवीस यांनी पवारांना एक सल्ला दिला आहे. राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून पवारांनी मदतीची मागणी करावी, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांना ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. 'पवार साहेबांच्या दांडग्या अनुभवामुळे त्यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळं साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण करा. ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई: करोनाविरुद्धच्या लढाईत जीव धोक्यात घालून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सेसच्या मानधनात कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेनं जोरदार आक्षेप घेतला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या संदर्भात पत्र लिहिलं आहे. 'डॉक्टरांची योग्य काळजी घेतली जाणार नसेल तर ते योद्धे आहेत या विधानाला काही अर्थ राहणार नाही, असं अमित यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारचा सार्वजनिक आरोग्य विभाग व आरोग्य सेवा आयुक्तलयानं २० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन ५५ हजार व ६० हजार असं निश्चित केलं आहे. त्यापूर्वी हे मानधन वेतन व भत्ते मिळून ७८ हजार इतके होते. मात्र, नव्या आदेशान्वये बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचं मानधन कंत्राटी सेवेच्या निकषावर निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळं त्यांच्या मानधनात २० हजार रुपयांची कपात झाली आहे. बंधपत्रित अधिपरिचारिकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर व परिचारिकांच्या मानधनातील ही कपात अन्यायकारक असल्याचं अमित ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
सध्याच्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात डॉक्टर व परिचारिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. हरियाणासारख्या राज्यात करोनाच्या काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानधन दुप्पट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारकडून तितक्या उदारपणाची अपेक्षा नसली तरी डॉक्टरांच्या वेतनात किंचितही कपात होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अमित यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या निधनाच्या कारणांची चर्चा करणारा, सध्या व्हायरल होत असलेला व्हॉट्सअॅप मेसेज पूर्णपणे खोटा व निराधार असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. मतकरी यांचे चिरंजीव गणेश मतकरी यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून या संदर्भात सविस्तर खुलासा केला आहे.
रत्नाकर मतकरी यांचं नुकतंच निधन झालं. मतकरी यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबाबरोबरच महाराष्ट्रालाही धक्का बसला. त्यांंना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. अत्यंत शिस्तप्रिय व आरोग्याची सर्व प्रकारची काळजी घेणाऱ्या मतकरी यांना करोनाची लागण कशी झाली हे कोडं सर्वांनाच पडलं आहे. अशातच रेवती भागवत यांनी व्हॉट्सअॅपवर मतकरी यांच्याबद्दल टाकलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. मतकरी यांना करोनाची लागण कशामुळं झाली असावी, याबद्दल त्यांनी काही तर्कटं मांडली आहेत. मतकरी कुटुंबाशी आपलं बोलणं झाल्याचा दावाही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.

गणेश मतकरी यांनी भागवत यांची ही सर्व तर्कटं फेटाळली आहेत. या पोस्टमुळं आम्हाला धक्का बसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'करोनाच्या काळात बाबा आणि आई कधीही घराबाहेर गेले नाहीत. त्यांना औषधं वा इतर गोष्टी दर १५ दिवसांनी आम्हीच द्यायचो. लॉकडाऊनच्या काळात घरी कामालाही कोणी नव्हतं. बाबांना धोक्याची पूर्ण कल्पना होती. ते सर्व प्रकारची काळजी घेत होते. त्यामुळं त्यांना निष्काळजीपणामुळे संसर्ग झाला असण्याची शक्यता नाही. ही अनावश्यक चर्चा आता थांबेल अशी अपेक्षा आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.

'आमच्या कुटुंबीयांपैकी कोणाशीही भागवत यांचं बोलणं झालेलं नाही. त्यांनी पोस्टमध्ये जे काही लिहिलं आहे त्यात तथ्य नाही. त्यामुळं या पोस्टकडे दुर्लक्ष करा आणि ती फॉरवर्ड करू नका, अशी विनंती गणेश मतकरींनी केली आहे.

नियम राखण्यासाठी रस्त्यावर गर्दी करणाऱ्यांवर पोलिसांना कारवाई करावी लागते. मात्र यातील काही जण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने नेमके काय करावे हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. विक्रोळी पार्कसाइट येथे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी काही जणांकडून लागण झाल्याने सुमारे १० पोलिसांना विलगीकरणात जावे लागले आहे. लॉकडाउनचे विविध नियम मोडणाऱ्या ७,३५२ जणांची मुंबईत आत्तापर्यंत धरपकड करण्यात आली आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर होण्याआधीच मुंबईत संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली. विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली. आत्तापर्यंत मुंबईत ६,४१७ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७,३५२ जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र ही कारवाई करताना गुन्हा दाखल करणे, आरोपीची माहिती घेणे, जबाब नोंदविणे, जामिनासाठी कागदपत्र तयार करणे यामुळे पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. याचा फटका पोलिसांना बसू लागला आहे.

 

२४ तासांत ४४ नवीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. धारावीतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२००च्या वर पोहोचली असून, आतापर्यंत सुमारे ६० जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत करोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असतानाही रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. रविवारी आढळून आलेले नवे रुग्ण मुस्लिमनगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरानगर, लक्ष्मी चाळ, महात्मा गांधीनगर, न्यू पारसी चाळ, जनता सोसायटी, कल्याणवाडी, शाहुनगर, जास्मिन मिल रोड, गुलमोहर चाळ, ढोरवाडा, सर्वोदय सोसायटी, सोशलनगर, मुकुंदनगर, काळा किल्ला, कुंचीकोरवेनगर, ६० फुटी रस्ता, या परिसरात आढळले असल्याची माहिती पालिकेच्या जी-उतर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

दादर, माहीममध्ये ११ नवीन रुग्ण - दादर व माहीम परिसर मिळून रविवारी दिवसभरात ११ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दादरमधील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५९ झाली असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये करोनाचे १४ नवे रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा १९३वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघाने पुढाकार घेतल्यानंतर शाडू मातीचा पहिला टेम्पो शनिवारी, मुंबईत दाखल झाला. पहिल्या खेपेत अंधेरी आणि जोगेश्वरी भागांतील जवळपास १२ मूर्तिकारांना एकूण ८०० गोणी कच्चा माल (शाडूची माती) पुरवण्यात आला आहे. लवकरच आणखी चार फेऱ्यांमध्ये अधिकाधिक मूर्तिकारांपर्यंत माती पोहोचवण्यात येणार असून, सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना घरातच मूर्ती घडवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मूर्ती केवळ ११, १५, १८, २१ इंच उंचीच्या असतील, असे यापूर्वीच मूर्तिकार संघातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

आगामी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत समन्वय समितीचा निर्णय, उत्सवाबाबत सूचनावली, मूर्तिकार संघाचा शाडू मातीच्या मूर्तींबाबत पुढाकार आणि अलीकडेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शाडू मातीची उपलब्ध करून दिल्यामुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शाडू मातीच्या मूर्ती तयार करा, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या मातीच्या उपलब्धतेबाबत केंद्र वा राज्य सरकारकडून पुढाकार घेतला जात नव्हता. अखेर मूर्तिकार संघाने माती आणण्याबाबत पुढाकार घेतला. ही माती गुजरातहून आणण्यात आली असून, गणपती मूर्तीसाठी वापरण्यात येणारी माती असल्याने राज्यात येताना कुठल्याही तपासणी नाक्यावर टेम्पो अडवण्यात आला नाही. मात्र, राज्य शासनाने जातीने लक्ष घालून ही माती मूर्तिकारांना उपलब्ध करायला हवी, अशी विनंती मूर्तिकार संघाकडून करण्यात आली आहे. तर, उपलब्ध कालावधीत मूर्तिकारांनी शाडूच्या मूर्ती घडवण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे कौतुक आहे. या निर्णयाची दखल घेत शासनानेदेखील शक्य तितके सहकार्य करावे, अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे कार्याध्यक्ष कुंदन आगासकर यांनी केली.

बेस्टमधील करोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच, अपुऱ्या सोयीसुविधांच्या निषेधार्थ बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुकारलेले आंदोलन सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच समितीतर्फे कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास 'घरी राहा, सुरक्षित राहा', असे लॉकडाउनचे आवाहन करणाऱ्या आंदोलनाचा इशारा दिला. त्यावर बेस्ट प्रशासनाने रविवारी रात्री बेस्ट कामगार संघटनांशी उशिरापर्यंत कोणतीही चर्चा केली नाही. तसेच, कामगार आंदोलनात सहभागी झाले, तरी एसटीच्या पर्यायी बससेवेने सेवांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला जात आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत आंदोलनासंदर्भात कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

अत्यावश्यक सेवेशी निगडित असलेल्या बेस्ट सेवेतील कामगारांमध्ये करोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. करोनाने बाधित झालेल्या आठ कामगारांचा मृत्यू ओढवला असून, करोनाग्रस्त कामगारांची संख्या १२२ इतकी झाली आहे. करोनाशी लढताना बेस्ट कामगार अग्रभागी असतानाही त्यांना सुविधा पुरविल्या जात नसल्याची भूमिका घेत कृती समितीने आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यावर प्रशासनाकडून चर्चेचे पाऊल न उचलता सुमारे एक हजार एसटीची पर्यायी व्यवस्था करण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात आल्याचे समजते.

लॉकडाउनच्या काळात मुंबईत अडकून पडलेल्या हजारो श्रमिकांना ओढ लागली आहे आपले गावचे घर गाठण्याची. पण गावकडे जायचे कसे या प्रश्नाने ग्रासलेल्या या श्रमिकांनी मिळेल ते वाहन... अगदी सिमेंट मिक्सरमधूनही गावची वाट धरली. काहींनी तर हजारो मैलांची पायपीट सुरू केली. मात्र, यातल्या काही श्रमिकांना आधार दिलाय तो गरिबांचे वाहन असलेल्या सायकलने. या सायकली त्यांना दिल्या आहेत अनेक वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या अस्सल मुंबईकर शेजाऱ्यांनी आणि मराठी कुटुंबांनी. आपल्या घराकडे निघालेल्या बिरजू या श्रमिकाने त्याविषयीच्या भावना 'मटा'कडे व्यक्त केल्या.

अनेक वर्षांपासून रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईत स्थायिक झालेल्या हजारो श्रमिक कुटुंबांना घराची ओढ लागली आहे. मुंबईतून इतर राज्यांना जोडणाऱ्या महामार्गांवर चालत जाणाऱ्या असंख्य श्रमिकांच्या रांगा दिसत आहेत. या त्यांतील अनेकांकडे सायकल दिसून येत होती. संचारबंदी सुरू असल्यामुळे सायकलची व्यवस्था करण्यासाठी बरीच कसरत करावी लागल्याचे अनेकांनी सांगितले. काहींनी परिसरातील गॅरेजांमधून गुपचूप सायकली विकत घेतल्या. तर अनेकांनी आपापल्या परिसरातील नागरिकांकडून गावी जाण्यासाठी सायकली मिळवल्या. माणशी अडीच-तीन हजार रुपये देऊन चार-पाच जणांच्या कुटुंबाला घेऊन ट्रकमधून जाणे परवडत नसल्याने अनेकांनी नाईलाजास्तव ५०० ते ६०० रुपयांत जुनी सायकल घेऊन मजल दरमजल सुरू केल्याचे बिरजूसारख्या अनेक श्रमिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, अनेक मुंबईकरांनी स्वतःहून आपल्याकडील सायकली दिल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला. पैशांअभावी नियमित घराची जागा बदलावी लागत असल्याने सायकल देणाऱ्या दानशूरांची नावे त्यांना सांगणे जमले नाही. मात्र, कृतज्ञतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होते.

करोनाचा फैलाव वाढत असल्याने लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका मिरा-भाईंदरमधील स्टील उद्योगालाही बसला आहे. मिरा-भाईंदरमधील स्टील उद्योग हा शहराच्या अर्थकारणाचा कणा ठरला आहे. मात्र हाच कणा लॉकडाउनमुळे मोडून पडण्याची वेळ आली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात स्टील भांडी वस्तूंचे उत्पादन घेतले जाते. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाउन लागू करण्यात आल्याने शहरातील स्टील उद्योग मागील दोन महिन्यांपासून बंद असून सुमारे २०० कोटींची उलाढाल बंद झाली आहे. त्यामुळे कारखानदार, कामगार आणि उद्योगाशी संबंधित अन्य घटकांवरही आर्थिक संकट उभे राहिले आहे. मिरा-भाईंदर शहरात पाच हजारांपेक्षा जास्त लहान-मोठे स्टीलपासून भांडी तयार करणारे कारखाने आहेत. १२०हून अधिक दुकानांमधून स्टीलच्या भांड्यांची घाऊक विक्री केली जाते. उत्तर प्रदेश, बिहार, उडीसा या राज्यांतील सुमारे २५ हजार कामगार स्टील कारखान्यात काम करतात. या सर्वांनाच या लॉकडाउनचा फटका बसला आहे.

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षानं काय दिलं नाही? ७ वेळा आमदारकी, दोनदा मंत्रिपद आणि सूनेला खासदारकी दिली. त्यामुळे त्यांना आणखी किती द्यायचं? कितीही दिलं तरी ते पक्षाच्याविरोधात बोलतातच. असा विचार करूनच केंद्रीय नेतृत्वाने नाथाभाऊंना तिकीट नाकारलं असावं, असं सांगतानाच पार्टीत काम करणं म्हणजे आमदारकीच का? जनतेत फिरून त्यांच्या अडचणी समजून घेणं हे काम नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मंदी असते तेव्हा मुंगी होऊन साखर खाणं आणि नम्र राहणंच योग्य असतं, असा सल्लाही त्यांनी खडसेंना दिला.

भाजप नेते एकनाथ खडसे यांचं विधानपरिषदेचं तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांचं तिकीट कापण्यामागे प्रदेशपातळीवरच्या नेत्यांचा हात असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांचे सर्व आरोप खोडून काढत पक्षाने खडसेंना आजपर्यंत काय काय दिलं याचा पाढाच वाचला. खडसेंनी पक्ष वाढवला हे मान्य. पण त्यांना सातवेळा आमदारकी दिली. दोनदा मंत्रिपद दिलं. त्यांच्या मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमनपद दिलं. त्यांच्या मुलाला विधानसभेचं तिकीट दिलं. त्यांच्या सूनेला खासदारकी दिली, पुन्हा मुलीला विधानसभेचं तिकीट दिलं, त्यांच्या पत्नीला महानंदाचं चेअरमनपद दिलं. त्यामुळे नाथाभाऊंना आणखी किती द्यायचं असा विचार केंद्रीय नेतृत्वाने केला असेल. शिवाय त्यांना कितीही दिलं तरी ते नावंच ठेवतात. त्यामुळे पक्षाने इतरांना तिकीट दिलं असावं, असा माझा समज आहे, असं पाटील म्हणाले.

मुंबई: १७ तारखेनंतर राज्यात लॉकडाऊनची स्थिती कशी असेल याबाबत काळजीपूर्वक आराखडा तयार करायचा असून प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या सूचना तसेच अपेक्षा याचे नियोजन करून ते कळवावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना सांगितले. मुख्यमंत्री आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत होते. लवकरच पावसाळा येत असून पावसाळ्यात साथीचे व इतर आजार पसरतात. करोना संकटाशी लढताना या रोगांचाही मुकाबला करावा लागेल. यादृष्टीने जिल्ह्यांतील विशेषत: खासगी डॉक्टर्स नियमितरित्या आपल्या सेवा सुरू ठेवतील हे पाहावे अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.

पुढच्या काळात लॉकडाऊन शिथिल करताना कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याजिल्ह्यांच्या सीमा मात्र सरसकट उघडण्यात येणार नाहीत याचा पुनरुच्चार करून मुख्यमंत्री म्हणाले की, आता मोठ्या प्रमाणावर मजुरांचे येणे जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे आपल्याला आता खऱ्या अर्थाने सावध राहून योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी लागेल ज्यामुळे संसर्ग वाढणार नाही. कोणत्याही परिस्थितीत कंटेनमेंट झोन्समध्ये कडक बंधने पाळली जातील हे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहिले पाहिजे. या झोन बाहेर विषाणू कोणत्याही परिस्थितीत पसरला नाही पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आपण एप्रिलमध्ये संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलो आहे. आता मे महिन्यात करोनाची मोठी संख्या पहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आपल्याला करोनाची साखळी तोडायची आहे, मात्र येणाऱ्या पावसाळ्यात विविध रोग येतील. त्यात साथीचे रुग्ण कोणते आणि करोनाचे रुग्ण कोणते हे पाहावे लागेल. यादृष्टीने वैद्यकीय यंत्रणा तयारीत ठेवावी लागेल तसेच खासगी डॉक्टर्सना तयार ठेवावे लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

मुंबई: 'कुठलंही कटू वास्तव किंवा कठोर निर्णय पंतप्रधान मोदी स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते अर्थमंत्र्यांवर किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर ढकलून देतात. त्यांना काही ठोस आणि स्पष्ट सांगायचंच नसतं तर ते टीव्हीवर लाइव्ह भाषणं का देतात आणि संपूर्ण देशाला गोंधळात का टाकतात,' असा परखड सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल २० लाख कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. हे आर्थिक पॅकेज नेमकं कसं असेल? त्याचं वाटप कसं केलं जाईल? याची माहिती अर्थमंत्री देतील, असं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. त्यावरून प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर टीका केली आहे. 'पंतप्रधान स्वत: वाईटपणा घेताना दिसत नाही. कुठलाही कटू निर्णय स्वत: सांगत नाहीत. ते सगळं ते इतरांवर सोडून देतात. कदाचित तो त्यांच्या प्रसिद्धी व्यवस्थापनाचा भाग असावा,' असा टोला आंबेडकरांनी हाणला आहे. 'मोदींच्या आर्थिक पॅकेजमध्ये केवळ मध्यमवर्गाचा विचार केलेला दिसतो. असंघटीत क्षेत्रातील मजूर आणि स्थलांतरितांसाठी काहीही नाही. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मध्यमवर्गीयांना खूश करण्याकडे मोदी सरकारचा कल होता. आर्थिकदृष्ट्या अक्षम व कमकुवत लोकांकडं पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. चौथ्या टप्प्यातही सरकारची हीच भूमिका कायम आहे,' अशी खंत आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.

अहमदनगर: आजारातून बरी होत असलेल्या गायीचे रक्त लवकर वाढावे म्हणून एका शेतकऱ्याने तिला गाजर खाऊ घातले. मात्र, त्यातून नवीन समस्या निर्माण झाली. गायीचा जीव धोक्यात आला. खासगी पशुवैद्यकानं केलेल्या तातडीच्या उपचारामुळे हा धोका टळला.

अकोले तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या गायीवर हा प्रसंग ओढावला होता. गाय अजारी असल्याने त्यांनी डॉ. डॉ. संतोष वाकचौरे यांच्याकडून उपचार करून घेतले. उपचारानंतर गाय बरी होत होती. चारा खाऊ लागली होती. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिच्या अंगातील रक्त कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तिने चारा खायला सुरवात केल्याने शेतकऱ्याने तिला मका, घास सोबत गाजरही खायला दिले. गाजरामुळे रक्त वाढावे, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र, सायंकाळी गायीची प्रकृती आणखीच बिघडली. लाळ गाळू लागली. गायीला श्वासही घेता येईना. तेव्हा त्यांनी पुन्हा डॉक्टरांशी संपर्क केला. प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात येताच डॉ. वाकचौरे तातडीने निघाले. दिवसभर चांगली तब्येत झाली असा निरोप देणारा शेतकरी असे का सांगतोय? काय झाले असेल आता त्यांच्या गाईला, नव्याने, असा प्रश्न डॉक्टारांना पडला. ‘डॉक्टर काहीही करा, पण गाय वाचवा, एकच गाय आहे, तिच्या दुधावर आमचे घर चालते.’ शेतकरी विनंती करीत होता.

शिरडी: देश के तमाम हिस्सों और धार्मिक स्थलों में फंसे श्रद्धालुओं को उनके घरों तक पहुंचाने का कार्य सरकार कर रही है. महाराष्ट्र सरकार का ऐसा ही एक प्रयास दिखा साईं बाबा के शिरडी धाम में. लॉकडाउन के दौरान करीब 1400 से ज्यादा साईं भक्त और प्रवासी शिरडी धाम में फंसे हुए थे और लगातार अपने घर जाने का प्रयास कर रहे थे लेकिन लॉकडाउन की अवधि लगातार बढ़ने की वजह से वह अपने घरों को नहीं जा पाए. अब जब सरकार ऐसे फंसे लोगों को उनके घरों तक पहुंचाने का कार्य शुरू कर चुकी हैं तो इन साईं भक्तों को भी इसका लाभ मिला.

गुजरात और उत्तर प्रदेश के लखीमपुर के रहने वाले 1251 श्रद्धालुओं और प्रवासियों को लेकर के एक ट्रेन शिरडी से रवाना हुई . शिरडी में फंसे श्रद्धालुओं का सबसे पहले मेडिकल टेस्ट किया गया उसके बाद इन लोगों को ट्रेन में बैठाया गया और ट्रेन उत्तर प्रदेश के के लिए रवाना हुई .

इन श्रद्धालुओं ने अपने गांव तक जाने के लिए शिरडी प्रशासन से इजाजत मांगी थी और जब सरकार की तरफ से लोगों को उन्हें उनके स्थानों तक पहुंचाने के प्रयास शुरू किए गए तो शिरडी में फंसे इन लोगों की भी जाने की व्यवस्था वहां के प्रशासन ने रेलवे की मदद से की.

जब तक ये लोग शिरडी में फंसे थे महाराष्ट्र प्रशासन और शिरडी साईं धाम प्रशासन की मदद से इन लोगों की सहायता की जा रही थी और इनके खाने रहने की व्यवस्था की गई थी. ट्रेन से विदा होते वक्त सभी साईं भक्तों और प्रवासियों ने महाराष्ट्र सरकार का धन्यवाद किया.

मुंबई: 'करोनाच्या रूपानं आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्यानं मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,' असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
करोनाच्या साथीमुळं महाराष्ट्रासह देशात उद्भवलेली परिस्थिती व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी लोकांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली. 'राज्यातील बाधितांचा आकडा वाढतोय हे खरं असलं तरी नाउमेद होण्याचं कारण नाही. चाचण्या वाढल्यामुळं ही संख्या वाढल्याचं दिसतंय. ही संख्याही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय. पोलीस, आरोग्य यंत्रणा, मीडिया यांच्यासह राज्यातील जनताही त्यांना सहकार्य करते आहे,' असं शरद पवार म्हणाले.

मुंबई: 'लॉकडाऊनमुळं महाराष्ट्रात अडकून पडलेल्या व आपल्या मूळ गावी जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये घेऊन जाण्याची व्यवस्था संबंधित राज्यांनी करावी. त्यासाठी वाहनांची व्यवस्था व प्रवास खर्चही त्या-त्या राज्यांनी करावा,' अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारनं व्यक्त केली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय गुरुवारी घेतला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं दिली आहे.

देशात ठिकठिकाणी अडकून पडलेले स्थलांतरित मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आणि अन्य नागरिकांच्या आंतरराज्य प्रवासाला केंद्र सरकारनं बुधवारी सशर्त परवानगी दिली. केंद्रीय गृह सचिवांनी या संबंधात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी आदेश काढले. घरी जाण्यापूर्वी स्थलांतरितांची करोना चाचणी करावी, त्यानंतर पूर्णपणे निर्जतुंकीकरण केलेल्या बसमध्ये त्यांना परत पाठविण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. मात्र, केंद्राच्या या आदेशानंतर मजुरांच्या परतीच्या खर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे. विशेषत: महाराष्ट्राला तो अधिक भेडसावत आहे.

 

पुण्यात काल रात्री ९ वाजल्यापासून ते आज पहाटे ९ वाजेपर्यंत म्हणजे अवघ्या १२ तासांत १२७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील एकूण रुग्णसंख्या १७२२वर पोहोचली आहे.

पुण्यात काल रात्रीपर्यंत रुग्णसंख्या १५९५ एवढी होती. त्यात आणखी १२७ रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १७२२वर पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. रात्री ९नंतर काही तासांतच ८७ तर मध्यरात्री ४० असे १२७ रुग्ण वाढले. यातील बरेचसे रुग्ण झोपडपट्टी भागातील असल्याचं सांगण्यात येतं. या रुग्णांची ट्रव्हेलिंग हिस्ट्री नसून संपर्कामुळे त्यांना करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं. हे १२७ रुग्ण कुणाकुणाच्या संपर्कात आले होते, याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. पुणे हे करोनाचं हॉटस्पॉट ठरल्याने पुण्यातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तसेच झोपडपट्टीतील लोकांना शाळा, महाविद्यालयांमध्ये संस्थात्मक क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तरीही पुण्यातील रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राज्यातील करोनाबाधितांची संख्या ९९१५वर पोहोचली आहे. त्यापैकी २०५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १५९३ रुग्ण बरे झाले आहेत.

मुंबई: राज्यात बुधवारी ५९७ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून बाधितांचा आकडा ९९१५ वर पोहोचला आहे. आतापर्यंत १५९३ बाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण वाढत असले तरी दुपटीनं वाढण्याचा वेग ७ दिवसांवरून १० दिवसांवर गेला आहे, ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी...

* महाराष्ट्र सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय. सर्व अधिकारी, आरोग्य खात्याचे कर्मचारी, पोलीस यांचीही मदत सरकारला होतेय - शरद पवार

* लातूरच्या भूकंपावेळी देखील राज्यावर संकट होतं. अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. पण आपण उभे राहिलो. मुंबईतील बॉम्बस्फोटांनंतरही उभे राहिलो - शरद पवार

* कर्जफेड व व्याजाच्या बाबतीत आरबीआयनं बँकांना केवळ मार्गदर्शन करू नये. आदेश द्यावा - शरद पवार

*  लॉकडाऊनचा शेतीवरही परिणाम झालाय. पीककर्जाचा व्याजदर शून्यावर आणण्याची गरज - शरद पवार

मुंबई: उत्तर प्रदेशातील साधूंची हत्या व त्यानंतरच्या घडामोडींवरून शिवसेनेनं राज्यातील विरोधी पक्षावर उपरोधिक शब्दांत हल्ला चढवला आहे. 'महाराष्ट्राप्रमाणे यूपीतही कायद्याचं राज्य असल्यानं साधू हत्याकांडाचे आरोपी तुरुंगात गेले. फक्त महाराष्ट्राप्रमाणे तिथं विरोधी पक्षाचा थयथयाट दिसला नाही हा फरक आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्ष गुंत्यात पाय अडकवून स्वत:चे हसे करून घेतोय. यूपीतली जनता या खेळास मुकली आहे,' असा टोला शिवसेनेनं राज्यातील भाजप नेत्यांना हाणला आहे.

पालघर येथे दोन साधूंचा झुंडबळी गेल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षानं सरकारवर टीकेची झोड उठवली होती. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच यूपीत साधूंची गळा चिरून हत्या झाली. उद्धव ठाकरे यांनीही योगींना फोन करून कारवाईची मागणी केली. यूपीतील साधू हत्येचं कुणीही राजकारण करू नये, असं खोचक ट्विटही शिवसेनेकडून करण्यात आलं. त्यामुळं संतापलेल्या आदित्यनाथ यांच्या कार्यालयातून ट्विट करण्यात आलं व महाराष्ट्र सांभाळा असा सल्ला देण्यात आला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून योगी सरकारच्या या प्रतिक्रियेचा समाचार घेतानाच भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर तोफ डागण्यात आली आहे.

डिभे धरणाच्या उजव्या कालव्याला सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. या आवर्तनाचा फायदा आंबेगाव तालुक्यासह शिरूर तालुक्यातील अनेक गावांना होत आहे. 'हेड टू टेल' पद्धतीने पाण्याचे वितरण होत आहे. मात्र, काही शेतकरी कालवा फोडून पाणी चोरत आहेत. आंबेगाव तालुक्यातील अवसरी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव येथील अज्ञात शेतकऱ्यांनी जेसीबी मशिनच्या साह्याने कालव्यातून निघणारी वितरिका फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे पाणी वाटपाचे नियोजन कोलमडले असून, जलसंपदा विभागाचे अधिकारी पाणी चोरांवर पोलिस कारवाई करण्याबाबत पत्र देणार आहेत.

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ७५ गावांना होतो. हा कालवा शिरूर तालुक्यातील कर्डिलेवाडीपर्यंत जातो. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ठिकठिकाणी पाणी देण्यात येते. सध्या 'टेल टु हेड'पद्धतीने पाणी वाटप सुरू आहे. असे असतानाही रात्रीच्या वेळी 'जेसीबी'द्वारे काही अज्ञात शेतकरी कालव्यातून निघणाऱ्या वितरिका फोडून पाणी घेत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, गेट आणि कालव्याचे नुकसान होत आहे. सर्वत्र 'लॉकडाउन'सुरू असल्याने फोडलेल्या वितरिका दुरुस्त करण्यासाठी जलसंपदा विभागाला मशिन आणि कामगारही ऐनवेळी मिळत नाहीत. यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करणे अवघड होत आहे.

 

लॉकडाउन काळ आणखी वाढणार की नाही, याची शाश्वती नसल्याने नागरिक घबराटीतून धान्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. मुंबईच्या बाजारात काही धान्याचा तुटवडा जाणवत असला तरी तांदळाचा साठा मात्र भरपूर आहे. यामुळे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबईच्या बाजारात जानेवारी महिन्यात तांदळाचा नवीन माल येत असतो. आंध्र प्रदेश, पंजाब, सुरत व नागपूरहून तांदूळ मुंबईत येतो. सुरत व नागपूरहून एचएमटी श्रेणीतील कोलम तांदूळ येतो. आंध्र प्रदेशहून शुद्ध एचएमटी तांदळाची आवक होते. तर बासमती श्रेणीतील तांदूळ पंजाबहून येतो. यापैकी कोलम व एचएमटी तांदळाची आवक जानेवारीअखेरपर्यंत होते. पंजाबमधील बासमती तांदळाची आवक जवळपास मेपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू असते. सध्या ही सर्व आवक मोठ्या प्रमाणात झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
 

मुंबई: महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून शुक्रवारी दिवसभरात करोनाचे ३९४ नवीन रुग्ण आढळले आहेत तर १८ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. राज्यात करोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ३१० वर पोहचला आहे. दरम्यान, दिलासा देणारी बाबत म्हणजे रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढत असून आतापर्यंत ९५७ पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात गुरुवारच्या तुलनेत करोनाबाधित नवीन रुग्णसंख्येचा आकडा जवळपास निम्याने घटला असला तरी, राज्यात करोनाबाधित रुग्णांच्या बळीने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी ३९४ नवीन करोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासात राज्यात १८ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात ११ जण मुंबईतील तर पाच जण पुण्यातील आहेत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामुळे राज्यातील मृत्यू संख्या ३०१ झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

शुक्रवारी राज्यातील ११७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत एकूण ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ८१७ इतकी झाली आहे. राज्यातील करोना आजाराचा मृत्यू दर ४.४ टक्के आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या एक लाख २ हजार १८९ नमुन्यांपैकी ९४ हजार ४८५ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले असून, ६ हजार ८१७ जण पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात १ लाख १९ हजार १६१ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून, ८ हजार ८१४ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

मुंबई: मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३५७ ने वाढली असून एकूण रुग्णसंख्या आता ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे तर त्याचवेळी दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत १२२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

मुंबईतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे. या प्रयत्नांना अपेक्षित यश अद्याप मिळू शकलेलं नाही. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात करोनाचे १८९ रुग्ण आढळले आहेत तर २१ आणि २२ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशांळांमधील अहवाल प्राप्त झाले असून त्यात १६८ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईत एकूण ३५७ रुग्ण वाढले आहेत. मुंबईत आतापर्यंत ४ हजार ५८९ जणांना करोनाची लागण झाली असून त्यातील ३ हजार ८१५ रुग्णांवर प्रत्यक्षात उपचार सुरू आहेत. मुंबईत शुक्रवारी १२२ रुग्ण करोनामुक्त झाले असून आतापर्यंत ५९५ जणांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

मुंबईत शुक्रवारी ११ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण करोना मृत्यूंची संख्या १७९ वर पोहचली आहे. आज जे ११ रुग्ण करोनामुळे दगावते त्यातील ७ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर एका ८० वर्षीय वृद्धाचा तसेच ४० वर्षाखालील व्यक्तीचाही करोनाने मृत्यू झाला आहे. अन्य रुग्ण ४० ते ८० वर्षे वयोगटातील आहेत.
 

मुंबई: राज्यातील करोनाबाधितांची संख्या ६८१७ पोहोचली असून आतापर्यंत राज्यभरात ९५७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५५५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या राज्यातील करोना आजाराचा मृत्यूदर हा ४.४ टक्के आहे. राज्यातील २६९ मृत्यूंचे वयोगटानुसार विश्लेषण केले असता ५० वर्षांखालील व्यक्तींचा मृत्यूदर हा कमी आढळून येतो, विशेषतः २१ ते ३० वर्षे वयोगटात मृत्यूदर ०.६४ टक्के इतका आहे. तर त्यापुढील वयोगटात मृत्यूदर वाढताना दिसून येतो. ६१ ते ७० या वयोगटात मृत्यूदर सर्वाधिक म्हणजे १७.७८ टक्के एवढा आहे. जाणून घेऊ या राज्यातील करोना विषाणूबाबतचे ताजे अपडेट्स...

* हिंगोलीतील राज्य राखीव दलाच्या जवानाला करोना; संपूर्ण गाव केलं सील

* अमरावतीत करोनाचे दोन, तर यवतमाळमध्ये एक रुग्ण सापडला

* औरंगाबादमध्ये तीन नवीन करोना पॉझिटिव्ह; २० रुग्णांवर उपचार सुरू

मुंबई: मुंबईत अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम पाळले जात नसल्याचं उघड झाल्याने धारावीसह मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. वांद्रे परिसरात आतापर्यंत १८४ रुग्ण सापडल्याने वांद्र्यातील बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वर नगर आणि पत्थर नगरातील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. या कंटेन्मेंट झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचं समोर आल्याने येथील रहिवाश्यांना लाऊडस्पीकरवरून वेळोवेळी सूचनाही देण्यात येत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईही करण्यात येत आहे.

एच/पूर्व विभागातील बेहराम पाडा, भारत नगर, ज्ञानेश्वर नगर, पत्थर नगर परिसरात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एच/पूर्वेच्या सहाय्यक आयुक्तांनी विविध उपायोजना केल्या आहेत. हा संपूर्ण परिसर दाटीवाटीचा आणि झोपडपट्टीने वेढलेला आहे. या परिसरातील लोकसंख्या अधिक असल्याने करोनाचा संसर्ग अधिक वाढू नये म्हणून महापालिकेने विशेष काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या परिसरातील सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये म्हणून येथील रहिवाश्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. सुरक्षित अंतर ठेवणे, फेस मास्क वापरणे, साबणाने हात धुणे, सार्वजनिक स्वच्छता राखणे, सार्वजनिक शौचालयाचा वापर करताना काळजी घेणे, याबाबत जनजागृती करण्यासाठी एच पूर्व विभागातील महानगरपालिकेचे अधिकारी, खेरवाडी पोलीस स्टेशन व बीकेसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांच्या सहभागाने संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. करोनाबाबत नागरिकांच्या मनामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेले भीतीचे वातावरण कमी करून त्यांच्यामध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लावण्याकरिता ड्रोनचा वापर प्रभावी ठरत असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे.

मुंबई: धारावीत कालही करोनाचे २५ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे धारावीतील करोनाबाधितांची संख्या २१४वर गेली आहे. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने धारावीला करोनामुक्त करण्यासाठी विशेष रणनिती तयार केली आहे.

मुंबई महापालिकेने धारावीसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या रणनितीनुसार आता धारावीतील करोना रुग्ण असलेले एरिया निश्चित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. या निश्चित केलेल्या विभागांमध्ये टेस्टिंगची संख्या वाढवणं, स्क्रीनिंगचं प्रमाण वाढवणं, कंटेनमेंट झोनवर अधिक लक्ष्य केंद्रीत करणं, सॅनिटायझेशन करणं, लॉकडाऊनच्या नियमांचं कठोरपणे पालन करणं आणि क्वॉरंटाइन सेंटरमधील खाटांची संख्या वाढवणं आदी गोष्टींचा यात समावेश आहे. केंद्राचं पथक धारावीत येऊन पाहणी करून गेलं. या पार्श्वभूमीवर पालिकेने ही रणनिती तयार केली आहे.

देशभरात लॉकडाऊन सुरू होऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. या एक महिन्यात संपूर्ण देशात करोनाने हातपाय पसरले आहेत. त्यामुळे देशभरातील रुग्णालये केवळ आणि केवळ करोना रुग्णांनी भरून गेले आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची हालत त्याहून काही वेगळी नाही. संपूर्ण देशाच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढंच नव्हे तर मुंबईत या एक महिन्यात शंभरपटीने रुग्ण वाढले आहेत. अर्थात त्याला कारणही वेगवेगळी आहेत. मुंबईत रुग्ण संख्या अधिक असल्याने मुंबईतील अनेक भाग सील करण्यात आले असून दोनशेहून अधिक कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले आहेत. मुंबईत वरळी, भायखळा, धारावी आणि प्रभादेवी या ठिकाणी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली असून भीतीचं वातावरण आहे. करोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाला सर्वाधिक महसूल देणाऱ्या मुंबईचं अर्थचक्रही थांबलं आहे. त्यामुळे राज्यसरकारपुढे मोठं आव्हान निर्माण झालं आहे.

मुंबई: करोनाबाधितामुळं वाढणारी रुग्णांची संख्या आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या मनात असलेल्या भीतीचा मोठा फटका महापालिका रुग्णालयांतील आरोग्य सेवेला बसत आहे. कूपर रुग्णालयातील एका संशयित करोना रुग्णाला तब्बल २२ तास मृतदेहांच्या शेजारी बसून काढावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोविड १९ पॉझिटिव्ह वा संशयित असलेल्या रुग्णाचा मृतदेह दोन तासांच्या आत गुंडाळून ठेवणं आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, कूपर हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये तीन करोना संशयितांचे व अपघात वॉर्डमध्ये दोघांचे मृतदेह अनेक तास असेच पडून होते. आयसोलेशन वॉर्डमधील संशयित करोनाग्रस्तानं वारंवार विनंती करूनही रुग्णालयातील कुठलाही कर्मचारी मृतदेहांना हात लावण्यास तयार नव्हता. त्यामुळं संबंधित रुग्णाला या मृतदेहांसोबत भीतीच्या छायेत रात्री काढावी लागली. अखेर आयसोलेशन वॉर्डमधील फोटो आणि व्हिडिओ त्यानं आपल्या जवळच्या लोकांना पाठवले. त्यापैकी एकानं स्थानिक राजकीय नेत्याशी संपर्क साधला आणि त्याला परिस्थितीची कल्पना दिली. या नेत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मृतदेह हलवण्यात आले.

मृतदेहांच्या सहवासात राहावं लागलेला रुग्ण याबाबत बोलताना म्हणाला, 'माझ्यासाठी हा भयंकर अनुभव होता. माझ्या दोन्ही बाजूच्या खाटांवर मृतदेह होते. बुधवारची संपूर्ण रात्र मला झोप लागली नाही. माझ्या पत्नीनं रुग्णालय प्रशासनाकडं अनेक विनवण्या केल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत मृतदेह तिथंच पडून होते. माझ्या कोविडच्या रिपोर्टबाबत मला आता काहीच वाटत नाही. पण माझ्यासोबत घडलेला हा प्रसंग मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही.'

अहमदनगर: करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मास्कचं उत्पादन राज्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. राज्यातील बचतगटही यात हातभार लावत असून नगर जिल्ह्यातील ४० बचतगटांनी तब्बल १ लाख १२ हजार मास्क तयार केले आहेत. विशेष म्हणजे, यातील १ लाख ८ हजार मास्कची विक्री सुद्धा करण्यात आली आहे.

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. करोनाचा संसर्ग अधिक असलेल्या शहरांतील नागरिकांवर मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळं साहजिकच 'मास्क'ना मागणी वाढली आहे. त्यामुळे या काळात राज्यातील बचतगट मोठ्या प्रमाणात मास्क तयार करत आहेत. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील ४० बचतगटांनी तब्बल १ लाख १२ हजार मास्क तयार केले आहेत.

पहिला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर औरंगाबादमधील एका ७६ वर्षीय महिलेचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. ती बाधित असल्याचं स्पष्ट नसल्यानं तिच्या अंत्यसंस्काराला १०० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कारासाठी कुठलीही खबरदारी घेण्यात आली नव्हती. मात्र, दुसऱ्या स्वॅब रिपोर्टमध्ये ती कोविड पॉझिटिव्ह असल्याचं निदान झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.

संबंधित महिला ही मुबई येथून शहरात परतली होती. रोजी ताप व दम्याच्या आजाराने बेशुद्ध पडल्यानं तिला घाटीच्या अपघात विभागात दाखल करण्यात आलं होतं. अपघात विभागातच ऑक्सिजन लावण्यात आलं. लक्षणांवरून पुढील उपचारासाठी तिला कोव्हिड इमारतीच्या आयसीयूमध्ये स्थलांतरित करण्यात आलं. त्याच दिवशी तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. तिचा स्वब निगेटिव्ह आला होता. मात्र, वृद्ध असल्यामुळे प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. या वृद्धेवर कोव्हिड संशयित म्हणून उपचार देखील सुरू केलेले होते. दक्षता म्हणून त्या महिलेचा लाळेचा नमुना डॉक्टरांनी पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठविला. तो रिपोर्ट येण्याआधीच मंगळवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. ती करोनाबाधित असल्याचं स्पष्ट नसल्यानं नातेवाईकांनी तिच्यावर अंत्यसंस्कार देखील केले. मंगळवारी रात्री उशिरा त्या महिलेचा दुसरा स्वब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, असं घाटीच्या औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितलं. आहे. बायलॅटरल न्युमोनिया विथ हायपरटेन्शन व ॲक्युट रेस्पिरिट्री डिस्ट्रेस सिंड्रोमने तिचा मृत्यू झाला, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं.

मुंबई: 'करोनाच्या संकटकाळात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे एखाद्या योद्ध्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. राज्यातील सर्वच महापालिका प्रशासनांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा,' अशा शब्दांत शिवसेनेनं टोपे यांचं कौतुक केलं आहे.

महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राजेश टोपे सरकारमधील इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. बैठकांचं सत्र सुरू आहे. राजेश टोपे हे महापालिकांना भेटी देत आहेत. हॉटस्पॉटवर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. त्याचसोबत, सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोग्य सेवेशी निगडीत सर्व गोष्टींची माहिती जनतेला देत आहेत. त्यांच्या याच कामाच्या अनुषंगानं शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'च्या अग्रलेखातून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

मुंबई-पुण्यातील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबद्दलही अग्रलेखातून चिंता व्यक्त केली आहे. 'वेळ आणीबाणीची आहे. मुंबईचे महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी संपूर्ण यंत्रणेचा फेरआढावा घेणे गरजेचं आहे. पालिका आयुक्तांनी करोना लढाईसाठी वेगवेगळे गट केले आहेत. प्रत्येकावर जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. काही 'एनजीओ'ही यात आहेत. या सगळ्यांची नक्की उपयुक्तता काय आणि त्यात भोजनभाऊ किती? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. ही लढाई हवशे, नवशे आणि गवश्यांच्या जोरावर लढता येणार नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं आजवर अशी अनेक आव्हानं परतावून लावली आहेत. करोनामुळं आरोग्य खात्यावर कामाचा ताण वाढला आहे हे खरं असलं तरी मुंबईच्या रक्षणासाठी त्यांना कंबर कसावी लागेल. स्वत: मैदानात उतरलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा आदर्श घ्यावा लागेल,' असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

'नागपुरात करोनाग्रस्तांचा आकडा ७० च्या पुढं गेला आहे. याकडं नागपूरकर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांनाही डोळेझाक करता येणार नाही,' असा टोलाही शेवटी अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
 

नांदेड: करोनाचा एकही रुग्ण नसल्यानं ग्रीन झोनमध्ये टाकण्यात आलेल्या नांदेड जिल्ह्यातही करोनानं शिरकाव केल्याचं उघडकीस आलं आहे. पिरपुराण भागातील ६४ वर्षीय इसम करोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं सकाळपासूनच तो भाग सील करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य सरकारनं लॉकडाउन घोषित केल्यासपासून नांदेड जिल्हा प्रशासनाकडून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात होती. त्यामुळं करोनाला अटकाव करण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी ठरले होते. त्यामुळं करोनाच्या दृष्टीनं राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या विभागणीमध्ये नांदेड जिल्हा ग्रीन झोनमध्ये समाविष्ट झाला होता. त्यानंतर प्रशासनानं काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील केलं होतं. त्यानंतर दोन दिवसांच्या आतच एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे.जिल्हा आरोग्य प्रशासनाने मंगळवारी नऊ जणांचे नमुने तपासणीला पाठविले होते. यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याबद्दल समजताच प्रशासनानं रुग्णाचं वास्तव्य असलेला परिसर ताब्यात घेतला असून अन्य उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

देशभर में कोरोना संक्रमण की स्थिति गंभीर होती जा रही है। महाराष्ट्र में लॉकडाउन के बाद भी मुंबई के वॉकहार्ट हॉस्पिटल में 26 नर्सों और 3 डॉक्टरों के संक्रमित आने के बाद प्रशासन चिंता में पड़ गया है। महाराष्ट्र में सोमवार सुबह 33 नए मरीज सामने आए है। इसी के साथ संक्रमितों का आंकड़ा बढ़कर 781 तक पहुंच गया। इनमें से 19 मामले पुणे, 11 मुंबई, 1-1 सातारा, अहमदनगर और वसई से सामने आया। वहीं मुंबई से सटे वसई-विरार के नालासोपारा इलाके में एक 65 वर्षीय संक्रमित की मौत हो गई। इसी के साथ राज्य में मृतकों की संख्या बढ़कर 46 हो गई है। सबसे ज्यादा 113 मरीज रविवार को सामने आए थे। रविवार को ही यहां सबसे ज्यादा 13 मरीजों की मौत हुई है, जिसमें से 9 मुंबई एमएमआरडीए से, 3 पुणे और एक औरंगाबाद से थे।

वॉकहार्ट के 270 कर्मचारियों की जांच, जसलोक भी रेड जोन - बीएमसी ने वॉकहार्ट अस्पताल को एक निषेध क्षेत्र (क्वारैंटाइन जोन) घोषित कर दिया है। मुंबई सेंट्रल में स्थित इस अस्पताल में किसी नए मरीज की भर्ती करने पर रोक रहेगी। आयुक्त सुरेश काकानी ने कहा, ‘‘यह दुर्भाग्यपूर्ण है कि हॉस्पिटल में कैसे इतने ज्यादा लोगों में संक्रमण फैल गया। सभी को सावधानी बरतनी चाहिए थी। इसकी जांच के लिए टीम गठित की गई है।’’ हॉस्पिटल में काम करने वाले 270 से ज्यादा कर्मचारियों और डॉक्टरों की जांच कराई जा रही है। मुंबई के जसलोक हॉस्पिटल को भी रेड जोन घोषित कर दिया गया है। जसलोक अस्पताल की छह नर्सों समेत 19 कर्मचारियों में कोरोना की पुष्टि हुई है। इसके बाद इन अस्पतालों में आवाजाही प्रतिबंधित कर दी गई। इसके साथ ही इन मरीजों के संपर्क में आए लोगों को भी क्वारैंटाइन किया जा रहा है।

औरंगाबाद के जिला हॉस्पिटल में कार्यकर्ता एक 38 वर्षीय पुरुष नर्स में भी कोरोना पॉजिटिव आया है, जिसके बाद हॉस्पिटल के कई स्टाफ की कोरोना जांच करवाई गई है। आज शाम तक इनकी भी रिपोर्ट आने की संभावना है।

कोरोना के बढ़ते मामलों के बीच पूरी दुनिया में वेंटिलेटर की मांग में जोरदार वृद्धि देखने को मिल रही है. ऐसे में देश में भी कोरोना के बढ़ते मामले के बीच सरकार वेंटिलेटर को लेकर एक्शन मोड पर आ गई है. सरकार की तरफ से सरकारी अधिकारियों, बड़े कॉरपोरेट घराने और वेंटिलेटर प्रोडूसर का एक व्हाट्सएप ग्रुप बनाया गया है. समय-समय पर वीडियो कांफ्रेंस भी की जा रही है जिसमें केंद्रीय मंत्री पीयूष गोयल एस जयशंकर भी मौजूद रहते हैं जहां वेंटिलेटर के मेगा प्रोडक्शन को लेकर प्लानिंग पर बात की जा रही है.

मुंबई का एवीआई हेल्थ केयर जो वेंटिलेटर बनाने का काम करता है पिछले कई दिनों से इनका काम ठप चल रहा था. कंपनी के मालिक चिराग लगातार सरकार से परमिशन के लिए बात कर रहे थे अब सरकार की ओर से उन्हें परमिशन भी दी गई है और यह भी शेयर किया गया है कि उनकी जरूरत का सारा सामान उनको उपलब्ध कराया जाएगा उनके कर्मचारियों की मदद की जाएगी और उन्हें हर तरह से मदद की जाएगी.  मंगलवार से प्रोडक्शन शुरू करने की तैयारी भी है.

देश में वेंटीलेटर प्रोडक्शन का ज्यादातर काम असेम्बलिंग का होता है जिसके लिए विदेशो से रॉ मैटेरियल इंपोर्ट किया जाता है. ऐसे में जब इंपोर्ट एक्सपोर्ट बंद है उत्पादन बहुत चैलेंजिंग हो जाता है.प्रशासन की तरफ से वेंटिलेटर प्रोड्यूसर को आश्वस्त किया गया है की उन्हें जो जरूरत होगी सरकार उसे पूरा करेगी. मशीन बनाने के लिए जो सहयोगी प्रोडक्शन की कम्पनी होगी उन्हें भी खोला जाएगा. आईआईटी और तकनीकी संस्थानों में हो रहे रिसर्च और भारतीय तकनीकी विकास करने को लेकर बातें की जा रही है.

 देश में सबसे ज़्यादा कोरोना संक्रमण के मामले महाराष्ट्र में है. अबतक कुल 537 मामले सामने आए हैं जिनमें से अधिकांश मामले 306 मुंबई के है लिहाजा कोरोना संक्रमण का ख़तरा मुंबई शहर पर सबसे ज़्यादा है. ऐसी स्थिती में लोगों के ज़्यादा से ज़्यादा टेस्ट और इलाज के लिए बीएमसी ने शनिवार से कोरोना टेस्टिंग क्लिनिक शुरु करने का निर्णय लिया है.

आज से मुंबई नगर निगम में 10 जगहों पर कोरोना टेस्टिंग क्लिनिक की शुरुआत की गई है. क्लिनिक मुख्य रूप से घनी आबादी वाले क्षेत्र में शुरू किए गए हैं. बीएमसी द्वारा दी गई सूचना के मुताबिक़ ये कोरोना टेस्टिंग क्लिनिक सुबह 9 से दोपहर 1 बजे तक यानि चार घंटों के लिए खुले रहेंगे.

क्लिनिक में एक टीम होगी जिसमें एक डॉक्टर और एक नर्स शामिल होंगे. सुबह 9बजे से दोपहर 1 बजे तक चार घंटे की अवधि के दौरान, अस्पतालों में संदिग्ध 'स्वैब' के नमूने भी लिए जाएंगे. इन नमूनों को आवश्यक चिकित्सा जांच के लिए मेडिकल लैब भेजा जाएगा.

चिकित्सा प्रयोगशाला में इन क्लिनिकों में लिए गए 'स्वैब' के नमूने भेजने के लिए आवश्यक परिवहन व्यवस्था, साथ ही स्टाफ की योजना बनाने के लिए विभागीय स्तर और सहायक आयुक्त के स्तर पर निर्देश दिए गए हैं.

ये क्लिनिक ज़्यादातर उन परिसरों में रहेंगे जहां कोरोना पॉज़िटिव मामले ज़्यादा है या जहां संक्रमण का ख़तरा ज़्यादा है. वर्ली, धारावी, गोवंडी, शिवाजी नगर, भिंडी बाज़ार जैसे इलाक़ों में ये क्लिनिक खोले गए हैं.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (एमएनएस) प्रमुख राज ठाकरे ने मरकज में शरीक हुए लोगों पर एक विवादित बयान दिया है. उन्होंने कहा कि मरकज में शामिल हुए लोग जो प्रशासन की बात नहीं सुन रहे हैं और कोरोना फैलने की वजह बन रहे हैं ऐसे लोगों को गोली मार देने चाहिए.

पत्रकारों से बात करते हुए राज ठाकरे ने कहा, ''मरकज में गए लोगों का वजह से देश में कोरोना का ख़तरा बढ़ा है.कोरोना का संक्रमण करने की कोशिश करने वाले ऐसे लोगों को गोली मार देनी चाहिए. इन्हें ट्रीटमेंट नहीं देना चाहिए. अगर ऐसी स्थिती में भी इन लोगों को देश से ज़्यादा धर्म प्यारा है को इन लोगों को किसी तरह की सुविधा नहीं देनी चाहिए.''

राज ठाकरे ने कहा कि ‘इनमें से कुछ लोग अस्पतालों में अश्लील हरकतें कर रहे हैं, पुलिस प्रशासन के अधिकारी कर्मचारियों पर थूक रहे है. इन लोगों को सड़क पर लाकर मारना चाहिए और वो वीडियो वायरल करने चाहिए तभी इन लोगों का दिमाग़ ठिकाने पर आएगा. इन सभी लोगों को किसी अलग जगह पर सबसे दूर रखना चाहिए और इन्हें किसी तरह का इलाज या सुविधा नहीं देनी चाहिए तभी उनको समझ में आएगा.''